|  
Storvi
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 3:14 pm:    |  
 
 
 |   
  |   
 असंच काही नाही. मी एकदा  AI  ने गेले असता ती हवाई सुंदरी एका माणसाबरोबर  flirt  करत बसलेली  (  तो भारतीयच होता  )  आणि ती बाकीच्यांनी काही मागितले तर इतका त्रस्त चेहरा करत होती की माझी काही मागण्याची हिम्मतच नाही झाली      पण असा अनुभव मी इतरही ठिकाणी घेतला आहे. मागच्या वर्षी  Korean  ने भारतात गेले होते. परतीच्या प्रवसात, विमान खुप भरलेले होते. मी  bassinet  मागितले होते सो मला पुढची सीट मिळाली. पण आणखी एका कुटूम्बालाही ते पुढच सीट मिळाल होतं त्या समोर्च्य सीट्स मध्ये ते चार लोक होते. बाळाचं त्यांनी तिकीट काढलेल नव्हतं सो एक सीट रिकामं होतं. त्याबाईने खुशाल आपल्या मुलाला तिथे ठेवल  (  ही बाई कोरीयन होती  ) . आता हे मलाही करता आलं असतं पण आम्ही पडलो सभ्य, इतरांचा विचार वगैरे करणारे. आणि त्यांची एक सीट बॅसिनेट समोर होती आणी मीही बॅसिनेट मागितल्याने तीच्या नवर्याला कडेची सीट होती. मग एवढे करून तिने ह. सु. ला सांगितले आमची  family split  होते ह्य बाईला हलव. अरेcचा? आणि ती बाई मला म्हणते तु कडेला बस. म्हटलं मुळीच बसणार नाही. मी बॅसिनेट मागितलय मी बॅसिनेट समोरच बस्णार. नाःइतर पोरीला कुठे ठेउ? त्यांना ही जागा हवीच असेल तर मला दुसरीकडे दोन सीट्स रिकाम्या दे तरच मी इथुन हलीन. पण त्या बाईला खुSः करण्याच्या नादात ह्या ह.सु. ने एका गोर्या ग्रुहस्थाला हलवायला लावले, त्याला माझ्या ऐवजी कडेची सीट दिली, मग मला तिथल्या दोन सीट्स दिल्या. हे सगळा का तर त्यांच्या परिवाराला एकत्र बसायच होतं. मला बरच झालं मागुन सुद्ध दोन सीट्स मिळाल्याच नस्त्या, आणि आरोही तशी सारावेळ बॅसिनेट मध्ये बसली नसती, आणि मावतही नव्हती. आणि  turbulance  इतका होता, की सारखा तिला  cover  करून पाठाण मोडलं असता  (  येताना पाठीचा पार भुगा झालेला  )  
 
  |  
Kalandar77
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 4:14 pm:    |  
 
 
 |   
  |   
 स्टो, का sss ही कळलं नाही! कोण कुठे बसलं होतं ते परत सांग!       >> मी एकदा AI ने गेले असता ती हवाई सुंदरी एका माणसाबरोबर flirt करत बसलेली     LOL! मी पहिल्यांदा अमेरिकेत येत असताना तर  Air India  मधील एक हवाईसुंदरी आणि एक हवाईसुंदर यांची जेवण झाल्यावर मंद दिव्यांमध्ये 'मुखशुद्धी' चालु होती मधल्या जागेत अर्धवट पडदा लावुन!   मी म्हटलं, शिव शिव, अमेरिका यायच्या आधीच अश्या गोष्टी सुरु!      मला व्यक्तिश:  Air India  चा म्हणावा असा वाईट अनुभव आला नाहीये, पण त्यांचे  safety issues  एवढ्यात बरेच वाचण्यात आल्यामुळे  AI  ने जाणे बंद केले आहे.  
 
  |  
 सगळ्यात चांगली सर्व्हीस मला तरी सिंगापुर  airlines  ची वाटली. बाकी कोरीयन सगळ्यात जवळची म्हणून गेले होते पण मधे सेउल ला ते जो काही प्रकार करतात तो काही कळला नाही उगीच उतरून रांगेत उभ राहून परत फ़्लाईट मध्ये चढायच. 
 
  |  
Dinesh77
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 4:42 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मंडळी,   मला तरी एअर इंडियाचा असा काही अनुभव आलेला नाही. आत्तापर्यंत ५ वेळा विमानात बसायचा प्रसंग आलेला आहे. पण एअर इंडिया सर्वोत्तम.  खरोखरीच सुंदर असलेल्या हवाई सुंदर्या, तरुण, व्यवस्थित साडी, काहिही मागितले तरी हसुन देणे आणि अतिशय स्वादिष्ट जेवण.  कदाचित अपवाद असावा किंवा सौजन्य सप्ताह चालु असावा. 
 
  |  
Sashal
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 4:44 pm:    |  
 
 
 |   
  |   
 अगं पण रचना,  Singapore  चाही  refuelling halt  असतोच सोल मध्ये आणि मग  security check  करायला लावतातच परत  ..  मला तर ते बरं वाटतं  ..  साडे बारा तासांच्या  flight  नंतर किमान पाय मोकळे करायला मिळतात  ..  बरंच आहे एका अर्थी ते  ..  
 
  |  
 अरे हो विसरलेच होते.   बरोबर बरोबर 
 
  |  
Milindaa
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 4:51 pm:    |  
 
 
 |   
  |   
 काहिही मागितले तरी हसुन देणे  <<<  दिनेश, असं वाटलं म्हणजे तुमचं विमान पण उंच असणार       मला वैयक्तिक अजिबात वाईट अनुभव नाही एअर इंडीया चा, पण हसून सर्व्हीस म्हणजे हॅ हॅ हॅ (असामी असामी मधल्यासारखं हसतो)      
 
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 5:11 pm:    |  
 
 
 |   
  |   
 हसून सर्व्हीस देतात की नाही आठवत नाही. हं जेवण झकास असते, छोले काय मऽऽस्त असतात. मी पहिल्यांदा आले तेव्हा त्या ह. सु. ला लंडनला उतरण्या आधी फॉर्म मागीतला तर ती आ वासुन बघायला लागली, तुम्ही लंडनला उतरणार? तिने विचारले, (मी मनात म्हटले,  विमान शिकागोला चालले म्हणून मी पण काय पुढचा प्रवास फुकट करु का?) कारण तिने सर्वांना नुकतेच खाणे दिले होते.     आता मी फुकट खाल्ले असा तिचा गैरसमज असेल तर असो.( तिने कुठे सांगीतले की लंडनला उतरणार्यांनी आधी सांगा म्हणजे आम्ही अर्ध्याच प्रवाशांना खाणे देऊ)  पण या लोकांना माहीत असतेच की कोण कुठे उतरणार ते.       
 
  |  
Dinesh77
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 5:20 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मिलिंदा,  अहो नाही हो, त्या विमानाच्या वाटेलाही गेलेलो नाही अजुन.  
 
  |  
Storvi
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 5:27 pm:    |  
 
 
 |   
  |   
 >>अहो नाही हो, त्या विमानाच्या वाटेलाही गेलेलो नाही अजुन.   >>जाऊदेखिल नका... आताच ही अवस्था अहे तर त्या वाटेला गेल्यावर  ' आधीच मर्कट  '  व्हायचे   
 
  |  
Sami
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 5:27 pm:    |  
 
 
 |   
  |   
 दिनेश, सर्वात सुंदर असलेल्या हवाई सुंदर्या नेहमीच नसतात काही  AI  मधे... मी आणि माझा नवरा एकदा उत्साहाने  AI  ने गेलो होतो मुंबई ते दुबई... नवर्याला फार आशा होती. पण आमच्या वाट्याला एक जाडिअम्मा आली होती कोणीतरी  south indian  होती...  juice  चा ग्लास देताना सुद्धा वाकणं जड झालेलं तिला. मला वाटतं काही काहीच सेक्टर्स ना छान छान ह.सु पाठवत असावेत.  :-p
 
  |  
Deepanjali
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 5:30 pm:    |  
 
 
 |   
  |   
 रचना  -  सशाल ,   खरच  Singapore Airlines is the best..!  आणि कॅथे पॅसिफ़िक चा पण चांगला अनुभव ऐकला बर्याच लोकां कडून  (  बहुतेक हवाई सुंदर्यांचा चा महिमा  )    
 
 
  |  
 मग सुंदर नसतात तर हवाई सुंदरी का बरं म्हणत असावेत? उपहासाने तर नव्हे? त्या पुरुषांना कोणी हवाई सुंदर म्हणत नाही ते?      बाकी, मलाही  AI  चा वाईटच अनुभव आहे. 
 
  |  
Kedarjoshi
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 5:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मी असे ऐकले (भावाने सांगीतले) की भारतातच चालनारे  spice jet  आहे त्यांचा हवाई सुंदर्या खरच सुंदर असतात. बाकी अमेरिकन एअरलाईन्स चे दिल्ली शिकागो दिल्ली हे विना थांबा विमान फारच मस्त आहे. हवाई सुंदर्या व सर्विस पण. चक्क समोसा वैगरे देतात खायला. 
 
  |  
 कॅथे पण ठीक आहे म्हणे पण त्यांचा हॉल्ट जास्त आहे. मला पण सिंगापुरच आवडते. परत समज मुंबईहून लेट झाली फ़्लाईट पोचायला आणि  connecting  मिळाली नाही (हे असे बर्याचदा घडते) तर जेवण, रहाणं सगळ्याची सोय व्यवस्थीत करतात. आणि वर फ़ुकट सिंगापुरचे  tours        तुम्हाला ह सु सुंदर आहेत की नाहित ह्याचा खरच फ़रक पडतो का? मी तर निम्म्यापेक्षा जास्त वेळ झोपतेच फ़्लाईटमध्ये. विचारलेल्या प्रश्णांची आणि काही मदत हवी असल्यास तत्परतेने केली तरी पुरे इतकीच अपेक्षा असते माझी ह सु कडून 
 
  |  
Sashal
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 5:59 pm:    |  
 
 
 |   
  |   
 it might matter a great deal for a man travelling without a company ..  
 
  |  
Sayuri
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 6:08 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मी AI ने अजून गेले नाही. (Thank God!) पण माझे एक नातेवाईक गेले होते. ते Business class मधे होते आणि तिथे त्यांच्या सीटपुढे भरपूर मोकळी जागा होती. त्यांना वाटलं असं काय, तर नंतर कळलं की पुढ्ची सीट नादुरुस्त झाल्याने पूर्णच काढून टाकली होती.    मी आत्तापर्यंत सिंगापूर, थाय, कोरिअन try केल्यात. मला सिंगापूरच बेस्ट वाटली. Food आणि service साठी. कोरिअन पण चांगली आहे पण मला त्यांचं food नाही आवडलं. घरून डबा नेलेला उत्तम. Jet Airways पण चांगली आहे म्हणे..कोणाला काही अनुभव? अर्थात ती फ़क्त सिंगापूर आणि लंडन साठीच आहे ना. 
 
  |  
Deepanjali
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 6:09 pm:    |  
 
 
 |   
  |   
 अम्हाला  last India trip  हून येताना  Singapore airlines  ची  flight  काही तास  late  होती म्हणून तिथल्या समुद्रकाठी असलेल्या एकदम  classy hotel rooms  दिल्या होत्या     80 th floor  वर  ,  झकास समुद्राचा  view.   आणि  room  पण एकदम सही होती  octagonal shape  ची ,Room  चे  front panel  पूर्ण  transperent  काचेचं वगैरे .   शिवाय  US  मधे आम्ही  mention  केलेल्या  family,friends  ना आम्ही  late  येणार आहोत याची  personal phone  करून माहिती वगैरे दिली होती .   
 
  |  
Svsameer
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 6:26 pm:    |  
 
 
 |   
  |   
 अरे वा..  मि तर म्हणतो असं असेल तर आमचंही  flight  येताना  delay  होउदे  :D
 
  |  
Adtvtk
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 7:01 pm:    |  
 
 
 |   
  |   
 आतापर्यन्त ३-४ वेळा  Air-India  ने प्रवास केला. एकदा १ वर्षाच्या मुलीसोबत पण फ़ारसा काही वाईट अनुभव नव्हता पण मागचा २ मुलांना घेउन केलेला  NY JFK Mumbai  प्रवास वाईटच झाला.  मुलगा दिड वर्षाचा होता म्हणुन आम्हाला  basinate seat  नही दिली. त्याचे फ़ारसे काही वाटले नाहि पण मधलीच  seat  दिली ३ तास आधी जाउनही. पोर (१.५ व ३.५) समोर लाथा घालु नये म्हनुन अक्षरश त्यांचे पाय धरुन बसवे लागले. तरी एकदा भांडण झालेच.  येताना ४-५ तास आधी गेलो. पण मला आणि मुलाला पुढची  basinate Seat  आणि नवरा आणि मुलगी कुठेतरी पाठी. आणि वर  via  दिल्लि. विमानतळावर  seats  एकत्र द्यायला सांगितले तर अर्धा तास  computer  वर खुडबुड करुन नंतर इथुन काही करता येत नाही पण विमानात करु शकाल असे संगितले. दिल्लिपर्तन्त तग धरला व नंतर एकत्र  seats  मिळतील का तर विचरले तर ह.सु. चे उत्तर  That's your problem what can I do?  नशिबाने एक वयस्कर  attendant  ने विमानच्या शेवटच्या  seats  एकत्र दिल्या. पाठच्या कितितरी  seats  रिकम्या होत्या.  आणि पुन्हा कध्धी  Air India  ने जावे लगले (नाईलाजाने)तर  Via London  जाणार नाही. पुर्वी  stop over  ला एका दाराने बहेर पडुन दुसर्या दारने आत घेत पण आता आख्खा  Air Port  फ़िरुन जावे लागते त्याच  gate  कडे 
 
  |  
 
 | 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
 
 हितगुज दिवाळी अंक २००७ 
 | 
   |  
 
 
 
 
 |