Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through April 02, 2007 « Previous Next »

Tivlyabavlya
Saturday, March 31, 2007 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंता नको.. आमच्याकडे नेहेमीच दिवाळी असते.. म्हणजे सगळ्याच गोष्टीत दिवे घेतो म्हणुन म्हट्लं :-)

आणी तुमचे बरोबर आहे..इथे शिकागो ला आल्यापासुन मला बराच फ़ावला वेळ मिळतो आहे त्यामुळे मी माझा आवडता उद्योग सुरु केला आहे.. टि बि :-)
And hats off to all maaybolikars for making my time worthwhile :-)

R_joshi
Saturday, March 31, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाव आणि प्रतिमा... धम्मालच ऊडविली आहे या बीबीवर. :-)

Gobu
Saturday, March 31, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बन्धू, भगिनीनो,
माझ्या नावावरुन काय वाटते कुणी सान्गाल का?


Zakasrao
Saturday, March 31, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु - गोल टमोल गोबीचा गड्डा.
तसाच तु गुबु गुबु गाल असलेला.
डोक्याला फ़ेटा आणि फ़टफ़टीवर फ़िरणारे गावचे पाटील>>>>>
आयला आता हाच वेश करावा लागेल नाहितर कोण झकासराव म्हणणार नाही.

Ravindrakadam
Saturday, March 31, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु अगदि रसरशीत भरलेल्या वान्ग्यासारखे व्यक्तिमत्व असणार!

Chyayla
Sunday, April 01, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे खुप दीवसात ईकडे भटकलोच नव्हतो...
असो धन्स त्या दीशा ला परत एकदा दीशा दील्याबद्दल आणी सुविकास्क ला पण अगदी मान्य की बर्याच जणान्च्या प्रतिमा उजळायच्या आहेत.

सुपरमॉम मला तर ही सुपरमनची आई वाटतेय निळा ड्रेस घालुन समोर मोठा S , गळ्याभोवती कापड गुन्डाळुन (कदाचीत तो उलटा ऍप्रन असावा) आणी एक हात असा वरती करुन उड्डाण करण्याच्या पोज मधे. यान्च्या बद्दल साम्भाळुन लिहिलेल बरे नाहीतर कुठुन आकाशातुन टपकायाच्या आणी तुम्हाला ढिश्शुम्म.. व्हायच.

गोबु झकास जे म्हणतोय ते बरोबर वाटत गोभीच्या फ़ुलाप्रमाणे फ़ुललेले गाल

दीशा नाट्यगीत... दाही दीशा... दाही दीशा उमलल्या आSS आSS ह्यान्च लिखाण प्रत्येक विषयावर आहे म्हणजे अगदी दाही दीशात ज्ञान किर्ती मिळवलीय यान्नी. असे दीसतेय.. पण दीशा हा आयडी घेण्याच्या मागच कारण काही लक्षात येत नाही. तुम्ही लिहिलेल्या माझ्या प्रतिमाबद्दल आभारी आहे हो मी आहेच Happy Go Lucky

अदी म्हणजे आपले प्रिय अदी सेठच ना, सेठ म्हटल की जीसका जीतना बडा पेट वो उतना बडा सेठ, त्यामुळे यान्च्या पोटाबद्दल कुतुहल आहे... तरी याना सेठ का म्हणतात कळाले नाही काही वरिष्ठ मायबोलिकर सान्गु शकतील कदाचित, खर म्हणजे ही पण मिष्किल स्वभावाचे व्यक्ति दीसतेय. "घरचा बॉस" ही पोस्ट तुमचीच ना, ह. ह. पु. वा.
पण माझा मोठ्ठा घोटाळा होतोय असे वाटते मायबोलीवर दोन अदी आहेत वाटत एक अदी७८७ आणी दुसरे नुसते आदी. जाणकारान्नी खुलासा केल्यास मन्डळ आभारी राहील...पण दोघेही आदीमानव वाटतात.

टीवल्याबावल्या तुमचेच नाव टीवल्या बावल्या का? आठवल? हा हा ... (प्रवासातले अनुभव मधले) याचे पण प्रकार आहेत विदुषकी आणी माकडाच्या जशा असतात तशा टीवल्या बावल्या.. मी माझ्या लहान भाच्याला म्हणायचो टीवल्या बावल्या करु नकोस, तर पठ्ठा मोठा झाल्यावर आणी व्ययस्थित बोलायला लागल्यावर मलाच आता म्हणतो "मामा टीवल्याबावल्या करु नकोस".
मला वाटत ह्या व्यक्तिमुळे लहान मुलान्चे भरपुर मनोरन्जन होत असेल. तुम्ही सर्कशीत असता का हो? एक. भा. नि. प्र.? ... माफ़ करा ह पण हे नाव वाचुन हीच प्रतिमा येते डोळ्यासमोर.


सुविकासक ह अगदी गम्भीर चेहरा करुन बसलोय की हा असा कसा हा आयडी म्हणायचा... चला प्रयत्न तर करु या...
या व्यक्तिचा चान्गला विकास झाला असावा जसे एक तर व्यक्तिमत्व, बुद्धी, प्रतिभा आणी प्रतिमामधे. (एक खुलासा उगीचच कुणी याचा अर्थ असा घेवु नये की वजनामधेही चान्गला विकास झाला असावा).. हो ना पहाना सुविकासक तु काही मनाला लावुन घेउ नकोस लोक असेच असतात "वात्रट्ट" कुठले छ्या...
पण (सुविकासक)यान्च्या पोस्ट व शेरे वाचण्यासारख्या असतात. तर चालु द्या तुमच्या लिखाणात असाच सुविकास होत राहो...

रुनी अरे ही ती "रुनी लैला" आहे का? उर्फ़ रुपाली महाजन, आता महाजन म्हटले की माझ्या पहाण्यात बुटकेसे पण मोठे घरन्दाज लोक पहाण्यात आलेत. म्हणतात ना "महाजनो येन गतस्य पन्था:" ते यान्च्याच कडे बघुन म्हटले असावे. पण हे काय.. ई... ई.. हिच्या नावातच पाल आली की.. तुम्हाला सान्गतो मन्डळी मागे काय गोन्धळ घातला होता हो ह्याच पालीनी ईब्लिसपणाच्या BB वर... चला आता सटकतो ईथुन...

चुक भुल देत रहा मी घेतच राहील


Gobu
Sunday, April 01, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, च्यायला, आणि रवी,
धन्यवाद!

मी ही लिहीतो आता:
झकासराव्: झुपकेदार मिशा, प्रचड देह आणि गडगडाटी हसणे (डोकीवर पागोटे आहेच!!!)
सुपरमोम्: कठोर शिस्तप्रिय, हीच्यासमोर हिची काय पण शेजारची मुले ही घाबरुन वागणार (शेजारे नेहमी पुटपुटणार्:हीचे सुनाशी कसे पटणार देव ज़ाणे!)
च्यायला: तोन्डात पानमसाला आणि शिवराळ भाषा, दाढी वाढुन घरी कमी आणि पान दुकानासमोर जास्त आढळणारा!!!
तिवल्याबावल्या: शरीराने बारीक पण खोड्या करण्यात महाउस्ताद, चश्मिश, एका जागेवर जराही न बसणारा!
रवीन्द्र कदम्: नाकासमोर पाहुन चालणारा, चश्मीष, नको तेवढा सरळ, बैन्क किन्वा तत्सम ठिकाणी क्लर्कच्या हुद्द्यावर नोकरी
मित्रहो,
दिवे घ्या ह





Saavat
Sunday, April 01, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


गोबु..
च्यायला,
आरऽऽ त्याच्या मारी...
पानमसाला खावून पिचकारी सोडतानाचा, पानपट्टीसकट, तुझा दाढीसहित फ़ोटू टाक बर लवकर..


Ultima
Sunday, April 01, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो...फ़ोटू तर हवाच................झकासराव तुमचा पण.....{:-) }

Runi
Monday, April 02, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,.....बाबा रे पाल या प्रकाराची मला प्रचंड भिती वाटते, तेव्हा तु असे काही म्हणु नकोस. बाकी मी बुटकी वगैरे मुळीच नाहीये.

ता. क. : आणि ती गायिका रुना लैला आहे, रुनी लैला नाही. C.B.D.G


Gobu
Monday, April 02, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी पुढे:
उल्तिमा: एकदम अल्टिमेट.. सदर व्यक्ती एकतर अतिशय सुन्दर असणार किन्वा कला रसिक
रुनी: डिट्टो जयश्री गडकर ची कॉपी, मुळुमुळु रडणारी मोडेर्न कन्या
लाजो: पक्की पन्जाबन, जाडजुड पण लाजली की कलेजा खल्लास करणारी..
शेषनाग्: अतिशय धार्मिक, दर सोमवारी उपवास आणि पुजा करणारा
न्काशी: ही जापानी कुठे आली इथे? बाकी ही दिसायला नक्कीच जापानी असणार
महेश्: भलामोठा देह (माझे सर्व महेश नावाचे मित्र असेच आहेत), मिश्कील आणि समन्जस
सखी: दोन वेण्या घालणारी, आणि नेहमी हळदीकुन्कुवाच्या कार्यक्रमाला चाललीय असे भाव, सात्वीक पण वेन्धळी
सुविकास्क आणि सावट्: या नावावरुन काहीच बोध होत नाहीय


Sakhi_d
Monday, April 02, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>सखी: दोन वेण्या घालणारी, आणि नेहमी हळदीकुन्कुवाच्या कार्यक्रमाला चाललीय असे भाव, सात्वीक पण वेन्धळी>>

गोबु मस्तच.... :-) मजा आली वाचुन.
आणि दोन वेण्या नाही एकच वेणी....... :-)

तुझ्या नावावरुन झकासने मांडलेल्या मताला अनुमोदन...


Ravindrakadam
Monday, April 02, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु, फारच छान!
दोन डोळ्यानी अगदि स्पष्ट दिसते मला!
झकासरावानी तुझ्याबद्दल मान्डलेल्या मताला मी सहमत आहे.


Nkashi
Monday, April 02, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु, मी जापानी नाही हो.... अस्सल मुंबैकर आहे... आणि आता पुणेकर... :-)

Runi
Monday, April 02, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी: आणि नेहमी हळदीकुन्कुवाच्या कार्यक्रमाला चाललीय असे भाव, सात्वीक पण वेन्धळी >>>
नावावरुन काय काय भन्नाट प्रतीमा उभ्या केल्या आहेत सगळ्यांनी एकदम मजा येतेय वाचायला.
रुनि


Disha013
Monday, April 02, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो च्यायला,तुम्हाला माझ्या 'ज्ञानी' posts कुठे दिसल्या? :-) anyways , थांकु. आणि माझा Id सगळिकडे दिसतो, कारण तो माझा एकुलता एक Id आहे.!

अजुन काही नावे....

मनिशा लिमये--साधीसुधी,अबोल अशी घरात रमणारी गृहिणी.
मृण्मयी-- artistic , अभिमानी,हुशार
टुलिप्---स्वत्:ला maintain करणारी, avg पेक्षा जराशी उंच आणि प्रसन्न हसु असणारी आणि बडबडी.
स्वाती---या नावाच्या मुली बुटक्या पण हुषार असतात.
दिवे घ्या हं..



Bhagya
Tuesday, April 03, 2007 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल सुरु आहे की या बी बी वर......ज्या कोणी सुरु केला असेल त्याचे कौतुक करायला हवे.

Adi787
Tuesday, April 03, 2007 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, सहिच... मी शेठ सारखा तर नाही.. हो आदि आहे आनि मानव ही.. पण आदिमानव मात्र नाही.. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेले आदी दुसरेच असावेत ....


Chyayla
Tuesday, April 03, 2007 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला: तोन्डात पानमसाला आणि शिवराळ भाषा, दाढी वाढुन घरी कमी आणि पान दुकानासमोर जास्त आढळणारा!!!

व्वा क्या बात है...एकदम पटल म्हणायच राव.. च्यायला ची प्रतिमा अशीही असु शकते.. आजपर्यन्त कुणी माझी अशी प्रतिमा केलीच नव्हती.

आणी सावटअल्टिमा म्हणताहेत फ़ोटु टाका... वाट पहा... म्हणजे दाढी वाढायला, ईकडे अमेरिकेत पानपट्ट्या सुरु व्हायला वेळ लागणारच ना... बाकी Public Demand वर माझे व झकास चे फ़ोटु आहेत की ऑर्कुटच्या सन्केत स्थळावर.

दीशा पहा बर तु ईथेच किती छान "ज्ञान" दाखवले तुझी ही शैली म्हणजे "ज्ञान हे विनयाने अधीक शोभुन दीसते" याचा प्रत्यय देणारे आहे, पण तुझ्या चौफ़ेर व्यक्तिमत्वाला मानल बुवा... आणी हो मी पण एकच आयडी वापरुन धुमाकुळ घालतोय. Same pinch ..

रुनी ओहो ती रुना लैला होय... माहिती बद्दल धन्यवाद, वेन्धळेपणाचे पेटेन्ट घ्यावे लागेल आता मला. बुटके यासाठी की माझ्या ओळखिचे एक कोकणातले महाजन होते पुर्ण परिवार हा बुटकाच पण सगळे खुपच हुषार.. तेच कारणीभुत आहेत माझ्या स्वछ, निर्मळ मनात अशी प्रतिमा निर्माण करायला... तुमच्या रु"पाली" नावातच पाली आहेत आता कस करायच बुवा...

अदी हो ते अदी दुसरेच असावेत तुमच्या पोस्ट खुप वाचण्यात नाही आल्यात पण जेवढ्या आल्यात त्यावरुन एक दिलखुलास, मोकळ्या मनाचे दीसात आहात.

आता आपण एक गम्मत करु या BB मधे जो पण डोकावेल ना त्याची प्रतिमा निर्माण करुन स्वागत करु.

तर आता या भाग्या आल्यात.. तो हो ज्जाये शुरु... माझ्या कडुन हा एक प्रयत्न.
भाग्यश्रीजी नमस्कार तुम्ही जयन्त कुळकर्णी यान्चे कौतुक करा.

भाग्या आयडी वाचुन मला ना ते टपोरी नाव असतात ना खट्या, नान्या, चन्द्या, बन्ड्या, पेन्द्या.. अजुन काही त्यासारखेच ही भैन लोगोन्की टपोरी ग्यान्ग मधल नाव वाटत.. ए भाई लोग बघता क्या है.. सलाम करो.. भाग्या आयेला है.



Tivlyabavlya
Tuesday, April 03, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला...सर्कशीत तर विदुषक व्हायचा चान्स नाही मिळाला.... आणी कोणी आदर्श पण डोळ्यासमोर नव्हता....पण हो इथे मायबोली वर तुमच्या पावलांवर पाय टाकायला नक्किच आवडेल... :-) वैदर्भियन भाषेत म्हणायचे झाले तर... मी एक "काडेल पोट्टा" आहेच....लहानपणापासुन..आणी आजतागायत मी तो "काडेलपणा" करत आलेलो आहे... त्यामुळे आशिर्वाद असावा..

आणी गोबु साहेब..तुमच्या गेसवर्क ची कमाल आहे... तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे मला चश्मा आहे....एका जागेवर बिल्कुल बसत नाही....फ़क्त शरिरयष्टी जरा तुमच्या नावाप्रमाणे थोडी "ग़ोबु" आहे..:-)





चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators