Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 31, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through March 31, 2007 « Previous Next »

Giriraj
Wednesday, March 14, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मगच्याच महिन्यात झालेल्या माझ्याच लग्नात मुलीने हार घातल्यावर मी हार घालायचेच विसरलो आणि वेगेवेगळे फोटोग्राफर सांगत होते तसेच करत बसलो... हार घाला म्हणून ईतरांकडून आणि दस्तुरखुद्द मुलीकडून आवाज आला तेव्हा मी माझ्या समोर केलेला हार घातला... :-)
होते असे कधी कधी.. प्रथमच लग्न करत होतो नाऽऽ! :-)


Suvikask
Wednesday, March 14, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथमच लग्न करत होतो नाऽऽ!.... great आहात

आता लग्नानंतर बर्‍याच गोष्टी प्रथमच करतात... मग ते कस manage केल?


Zakasrao
Wednesday, March 14, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होते असे कधी कधी.. प्रथमच लग्न करत होतो नाऽऽ!>>>>.
गिर्‍या आताच नाव आणि प्रतिमा वाचुन आलोय आता इथ मात्र हद्द झाली रे. असा कसा रे तू. अब तेरेको बराबर सजा मिलेगी. बायकांची मेमरी लग्नानंतर हार्डडिस्क होते त्या सगळ लक्षात ठेवतात. (स्वानुभव आहे ) आता हे आणि ते सिमरन एकत्र
झालकी तु आता मात्र हेल्मेट सहीत सगळे गार्ड घेउनच घरी entry कर बाबा.


Mahesh
Wednesday, March 14, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, कोणाला अर्धचंद्र द्यायचा आहे ?
अर्धचंद्र देणे म्हणजे नोकरीवरून काढून टाकणे किंवा हाकलून देणे.


Mahesh
Wednesday, March 14, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आता लग्नानंतर बर्‍याच गोष्टी प्रथमच करतात... मग ते कस manage केल?
का छळता त्यांना ? बिचारे आधीच परेशान असावेत...

Badbadi
Wednesday, March 14, 2007 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या, .... दिनेश ने एक मायबोलीकर या नात्याने एक टप्पल नाही का मारली तुला??

Ultima
Wednesday, March 14, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी.... आज पहिल्यांदाच मराठीत लिहितेय...खुप मस्त वाटलं. पण हे स्य्म्बोल्स्/ फ़cएस कसे बुवा टाकयचे

Sheshhnag
Wednesday, March 14, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होते असे कधी कधी.. प्रथमच लग्न करत होतो नाऽऽ!

म्हणजे....?

Ultima
Wednesday, March 14, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथमच म्हणजे??................. ये शेष मला पण सांग ना हे चित्र कसं आल??

Sheshhnag
Wednesday, March 14, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार सोपे आहे...
/cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi इथे जा, हवं ते मिळेल...

Mrinmayee
Wednesday, March 14, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज नवर्‍याला लंचबॉक्स देताना दह्याच्या डब्या ऐवजी सावर क्रीमचा डबा दिलाय!

Anilbhai
Wednesday, March 14, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही काळजी करु नकोस. सावरेल तो ह्यातुनही. :-)

Dineshvs
Wednesday, March 14, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी, बाळाला टपल्या मारमारुन आता माझीच मला लाज वाटायला लागलीय.
भाचीच्या ताब्यात दिलाय त्याला.
माणसळवायचा प्रयत्न करत्येय बिचारी.


Mrinmayee
Wednesday, March 14, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावरेल तो ह्यातुनही.
सावरला सावरला!!! ('ऑफिसजवळच्या मेक्सिकन हॉटेलातून टाको घेऊन येईन' म्हणालाय!)


Runi
Wednesday, March 14, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो गिरीराज धन्य आहात, पण तुम्ही लग्नात फक्त हार घालायचा विसरलात. मी गावाकडे एका लग्नात बघितलेय की लग्न लावायच्या वेळी वधु आणि वरा कडच्यांना समजले की त्यांनी लग्न लावण्यासाठी भटजीच बोलवले नव्हते.....मग ही पळापळ... धमाल आली

Sunidhee
Wednesday, March 14, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय थॅन्क्स.. महेश :-). गिर्राज नशीब तुझ्याच लग्नात हा घोटाळा केलास.. नाही म्हणजे तिसर्‍याच्या लग्नात गडबडीत 'तु' हार घातला असतास तर बर दिसलं नसतं ना?

Yogesh_damle
Friday, March 16, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो पानातलं टाकून टाको घेऊन आला? :-)

माझा एक सीनिअर लग्नात बायकोकडे इतकी टक लावून पाहत होता की बाकी सगळं विसरला! अर्धा अल्ब्म भरून तसले फोटो आहेत शहाण्याचे! [:-)]

Yogesh_damle
Friday, March 16, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा वेंधळेपणा.. वरच्या पोस्टवरचा स्माईली [ ] अशा कंसात टाकला! Orkut ची सवय!! :-)

Disha013
Friday, March 16, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा छान वेंधळेपणा चालु आहे!
माझ्या एका मावशीचे लग्न दोन्ही बाजुंना मध्यवर्ती पडेल म्हणुन पुण्यात ठेवले होते. आणि घरुन निघताना तिच्या सासरच्यांना द्याय्च्या मानपानाच्या साड्यांची पेटीच घरी विसरलेले सगळे. पुण्याला गेल्यावर लक्षात आले. नशीब वेळ मिळाला होता. मग काय पटापटा दुसर्या साड्यांची खरेदी झाली. :-)


Chyayla
Sunday, April 01, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका १ एप्रिलला मी चुकुन ४,५ मीत्र, मैत्रीणी, सहकुटुम्बीयान्ची अशी आमच्याच घरी छोटीशी पार्टी ठेवली अर्थात त्यात सगळे आमच्याच कॉलनीतले राहणारे. सगळी तयारी केली सगळ्याना निरोप दीले सगळ्यानी अगदी हसत हसतच येतो म्हणाले.. होता होता सन्ध्याकाळ झाली पण कुणाचा पत्ताच नाही. आम्ही आपली वाटच पहात बसलो.

थोडा वेळ झाला तेन्व्हा एका कुटुम्बातले दोन छोटेसे भावन्ड आलेत आणी आईला म्हणाले आम्ही ईकडुन जात होतो तर पाणी प्यायला आलोत मी त्याना म्हटल कारे आई-बाबा नाही आलेत?... तर म्हणाले येतील आताच आम्हाला वाटल की तुम्ही एप्रिल फ़ुल बनवताय.

मग कुठे उलगडा झाला आणी मी धावाधाव करत प्रत्येकाकडे परत गेलो आणी शप्पथ घेउन सान्गितले की अहो खरच पार्टी आहे म्हणुन बापारे किती आणी कशी खात्री पटवुन देउ असे झाले होते आणी तरी पण कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हत.. माहिती आहे माहिती आहे तुझ्यावर कसा विश्वास ठेवणार आणी तोही १ एप्रिलला... असे काही एकुन घ्यावे लागले. (ईब्लिसपणाचे दुष्परीणाम)

शेवटी एका काकुना गाडीवर घरी घेउन आलो आणी सगळी पार्टीची तयारी दाखवली तेन्व्हा कुठे सगळ्यान्चा विश्वास बसला व शेवटी मस्त पार्टी झाली.

आजही १ एप्रिल तारीख पाहिली की मला ही १ एप्रिलची पार्टी आठवते...
ही.. ही... मायबोलीकरान्नो तुमची वाट पहातोय येताय ना पार्टीला.. अरे निदान आता तरी विश्वास ठेवा


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators