Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 28, 2007

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » QLC » Archive through March 28, 2007 « Previous Next »

Konitari
Sunday, April 09, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही.. कालच जॉईन ज़ालो (हा शब्द कसा नीट लिहायचा ?) मायबोलि पण वाटतेया कि अरे हे तर माज़ेच (परत चुकला) जुने मित्र आहेत.. मी या QLC चा first hand अनुभव घेतलाय.. आणि थोडे analysis करायचा पण प्रयत्न केलाय..

जी माणसे च्नचल (अनुस्वार कस द्यायाचा :-) ?) असतात त्याना हा
problem जास्त प्रमाणात जाणवतो..

साधारणतह:..
college सम्पुन २-३ वर्षे छाली (your mileage may vary ) कि QLC creep in व्हायला सुरुवात होते.. तेन्व्हा थोडे स्थेर्य आले अस्ते आयुश्याला.. आधीची २५ वर्ष.. नाही म्हट्ले तरी एका rat race मधे धावत असतो.. शाळा.. शाळेतले grades.. eng / medical ला admission.. परत त्यात चान्गले marks मिळवायला परिश्रम.. MS वगिरे करायचा असेल तर GRE साठी efforts.. admission ची धावपळ.. US / परदेशामधे येण.. परत classes, tests, TAs/ part time jobs मधली धावपळ.. या सगळ्यात गाडी खुप तापली असते.. मग when you join your new job.. सुरुवातीला सगळा नवीन, नवीन वाटत.. तेन्व्हा you are very excited.. त्यामुळे काय करु नी काय नको असे होत.. but साधारण तुम्ही रुळलात जॉब मधे.. कि त्यातल नाविन्य सम्पत.. आणि मनाला अचानक एक रिकामे पना जाणवायला लागतो.. दहावीचि बारावीची परीक्शा ज़ाल्यावर कस होत त्याप्रमाणे आयुश्याची गाडी neutral वर आधिच्य momentum वरच पुढे जात असते.. तुम्हाला traction मिळत नाही हवे तेवढे.. आणि gear मधे टाकायचा पण कन्टाल येतो..जातेय न पुढे तर जाउन्दे… असे वाटते.. (ज़े automatic transmission च्या गाड्या वापरतात त्याना कलणार नाही हे :-) )

मला अस ३ वेळा ज़ालाय आत्तापर्यन्त
QL नन्तर ६ वर्षात.. :-) .. latest being just 3 months back…प्रत्येक वेळेला बाहेर आलोय मी याच्यातून.. कसा.. गाडी चढावर नेउन.. चढावर नेली.. कि ज़क मारत तुम्हाला neutral मधुन काढावी लागते.. accelerator द्यावा लागतो.. मग तुमचा engine idle करण थाम्ब्त.. :-)

हा एक उपाय नेहमीच
work ज़ालाय माज़्या बाबतीत change your surroundings.. school, job, location, जायच्या यायच्या वेळा, restaurants anything and everything.. ( तुमच्या limit मधे ..offcourse :-) ) ज्यामुळे तुम्हाला नवीन अनुभव, challenges मिळतील.. your mind will be engrossed in that.. आणि QLC will not be an issue anymore..

मी दुसरा पण approach try केलय.. तो म्हण्जे गाडीत अजुन एक passenger घेने.. जमला नाही तो.. त्याविषयी my crushes ( actually my heart breaks असा असेल तर तिथे जास्त appropriate होइल तो.. :-) ) this is also very effective.. माज़्या मित्रान्च्या उदाहरणावरुन सान्गू शकतो.. you become so busy.. and happy also (atleast initially ;-) ) that QLC वगेरे non-existent होते.. but this is very risky and should be tried with utmost care.. changing your passenger or not able to "pick" desired passenger may bring more crisis (and more serious) than QLC :-)

तिसरा.. आणि more permanent उपाय म्हण्जे you really start looking for peace of mind.. and start exploring.. like meditation etc. but I have not tried this.. and I think its more appropriate for HLC.. :-)

What say...


Maudee
Monday, April 10, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी हा problem एकदाच face केलाय.....
मला काही म्हणजे काहीही करायचा कन्टाळा यायचा.....
शेवटी वैतागुन मी doc कडे गेले....
result was .... my hemoglobin was too low ....त्यामुळे काहीही करायचा उत्साह नसायचा........


Kharamulaga
Wednesday, March 07, 2007 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, हे वाचून फ़ार बरे वाटले की हे फ़क्त मलाच होत नाही तर सर्व २०-३० वयातल्या लोकांचे दुखणे आहे. अगदी खरे सांगायचे तर गेल्या ३ महिन्यापासुन मीही या त्रासातच आहे. म्हणजे त्रास काहीही मिळवण्याचा नाही, तर एक प्रकरचा वैतागलेपणा. आणि मी ही मुंबईचा, म्हणजे मु.बईकराना कुठला हा त्रास वगैरे काही नाही पण सर्व छंद, जे मी पुर्वी खूप आवडीने करायचो ते ही करवत नाहीत. एक भाबडा प्रश्न, कधी जाते हो ही फेज अवस्था?

Nandini2911
Thursday, March 08, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला. मी एकदा अशीच कंटाळून नोकरी सोडून घरी गेले होते. चार महिने नुसती घरी होते. दिवसरात्र टवालक्या आणि इतर उपद्व्याप.. पण काही काम म्हटलं कि नको व्हायच्न. दोन तीन जॉबच्या ऑफ़र आल्या त्याही फ़ोनवरूनच जमणार नाही असं उत्तर देऊन मोकळी झाले.

हे पण QLC च आहे का?

मला एकटेपणा फ़ार सतावतो. कुठच्याही गोष्टीचा कंटाळा प्रचंड प्रमाणात येतो. मी relaxation साठी योग करते पण तरीही १५ दिवसातून एकदा तरी कंटाळा आला म्हणून ऑफ़िसला सुट्टी मारते...

आधी या बाबीचा एवढा विचार केला नव्हता पण वरती सर्वाचं वाचून वाटतय की मी एकटीच नाही आहे.


Tawaal
Thursday, March 08, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी QLC मध्ये लग्न केलं आणि ROLC मध्ये अडकलो

Runi
Thursday, March 08, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टवाळ, हे ROLC म्हणजे काय?
QLC = Quarter Life Crisis हे माहीत आहे मला.
रुनि


Kharamulaga
Thursday, March 08, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणितरीचा पोस्ट वाचुन छान वाटले आणि या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण साधारण १५ दिवसानंतर परत तेच.

Sunidhee
Thursday, March 08, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीतरी ने गोंधळुन टाकलं बुवा.... मराठी शब्द वाचेपर्यन्त इन्ग्लिश शब्द येतात.. आणि इन्ग्लिश शब्द वाचे पर्यन्त मराठि शब्द येतात.. आणि मग ईं-म-ईं-म होत रहातं

Parinitawife
Thursday, March 08, 2007 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती आनंद झाला मला माझ्या सारखेच कंटाळणारे तुम्हा सार्‍यांना बघुन:-) आजच सकाळी काही कारण नसतांना कंटाळा आला, छान मराठी गाणी लावली, मायबोलीवर आले पण कश्यातच मन गुंतेना, आता परत मायबोली वर आले व ही बीबी नेमकी काय म्हणुन उघडली. आता बर वाटतय.

Tawaal
Friday, March 09, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी,
ROLC= REST OF LIFE CRY-SIS (crisis)

Disha013
Friday, March 09, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मुलांनो,चाचा नेहरु सांगुन गेलेत ना 'आराम हराम आहे'.
जरुरीपेक्षा जास्त विश्रांती घेवु नका. उशीरा उठु नका.
सकाळी लवकर उठुन बघा, दिवसभर ताजेतवाने वाटेल,कंटाळा येणार नाही.
मी स्वता: अनुभव घेतलाय. माझे मस्त आरामात चालाय्चे सगळे पुर्वी
उशीरा उठण्याने सुस्ती राहाय्ची सतत. कंटाळा पाचविलाच पुजलेला असायचा. लवकर उठले ना की जादु झाल्यासारखा फ़रक पडतो मानसिक स्थितीवर. बघा प्रयत्न करुन.
आणि मायबोलीवर २,४ ओळी लिहिल्या तरी कोणाशीतरी बोलाय्चे समाधान मिळते. :-)


Nandini2911
Saturday, March 10, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाचाजी म्हणाले आराम हराम आहे.. आपला शत्रू आहे..
गांधीजी म्हणाले. शत्रूवर प्रेम करा.
कुणाचे ऐकावे बरे?


Limbutimbu
Saturday, March 10, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> कुणाचे ऐकावे बरे?
दोघान्चही ऐक, त्यातच तुझ भल हे!


Zakasrao
Saturday, March 10, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.cerebralpalsymiracle.org/

इथे येवुन आपल्या QLC वर चर्चा करणार्‍या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो जरा वर दिलेल्या लिंक वर जावुन पहा.मग आपल्या आयुष्याकडे पहा, विचार करा आणि मग ठरवा की काय होतय ते. मला तर स्वत्:ची लाज वाटली मी उगीचच crisis crisis करत होतो म्हणून. तुम्हीही बघा. तिथे जावुन feedback देवुन या.

Zakasrao
Saturday, March 10, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वत:चं सामान्यत्व फार छळू लागलं की
म्हातारीच्या पिसाकडे बघावे. स्वच्छंदपणे कसे उडत असते हवेत.
आपल्याला कोणी गरूड म्हणत नाही याची त्याला खंत नसते.
बळकट पंख नसल्याचा खेद नसतो. आकाशाचा अंत गाठण्याचा हव्यास नसतो.
अन पृथ्वीचा ठिपका होऊन जाण्याइतकी उंची गाठण्याचा मोहही नसतो.
आपल्या मस्तीत भिरभिरत, हवेशी जुळवून घेत,
आपल्या हलक्या अस्तित्वाला सहजपणे स्विकारत, ते मजेत जगून घेते.
उंचावर गेल्यावर त्याला जमिनीची भीती नसते.
अन् जमिनीवर उतरल्यावर नसतो आकाशाचा मोह.

म्हणूनच स्वत:चे सामान्यत्व छळू लागलं की
बघावे
नि:संग भिरभिरणाऱ्या म्हातारीच्या पिसाकडे.

नेटवर कुठतरी वाचलय.

Limbutimbu
Saturday, March 10, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> नेटवर कुठतरी वाचलय.
नक्कीच, मी ते लिहिलेल नाही कुठेच!....DDD
असली सन्देशवजा स्वगत आपुनको नै जमता रे बाबोऽऽ

Zakasrao
Tuesday, March 13, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! ऐकल वाटत सगळ्यानी माझ?

Ultima
Tuesday, March 27, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कुणीतरी ने गोंधळुन टाकलं बुवा......... आणि मग ईं-म-ईं-म होत रहातं"
सुनिधी... मला पण तसच झालं. बहुतेक कुणितरी ने ठरवलं असेल की
"इफ़ यु कान्ट कन्हविंन्स देम जस्ट कन्फ़्युज देम"

हो की नाही रे लिम्बुटिम्बु


Zakasrao
Wednesday, March 28, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वत:चं सामान्यत्व फार छळू लागलं की >>>
हे स्वगत किंवा कविता क्षिप्रा यानी दिलेल्या माहितीनुसार संजिवनी बोकिल यांची आहे.
अल्टिमा तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?


Kharamulaga
Wednesday, March 28, 2007 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव,
तुमची ही गोष्ट मात्र पटली की ही बहुधा सामान्यत्वाचीच जाणिव असावी जी आजकालच्या मुलाना अचानक चालून येते. प्रचंड गतिमान असणारे आयुष्य अचानक थांबते नोकरीत स्थैर्यता आल्यावर आणि परिणाम होतोच.

बहुधा या अवस्थेचे काहीही उपाय नाहीत, ज्याचे त्याने बाहेर पडावे. मी तरी बाहेर पडलो असे वाटते आहे कारण मी देशातुन सरळ अमेरिकेतच आलो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators