Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 09, 2007

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » कंटाळा » Archive through January 09, 2007 « Previous Next »

Sakhi_d
Tuesday, January 09, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय,

मला खुप कंटाळा आलाय ह्या जगण्याचा. आयुष्यात काहिच रस वाटत नाहि. आला दिवस काढायचा असे चालू आहे. कशातच मन रमत नाहि. कंटाळा जाण्यासाठि मी खुप काहि करते पण तेवढ्यापुरते बरे वाटते पण दुस-यादिवशी पुन्हा हा कंटाळा हजर............... काय करु? काहि उपाय आहे कोणाकडे..........

मी खरतर आधी अशी नव्हते...... नेहमी उत्साहाने भरलेली असायची पण हल्ली कशातच मन लागत नाही. खुप काहि करायचा प्रयत्न करते पण हल्ली काही करताच येत नाहि.





Bee
Tuesday, January 09, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, तुझ्या profile मधले favorite quotes आणि more about me इतके छान आहेत आणि सध्या खरे तर तुलाच अशा fav quotes ची गरज आहे असे वाटते. जीवन हे एखाद्या landscape सारखे असते म्हणजे तिथे कधी चढ कधी उतार असतीलच, कधी हिरवळ कधी वाळवंट निर्माण होतीलच. जेंव्हा जीवनात एकदम हताशपणा येतो त्यावेळी आपणहून आग्रही आनंदीपणा आणावा. कुठे हवापालट करण्यासाठी जावे, कुठल्यातरी पुस्तकांच्या दुकानात जावे, दादर सारख्या भरगच्च बाजारात जावे. आपोआप मनाची मरगळ दूर होते. निदान प्रयत्न व्यर्थ जात नाही. करुन पहा. कंटाळा येणं हे खूपच normal झालं. त्यासाठीच काहीतरी change हवा असतो. जीवनात काहीतरी नाविन्य आले की आपोआप हा कंटाळा दूर होईल.

Sakhi_d
Tuesday, January 09, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे बी तु म्हणतोस ते अगदी बरोबर आहे.... मला फ़क्त कंटळा आलाय असे नाही म्हणता येणार. खुप depress झालेय. खुप निराश झालीय.

बदल करावा म्हणशील तर मी खुप पुस्तक वाचते, गाणी एकते, जप वैगरे करते, ट्रेकिंगला जाते....... पण हे सगळे तातपुरते असते. कितितरी महिने झालेत मी मोकळेपणी हसुन, आनंदी राहुन....

मनाच्या तळाशी एक निराशावाद भरलाय आणि तो कशानेच जायचे नाव घेत नाहिय. खुप थकल्यासारखे झालेय. कोणाशी तरी खुप बोलायचे आहे. सगळ्या चिंता, काळज्या, जबाबद-या विसरुन मुक्त भटकायचे आहे........ आणि असेच बरेच काही. पण सध्या माझ्याबरोबर बोलायला, ह्या सगळ्या गोष्टी करायला कोणीच नाहिय. खुप एकटि पडलीय.


Bee
Tuesday, January 09, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, तुझे वरिल पोष्ट वाचून मला विन्दांच्या ह्या ओळी आठवल्यात्:

जिवित वृक्ष नसे वठलेला
जोवर अश्रुंचे ओलेपण
तिच निराशा तिला भितो मी
कोरडे हास्य करी मन

हे अगदी खरे आहे, शतप्रतिशत खरे आहे. पण ह्यावर रामबाण उपाय म्हणजे आपलाच जगण्याचा आणि त्यातून आनंद उपभोगण्याचा अट्टाहास असणे हाच होय. तो कुणाला कसा जमतो हे त्याच्या स्वभावाशी निगडीत आहे. बाकी तुला सांगितलच. मलाही ते उपयोगी पडेल.


Sakhi_d
Tuesday, January 09, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी......... खरच ह्या ओळी अगदी योग्यच आहेत. मी खुप प्रयत्न करते रे पण नाही जमत. गेली ३ - ४ वर्ष हाच प्रयत्न चालु आहे.

तरी थंक्स माझ्याशी बोलल्याबद्दल...


Rajankul
Tuesday, January 09, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, कंटाळा आला ना देवाचे ना घेत जा कंटाला पळुन जातो.

Zakki
Tuesday, January 09, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sakhi_d , खर्रक्काय? का हो? असले काही आजकालच्या जगात बोलू नका! प्रत्यक्ष नाही तरी काँप्युटर वर कुणि मैत्रिण (मित्र) भेटेल. त्यांच्याशी गप्पा मारा. हळू हळू नैराश्य जाईल! स्वानुभव हो.

Rajankul
Tuesday, January 09, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा झक्की खर्र, सगळा त्यासाठिच प्रपंच दिसतोय.

Mansmi18
Tuesday, January 09, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Sakhi,

Your profile doesnt say much but seems like tuze man "kuthetari" guntale hote ani tithe tula apekshabhang sahan karava lagala ani tyamule tuze kashatahi laksha lagat nahi ani depress zalis.

Tuze location mala mahit nahi pan ek thikan aahe jithe bhajan chalate (many locations in Mumbai and USA also). Just try to attend it. It is called Sriharimandir. Tithe kalwati aainchya shikavani pramane Bhajan chalate. Ekada ja ani paha tuza kantala, dukkha par palun jail.
you will get more information on
www.sriharimandir.org

Just try once and I am sure you will post a message exactly opposite of one you posted today:-)

All the best.

Karadkar
Tuesday, January 09, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manoj,
That site is
www.shriharimandir.org

Please check your email ....

Mansmi18
Tuesday, January 09, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks for the correction.



Sas
Tuesday, January 09, 2007 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी तुझ्यासारखच काहीस मलाहि होत आजकाल

नवर्‍या बरोबर बाहेर जाउनहि आले Long Weekend ला पण तरिहि तो आनंद क्षणिक होता, आज परत मी एकटि आहे, बाहेर येणार्‍या जाणार्‍या गाड्यांचा आवाज नसला काहि क्षण तर सुन्न शांती होते मन खाणारि. काम आहे करायला I work from home as a volunteer. But काम करता करता मध्येच मन नाराज होत. आज तर वाटतय कुणासोबत तरि मस्त जाव कुठेतरि बाहेर फिरायला, हसाव जोर जोरात, मन -मोकळ्या गप्पा माराव्यात, बाहेर खाव, धमाल करावि पण कुणासोबत जाणार?? नवरा office मध्ये.

माणसाला असणारि माणसाच्या सोबतिचि गरज पुस्तक,छंद... नाही पुर्ण करु शकत. I m sorry I have no suggestion for u but I can understand how you are feeling.

Priyab
Tuesday, January 09, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि अशा वेळी laptop घेते आणि Barns and Nobles,Borders,Mall ,Public Library अशा ठिकाणि जावुन बसते ह्या ठिकाणि wireless network available असते..काम हि होते आणि लोक हि दिसतात

Chyayla
Tuesday, January 09, 2007 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर बुवा या कन्टाळ्याचाच कन्टाळा आलाय.

सखी मला पण असेच वाटायचे आधी, भारतात नेहमी व्यस्त असण्याची सवय आणी ईकडे काही दिवसानन्तर वर्क फ़्रॉम होम मुळे कुठे जायची गरजच नाही. त्यामुळे फ़ुल टु बोर होणे आलेच, माझे मित्र तर जाम बोर होतात आणी असेच डिप्रेस होतात जरी त्याना नौकरी आहे तरी.

मी तरी कन्टाळा घालवण्यासाठी खालील उपाय करतो, कदाचित तुला पण सुचेल असेच काही.

ईब्लिसपणा करणे, च्याटिन्ग करणे, मायबोलीवर भटकणे.

तर दर रविवारी ईकडे लहान मुलान्वर भारतिय सन्स्कार करणारे असे बालगोकुलम आहे तिथे जाउन लहान मुलान्चे खेळ घेतो शिवाय गाणी, गप्पा, गमती, जमती, श्लोक शिकवणे वैगेर यामधे छान वेळ जातो. आणी पुर्ण हफ़्त्याभरासाठी एकदम ताजे तवाने वाटते.

सगळ्यात चान्गला उपाय, यामुळे आता मला कधीच कन्टाळा येत नाही तो म्हणजे सकाळी (उशीरा पण चालेल) उठायचे आरामात एक्दम हलका फ़ुलका हात पाय हलवत व्यायाम अगदी १० ते १५ मिनट बस, मग मस्त पैकी फ़्रेश हवेत जावुन (बाल्कनीतच) भरभरुन श्वास घ्यायचा म्हणजे प्राणायाम करायचे पुर्ण दीवसभर मस्त तजेला वाटतो.

शेवटी ध्यान ( Meditation ) आणी हो यामुळे भलते सलते विचार पण दबुन जातात व मन अगदीच हलक होउन दीवस दीवस भर एक अनाहुत उत्साह मना मधे भरलेला असतो, तसे ध्यान सुरुवातीला जमायला वेळ लागतो पण एकदा जमले ना की मग एक व्यसनच लागत. त्यासाठी पण मी बुधवारी, रवीवारी आणी असाच मधुन मधुन ग्रुप मेडिटेशनला जात असतो.

मला तर वेळ फ़ार कमी पडतो, उलट मला अजुन वेल मिळाला तर कही तरी वाद्य शिकायची ईछा आहे. पाहु या कधी मिळतो ते.


Vijaykulkarni
Wednesday, January 10, 2007 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sakhi,
if your depression is chronic and it has no proximate cause then it may be time to see a doctor. Antidepressatns like Zoloft work very nicely if the root cause of depression is biomedical.


Marhatmoli
Wednesday, January 10, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

asaa ka.nTaaLaa adhunmadhun sagaLyaa.nnaach yeto aaNi tyaawar suchavilele (waril sagaLe) upaay yogyach aahet, paN satata 3/4 warShe jar manaachi hich awasthaa asel tar malaa waaTate hi samasyaa jaasta gambhir aahe.
Sakhi Please seek professional help .

Mrinmayee
Wednesday, January 10, 2007 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्लिनिकल डिप्रेशन हा मेडिकल प्रॉब्लेम असु शकतो. पण कंटाळा म्हणजे आळशीपणाचं एक्स्टेंशन! त्याचं कौतुक करण्यापेक्षा सोपा उपाय:
नव्या डुप्लिकेट आयड्यांनी नवे बीबी उघडावेत. सटरफटर प्रश्ण / शंका / 'आज मरु की उद्या' टाइप पोस्ट टाकावीत.
आणखी नव्या आयड्या काढून आपणच त्याची उत्तरंही द्यावीत.
असं केलं की वेळ छान जातो. इतर भाबडे मायबोलीकर त्यावर खूप सिरिअसली उत्तरं,सल्ले देतात. आपण 'सगळ्या बिनडोकांना कसं उल्लु बनवलं' याचा आनंद लुटावा. कंटाळ्यावर हमखास इलाज.


Disha013
Wednesday, January 10, 2007 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी,अगदी माझे शब्द घेतलेस!:-)

Ganeshbehere
Wednesday, January 10, 2007 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुनमयी,
तु अशा आयडिया किती लोकांना दिल्या, कारण लोकांनी त्याची अमंलबजावणी पण सुरु केली आहे.दिसत नाहि का आज काल अशा समस्या चे BB मायबोलि वर खुप दिसायला लागले. काल परवा त्या "Please Help, Confused...." चा BB वर काय धुमाकुळ चालु होता, मी त्या स्टोरी चा Climax आणि शेवट पण माहित आहे, पण काय झाले माहित नाहि शेवटि Moderator नी त्याची दखल घेतली आणि सगळे पोस्ट उडविले.....
मला इथं कोणाला व्यक्तीगत दुखावायचे नाहि आहे, पण कळत नाहि का असे करतात लोकं..... TP म्हणुन ठिक आहे पण आज काल याचे प्रमाण खुप वाढ्ले आहे,,,,,

Duplicateid
Wednesday, January 10, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mru aikala bare me tuza :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators