Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 04, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 04, 2007 « Previous Next »

Supermom
Friday, March 02, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुला भावुक चेहरा म्हणायचेय का रे बाबा?

Marathi_manoos
Friday, March 02, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश VS वरुन अस वाटत की ते एक चांगले शिक्शक असावेत.
माफ़ करा अजुन मराठी मध्ये लिहिता येत नाहि नीट.

Manuswini
Friday, March 02, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा इथे खुप मजेशीर रंगलेले दिसतेय.

मी ज्यास्त कोणाशी interact केले नाहेय पण बी मला अती चिकीत्सक,नको तिथे ज्यास्त विचार करणारा माणुस वाटला. :-)

आता तु लाव बघु तुझा अंदाज मनु नावाच्या व्यक्तीबद्दल.

बी, इथे जे वाटले ते लिहिलेय, तेव्हा perosnally खुन्नस वगैरे काही नाही. ...

काही लोकांशी personally ओळख असल्याने लिहिण्यात काही मजा नाही.
overall इथे मायबोलिवर सर्वच मला हुशार विचारी वाटतात.

माझे अनुभव 'नावावरुन'

सचिन - मराठी(हो, नक्कीच मराठी नाव) घरातील वरुन गोड, साधा दिसणारा पण खाली मुंडी पाताळ धुंडी.

राहुल - bubbling personality , खट्Yआळ.

समीर - थोडासा आखडु.
काही नावाबद्दल तर मला उगाच घृणा वाटते.
कधी कधी नुस्त नावावरुन अंदाज येतो ती कशी असेल आणि exactly तशीच निघते.

१)सर्व साधारण मला बारीक डोळ्याच्या, पातळ ओठाच्या व्यक्ती लबाड असतात असा अनुभव आहे.
२)बोलताना ओठ तिरपे करुन बोलणार्‍या कुसक्या वाटतात.
३)अती नाटकी गोड आवझ काधुन बोलणारी व्याक्तीबरोबर दोन मिनीटे उभे राहुन बोलणे मला त्रासदायक वाटते.

मुलांमध्ये मला राहुल,सुनील ही नावे छान वाटतात.

मुलींमध्ये प्रिया,श्रीया,प्रीती, मधु, शालु,नीरु,सलोनी(माझी भाची),सगळ्यात मह्त्वाचे मला माझे स्वःताचे नाव आवडते, एक वेगळी प्रतीमा तयार करतात. :-)
असो....

disclaimer: this is not a personal comment on anybody whom I have met or not met.




Supermom
Friday, March 02, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे अंदाज खूपच मजेदार वाटतात.
मनू, बी त्याला काय वाटते सांगेलच. पण माझ्या मनातली तुझी प्रतिमा सांगू का?

नाजुक चणीची, गोल चेहर्‍याची, तरतरीत मुलगी. अतिशय उत्साही. तुला एका जागेवर बसायला मुळीच आवडत नसावं. अन हो, सगळे पदार्थ अगदी वाटण घाटण करून, आवडीने तयार करणारी.(आता हे कुणीही सांगेल म्हणा.)


Yuvrajshekhar
Friday, March 02, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम तुमच्या नावावरून तुम्ही एक ४५-५० वर्षांची, गोरी, मध्यम उंचीची, स्थूल बांध्याची, टिपीकल गृहिणी असावी असं वाटतं

Manuswini
Friday, March 02, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ,
फार मजा वाटली वाचताना
पण अंदाज इतका बरोबर कसा काय लावलास?

I am petite,very restless-true, outgoing, बाकी सगळे बरोबर.

एक चुक - चेहरा गोल नाही लंबगोल आहे. :-)

स्वःताची तारीफ़ खुप झाली नै.

मला तुझ्या दोन गोष्टी खुप भावल्या एक तर तुझा preganancy exp नी तुझ्या पप्पांवरील कथा.

त्यावरुन वाटते खुप संवेदनशील मन,प्रेमळ असणार तु. तुझ्या नवर्‍याचे पण कौतुक वाटले.

generally मी म्हटले ना मला इथील सगळेजण खुप हुशार नी चांगल्या विचारंची जाण असणारे वाटतात.


Supermom
Friday, March 02, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू,
मी संवेदनशील आहे हे अगदी बरोबर.
प्रेमळ आहे की नाही माहीत नाही. ते माझ्या कुटुंबातल्या लोकांनाच जास्त माहीत.
युवराजशेखर, तुमचे ९०% अंदाज साफ़ चूक. पण वाचायला गंमत वाटली.


Zakasrao
Saturday, March 03, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमळ आहे की नाही माहीत नाही>>>>>>>>>>>
छे हो तुम्ही अगदी १०१% प्रेमळच आहात तुमचा id पहा ना supermom आई ही प्रेमळच असते तुम्ही तर super आई आहात.
मला नलिनी विषयी देखील असेच वाटते ती सुधा संवेदनशील आणी प्रेमळ आहे.


Swa_26
Saturday, March 03, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...." स्वाती नावाची प्रत्येक मुलगी मी अति बुद्धीमान बघितली आहे. त्यांचा जीवनाप्रतीचा दृष्टीकोण खूप निराळा असतो. त्या खूप गुणी असतात.." बी... :-)

दिनेशदा, तुमचा फोटो पहायच्या आधीपासुनच मला तुम्ही एकदम साधे आणि सरळ असे दिसत असाल असे वाटायचे.

नीरजा हे नाव तसेही एखाद्या कलाकाराचेच असावे असे वाटते, नावच काव्यमय असल्यामुळे आणि ते एका कवयित्रीचे नाव (कि टोपणनाव??? CBDG ) असल्यामुळे.....

बी, तु तुझे नाव सांग ना... म्हणजे मग अंदाज लावता येईल. :-)

च्यायला, तु म्हणजे एक happy go lucky म्हणजे आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असणारा आणि जीवनाचा भरपूर आनंद लुटणारा असा वाटतोस.

सध्या एवढेच पुरे... बाकीच्यांबद्द्ल नंतर लिहिन...


Psg
Saturday, March 03, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, मला पण तू सुपरमॉमला वाटलीस तशीच वाटतेस कायम.. गोरी, स्लिम, उंच आणि उत्साही! :-)

Bhramar_vihar
Saturday, March 03, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लय झाकास! चालुदे हो! :-)

Ajjuka
Saturday, March 03, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय मस्त जमलिये.. Mutual Admiration Society... :-)
मी घारी आहे.. गोरी नाही.. बाकी कलाकार बिलाकार मला काही माहित नाही.. कल्लाकार नक्की आहे..

Neelu_n
Saturday, March 03, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच बीबी चालु झालाय :-)
>>>>मनिषा लिमये साधी सरळ मध्यम उन्चीची मनसोक्त खळखळुन हसणारी.
अहो च्यायला तुम्ही भेटलात की काय मनिषाला. खरच अशीच आहे ती. मनिषा बघ ग काय अचुक वर्णन आहे तुझे.:-)
स्वाती तु आहेस का मग बुद्धीमान? बाकी तुझ्या नावावरुन नाही पण पोस्टवरुन तु मला तु जराशी खोडकर, पण तरीही सगळ्यांना सांभाळुन घेणारी, स्वत: स्वैपाक करुन आवडीने खावु घालणारी गोड मुलगी अशी प्रतिमा उभी रहाते.:-)
पण कधी कधी आपण प्रतिमा तयार करतो त्याच्यापेक्षा खुपच वेगळी असतात ती माणसं.
प्रज्ञा नावाच्या मुली मला कायम खुप हुशार वाटतात.:-)



Ajjuka
Saturday, March 03, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता वरच्या काही जणांचा समाचार..
सुपरमॊम.. धन्यवाद गं.. ही बाई साधारण ३५शीची आणि सर्व जगाची चिंता वाहणारी आहे असं आयडीवरून आणि लिखाणावरून वाटतं. कशाची काळजी करायची गरज नसेल तर त्यामुळे हिला ’काय हे काळजी नाही आपल्याला’ यामुळे काळजी वाटू लागेल.. दिवे घे गं..
बी.. अर्थात.. ___________ सांगू का रे खरं नाव? खऱ्या नावावरून नाही पण एकंदरीत संपर्कावरून.. मला तरी मुळात मनाने चांगला पण पुस्तकी आणि चौकोनी माणूस वाटतो.
मिलिंद नावाचा माणूस कितीही आवडला तरी त्याचं नाव मिलिंद आहे म्हणून लग्न करणार नाही.. अशी प्रतिज्ञा केली होती मी. ही ही ही. मंदार पेक्षा चौकोन असतात हे लोक असा माझा समज.. ओळखीतलेच काही नियम आणि काही अपवादही आहेत.. ही ही ही
स्वाती नावाबद्दल माझे मत वेगळे आहे.. इथे भेटलेली एक अविस्मरणीय स्वाती (बेटी) वगळता मी बाकीच्या स्वात्या टिपिकलच पाह्यल्यात. स्वा.. हे तुला नाही. हा पण सगळ्या यच्चयावत तल्लख बुद्धीच्या होत्या एवढे मात्र नक्की..
BTW स्वा.. त्या कवियित्रीचे हे टोपणनाव नाहीये. तिचेही हे खरेच नाव आहे.
आता कुणाची टोपी उडवावी बरं!!
लिंब्या... कोक्या आहे हे कळतंच तिरक्या बोलण्यातून.. तेव्हा आपसूकच किडकिड्या, गोरा पण रापलेला, घारा माणूस समोर येतो..
हुडा.. हे महाशय डॊन आहेत.. बसल्याजागी दिसेल त्या प्रत्येकाला उचकवणे हा यांचा मूळ धंदा.. चणी लहानखुरी असावी, मेंदू तल्लख पण डोक्यात सतत काडेकरूगिरी चालू.. आणि त्याबाबतीत सदैव पहिला..
पेशवा... आरामसे... जास्ती लोड घेणार नाहीत.. लोडाला टेकून बसून राहतील.. ही ही ही.. काय जया?
माझा अंदाज एकदम पर्फेक्ट ठरलेली.. आपली लाडकी कवयित्री.. क्षिप्रा.. जसं imagine केलं होतं तश्शीच आहे ती.. तल्लख, हसरी, प्रसन्न.. तिला कुठलेही negative feeling स्पर्शच करत नसावेत..



Bhramar_vihar
Saturday, March 03, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यातल्या त्यात लिमये म्हणजे अगदी गायच असतात

मनिषा तू खूष होउ नकोस, तू लिमये आता झालीयेस! :-)

Dineshvs
Saturday, March 03, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्राच्या बाबतीत, अगदी एकमत. तिची एक सुंदर भावमुद्रा टिपलीय अलिकडे.
रॉबीनबद्दल, अंदाज बरोबर नाही.
नाटकात कसे पात्रनिवडीबाबत, भुमिकेला शोभणारी शरिरयष्टी असावी लागते, तसे आपण ईथल्या पोस्ट्सना शोभेल असा चेहरा देतोय का ? तरिही हा खेळ मजेदार आहे, सगळ्यानाच मैदानात घ्या बघु.


Chyayla
Saturday, March 03, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे या BB वरच मस्त धुळवड सुरु आहे... एकामेकाला प्रतिमेचा रन्ग फ़ासणे सुरु आहे आणी ह्या रन्गान्ची मजा पण येत आहे. मी पण येतो काही जणाना रन्ग फ़ासायला...

सगळ्या मायबोलीकराना होळीच्या शुभेछा:


Yuvrajshekhar
Saturday, March 03, 2007 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम,सगळेच अंदाज बरोबर आले तर त्यात काय मजा आहे?कधीच न भेटलेल्या व्यक्तीबद्दल नुसता अंदाज व्यक्त करणे यात मजा आहे तो अंदाज खरा असला तर स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची नाही आला तर सोडून द्यायचं.
आणि हो म्हणतात ना की
'अज्ञानात सुख दडलेलं असतं' असंच काहीसं आहे.


Aaspaas
Sunday, March 04, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, गंमतच आलू आहे इथे. मजा आली. पाठीमागचे वाचूनच काढले. बर्‍याच जणांचे अंदाज बरोबर आहेत. केवढा प्रभाव असतो नावांचा. खरेतर नाव आधी ठेवतात आणि नंतर माणूस घडतो, मुळचे गुण असतातच. पण नावावरुन म्हणण्यापेक्षा मतांवरुन त्या व्यक्तिची प्रतिमा इथे तयार झालेली दिसते. त्या घडण्याचा आणि त्या नावांचा काही संबंध आहे का? किंवा अद्याक्षर पाहून नाव ठेवतात त्याचा काही संबंध असतो? फारच गंमत आहे. मतांनुसार व्यक्तिची मुद्रा, अंतरंग त्याची जडणघडण, त्याला आलेले अनुभव ओळखणे आहे.

Anushka1
Sunday, March 04, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा नावावरुन खुपच सोज्वळ वाटतो पण एकंदरित फ़ार खतरनाक माणुस दिसतो कधि दगा देइल ते सांगता येणार नाहि.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators