Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 15, 2007 « Previous Next »

Chyayla
Tuesday, March 13, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिचारा जॉन कसल्या सन्कटातुन वाचला म्हणायचा... खर सान्गु केवळ या साठीच आपण शिनेमामधे हिरोगीरी करणाच्या भानगडीत नाही पडलो... थोड विषयान्तर पण माझ एक निरिक्षण आहे... अगदीच जुजबी... या पन्जाबी मुली ना भलेही लग्नापुर्वी चवळीची शेन्ग तर लग्नानन्तर गवळीची म्हैस होतात. त्यामुळे ही सिमरन ही तशीच असेल यात मला काही शन्का नाही.

पण मला एक प्रामाणिक पणे वाटत आपण या BB वर मायबोलिवरची नाव व आयडी बद्दलच लिहिले तर जास्त मजा येइल.. बाकी येउ द्या..

GS1 मला वाटत दीनेश प्रमाणेच मायबोलीवरचे आदीमानव आहेत माझ्या वाचण्यात त्यान्चे काही पोस्ट आलेत त्यावरुन ते एक विचारी, मुद्देसुद लिखाण, लोकान्वर निश्चितपणे छाप सोडेल असे प्रभावी व्यक्तिमत्व अशा व्यक्तिकडे लोकान्ना आकर्षित करुन आपलस करुन न घेतले तरच नवल, यान्चा उल्लेख करताना शेवटी "जी" नक्कीच लावत असतील, शिवाय हरहुन्नरी व कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करुनच मत मान्डणारे असे वाटतात.


Runi
Tuesday, March 13, 2007 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्नापुर्वी चवळीची शेन्ग तर लग्नानन्तर गवळीची म्हैस होतात>>>
च्यायला, ...खो खो खो

Lajo
Wednesday, March 14, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्नापुर्वी चवळीची शेन्ग तर लग्नानन्तर गवळीची म्हैस होतात.

हा हा हा सहीच च्यायला. या मधे पंजाबी बायकांबरोबर गुजराथी आणि मारवाडी बायकांचाही समावेश केला पाहिजे.


Sakhi_d
Wednesday, March 14, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chayala thanks मलाही हे नाव खुप आवडते आणि अशीच आहे मी सतत हसणारी आणी हसवणारी.... :-)

आणी चाफ़्याबद्दल लिहिलेलेसुद्धा बरोबर आहे. कधी कोणाची विकेट घेईल ह्याचा नेम नाही


Zakasrao
Wednesday, March 14, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रबोध : हुशार, सगळ्या बाबतीत उत्साही, खुप मित्रमैत्रिणी असणारे, वेगळ्या वाटेने जाणारे >>>>>>>मीनु मला तर प्रबोध वरुन दिल चाहता है चा सुबोध च आठवला.
अपर्णा : गरीब, चाकोरीत राहणार्‍या .. कधी कधी खाली मुंडी >>पाताळ धुंडी असा अनुभव येऊ शकतो. >>>
मनिषा : व्यवहारी, स्वार्थी .. >>>>>
राहुल, योगेश : happy go lucky, दिखाव्याची आवड असणारे >>>>
मीनु
सिमरन... गोरी गोरी,उंच,परफ़ेक्ट फ़िगर ,डोळे अगदी आमंत्रित करतिल असे असलेली मुलगी असते नेहेमी... हाऽय!दीर्घ सुस्कारा!>>>>
गिरि घरी गेला कि डोक्याला हेल्मेट घालुन entry कर. खुप मोठा प्रमाद केलायस तु.

च्यायला तु अशक्य आहेस.

Sheshhnag
Wednesday, March 14, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कसा दिसत असेन??

Meenu
Wednesday, March 14, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला अरे माझं नाव मीनाक्षी आहे .. बाकी तु म्हणजे सुटलाच आहेस अगदी .. आणि मी लिहीलेल्या नावांपैकी काही नावं आहेत हं मायबोलीकरांची ..

Rupali_rahul
Wednesday, March 14, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम सुंदर बीबी झालय हा. वाचताना प्रत्येक पोस्टला हसुन हसुन पुरेवाट होत होती...

अभिजीत एकंदर भेटलेले अभिजीत एकदम सरळमार्गी, मस्तीखोर पण फ़ारच प्रेमळ.
राहुल म्हणजे एकदम शांत, समंजस आणि खेळकर वृत्तीचे असा माझ अनुभव होता. पण...
राज, रित्विक एकदम भारदस्त व्यक्तिमत्व, स्मार्ट आणि handsome असलेली मुल... माझी आवडती नाव...
सचिन, प्रशांत, समीर, योगेश एअक्दम टवाळखोर आणि उनाडके भेटले.
दिपाली, कुसुम, सुमन शांत, समंजस, भोळ्या भाबड्या मुली...

पण इकडे भेटलेले मायबोलिकर मी केलेल्या कल्पनेपेक्षा वेगळे भेटले...
नीलम मला भेटलेल्या नीलम सगळ्याच एकदम आर्टीस्टीक, शांत, समजुतदार होत्या, नीलुताई पण आर्टीस्टीक आहे पण शांत मुळीच नाहीय.. मस्त खेळकर स्वाभावाची
अंजली शांत संयमी, दुरदर्शी, वास्तववादी. आणि अंजु एकदम मस्तीखोर वैगरे...
नंदिनि आयडि आणि कथेवरुन एकदम, विचारांत प्रगल्भ असणारी मोठी बाई वाटली पण भेटल्यावर एकदम चंचल, अखंड बडबड करणारि, अगरबत्तीसारखी बारिक मुलगी.
श्यामली एकदम मस्त लेखिका, छान मस्त खेळकर आणि हसमुख स्वभावाची आणि हा अंदाज एकदम बरोबर ठरला, एकदम बडबडी आणि खेळकर...
लोपामुद्रा एकदम भारदस्त व्यक्तिमत्वाची, विचारी, शंत, संयमी वैगरे.. पण ही पण माझ्यासारखीच बडबडी, मस्तिखोर आणि सुंदर लेखिका...
मनिषा एकदम बडबडी आणि अंदाजाप्रमाणे तशीच आहे.

दत्तराज नावाने एकदम सरळसाधा, निरागस असा वाटला होता पण प्रत्याक्षात कोणाचे पाय कसे, कधी खेचावेत याची वाट बघत असतो, पण कमेंट करुन सगाळ्यांना हसवणारा...
मिलिंद शांत, समजुतदार आणि विचरी वैगरे... एकदम सभ्य, गंभीरप्राणि. मायबोलीवरिल दोन्हि मिलिंद वेगवेगळे आहेत, एक उत्ताम विडंबनकार, दुसरा स्वताच्या बोलण्याने एकदम हसविणारा, कोणालाही चिडविणारा, मस्करी करणारा पण अतिशय caring ...

कृपया, सगळ्यांनी दिवे घ्यावेत... बाकीचे नंतर कधीतरी...


Ultima
Wednesday, March 14, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरे आरे हे सार्वजनिक बारसे प्रकरण एकदम जोरात सुरु आहे की...

सखी: एकदम प्रेमळ, जिवाभावाची एक मैत्रीण वाटते.

च्यायला:- मिस्किल, सगळ्यांच्या विकेट घेणारा एक सच्चा दोस्त.

झकासराव:- गावचा पाटील, नावाप्रमाणेच झकास डोक्यावर टोपी हातात एक बिडी.....सॉरी हं...पण अशीच प्रतिमा येते डोळ्यासमोर....



Gurudasb
Wednesday, March 14, 2007 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त मजा आणली आहे या बीबी ने . शरद उपाध्येंच्या राशीचक्राची आठवण येते . चालू द्या .

Dinesh77
Wednesday, March 14, 2007 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेषनाग,
तुमच्या कपाळावर १० चा आकडा आहे का हो?
ए. भो. प्र.
:-)


Chyayla
Wednesday, March 14, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेषनाग,
तुमच्या कपाळावर १० चा आकडा आहे का हो?

दीनेश सहीच... मला पण हाच प्रश्न पडला हा आयडी वाचुन, शिवाय डोक्यावर चान्दोबा आही की पृथ्वी धारण केली आहे ते पण विचारावस वाटत. बाकी सुदर्शन नावावरुन ह्या व्यक्ति गोर्या, शान्त म्हणजे हळु हळु काम करणारे व उन्च असु शकतात असे वाटत. पता नही और क्या चक्कर चलाते होगे.
मला एक भाबडी शन्का आहे.. मायबोलिवर मुषक, उन्दीरराज, बेडुकराव, मन्डुक असले आयडी दीसत नाहीत कदाचित या सगळ्याना हा शेषनागच जबाबदार असावा... हो कि नाही हो मित्रान्नो


लग्नापुर्वी चवळीची शेन्ग तर लग्नानन्तर गवळीची म्हैस होतात.

हा हा हा सहीच च्यायला. या मधे पंजाबी बायकांबरोबर गुजराथी आणि मारवाडी बायकांचाही समावेश केला पाहिजे. ... इति लाजो

धन्यवाद रुनि, लाजो... अरे अजुन कुणाची म्हैस सुटली असल्यास(दोन्हि अर्थानी) लाजो कडे नोन्दणी करु शकता.. मला सध्या वेळ नाही शेन्गा निवडायच्या आहेत अजुन

उल्टिमा तुला पण धन्स... सच्चा मीत्र म्हटल्याबद्दल... बाकी तुझ्याबद्दल विचार करुन सान्गेल.. घाबरु नको नन्तर विकेट नाही घेणार ह.



Runi
Wednesday, March 14, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, तू ultima या ID उच्चार उल्टिमा केल्या मुळे मला डोळ्यासमोर एकदम शिर्षासन ( shirShaasan , हा शब्द असाच लिहायचा ना?) करणारी हल्लीच्या चित्रपटातली 'मा' (स्मिता जयकर) डोळ्यासमोर आली ना. मग जाम हसायला आले.
हा आय डी बहुदा ultimate चा शॉर्ट फ़ॉर्म म्हणुन घेतला असावा असे मला वाटते. C.B.D.G.
रुनि


Adi787
Wednesday, March 14, 2007 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, सहिच .. शेंगा चांगल्या निवड रे बाबा.. नाहि म्हटलं शेवग्याच्या निवडशील नाहीतर ...

बाकी, लाजो नावा वरुन ती व्यक्ती म्हशिंची नोंदनी करणारी असेल .. वाटले नव्हते.

हो बरोबर रुनी, तशी ही पन च्यायलाचि वीकेट्च दिसते


Lajo
Wednesday, March 14, 2007 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो च्यायला, शेंगा निवडून झाल्या की जरा मदतीला या बरं... काय आहे आजकालच्या म्हषी लई हुल्लड आणि त्यातुन सुटलेल्या म्हषी मला एकटीला नाही हो आवरायच्या!!!

आदि७८७, लाजो हे एखाद्या भैय्यीणी च नाव नाही वाटत तुम्हाला? उच्चार करताना थोडा UP style करा.

आणि आता imagine करा मी कशी दिसत असेन ते!!!!


Chinnu
Thursday, March 15, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>चिनु -- बारिक चणीची मुलगी येते समोर.
दिशाताई, थॅंक यु हं! :-)

Adi787
Thursday, March 15, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो, "सुटलेल्या म्हशी" ... गड्बडा लोडिंग ...

भैय्यनी म्हनजे एक भारदास्त व्यक्तिमत्व, पान खावुन एक हाती लाठी असलेली आणी "सुटलेल्या म्हशी" हाकणारी.. बापरे.. म्हन्जे एकंदरीत भयंकरच झाले हे


Zakasrao
Thursday, March 15, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल म्हणजे एकदम शांत, समंजस आणि खेळकर वृत्तीचे असा माझ अनुभव होता. पण>>>>>>>>>>वाचल बरका हे राहुलने कि तो शांत आणि समंजस नाहिये ते. D~
नावाप्रमाणेच झकास डोक्यावर टोपी हातात एक बिडी>>>>
गेलाबाजार एखादा फ़ेटा आणि भारदस्त चिलीम तरी द्यायची. काय हे तन्वी.
च्यायला:- मिस्किल, सगळ्यांच्या विकेट घेणारा एक सच्चा दोस्त>>>> तुला हे इतक्या लवकर कसे कळाले बर?
तुमच्या कपाळावर १० चा आकडा आहे का हो>>...
मायबोलिवर मुषक, उन्दीरराज, बेडुकराव, मन्डुक असले आयडी दीसत नाहीत कदाचित या सगळ्याना हा शेषनागच जबाबदार असावा...>>>> च्यायला
मला सध्या वेळ नाही शेन्गा निवडायच्या आहेत अजुन>>>.कसली घेतोयस चवळी गवार घेवडा,दिडका इ इ.
कसलीही घे पण बघुन घे हो नीट.

लाजो हे एखाद्या भैय्यीणी च नाव नाही वाटत तुम्हाला>>.
मला तर पंजाबी वाटतय. D~

Robeenhood
Thursday, March 15, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा सहीच च्यायला. या मधे पंजाबी बायकांबरोबर गुजराथी आणि मारवाडी बायकांचाही समावेश केला पाहिजे.
>>>>
यात मायबोलीवरील बायकांचा समावेश करायचा का?
(मागे वळून देखील न पाहता दुसर्‍या बीबी वर धूम ठोकतो!)


Ajjuka
Thursday, March 15, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण मस्त खिचडी करतोय. ३ गोष्टींची.. मायबोलीवरचा आयडी आणि केवळ आयडीवरून त्या व्यक्तीबद्दल बांधलेला अंदाज. मग ती व्यक्ती प्रत्यक्षात कशी आहे त्याचे वर्णन. मग अशीच अमायबोलिकर नावे घेऊन त्यांच्या व्यक्तित्वाचे अंदाज.
पण मजा येतेय. एक सांगू का.. आवडती नावं आहेत ना प्रत्येकाची ती पण त्यांच्या आयडीजशी मॆच होतात. म्हणजे ’चौकोनी आयडीज’ ना टिपिकल फिल्मी नावं आवडतायत इत्यादी.. एक सहज दिसलं म्हणून लिहिलंय.. कुणावरही कॊमेंट नाही..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators