Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 26, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through September 26, 2006 « Previous Next »

Manishalimaye
Tuesday, September 19, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मला काही कामानिमित्त जरा जायच होत त्यापुर्वी मुलाला school-bus मधे बसवुन द्यायचे होते. मी stop वर गेले जरा घाईतच...
एक पिवळी bus आली St. Xavier's नाव पाहील आणि तो driver घेत नव्हतातरी मुलाला मी जबरदस्तीनेच त्या bus मधे चढवलं [ प्रत्येक ठिकाण्चे bus no. वेगळे आहेत. त्य त्या no चीच मुले त्यात घेतात]
मग बाअहेर जाऊन आले आणि घरी आल्यावर सारख वाटत राहील "आपण त्याला कोणत्या bus मधे ढकललं बरं. कुठल्या वेगळ्याच bus मधे तर नाही ना?[कारण या Xavier's group च्या बर्‍याच शाळा आहेत ]अगदी डोक दुखायला लागलं. त्याच्या शाळेत फोन करुन पाहीला लागलाच नाही नेमका, सरळ शाळेत गेले
ती bus खरंच त्याची नव्हतीच,दुसर्‍याच शाळेची होती.पण बसवाल्याने त्याला शेवटी त्याच्या शाळेत सुखरुप पोचवले होते


Lopamudraa
Tuesday, September 19, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ग..ती post आता येणार नाही..

पण आता नक्कि म्हणावस वाटतय काही खर नाही (तुझ्या मुलाच...)
एक पिवळी bus आली St. Xavier's नाव पाहील आणि तो driver घेत नव्हतातरी मुलाला मी जबरदस्तीनेच त्या bus मधे चढवलं >>>>>>>

Manishalimaye
Tuesday, September 19, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग नाव आणि रंग एकच त्या बस चा शिवाय मी प्रचंड घाईत होते ना,
नवरा फक्त एव्ढच म्हणाला----:"होत असं कधी कधी"


Chaffa
Saturday, September 23, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल वेंधळेपणा दाखवण्याचा प्रयत्न खरा!!!!
पण म्हंटलं वरती पोस्ट वरुन गोंधळ चाललाय तर का डिस्टर्ब करा नाही का
बाकी मरु दे. दोन दिवस झाले या गोष्टीला. यात वेंधळा कोण हे काही मला समजलं नाही, तुम्ही बघा प्रयत्न करुन.
त्याचं काय झालं. !!!!
घरात चाललय फर्निचरचं काम, मला आमचा सुतार म्हणाला( मी त्याला कारपेंटर म्हणावं असं तो म्हणतो. तरिही सुतारच.) 'सायेब आपल्याला ६ बाय ८ चा प्लायवुड पायजे'. म्हटलं देतो आणुन सगळा एरीया शोधला नाही मिळाला प्लाय, सांगितलं बाबा नाही मिळत तुझा तो प्लाय महाशय म्हणाले मग ठिकाय ८ बाय ६ चा मिळाला तर आणा, आणी आमचं ध्यान आख्या गावभर तो उपरुक्त प्लाय शोधत फिरलं. दुकानदार चाट, मग एकाला दया आली असावी त्याने यातली खरी गडबड सांगितली. त्या छत्रपती सुताराला मी झापला खरा पण दिवसभर उगाचच मला तोंडभर दाढी असल्यासारखं वाटत होतं.


Anushka1
Saturday, September 23, 2006 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्धा तास लिहायचा प्रयत्न करतेय. आता जमल
टाईमपास करायला ईथे आले. एक एक किस्से वाचुन करमणुक झाली खास करुन चाफ्फा कसला भारी वेंधळा माणुस आहे हा. चाफ्फा राग मानु नको सहज लिहिल.


Anushka1
Sunday, September 24, 2006 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाय द वे चाफ्फा तुझे लग्न झाले आहे का
सहज विचारलं कारण तस असल्यास तु तुझ्या पत्निला कितीवेळा आणी कुठे कुठे विसरुन आलास याची एक लिस्टच होईल नाही. तशी लिस्ट असल्यास तिही लिही.


Rahul16
Monday, September 25, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi mitrakade mukkamala gelo hoto.
sakali aanghol kelyawar tyacha dressing table warache deodorant samajun analgesic (zandu balm) spray aangawar marun ghetala.

mag parat changali ghasun aangol karawi lagali . pan tari ardha tas hasawe ki radawe samajat navate

Chaffa
Monday, September 25, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा म्हणण्यापेक्षा आमचा किस्सा:
शाळेत विद्यानप्रदर्शनाचे वारे वहात होते. आमच्या ग्रुपचा फार मोठा सहभाग. आता अंतरशालेय स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणुन आमचा प्रयोगशाळेत मुक्त संचार,, एका ऐतिहासिक गोष्टीवर रचलेला प्रयोग होता. शेवटच्या वेळी तिथे रंगरंगोटी चालली होती.. आता ऐनवेळी डार्क रंग कुठुन आणणार म्हणुन सरळ पोटशियम परमनगेट घेतले आणी जरा घट्ट रंग द्यावा म्हणुन त्यात (.............) मिसळले आणी मिश्रण एकत्र करेकरेस्तोवर पेटले की ते हा धुरच धुर आजुबाजुच्यांच्या घशात खवखव प्रयोगशाळेचा शिपाई येईपर्यंत टेबलावरही आग पसरलेली. कसाबसा त्याने गोंधळ निस्तरला पण त्यानंतर कधिही प्रयोगशाळेत गेलो की तो आमच्या आजुबाजुला रेंगाळताना मी पाहिलाय


Yogesh_damle
Tuesday, September 26, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात्रीची शिफ़्ट संपल्यानंतर घरी जायला निघालो होतो. रस्त्यात बॉस चा फ़ोन आला. 'ऑफ़िसमध्ये लोच्या झाला रे' च्या आशयाचा. तो 'लोच्या' एकत आणि त्यावर तोडगे सुचवत मी इतका गुंगून गेलो की घाटकोपरला उतरायचं विसरूनच गेलो! ठाण्यापर्यंत गपचुप बसून राहिलो आणि परतीच्या प्रवासात घाटकोपरला गोरामोरा (अजून होणं शक्य नव्हतं तरी!) होऊन उतरलो :D

चाफ्याची बायको त्रासून म्हणत असेल, "चाफा खंत करी काही केल्या सुधरेनाऽऽऽऽऽ!"

Rachana_barve
Tuesday, September 26, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी चौथीत होते तेंव्हा मी पण असच केल होत. माझी शाळा अभिनव होती आणि मी विसरूनच गेले की उतरायच आहे नळस्टॉपला. मग डेक्कन कॉर्नरला शेजारची बाई म्हणे अग शाळा आली उतरणार का? तर मी बघते तर काय डेक्कन कॉर्नर आणि विमली समोर. मग एकदम एंबॅरेस की काय तशी झाले. हसून फ़जीती लपवत खाली उतरले. मग डेक्कन वरून बस कशी मिळवायची मला माहित होते मग पुल ओलांडला. आणि चुकून डेक्कन ला बाहेर निघायच्या ऐवजी संभाजी पुलावर आले. चालत चालत तुळशी बाग. मग आता रडते की नंतर अशी स्थिती झाली. काय करावे सुचेना. मग शेवटी रिक्षेवाल्याला थांबवले त्याला सगळ सांगीतल. माझ्या नशीबाने तो शाळेचा रिक्षेवाला होता. त्याने मला सुखरूप घरी पोहोचवले

अजून मी अशीच दुसरी तिसरीत असेन आणि आमच्या इथे वेगवेगळ्या मुलांच्या आया शाळेत सोडणे आणणे करायच्या. I mean वार वेगळे वेगळे. एक दिवशी एक काकू मला विसरली. मी आपली वाट बघते आहे आणि हि विसरली. मग मी शाळेतून चालत चालत घरी निघाले. तेंव्हा आम्ही झाला मध्ये रहायचो. मला रस्ता तसा माहित होता. मधे रस्त्यात आई घाबरून मला शोधायला निघालेली सापडली. मी तिथे आईला मिठी मारली. बहूतेक अपमानाने असेल पण मी २ तास रडले. मग आईची आणि त्या काकूंचे २ तास नंतर भांडण बघायला मिळाले :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators