Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 23, 2006

Hitguj » My Experience » Office stuff » Archive through March 23, 2006 « Previous Next »

Bee
Saturday, February 25, 2006 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर शुक्रवारी आम्हाला weekly report द्यावा लागतो. मला office च्या कामांच्या बाबतीत नोंद करून ठेवणे फ़ारसे कधी जमले नाही. आत्ता आपण हे केले, ते लगेच केले म्हणून मी कधीच लिहून ठेवत नाही. मग शुक्रवार उजळला की section heads ची मेल येते संध्याकाळ पर्यंत weekly reports तयार ठेवा. इतके महाभयंकर बोरींग काम आहे हे weekly report तयार करणे म्हणजे. माझा एक colleagues जो भारतीय आहे, weekly report मध्ये इतके ताणतो आणि आपली स्तुती mgr करून करवूनच घेतो. माझ्या बाबतीत मात्र मी जे काम केले ते देखील विसरून लिहायचे राहून जाते. मी एकदा माझ्या section head ला म्हंटलेही की माझ्यासाठी weekly report इतके unproductive काम आहे की मला एक दोन तास सहज लागतील जर मी आठवूण आठवूण सगळे काम केल्याचे लिहित बसलो तर. त्यानी suggestion दिले, spread sheet रोज update करायची. पण दिवसभरातून इतके support call, testing cases, documentation, meetings, code review, updates, emails झालेल्या असतात की spread sheets कितीही update करावी असे ठरवले तरी ती पुढे चालून आपल्या अनियमित पदावर येतेच. मी माझ्या भारतीय colleagues ला विचारले, जनाब आप तो काम धाम कुछ करते नही तोभी आपकी repord काफ़ी बडी होती है. थोडी tips हमेभी देदो तर तो म्हणाला काम करने का हिसाब रखकर अगर report बनाई जाये तो सिर्फ़ दो लाईन मे report खतम हो जायेगी. धन्य! माझी एक chinese colleague आहे ती वेळोवेळी sprad sheets update करते खेरीज शुक्रवारी परत दोन तासभर weekly report घेऊन बसते. मी तिला नेहमी म्हणतो u love weekly most of all it seems! जाऊ द्या... मी मायबोलि access करूनही कामे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे आणि हे फ़क्त प्रिय मायबोलिकरच समजू शकतील, किंबहूना शुक्रवारचे ते दोन तास मला इथे यायला अधिक आवडेल :-)

Maanus
Saturday, February 25, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अरे फार सोपे काम असते ते...

outlook च्या sent items folder मधे जायचे, आणि last friday to this friday जितकी पन पत्र लिहिली असतील त्यांच्या subject वरुन अंदाज बांधायचा काय काम केले असेल ते.


Dhumketu
Monday, February 27, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी सहानभुती आहे रे तुला.. आम्हाला तर हा डाटा ४-५ वेगवेगळ्या प्रकारे द्यावा लागतो. परत तास लिहावे लागतात... आता कामच करत नाही तर तास तर दुरचेच...पण लिहिचे काहीतरी... :-)

Bsa
Monday, February 27, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतुशी सहमत आहे... अगदी खरे आहे..
आणि त्यात जर दिवसाच्या ८ तासाचा तपशील द्यायचा असेल तर चान्गलीच वाट लागते... :-(

Manuswini
Monday, February 27, 2006 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शी आठ तासाचा तपशील शी काय हे

आता थोडीना सारे ८ तास काम चालु असते हे असे मधे मधे मायबोलिवर भटकण चालु असते..

एक काम कर बी, बॉस ला सांग की एक ज्यास्त तास फ़ोर मायबोलि वर तुझे एकडचे तिकडचे अनुभव लिहायला आणि कुचाळक्या करायला
jokes apart, make task list in outlook everyday, and just go through at the end of friday. daily task list बनवायची कुचाळक्या झाल्या की म्हणजे साधारण ११:०० वाजता कामाला लागशील तेव्हा जसे कामवाल्या येतात ना अगदी ११:०० वाजता तंबाखू कुटुन झाला की लगबगिने पाणी जायची वेळ होते तेव्हा तसेच luch break ek taas uralaa asato naa .. laag kaamaalaa


Rachana_barve
Tuesday, February 28, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Actually he status reports मला अज्जिबात आवडत नाहीत. आणि ते लिहिताना मला शब्द पण सुचत नाहीत. manager says I don't want one liners आता, मी एखादा bug solve केला असेल तर मी लिहिते bug number - solved :-O.. Anyways माझ्या चायनीज कलीगकडून मी अतिशय महत्वाची गोष्ट शिकले आणि शिकते पण आहे. ती Aim वरचे महत्वाचे conversations पण व्यवस्थीत save करून ठेवते. प्रत्येक Project झाला की नक्की तो काय होता तिने कोणत्या files change केल्या.. आणि काही complicated असेल तर लिहून ठेवते. त्यामूळे मला कोणी ६ महिन्यापुर्वीच्या project बद्दल विचारल की सगळ शोधायला माझे २ तास जातात तसे तिचे जात नाही. आणि जर कोणत्या problem मध्ये तुम्ही अडकला असाल तर proofs देणे पण सोप्पे होते. त्यामूळे तिच्याच भाषेत. एखादेवेळेला एक काम कमी कर पण Documents should be up to date :-) अजूनही मी सुधारत नाही ही गोष्ट गौण.. :-(

Naatyaa
Tuesday, February 28, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजूनही मी सुधारत नाही ही गोष्ट गौण.. >>> हे कधी बदलणार?

Rachana_barve
Tuesday, February 28, 2006 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात्याभाऊ बीबी चुकला. सांगु का मिलींदाला? :-O

Dhondopant
Wednesday, March 01, 2006 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वहीत किंवा excel मधे दोन कॉलम मधे हे करता येते... आणि तुमचा वेळ ही वाचणार!!.. कसे?? एक डेट चा कॉलम करा आणि एक Description चा. आता

Date ........... Desc
२/२८............. हे केल[२ तास],ते केल[४]

असे कंसात आकडे टाकुन मोघम लिहुन ठेवा. शेवटी update करताना सोप्प जाईल!!


Sandeep_bodke
Wednesday, March 01, 2006 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I keep the log of my daily tasks & stuffs...it helps in preparing weekly status reports on fridays..!

Bee
Thursday, March 02, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जे application develop केले आहे नि त्यात आता वारंवार जे काही enhancement/additions of new requests/bug fixing/performance improvement/stability सुरू असते खेरीज customer support असतो त्यासाठी मी इतरांची कधी काही मदत घेत नाही. ते माझे काम आणि मीच शिकायला हवे अशी भावना मनात असते. मला जे काही customer support करवा लागतो तो global आहे. बर्‍याच emails येतात. मी सगळ्यांची उत्तर अगदी नीटनेटकी, बारीकसारीक गोष्टीही नमूद केल्याल्या असतात आणि दरवेळी customer lay man आहे असे समजून माहिती पुरवली असते. त्यामुळी मी एक उत्तम support देतो अशी प्रतिक्रिया नेहमीच मला मिळते. पण माझ्या applications चे आता architectural changes झालेत. मला एका फ़्रेंच मुलीचा support घ्यावा लागतो आणि तिचे ते काम आहे मला support करणे. पण ह्या मुलीने मला सुरवातीला एक basic procedure समजावून सांगितली. एकतर ती फ़्रांसला असते त्यामुळे हे सगळे काही net meeting वरच असते. नंतर तिला मी मदत मागितली तर तिने उत्तर देणेच बंद केले. मग माझे release late होत आहे. असे हे प्रश्न boss समोर मांडायचे तरी कसे. शिवाय boss हे फ़्रेंच आहे.

Sanghamitra
Thursday, March 02, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी आऊटलुक तर आहेच. शिवाय अजून एक आयडिया सांगते.
work नावाचा folder बनवायचा.
रोज त्या folder मधे आजच्या date चा एक folder तयार करायचा. आणि आज जे काही गूण उधळले ते आजच्या दिवसाच्या folder मधे save करायचे. जे काही programs files docs असतील ते. एक महिना झाला की त्या महिन्याची zip करून ठेवायची.
फार मोठे task assign झाले असेल तर त्या task name चा folder बनवून त्यात date wise sub folders बनवायचे.
असे केलेस तर वर्षभरातले कुठल्याही दिवसाचे काम विचारले तर सांगता येईल. शिवाय outlook असतोच details साठी.


Champak
Thursday, March 02, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे काही गूण उधळले >>>>

ज्याला / जिला, काॅफ़ी, लंच, डिनर ई ई ला नेले ते पण लिहायचे का?

Bsa
Thursday, March 02, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee मला वाटते अश्या वेळेस CC culture च चान्गला उपयोग होतो.
Utlimately Boss ही responsible असतोच ना जर release late झाले तर..
Not sure if you are doing this or not..
I always copy my manager/boss in similar type of situation.

Bee
Friday, March 03, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bsa- ती खूप जुनी employee आहे, नक्कीच तिचे माझ्यापेक्षा चालते. तिचे कुणी बिघडवून घेणार नाही. मी केले आहेत सगळ्यांना CC पण काहीही उपयोग झालेला नाही. शेवटी मी सकाळपासून रात्रीपर्यंत बसून जास्तित जास्त काम करून ते नविन architecture शिकतो आहे. पूर्वी मी Tomcat वापरायचो आता JBOSS वापरतो आहे. पण JBOSS configure करायला मला वेळ लागतो आहे कारण मी पुर्वी कधी वापरलेच नाही. आता right from the scrapth study करायला मला वेळ नाही आणि घाईत तर काही शिकायचे म्हणजे जे काम नीट होईल तेही फ़सण्याचे chances अधिक असतात. परत माझी भारतवारी त्याची तयारी, खरेदी, बांधाबुंध, इकडे office मधला तणाव. खूप आवाक्याबाहेरच होते आहे पण काही गत्यंतर नाही.

Meenu
Friday, March 10, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी architectural changes document केलेले नाहीत का? ज्याच्या मदतीनी तूझा वेळ वाचेल? किंवा ती मुलगी तुला तस काही document, training material देऊ शकत नाही का?

work log साठी वर दिलेले option उपयोगी पडतीलच.. पण आम्ही काय करतो.. त्या कामाचा ID log e.g. monday - 11:00 PM to 12:00 PM IDNo.111 करतो. त्या ID वर काय काय काम केलं ते issue tracking tool वर recorded असत. ते बघुन मग report लिहायचा... पण त्याचा कंटाळा करणं मात्र बरोबर नाही


Bee
Friday, March 10, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, होत आले माझे ते काम पुर्ण आता.

जेंव्हा आपण as an example Ingres to Oracle असे migration करतो तेंव्हा UAT/SIT test cases काय असायला हव्यात. तसे हे application वर अवलंबून असेल पण एक common test cases जर कुणाला माहिती असेल तर सांगा.

नेमस्तक अशी technical info इथे विचारणे जर अपेक्षित नसेल तर तर कळवा. परत लिहिणार नाही.


Mbhure
Tuesday, March 14, 2006 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच ई - मेल मधून पाट्ठवली. ऑफीसशी संबंधीताहे म्हणुन ईथे टाकतोय. BB चुकला असेल तर कळवा.

Raja_of_net
Monday, March 20, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Agadi barobar kavita ahe.

Maanus
Thursday, March 23, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या साहेबाकडुन आता आलेले ह्या विशयावरचे पत्र. मराठीत लिहीतो.

विशय्: आठवड्याच्या कामाचा तपशील

जर तुम्ही गेल्या आठवड्याचा पाठवला नसेल ( आणि तुम्हाला माहीत आसेल तुम्ही कोण ते ) , तर कृपया पुढच्या एक तासात पाठवा.

आभारी आहे.

संत


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators