Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Malaa vinodi vaTlele

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Malaa vinodi vaTlele « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 25, 200720 08-26-07  12:37 am
Archive through January 28, 200820 01-28-08  1:12 pm
Archive through January 29, 200820 01-29-08  4:56 pm
Archive through March 29, 200820 03-29-08  7:36 am
Archive through March 30, 200820 03-30-08  8:09 am
Archive through March 31, 200820 03-31-08  8:51 pm
Archive through May 28, 200820 05-28-08  9:31 pm

Raviupadhye
Thursday, May 29, 2008 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही वेळा वेब साईट वरूनच एकन्दर काय प्रकार आहे याची पूर्ण कल्पना येण्याएवढा अनुभव्/ skill आपणा सर्वात असते. आणखी खरोखर अनुभव घेवून पैसे व वेळ वाया घालवण्याची गरज नसते. अय्यंगारांची संस्था तत्सम कार्य करते,अन्य अनेक आयुर्वेद तज्ज्ञ अशीच सेवा देतात. ह्या बालाजींच्या वेब साईट वरून काय वाटते ते चिन्या जी तुम्हीच सांगा-:-)

Uday123
Thursday, May 29, 2008 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेवढे पाणी वाईट, दूषित वा विषारी असेल तेवढा त्यावर वाईट शक् ०दतींचा व वाईट विचारांचा प्रभाव जास्ती पडतो व ते अधिकच दूषित होऊन मनुष्यमात्राच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते, हे आता सप्रयोग सिद्ध झालेले आहे.
--- हे प्रयोग कुणि केलेत? वाईट विचरांचा प्रभाव पाण्यावर पडायला लागला तर जगात एक थेंबही 'शुद्ध पाणी' मिळायला नको, जिवसृष्टी कधीच नष्ट झाली असती, पण तसे होतांना दिसत नाही. वाईट, चांगले विचार हे व्यक्ती नुसार बदलतात. तुम्हाला जे वाईट किंवा चांगले वाटेल ते मला तसे वाटेलच असे नाही, मग पाण्याला कसे कळणार हे विचार चांगले आहेत अथवा वाईट. मग या महाशयांना कुणी जर फ़ेका(थापा)ड्या म्हटले तर काय चुकले?


Dakshina
Thursday, May 29, 2008 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय, तुम्हाला १००% अनुमोदन. त्यांच्या लेखात कायम अचाट आणि सामान्य जनांना परवडणार नाही असेच उपाय दिलेले असतात. रोज म्हणे अमूक तमूक वेळ व्यायाम केला पाहीजे, मान्य आहे, अहो पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, धड जेवायला वेळ नाही मिळत लोकांना..
व्यायामाचं सोडा, मनुके, बेदाणे... असं उच्चं दर्जाचं खाणं खा असं ही ते सांगतात... हे म्हणजे सगळं आवाक्याबाहेरचं (निदान माझ्यातरी) महागाई मुलखाची वाढलेय, या ढमूक फ़ळाऐवजी सबस्टीट्यूट म्हणून हे 'हे' फ़ळ खा, असं सुचवताना ते कधीच दिसत नाहीत. आणि हे शुद्धा पाणी प्या, हे खा, ते खा हे सामान्य जनांना कळत का नाही? असले सल्ले फ़ुकट कुणिही (मी ही) देतंच... त्यासाठी खास बालाजी तंबेच कशाला हवेत?


Tonaga
Thursday, May 29, 2008 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बालाजी तांबेंकडून उपचार करुन घेतलाय का कोणी???त्यांच्या उपचाराने गुण येतो का नाही हे माहीतिय का कुणाला??का नुसताच त्यांच्या लेखांवरुन त्यांना शिव्या देत आहात???बुध्दीप्रामाण्यवाद्यांनी अशा चुका करु नयेत. >>>>>>छान, म्हनजे आता कुडमुडे ज्योतिषी अन बंगाली बाबा यांचा देखील गुण येतो की नाही याची खात्री करूनच त्यांचेबद्दल विधाने करायची. अरे किमान लिहिण्या बोलण्यात शास्त्रशुद्धता असावी ना. खेड्यातील मांत्रिक साप विंचू उतरवतात (न चढलेला)म्हणून त्याचेही आता गोडवे गायचे का? कारण काय तर त्याचा गुण येतो अन तुम्ही त्याचा काय अनुभव घेतलाय का? उत्तम लॉजिक...

लहानपणाच्या वाईट संगतीने वा वाईट सवयीने त्रस्त असाल किंवा सांगताही येत नाही अन सहनही होत नाही असे असेल तर किंवा मूळव्याध, भगेन्दर,गुप्तरोग,कॅन्सर, मायस्थेनिया ग्रेव्हिस, हार्ट अटॅक असेल तर भेटा

डॉ. एम. आय राणा(अलाहाबाद)रूम. नं ४, अप्सरा लॉज, बुधवार पेठ पुणे२. अक्सीर इलाज केला जाईल.
(अनुभव घेतला नसल्यास डॉक्टरावर टीका करू नये. डॉ हिन्दू आहेत.)
मुस्लिम, लोकसत्ता वाचणारे, सोनियाभक्तानी येऊ नये:-)

शाखा. कार्ले तालुका मावळ येथेही...


Chinya1985
Thursday, May 29, 2008 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रश्न पैशाचाच असेल तर मॉडर्न मेडीसीनमधेही अनेक अतिमहागड्या गोष्टी आहेत व त्या जाणिवपुर्वक महागड्या ठेवल्या आहेत असे जाणकारांचे मत आहे त्यामुळे तो मुद्दा होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा वरचा पाण्याचा परिच्छेद नक्कीच विनोदी आहे पण त्याहुन त्या डॉक्टरच्या संपुर्ण वैद्यकिय ज्ञानावरच काट मारणे चुकिचे वाटते.

टोणग्या हे डॉक्टर जर बंगाली बाबा,मांत्रिक असतील तर पोलिसांकडे तक्रार करुन त्यांचे फ़्रॉड बंद करायला तुला कोणी रोखलय???


Ashbaby
Thursday, May 29, 2008 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक बीबी उघडलाय यावर आरोग्य-आयुर्वेद्-आयुर्वेद उपचार केंद्र येथे. मलाही जाणुन घ्यायचे आहे तांब्यांबद्दल म्हणून. कृपया तिथे लिहा ना कोणीतरी. जे काय बरे वाईट आहे ते येउ द्या तेथे.

हा बाफ़ 'मला विनोदी वाटलेले" आहे आणि वरिल चर्चा अजिबात विनोदी वाटत नाहिय म्हणुन सांगण्याचे धाडस केले.

साधना.


Zakki
Thursday, May 29, 2008 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एन आर आय चा आय क्यु जरा कमीच असतो हा निष्कर्श काढावा का?
अमेरिकेत एन आर आय पेक्षा अत्यंत मोठ्या बहुसंख्येने इतर लोक रहतात. त्यांना थोडीफार जरी अक्कल असती तर, इतक्या एन आर आय ना इथे बोलवण्याची गरजच पडली नसती.
जरा चौकश्या करा की भोंदू लोकांच्या, मग ते भोंदू हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन किंवा कुठल्याहि धर्माचे असले तरी, त्यांच्या मागे किती लोक असतात नि त्यातले एन आर आय किती असतात?
एन आर आय म्हणजे कुणि वेगळे लोक नव्हेत. आजकाल अनेक लोक येऊन जाऊन असतात, कामाप्रमाणे जिथे रहावे लागते तिथे रहातात (बिचारे). असे 'टका सेर भाजी, टकासेर खाजा' गोष्टीतल्या येडपट राजासारखी विधाने करू नका.


Tonaga
Thursday, May 29, 2008 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीसाहेब, मूळ म्हण अशी...

अंधेर नगरी चौपट राजा
टका सेर भाजी टकासेर खाजा.

ही गोष्ट हिन्दी भाषक वाटत नाही कारण त्यात भाजी शब्द आहे तो हिन्दीत नाही. सब्जी आहे. बहुधा नागपुरी हिन्दीत भाजी म्हनत असावेत....:-)


Zakki
Thursday, May 29, 2008 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेल. आजकाल काय, कुठल्याहि भाषेत काहीहि बोलतात. नुकतेच 'पहाणेच मस्ट आहे' असे वाचले! ते हि सावरकरांच्या जयंतिबद्दल बोलणे चालू असताना. म्हणजे जरूर पहावा, पहाणे अत्यावश्यक आहे, असे मराठी शब्द न वापरता काहीतरीच अर्धवट भाषेत बोलायचे, काही पण बोलायचे (जसे 'एन आर आय' चा 'आय क्यू' कमी) नि वर मायबोलीवर!! म्हणजे ज्या बिचार्‍या मराठी भाषेच्या प्रेमाखातर हा उपद्व्याप, त्याचे वाट्टोळे!

Uday123
Saturday, May 31, 2008 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"औरंगाबाद येथील निशांत तोतला याने एप्रिल २००८ मध्ये झालेल्या आयआयटी-जेईई परीक्षेत देशातून सेंकड रॅंक (दुसरा क्रमांक) मिळविली आहे."
--- झक्की साहेब ही दैनिक सकाळ मधील ठळक बातमी आहे, वर्तमानपत्रच जर असे छापायला लागले तर कुणाची
mistake म्हणायचे? आडातच नाही आहे तर पोहर्‍यात कोठून येणार?

Tonaga
Saturday, May 31, 2008 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आय क्यू ही संकल्पना जुनी झाली असून बाद करण्यात आली आहे. त्याला हल्ली अशास्त्रीय मानतात.
त्या ऐवजी EQ Emotional Quotient काढतात याची कमी आय क्यू असलेल्यानी नोन्द घ्यावी :-)


Aashu29
Tuesday, July 01, 2008 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.youtube.com/watch?v=VlAjybfEvgQ

मला जाम विनोदि वाटले हे गाणे, श्पेशलि ते VIP म्हटलेले.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators