Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 23, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » कांदापोहे अनुभव » Archive through October 23, 2006 « Previous Next »

Rahul16
Saturday, April 08, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बाहिनी चा किस्सा,


तिला पाहायाला मुलाचे वडील आणी आई आले होते.
वडीलांजवळ प्रशनांची मोठी लिस्ट होती.
एकामागे एक असे ३०-४० प्रशन विचारुन झाले.

नमुने दाखल,

दासबोध वाचले आहे का?

५ संतांची नावे सांग?

एकतर्फी प्रेमातुन होनारे खुन याबद्दल मत काय?

बहिन पारिक्षेत पास झाली...:-)

मुलाचे वडील आमच्या काकांचे मित्र आहेत.

नंतर काकांनी त्यांची चांगली काढली,..:-)

मग मुलाच्या वडीलांनी हात जोडुन माफी मागीतली.

लग्न तेथे झाले नाही.



Ananta
Sunday, April 09, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाम मज्जा आली हे सर्व किस्से वाचुन....!!!


Anaani
Tuesday, April 11, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे किस्से वाचुन मज्जा आलि. I am lucky i didn't have to go through all this process.

Proffspider
Wednesday, August 09, 2006 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल आली हे सगळे किस्से वाचताना!!!!

Ludabuda
Wednesday, August 09, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलगी बघताना कांदेपोहेच क? खूप तिखट करुन डोळ्यासमोर अश्रुंचा पडदा झाला की मुलगी आणायची समोर, म्हणजे कशीही असली तरी नीट दिसत नाही परत आम्ही मुलगी दाखवली असे म्हणायला मुलीकडचे मोकळे----कल्पना चंगली आहे

आणि समजा मुलगी बघताना मला पिझ्झा हवा असेल तर मी काय करु?
कोणी अनुभवी मला मार्गदर्शन करतील काय मला निराश करु नका


Arch
Wednesday, August 09, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि समजा मुलगी बघताना मला पिझ्झा हवा असेल तर मी काय करु? >>
मग इटॅलियन मुलगी बघायला जा.


Chafa
Wednesday, August 09, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा डब्ब्यात पिझ्झा घेऊन जा. मुलगी समोर आली की लगेच डबा उघडून पिझ्झा खायला सुरुवात कर. :-O

Rachana_barve
Wednesday, August 09, 2006 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा मग मुलीला घरी बोलाव आणि KP ऐवजी पिझ्झा कर

Kedarjoshi
Wednesday, August 09, 2006 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि समजा मुलगी बघताना मला पिझ्झा हवा असेल तर मी काय करु?>>>>>>>>>>

HHPV. LOL. किंवा पिझाह्ट मधे बघन्याचा कार्यक्र्म उरक नी तिलाही पिझा खाउ घाल.

Ludabuda
Thursday, August 10, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच सल्ले मिळाले पण या सगळ्यात माझेच बरेच पैसे ख़र्च होतील हे कसे रे डोक्यात शिरत नाही रे तुमच्या. अरे तुम्ही कांदेपोहे काय मुलीकडे बरोबर घेऊन जातारे शिंच्यांनो? मला असे सल्ले देता ते
उपयुक्त सल्ले हवे आहेत देणार कारे?

आपला लुडबुड


Deepanjali
Thursday, August 10, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच सल्ले मिळाले पण या सगळ्यात माझेच बरेच पैसे ख़र्च होतील हे कसे रे डोक्यात शिरत नाही रे तुमच्या
<<<पैसे खर्च होउ नयेत म्हणून जालीम आणि एकमेव उपाय :
लग्नच करु नकोस , त्यामुळे हे आणि लग्नानंतर होणरे सगळे खर्च वाचतील आणि त्या पैशातून तुला हवे तेवढे पिझ्झे खाता येतील .


Limbutimbu
Thursday, August 10, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> खूप तिखट करुन डोळ्यासमोर अश्रुंचा पडदा झाला
छे छे छे, लग्नच करु नकोस हा उपाय नाही! :-)
तुला तिखट लागत असेल, तोन्ड आल असेल तर कच्ची तोन्डली खावुन मग जा, आख्खी मिरची कराकरा चावलीस तरी तिखट लागायच नाही!
अन येवढीच पिझ्झा खायची हुक्की आली तर तू मुलीच्या आईला सरळ पिझ्झाची ऑर्डर दे!
मग ती घरात जाईल, कालची शिळी कड्डक भाकर घेइल, त्यावर कालचा झुणका काधुन त्याचा लेप भाकरीला देइल! वर थोडी कोबी, कान्दा, कोथिम्बीर बारीक चिरुन पेरेल, दोन चमचे साजुक तुपाची धार टाकुन तुला सर्व्ह करेल! (आईच देणार, मुलगी नाय येणार येवढ्यात तुला सर्व्ह करायला! उगा भलतीच स्वप्ने बघु नकोस)
अन मग तो कालच्या शिळ्या भाकरीझुणक्याचा पिझ्झा तू चाखत माखत हाण लेका!
DDD

Moodi
Thursday, August 10, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या तुझी ही दणदणीत पाककृती रेसेपी बीबीवर लिही. इथे वाहुन जाईल.

Limbutimbu
Thursday, August 10, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> आपला लुडबुड
यापेक्षा "आपली" लुडबुड हेच व्याकरण दृष्ट्या जास्त बरोबर ना? :-)
अन तस असेल तर वरची पिझ्झ्याची कृती तुच करुन लचकत मुरडत लाजत बाहेर नेवुन दे!
DDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDddd

Ludabuda
Thursday, August 10, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बा लिंब्या तू सतत माझ्या पाळतीवर असतोस का जेथे जतो तेथे कटकट. अरे माझ्या वयाचे तरी भान ठेव जरा

Maudee
Thursday, August 10, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुमोदन लिंबू:-)

तुमची शिळ्या झुणका भाकरीच्या रेसिपीने तोंडाला पाणी सुटले आहे.

लुडबुड,
"अरे माझ्या वयाचे तरी भान ठेव जरा "
-वय झालं आहे तर कशाला मुली पहात फ़िरतो आहेस


Kedarjoshi
Thursday, August 10, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालची शिळी कड्डक भाकर घेइल, त्यावर कालचा झुणका काधुन त्याचा लेप भाकरीला देइल! वर थोडी कोबी, कान्दा, कोथिम्बीर बारीक चिरुन पेरेल, दोन चमचे साजुक तुपाची धार >>>>>>

लिंबुभो तुम जियो हजारो साल. काय फक्क्ड रेसीपी आहे.

माउडे, सही.



Princess
Thursday, August 10, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माउडी... छान उत्तर दिलस

Rujutajoshi
Friday, October 20, 2006 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hmm..khoop maja ali warche kisse pahun.

Mazha pan asach kissa. Bap re ajunhi kata yeto anga war. Amhi nuktech suru kele hote sthala pahayla. Tar hya mulche thal ale (mulga US madhye hota mag kay pay jaminiwar kase tiknar).

Punyat bhandarkar rd la ghar hota. Amhi gelo tevha sarva pratham mulachya wadlani maza zhdun interview ghetla. Uda: geeta yete ka? Mag 15 va adhyay mhanun dakhaw. Namke te mazhyach feild che nighale mag kay zhala FE te BE che sarva vishyavar mazhi viva suru.

Mazhya barobar mazhi mami wa kaka kaku ale hote. Mazhi ulat tapasni zhalyawar tyachya kade morcha walavla. Mazhi Mami BSNL madhye kamala ahe. Tar tila BSNL chi arthik shtit, kontya technology ne kaay sudharta yeil and what not... Mag rit sar kaka kauncha interview. Shewti to mulga chidla tyala mazhyashi bolache hote...
Mag amhala atlya kholi madhye pathawnyat ale.. Tar hya pathyane survatilach mala sunavle - Mhane ki Arranged marraige madhye sarv gaal asto mhane...Tithe matra mazha sayam sampla..mi asa sunawla na tyala...

Amhi ghari jaun itka haslo...bap re.
Bar itke houn suddha tyacha Hokar ala(???). Ani mazhya wadilani nahi sangtle tar mulache wadil bhandayla lagle ... Namune astat bai ek ek....


Sayuri
Monday, October 23, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे अनुभव मी इथे लिहिले..'शुभमंगल...सावधान"
http://manasokta.blogspot.com/2006/09/blog-post_28.html

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators