Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 10, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through March 10, 2007 « Previous Next »

Sheshhnag
Tuesday, March 06, 2007 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खीक्! हा हा हा हा

Zakasrao
Wednesday, March 07, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एनकाशी तुमची मेल चेक करा जी तुम्ही मायबोलीला दिली आहे ती. एक मेल पाठवली आहे.

Yogesh_damle
Wednesday, March 07, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची एक मैत्रीण अतीशय 'केविलवाणं' बोलून सगळ्यांच्या डोक्यात शिरते. सारखं "मेरा कबाड़आ हो जाएगा" "मैं मुसीबत में फँस जाऊँगी" वगैरे बोलून सारखं थोबाड पाडायचं.

एका दुपारी सगळे लॅब मध्ये आपापल्या काॅम्प्स वर बसले होते. बया आत येताच सगळ्यांची तोंडं लटकली... हिचं सुरू.... "अरे!! कोई तो कंप्यूटर खाली करो! मुझे अभी कंप्यूटर नहीं मिला, तो मैं मर जाऊँगी!"

माझ्या तोंडून फाडकन् निघून गेलं, "क्या तुम भी!! अजीब मज़ाक करती हो!! मरती तो नहीं!!"

सगळी लॅब कोसळायच्या बेतात होती, आणि बाईसाहेब 'तबडक तबडक' करत बाहेर निघून गेल्या!


Nkashi
Thursday, March 08, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, अहो mail नक्कि कुठल्या id वर टाकली आहे? मिळाली नाहि म्हणुन विचारल....

Zakasrao
Friday, March 09, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठल्या id वर टाकली आहे>>>>>..मायबोलिला दिलेल्या. आठवा कोणता दिलाय ते किन्वा orkut वर या झकासराव म्हणा मी तिथे आहे.

Tawaal
Friday, March 09, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केलेला लेटेस्ट ईब्लीसपणा

मी ०६ मार्चला मायबोलीवर परत जन्माला आलो


Ajjuka
Friday, March 09, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दामले मास्तर.. उत्तम.. हहपुवा! :-)

Heraspparesh
Friday, March 09, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दामले काका,मला एक सान्गा , ती डोक्यात जाणारी मुलगी घोडी होती का?
तब्डक तब्डक घोडेच धावतात ना , म्हणून जरा शन्का आलि डोक्यात!!!!!!

Chaffa
Friday, March 09, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव नावाप्रमाणेच झकास.!!!!!!
दामलेजी धम्माल एकदम,
नंदिनी खतरनाकच जाऽऽऽऽम हसलो.
आणी च्यायला म्हणजे एकदम च्याऽऽयलाच

तर मंडळीऽऽऽ (ओऽऽऽ) मी ईतके दिवस का नव्हतो माहीताय का.? ( असशिल कुठेही टवाळ्क्या करत आम्हाला कशाला चौकशा.??)
नाही दोस्तलोक नाही मी नव्हतो कारण मी आता नुकताच गृहस्थाश्रमात प्रवेश करता झालो आहे.
तरऽऽ हा एक ताजा ताजा इरसालपणा जो मी नाही केला पण शिकार झालो असतो.

त्या रात्री म्हणजे लग्नाच्या पहील्या रात्री आम्ही नवपरीणीत वगैरे जे काही म्हणतात ते जोडपे आमच्या बेडरुम मधे गेलो. आता मी ईतरांच्या लग्नात बराच ईब्लीसपणा केल्यामुळे जरा जास्तच सावध होतो पहीलेछूट सगळे कपाट धुंडाळले एकही गजराचे घड्याळ सापडले नाही मग संशय जरा जास्तच बळावला मग बेडवरची चादर उचकटली तिथेही काही नाही.?? असा हा तपासणीचा कार्यक्रम आगदी सोडलेल्या फ़ुलांच्या माळांपर्यंत पोहोचला निष्पन्न काहीही नाही अखेरिस सुस्कारा सोडून बेडवर बसणार तेवढ्यात शेवटचा प्रयास म्हणुन बेडवरची गादी जराशी उचलुन पाहीली आणीऽऽऽऽ.?
कपाळावर हात मारुन ध्यायची वेळ आली की महाराज.!!!!
बेडवर गादी ठेवतात त्याखाली जो प्लाय असतोनाऽऽ.? तोच काढलेला होता आणी दोन लाकडाच्या रिब्जवर गादी अलगद ठेवली होती. आत्तापर्यंत माझ्याकडे गोंधळुन बघणार्‍या माझ्या सौ.ला देखिल हसु आवरणे कठीण गेले.


Runi
Friday, March 09, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा, खि खि खि

तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा !!!

Arch
Friday, March 09, 2007 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा, सुखाने संसार करा.

आता इथे येणार्‍या अनुष्काच कस होणार?


Adi787
Friday, March 09, 2007 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा,

मानलं हं तुम्हाला..
संसाराची सुरुवात बाकी एकदम चौकस राहुन केलीत. आता संसार पण असाच सुरक्षीत करा :-)
तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा !


Storvi
Friday, March 09, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़्या लग्न म्हणजे इबलिसपणा वाटला काय? :-O

Disha013
Friday, March 09, 2007 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा,लग्नाच्या शुभेच्छा! बायकोला अनुष्काबद्दल सांगितले की नाही अजुन??

Chyayla
Saturday, March 10, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चाफ़्फ़ा तु परत आलास... अभिनन्दन चाफ़्फ़ा आणी चाफ़्फ़ी दोघान्ना पण... चाफ़्फ़ेकळ्याना वेळ आहे अजुन. तुला आठवत... मागे म्हटल होते की हा BB तुझ्या होणार्या BB ला दाखवु नको नाही तर "असला इब्लिस नवरा नक्को ग बाई" म्हटले असते, वाचलास पठ्ठ्या.

मस्तच आल्या आल्या धमाल किस्सा टाकलास... पण एक गडी ऑउट झाला सम्पले बिचार्याचे आनन्दाचे दीवस आता आम्हाला वेळ देशिल की नाही किस्से टाकायला काही सान्गता येत नाही.


Zakasrao
Saturday, March 10, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर्‍यांच्या इब्लिसपणाला बळी पडला रे चाफ़ा. चाफ़ा मेल चेक कर.
बेडवर गादी ठेवतात त्याखाली जो प्लाय असतोनाऽऽ.? तोच काढलेला होता आणी दोन लाकडाच्या रिब्जवर गादी अलगद ठेवली होती>>>>>>>>>>>.अरे अरे वाइट झाल रे. मग पुढे काय केलस?
एक आगावु प्रश्न.


म्हणजे त्या गादी, प्लाय आणी बेडच रे? उगीच मनात नसते प्रश्न आणतात कार्टी?


मी ०६ मार्चला मायबोलीवर परत जन्माला आलो >>>>>
टवाळा तु लिम्बुसारखा पिवळा का पडलायस रे? एक भा. नी भा. प्र.

Nandini2911
Saturday, March 10, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा. वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा.. पण इब्लिसपणा करणे सोडू नका. तुम्हाला पुस्तक छापायचे आहे ना?

Swa_26
Saturday, March 10, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा... विवाहाच्या हार्दीक शुभेच्छा... नांदा सौख्यभरे

पण इथे यायला विसरु नका... आणि पार्टी केव्हा देणार लग्नाची?? :-)


Zakasrao
Saturday, March 10, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मायबोलीकरांसाठी मी एक पाटि आणली आहे. त्या पाटिवर तुम्ही keyboard वापरुन लिहु शकता. घ्या ती आणि वापरुन पहा. खालि दिलेली पाटी सवे करा नंतर सवे अस html करा व open क्रुन लिहुन आनंद घ्या

text/plain
Magic Slate.htm (2.2 k)




Swa_26
Saturday, March 10, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय राव तुम्ही... कॉम्प्युटरच्या जमान्यात पाटी आणून राह्यले आमच्यासाठी :-) BTW ती बहुतेक एक confession पाटी आहे.. हो ना झकासराव :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators