Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 26, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » kitchen किस्से » Archive through April 26, 2006 « Previous Next »

Shyamli
Thursday, March 16, 2006 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडे तुझ्या दोन्ही विद्यार्थ्यांमधे एक साम्य आहे बघ...
शोध बघु.....

योगेश तुला काल मी मेल केला होता...
मिळाला नाही का?


Arch
Thursday, March 16, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश ही तुझी recipe recipe च्या bb वर टाक बाबा.

काय, गुण नाही पण वाण लागला की नाही?


Chioo
Thursday, March 16, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

arch, ते वाण नाही पण गुण लागला, असे आहे. :-) आता मलापण गुण लागला की. ;)

Saavni
Tuesday, March 21, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी १०वीत असताना आम्हाला बेकिन्ग शिकवल होत. मग मी घरी केक बनवायचा प्रयत्न केला. पण त्यात बेक्निग सोड्याच प्रमाण काहितरी कमी जास्त झाल (आज ही खात्री नाही काय झाला होत ह्याची). तर तो केक इतका कडक झाला कि घरचे कुणीच त्याला हात सुद्धा लावायला तयार नव्हते. मग शेवटी तो केक आम्ही आमच्या कुत्र्याला घातला. पण त्याने सुद्धा त्याचा वास घेतला आणि तो निघून गेला. तेव्हापासून केक म्हटल कि सगळे म्हणतात कि हिचा केक तर कुत्र्याने सुद्धा खाल्ला नव्हता :-((.

Mrinmayee
Wednesday, March 22, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pahilyandach dahivade kartana udid daal chhan 8 taas bhijvunn vaatli, tyala 'unhalyachya raatri' uttam ferment hou dila :-(, (idlisarkha)! Dusrya divshi fuglelya peethache vade talale. Komat panyat halke bhijavun paani kadhayla dablyavar aatun na shijlela patal peeth andyachya balakasarkha baher aala.
Tayaar kelela dahi koshimbirit, dahi-kachoreet (arthat vikatchi) madhe vaaprun sampavla.:-)

Junnu
Wednesday, March 22, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुरुवातीला जेव्हा पोळ्या शिकले, तेव्हा माझे इतके भयंकर शेप व्हायचे की नवरा म्हणायचा maths च्या complex shapes साठी live samples म्हणुन ठेवता येतील.
मी परवाच कालनिर्णय मधे सांगितल्याप्रमाणे चकल्या केल्या, पण त्या विरघळल्या, मग वडे केले त्याचे तर खुपच तेलकट झाले. :-(


Konitari
Sunday, April 09, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान करमणुक झाली हा वाचून. माझाही एक किस्सा:
लहानपणापासून मला खायची आणि खायला घालायची खुप हौस. त्यात सकाळची शाळा आणि आई नोकरी करत असल्याने दुपारी घरी एकटा. त्यामुळे बरेच प्रयोग चालायचे किचनमधे. त्यात बटाटेवडा हा जीव की प्राण. आई करत असताना अनेकदा बघितलेला त्यामूळे एकदा ठरवला कि आई घरी यायच्या आत बटाटेवडे करुन तीला सरप्राइछ द्याव. आता बटाटेवडा या प्रकारात काय काय चुकु शकता खरेतर काहीनाही. अतिशय सोपा प्रकार आहे हा. फ़क्त एक पथ्य पाळा.

चुकुनही उकडलेले बटाटे मिक्सर मधे मेश करु नका. मिक्सर बर्‍याच वेळ जिवाच्या करारावर फ़िरायचा प्रयत्न करतो आणि शेवटी थान्बतो. मिक्सर चे भान्डे साफ़ करण्यापेक्शा नविन आणणे सोयीचे पडते. :-)


Aarti
Sunday, April 09, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लग्ना नन्तर,दुबई ला शिफ़्ट झाल्यावर स्वैपाक शिकले.. म्हणजे नवर्या ने शीकवला....

एक दिवस वाट्ले तळ्णीचे मोदक करावे..
नारळाचे सारण करायला घेतले... आणी छान व्हावे म्हणुन खुप शिजवले... तर खोबरे एकदम कड्क...
पण चव चांगली होती (खरच) म्हणुन बाॅन्टी समजुन खाल्ले


Lopamudraa
Sunday, April 09, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बटाटेवड्यात काहिचुकु शकत नाही.....,
मी बटाटेवड्याचा पहिल्यांदा प्रयोग केला तेव्हा तेलात टाकल्यावर सगळा बटाटेवडा इतस्तता पसरला सारण, आणि...................


Rupali_rahul
Wednesday, April 12, 2006 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़सलेला प्रयोग कांदेपोहे
एकदा मी १० असताना घरी आई नसताना पोहे बनवायचा वायफ़ळ प्रयत्न केला होता. सगळी कृती आई करते अगदी तशीच केली आणि शिजवायला ठेवताना परत त्यात पाणि घातले. ते पोहे म्हणजे एखादी खिमईई झाली होती...


Raja_of_net
Wednesday, April 12, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली,
डाळ-भात समजुन खायचे पोहे अश्यावेळी.....
माझ्या एका मित्रानेही हाच प्रकार करुन खायला दिला होता आम्हाला...


Rupali_rahul
Wednesday, April 12, 2006 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा मग आईच्या ओरड्याबरोबर खाल्ले तेही...

Saranga
Thursday, April 13, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही ३ मित्र गुडगाव एकत्र राहत अस्तानाचा किस्सा. रात्री घरी आल्यावर मी भाजी चिरायला घेतली आणी मित्राला cooker लावायला सान्गीतले. केबल वर तेवध्यात 'कल हो न हो'चालू झाला आणी मित्र cooker ठेवून धावत बाहेर आला. थोड्या वेळाने काहीतरी करपल्याचा वास आला. आत जाउस्तोवर cooker cha valve फुटून काळा धूर येताना दिसत होता. cooker बाजुला काढुन बघितलतर काय, cooker मध्ये बिन पाण्याचा तान्दूळाचा कोळसा झाला होता!

Manuswini
Saturday, April 15, 2006 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे असे बरेचदा व्हायचे आता होत नाही
specially चहाच्या बाबतीत.
मी मस्त चहा प्यावा म्हणुन चहा ठेवायची आलं,साखर,वेलची कुटुन टाकुन पाणी उकळवत, ..
आणी बाहेर यायची फोनवर गप्पा मारत बसायचे नाहीतर tv बघत

जेव्हा सगळ पाणी आटुन करपायचा,साखरेचा करपलेला पाक
वास यायचा आणी कळायचं
भांड आठ आठ दिवस भिजत ठेवायची आणी नंतर काळं कुट्टं झालेले भांड फेकुन द्यायची शेवटी वैतागुन

ह्याच्या वरुन बर्याच वेळा ओरडा खायची आईचा, एकदा घाबरुन असेच आईचे आवडते भांड(चहाची छान किटली होती,आकार खुप सुबक होता) जळुन काळी कुट्टं गपचुप फेकुन दिली
आई आपली शोधतेय शोधतेय
काय झाले गं मनु ती किटली कुठेय हळुच घाबरुन सांगितली फेकुन दीली म्हणुन (पंधरा दिवसाने) :-)
आईच्या डोक्यावरच्या आठ्या बघुन जाम टरकले होते
म्हटले हा किस्सा lifelong गायला जाणार आणी गायला जातो सुद्धा अजुन
:-)


एकदा असाच भात करपला होता
वास जाता जात न्हवता
नेमकी आई office मधुन यायची वेळ
पटकन कापुर जाळला, आई खुश की मी अगदी आज धुप संध्याकाळचा जाळुन पूजा करतेय
as usual भात फेकुन दिला भांड्यासकट

आईला घाबरुन कारण तीला हे बिलकुल आवडयचे नाही की gas वर वस्तु ठेवुन असे बेफिकिर पणे बाहेर जायचे

एकटे रहायला लागल्यापासुन आता कमि झालेय हे सर्व


Dineshvs
Saturday, April 15, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांसाठी राईस कुकर हे अगदी योग्य प्रॉडक्ट आहे. अजिबात करपायची भिती नाही.

Savani
Saturday, April 15, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू, तू भांडी खराब करून वर ती फ़ेकून द्यायचीस.. अजबच आहेस:-)

Mrinmayee
Saturday, April 15, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, univ. campus apts मधे राहात असताना रात्री २ वाजता fire alarm झाला. कारण आमच्या शेजार्‍याचा rice cooker मधला भात आणि slow cooker मधले छोले करपले!!! त्यानी ही किमया कशी साधली हे तोच जाणे!

Deepanjali
Sunday, April 16, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू, तू भांडी खराब करून वर ती फ़ेकून द्यायचीस..

<<<मी तर एकदा micowave च जाळला आणि फ़ेकून दिला होता !
वरण शिजवण्या साठी चूकून एक तासा पेक्षा जास्त वेळ चालु राहिला आणि जळला बिचारा .. !


Mrunmayi
Monday, April 17, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिघडलेले मटर पनीर :
मी असेच पाहुणे येणार म्हणून मटरपनीर करायला घेतले. आणि ऐनवेळी पनीरचे तुकडे fry करायचेच विसरले. बिचारे पाहुणे आइने कशी झाली आहे भाजी विचारल्यावर चव चांगली झालीय एवढच म्हणाले :-)


Aparnas
Wednesday, April 26, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पण असाच एक किस्सा आहे पुरणपोळीचा. लग्नानंतरच्या पहिल्या श्रावण माहिन्यात मी माझ्या नणंदेला आणि आत्यांन्ना जेवायला बोलवलं होतं. उत्साहानी पुरणच्या पोळ्या करायच्या ठरवल्या. कुकरमधे डाळ शिजवून घेतली आणि ती तशीच न घोटता त्यात गूळ घालून गँस वर ठेवली आइ गूळ नेमका चिक्कीचा होता. त्यामुळे ते सगळं मिश्रण एकदम टणक झालं दगडासारखं. इतका टणक कि खलबत्त्यात घालूनही तो प्रकार तुटला नाही. शेवटी मग काय चितळे झिंदाबाद! श्रीखंड आणून वाढलं सगळ्यांना.
तात्पर्य: जेव्हा आपल्याकडे इतर कोणी जेवायला येणार असेल तेव्हा आपल्याला हमखास जमतील असेच पदार्थ करावे. नवीन पदार्थांचे प्रयोग जेव्हा आपण आपलेच असू तेव्हा करावेत. म्हणजे पदार्थ बिघडला तर सरळ टाकून देऊन आपण हाँटेल मधे जाऊन जेवू शकतो. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators