| 
   | 
| | Rakhee 
 |  |  |  | Friday, September 15, 2006 - 11:49 pm: |       |  
 | 
 आजुन एक आलिकडचा कीस्सा. माझी ३ वर्षाची मुलगी मझ्या उजवीकडे बसली होती आणि मी तिला दहि-भात भरवत होते. छानपैकि हिरव्या मिरचीची फ़ोडणी घातलेला जरासा तिखट भात होता. माझी दुसरी ६ महिन्याची मुलगी माझ्या डाविकडे बाऊन्सर मधे बसली होती. आमच्या घरी तेन्व्हा कोणीतरी आले होते. त्यान्च्याशी बोलण्याच्या नादात मी चुकून मझ्या ६ महिन्याच्या मुलिला तो तिखट भात भरवला. बिचारी १ महिन्यापुर्वीच नुसते मिठ घातलेली पेज वगैरे खायला लागली होती. तिनी तोन्ड वेड-वाकड केल्यावर मला माझा वेन्धळेपणा लक्शात आला
   
 
 |  | psg , या बीबीवरचे बरेचसे अनावश्यक मेसेज उडवले गेले, त्यामुळे तुमचा मेसेज  out of context  झाला होता, त्यामुळे तो ही उडवावा लागला.
 
 
 |  | | Chaffa 
 |  |  |  | Sunday, September 17, 2006 - 2:44 am: |       |  
 | 
 आणखी एक जुनी गोष्ट.
 मि पुर्वी काम करत असे तिथली
 आमचा एक सहकारी थेट केरळ मधुन आला होता त्या प्राण्याला ईंग्रजी सोडुन फक्त हिंदी तिही कामचलाउ येत होती. आता आमचे हिंदी काही शुद्ध वगैरे नव्हते तेही यथातथाच, पण ठिकठाक होते.
 एकदा त्याच्या बद्दलच काहितरी चर्चा चालु होती आणी हा मनुष्य आला, सहजच म्हणालो ` शैतान का नाम लिया शैतान हाजिर'. तुफान भडकला,
 आण ऐन वेळेस सगळ्यांची हिंदी दगा देऊन गेली.
 हे महाशय काही समजुन घ्यायला तयार नाहित आणी ईथे कुणाला म्हणिला हिंदीत किंवा ईंग्रजीत काय म्हणतात ते काहिकेल्या आठवेना! ह्या छत्रपतींचे 'तुम मेरेको शैतान बोला' पालुपद चालुच, आणी 'ईसको म्हण बोलता है ' हे बाकिच्यांचे समजावणे चालु शेवटी कुणी समजुत काढली देवजाणे.
 
 
 |  | चाफ़ा भान्नात किस्से आहेत एकदम.. मी आजच वाचलेत..!!!
 
 माझाही एक किस्सा.. आमची  meeting  वेळ अकराचा.. सांगितला जायचा पण साहेबांच्या वेळे नुसार..सुरु व्हायची मग तोवर मग कधी दुसर्या  branch  ला भेट  or  कंटीन ला बसायचो.. आणि साहेबांनी जर  meeting  सुरु करायचा आदेश दिला.. तर त्यांचा  PA  आमच्यापैकी एकाच्या  MB  वर  ring  द्यायचा.. मग आम्ही लगेच दोन मिनिटात  meeting hall  मध्ये हजर व्हायचो.एकदा.. कटीनला गेलो order  दिलि आणि लगेच  ph  आला..  order cacel  केली आणि घाई घाईने निघालो.. निघतांना मैत्रिणीने एक  folder  हातात दिले.. हे काय ग तुझे कागद इथेच राहिले होते.. मीही.... हो ग मी वेंधळीच आहे म्हणुन लगेच घेतले(नवरा रोज म्हणत असल्याने मनावर अगदी बि.ब्बले आहे.) आणि साहेबांसमोर जाउन बसलोही.!!!
 meeting  मध्ये..   माझा  number  पहालाच आला. नेमका.. (प्रश्नाचा). मी आपली उठुन..  file  उघडली.. तर समोर.. मेदु वडा..  10:Rs..
 दही वडा..  12:Rs.
 इडली सा.म्बार ऽशी यादि आली..
 ते  menu card  होते...घाइने तीने माझ्या हातात दिलेले.. .!!!
 
 
 |  | | Chaffa 
 |  |  |  | Sunday, September 17, 2006 - 7:30 am: |       |  
 | 
 बिंधास विचारायचं मेंदुवड्याची आजची किंमत काय.?
 टेन्शन नै लेनेका    lopamudraa.
 
 
 |  | | Chaffa 
 |  |  |  | Monday, September 18, 2006 - 1:40 am: |       |  
 | 
 लच लाउन चावी घरातच विसरणे ही माझी जुनी सवय. यावर माझ्या मित्रांनी एक सुस्साट आयडीया दिली होती, चावी तळ्मजल्यावरच्या पत्रपेटीत ठेवणे.
 आवर्जुन एकदा चावी लेटरबॉक्समधे ठेवली, मनापासुन धाडकन दरवाजा बंद करुन आरामात कामावर निघुन गेलो.
 परत आल्यावर लेटरबॉक्स उघडायला खिशात हात घातला आणी घात झाला लेटरबॉक्सची चावीतरी कुठे खिशात होती चावी घरातच.
 बरं बनवणार्याने या लेटरबॉक्स अशा बनवल्यात की जसे बंकेचे स्ट्राॅंगरुम उघडायचे वांधे. एक बॉक्स उघडताना दुसर्याचे नुकसान अटळ.
 अखेरीस एका दयाळू शेजार्याने त्याच्या बॉक्सचे नुकसान सहन करुन मला बॉक्स फोडायला परवनगी दिली तेंव्हा कुठे आमचा घरात प्रवेश झाला.
 दोन दिवसांनी लेटरबॉक्सच्या दुरुस्तिचे बिल माझ्या घरी
 
 
 
 
 |  | चाफ़ा..{लोल ..आणि हा पण मजेशिर अनुभव.. आणि हमखास घडणारा किस्सा आहे हा..(मी पण घेतलाय हा अनुभव)!!!
  .. 
 मागच्या आठवड्यात.. मी केलेला.. वेंधळेपणा तर... कळस.म्हणावा लागेल..
 आम्ही सगळे..  lawn tenis.  खेळायला.. गेलो होतो. bharataatun   नुकतेच आले होते आणि आल्य आल्या माझा पाय मुरगळला म्हणुन मी बसुनच होते काही दिवस.. त्या दिवशी पर्स घेउन पहिल्यानदाच बाहेर पडले आणि तिथल्या  topilet  मध्ये..पर्स विसरुन आले..!!! वर नवर्यला.. गाडी  lock  केली आहे का माझी पर्स आज गाडित राहिलिये म्हणुन सांगितले.. नतर घरी आलो तरी लक्षात नाही गाडित पर्स बघावी म्हणुन.. आणि त्यांनतर तीन तास आठवण सुध्दा आली नाही र्आत्री १० वाजता  LINCONSHIRE POLICE चा घरी फोन तुम्ची पर्स हरवलिये का? म्हणुन.. मग फोनवरच विचारणे काय काय आहे आत,.. आतल्या वस्तु जशा जशा मला आठवायला लागल्या तसा घाम फ़ुटायला लागला... आमचे  paassport ..,माझ  debit card ,१००००  indian Rs... ,१००  pounds. .., आनी इतर  library card , shops chii cards .. अजुन काही वस्तु आठवल्याच नाहित तेव्हा तो  officer  महणतो  i have a surprise for you..!!!  आणि माझा डिजिटल  cameraa  पण आहे अस त्याने हसत हसत सांगितले..माझ पर्स च वर्णन बरोबर आहे ऐकुन येउन पर्स घेउन जायला सांगितली... (त्यादिवसाननतर माझा नवरा मला काय म्हणतो हे सांगायला शब्दांची गरज नाही..
  ... 
 
 |  | | Jayvijay 
 |  |  |  | Monday, September 18, 2006 - 9:31 am: |       |  
 | 
 Lopamudra तुमच नशिब चांगल होत म्हणुन पर्स सर्व वस्तुंसहीत परत मिळाली अन्यथा केवढा अनर्थ ओढवला असता, कल्पनाच करवत नाही.
 तुम्ही यूके मध्ये आहात काय?
 
 
 |  | हो, जयंत मी  uk  त असते,
 अग मनिषा भारतात खुप आहे प्रामाणिक पणा माला वाटलेच आता  V&c  सुरु व्हायचे पण  polisanchaach   कधि कधि विचित्र अनुभव येतो.ऽसो
 आणि एकदा  busstop   वर.. माझे  traning  संपौन परत येताना माझ्या  hand bag  मधुन..संगम्नेर ला.. बस मध्ये चढताना पर्स मारली गेली.. तिक्टाला ही पैसे नव्हते रात्र्रिचे..११ वाजएलेले.. कंडुक्टरला माझे  I card  दाखवले मिही महराश्त्रशसनाच्या सेवेत आहे म्हणुन संगितले..त्याने बिचार्याने मला तिकिट काढुण दिले.!!! पर्स काहीइ मिळाली नाही....!!!
 
 
 |  | अजुन एक किस्सा.....
 मला काही कामासाठी सकाळी ७:३० लाच घराबाहेर पडावे लागले.. मुलाला १०० सुचना देउन घराबाहेर पडले..... मुलाची  caretaker  त्याला शाळेत सोडायला.. ८:२० ला येते.. माझे आचानक जाणे ठरल्याने आदल्या दिवशी मी तीला काहीच सांगितले.. नव्हते..,नवरा नेमका तेव्हा.. जर्मनी ला गेलेला..एका तासा साठी कोनाची काय मदत घ्यायची आणि मुलाने सगळ्या सुचना निट कळल्या आत्ता परत सांगु नको म्हणून सांगितले..!!!
 . ४ वाजता मी आले तेव्हा..  Caral  ती दारात उभी.. घराचे दार नुसतेच लोटलेले.. आत गेले तर.. tv  चालु.. आनी दारात चिठ्ठी  " मी इथला  Postman  आहे माझ नाव  Dave  मी सकाळि काही  Post  टाकयला आलो तर तुमचे दार पुर्ण उघडे होते घरात चाहुल लागली नाही म्हणुन.. दार लाउन घेतले.. "
 caral  ने सांगितले मी आज तुमच्या मुललाल शाळेत सोडले नाही, आले तेव्हा घरी कोणिच नव्हते..माझा  mb  घरिच असल्याने माझ्याशी  contact   झाला नाही..
 मग मात्र आम्ही दोघी हादरलोच.. घाइने शळेत जायला.. निघालो.. शाळेत केव्हा पोहचु असे झालेले.. त्यात बाइसाहेब  lane  चुकल्या.. मोठ्ठा वळसा घेउन जावे लागले अजुन उशिर तोवर गाडीत मी तीच्यावर भरपुर चिड्चिड करुन घेतली. ,माझा  mb  लाग्ला नाही तर..  Mr  ना तरी फोन करायचास.. म्हणजे त्यानी  copanit  फोन करुन काही तरी चौकशी केली असती.. शालेत गेलो तर.. मुलाचे  sport teacher  समोर दिसले.. त्यानी दाखवले स्वारी रग्बी खेळण्यात गुंग होती..!!!
 झाल अस.. ७:३० ते ८;३०हा वेळ एकटा असल्याने त्याला घरात खुप मोठ्ठा वाटला.. आणि आज करल आपल्याला.. घ्यायला आली नाही अशी समजुत करुन त्याने  cycle  काढली आणि शाळेत निघुन गेला.. ८:३० च्या आधीच..!!!! हुश्श..
 
 
 
 |  | लोपा ताइ, अरे बापरे, काय किस्से आहेत हे, मुलान्च्या बाबतित अशि रिस्क बर नव्हे हा ताइ. आमचे सुध्दा इथे डोम्बिवलित अशिच घाइ चालु असते सकाळि, कारन मिसेस घर सोडते ६.०० वा. आनि मि सोड्तो ७.१५ ला, पण अग्दि मारा मारि वेळेचि..
 बर मग..
 
 
 |  | त्या पर्स चा किस्सा वाचून मला पण आठवला. मी कुठेतरी कंपनीच्या कॉन्फ़रंस साठी गेले होते.  somehow  कोणीतरी माझी पर्स उचलून नेली की मी कुठे ठेवली हे मला नंतर आठवल नाही. काय झाल कोण जाणे पण पर्स गायब. रत्रि १० ची वगैरे वेळ होती. फ़ोन पण नव्हता तो देखिल पर्समध्ये. कळतच नव्हत काही. ज्या हॉटेलमध्ये शेवटचा दिवस म्हणून पार्टी होती त्याच्या लॉबी मध्ये उभी राहून मी विचार करत होते की आता काय करायच. सकाळी सकाळी फ़्लाईट होती.  लायसंन्स पण नाही तेही पर्समध्ये. मला फ़्लाईट मध्ये बसू पण कोणी देणार नाही. आता काय करायच असत हेच माहित नव्हत. डोळ्यातून गंगा जमूना. माझ्या सुदैवाने एक मराठी मुलगा चक्क समोर. त्याला हकिकत सांगीतली. मग त्याने मला तिथून पोलिस चौकीत नेल. पंचनामा लिहिला. रात्री २ वाजेपर्यंत पोलिस चौकीत आम्ही बसलो होतो.. मग पहाटे ६ ला फ़्लाईट तसच त्याने मला सामानासकट  airport  वर सोडल.
 तर तात्पर्य अस की समज पर्स हरवली आणि लायसन्स नसेल तर पोलिसचौकीत जाऊन पंचनामा लिहून घेउन त्याची ऑपी  Airport  वर दिली तर आत सोडतात
   
 
 |  | | Maitreyee 
 |  |  |  | Monday, September 18, 2006 - 8:43 pm: |       |  
 | 
 रचना मग त्या मराठी मुलाचं काय झालं? म्हणजे काही झालं का नाही पुढे
   
 
 |  | अरे व्वा ओपाताई, महामंडळा चा Conductor बिचारा  चांगला होता की, नाहितर मी आता प्रयंत चिडणारे आणि ओरडणारे च Conductor पाहिले आहेत.
 
 
 |  | | Chaffa 
 |  |  |  | Tuesday, September 19, 2006 - 1:39 am: |       |  
 | 
 आमच्या ईथे बरीच लेबरमंडळी तंबाखु खातात, म्हणजे आपण बडिशेप तोंडात टाकतो तसा तोंडात टाकतात. म्हंटलं चला एकदा आपणही चव घेउन बघावी. एकाकडे मागितला तंबाखु, त्यानेही झक्कपैकी मळून वगैरे दिला. (आता मुळात या तंबाखुला खाणे असे म्हणणारा मला मिळायला पाहिजे अरे तो काय खातात का.?)
 मी मस्तपैकी तोंडभर हसत तो घेतला आणी शब्दश खाल्लाऽऽऽऽ पुढ्चं काही आठ्वत नाही, डोळे उघड्ले तेंव्हा आमच्या फस्ट एड रुममध्ये होतो. मग पुढे अख्खा दिवस मी आणी बेसिन चांगली जोडी बनली होती.
 नंतर बरेच दिवस तो मनुष्य भेटला की हमखास विचारायचा क्यों साब तंबाखु बनाउं क्या.?
 पण मला माहितेय की मी तंबाखु खाल्ल्यावर माझ्यानंतर डोळे त्याचेच पांढरे झाले होते.
 
 
 |  | रचना मग त्या मराठी मुलाचं काय झालं? म्हणजे काही झालं का नाही पुढे >> तो किस्सा परत कधीतरी गं
   
 
 |  | | Bee 
 |  |  |  | Tuesday, September 19, 2006 - 5:27 am: |       |  
 | 
 कदाचित त्या मुलानेच रचनाची पर्स ऐनवेळेवर लांबवली असेल :-) सिनेमात हीरो असेच तर करतात हीरोईनला मदत करण्यासाठी :-)
 
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |