Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 26, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती जमती. » Archive through July 26, 2006 « Previous Next »

Rahul16
Friday, July 21, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Important link about the picture you are talking about....

http://ww3.mid-day.com/news/city/2006/july/140885.htm

Prady
Friday, July 21, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या college group मधील एका मित्राचं लग्न ठरत होतं. आणी group मधलं पहिलंच लग्न त्यामुळे चिडवाचिडवीला पण ऊत आला होता. हा मित्र देशस्थ ब्राम्हण आहे. बोलता बोलता तो म्हणाला की मी मुलीच्या वडलांना सांगितलं आहे अम्हाला काही नको फ़क्त लग्नाच्या दिवशी मला घोड्या वरून वरातीने लग्न स्थळी यायचं आहे. आम्ही सगळे आ वासुन बघतोय आणी म्हण्टलं अरे पण आपल्यात नसते ना अशी पद्धत. उगीच काय हट्ट. वधुपित्याचं म्हणणं पण हेच होतं. तर हा शहाणा म्हणे तेवढंच लोकांना नाचायला वगैरे मिळेल आणी मला पण घोड्या वरून दिसेल कोण कसं नाचतो. झालं मग आम्ही म्हण्टलं उंटच आणूया नाहीतर हत्ती कसा वाटेल? बघ सगळा dance नीट. आमची हसून हसून मुरकुंडी वळली होती. पण त्याने शेवटी आपला हट्ट पूर्ण केला. अजूनही आम्ही त्याला या प्रकारा वरून चिडवतो आणी परत एकदा हसून हसून पुरेवाट होते.

Kedarjoshi
Friday, July 21, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे राहुल, मी मराठवाडी आहे. तुला जो अनुभव आला तो मराठवाडी नाही, आम्ही पण अगत्यशिल की काय ते असतो. (ती माणस वेगळी असतील बहुतेक).
सर्वजण अनुभव सांगताहेत तर मी ही सांगतो.

सर्वांचा लग्नात माप ओलांडने हा प्रकार असतो तसा माझा ही लग्नात हा होता. मी व माझी बायको प्रज्ञा लग्नानंतर घरी आलो. तो वर आत्या, आई, बहीनी ई. नी ओवाळने व माप ओलांडने ह्या दोन्ही कार्यांची तयारी केली.
ओवाळुन झाल्यावर आईने माप ओलांड असे प्रज्ञाला सांगीतले, असे म्हनल्या बरोबर प्रज्ञाने जी जोरात लाथ मारली मापाला की तो पेला पार दोन तिन खोल्या ओलांडुन गेला व सर्व घरात तादुंळ फेकले गेल. हे झाल्यावर काही क्षण ( ५-६ सेकंद) अगदी भयानक शांतता पसरली. सर्व्जण एकमेकांकडे बघु लागले, तित्यक्यात माझा लहाना भाउ म्हणाला आई लवकर स्वागत कर घरात कडक लक्ष्मी आलीये. आई पण लगेच म्हणाली की बरे झाले तांदुळ घरभर पसरले, लक्ष्मीचा वास घरात राहील. मी म्हणालो लक्ष्मीचा वास माहीत नाही पन तांदळाचा वास मात्र नक्की राहील. लगेच वातावरण बदलले व सर्वजण हसु लागले.

झाले काय होते की मंगल कार्यालायुन येताना वधु कडची मंडळी रड्त होती. हे बघुन प्रज्ञाला या वधुने वराच्या घरी आपले घर का सोडुन जायचे ह्या प्रथे बद्दल राग यायला सुरु झाली होती, गाडीत पण ती शांतच बसली होती, या प्रथेचा जो राग होता तो चुकुन त्या " मापावर " निघाला.
आजही सर्वजण तिला ह्याची आठवण करुन देतात व हसतात.


Moodi
Friday, July 21, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार सही किस्सा आहे रे. कदाचीत प्रत्येक मुलीला मनातुन तसेच वाटत असेल.

Seema_
Friday, July 21, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुस्त लग्नातल्या विधीबद्दलच लिहायच का ? नंतरच काही लिहिता ( येण्या सारख असेल तर ) येणार नाही का ?

Gajanandesai
Friday, July 21, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला गोंधळ घालायचा आहे का? :-)

Fulpakhru
Friday, July 21, 2006 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खानदेश कडच्या लग्नात पापड फ़ोडने हा एक प्रकार असतो
कोनाला महीत आहे का?

माज़्या लगनात होता

मी खानदेश कडची नाही नवरा आहे

दीर, नंडा बरीच लोकं कसले तरी पापड पाठीवर फ़ोडतात

फ़ोडतात कसले मारून घेतात नवरा नवरीला :-)


Zakki
Friday, July 21, 2006 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका अमेरिकन नवर्‍याला हत्तीवरूनच लग्नाला यायचे होते. हत्ती मिळणार होता, पण खर्च फार.
दुसर्‍या एकाला (ज्याच्याजवळ हेलिकॉप्टरचे लायसन होते) त्याला हेलीकॉप्टर मधून लग्नाच्या ठिकाणी उतरायचे होते. पुढे परवानगी वगैरे न मिळाल्याने ते राहून गेले.


Giriraj
Saturday, July 22, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ुलपाखरु, त्या विधीला 'तेलन पाडणे' असे म्हणतात!

Tanya
Saturday, July 22, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडीने दिलेला फोटो, zee news मध्ये दाऊदच्या मुलीचा आणि जावयाचा आहे असे सांगितले होते.

Manuswini
Monday, July 24, 2006 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते विधर्भातील आणी नगपुर मधील अनुभव खुपच तिखट असतात
एक प्रकार लिहिला ना
मुलिचे आई वडील म्हणजे कचरा अशी त्यांची समजुत असते
राग मानु नका पण मी दोन्-तीन लग्ने बघितली आणी वाटते काय च्यायला समजतात काय स्वःताला ही मुलाकडची लोकं

बरे हा recent प्रसंग

लग्ना आधी बोलणीचा
मुलगा मुंबईतील नुकताच १ वर्षापुरवी अमेरिकेत आलेला वडिलांना काय म्हणुन कौतुक
मुलिचे आई वडील नुसते पहिल्या दिवशी भेटायला जातात आणी सर्व साधारण माहिती काढावी म्हनुन मुलांच्या घरी
तेव्हा मुलाचे वडील माझा मुलगा ५०००० भाडे देतो room चे
तुम्ही किती तोळे सोने घालणार मुलिला?
मुलिचे वडील म्हणाले ते आता सांगु शकत नाही( त्यांचे म्हणणे होते की मुलिचे दागिने अजुन काही ठरवले नाही) ..
ह्या एका वाक्यावर मुलाच्या वडिलांचे उत्तर काय तर तुम्ही आता सांगितले नाही तर नंतर वाद होतील?
मुलिंच्या वडिलांन प्रश्ण्- वाद का बरे होतील?

कोणाची अशी पद्धत आहे का की नवर्‍याकडची लोकांचे असे प्रश्ण सहजिकच आहे की हा त्यांचा हक्क आहे? का ही रीत आहे का??
just plain curious


Supermom
Monday, July 24, 2006 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, हे असे लोक तुला विदर्भातच काय,सगळीकडे भेटतील.

मी विदर्भातली म्हणून नाही हे म्हणत, पण हा वृत्तीचा भाग आहे. तो एका स्वतंत्र बी बी चा विषय होईल.


Manuswini
Monday, July 24, 2006 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम राग मानु नको तो कोणा एका भागाला किंवा personally उद्देशुन न्हवता
पण मी ही generaly बघितले आहे की 'तिथे' मानपमान खुप प्रकार असतात

take it easy


Supermom
Monday, July 24, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, मी मुळीच रागावले वगैरे नाही. किंवा मी विदर्भातली म्हणून तिथले सारेच बरोबर असेही नाही मी म्हणत. असे प्रश्न विचारणे बरोबर नाहीच.
मला एवढेच म्हणायचेय की हे मानापमान वगैरे प्रदेशावर नसून माणसाच्या स्वभावावर असते.

असो, आता मॉडस रागावतील बरे का
.

Raina
Tuesday, July 25, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
किस्सा मस्तं.

कुठल्याही लग्नात ईतके मनस्ताप होतात ना की प्रत्येक वधुने असे करायचे ठरवले तर भारतात ब-याच female football players तयार होतील.

Manuswini
Tuesday, July 25, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom
thanks for understanding :-)
बरे मंडळी मी खरोखर वरिल प्रश्ण विचारला ते हे जाणुन घ्यायला की खरोखर अशी कुठे पद्धत आहे का का कोणाला माहीती आहे की,
मुलाकडचे लोकांना मुलिच्या वडीलांनी हे सांगणे जरुरि असते की मुलिला दागिने काय काय आणि किती तोळे घालणार
नाहीतर तो वादाचा विषय होवु शकतो?
अशी पद्धत आहे का कुठे??

since we are tlaking about different ways in marriage ,i am asking this


or is it just plain "show-off" from boys side ,the boys party wants to know?? and boast of that girl gave them this much gold as their boy's price is so high in marriage market??:-)


Prady
Tuesday, July 25, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी मला वाटतं की हे लोकं कसं वागतात हे पूर्णपणे त्यांच्या मानसिक व वैचारीक बैठकी वर अवलंबून असतं. आणी असं वागणार्या माणसाला जात पात, भौगोलिक प्रदेश तसेच त्याच upbringing ह्याची बंधनं नसतात. ही त्या त्या माणसाची व्रुत्ती असते. आणी लग्नाच्या बाजारात एकदा उतरलं की व्यक्ती तितक्या प्रक्रुतीची चुणूक दिसतेच. जसं तु वर्णन केलेलं एक टोक आहे तसंच दुसरं चांगलं टोकही आहेच. मुला मुलीची मनं जुळलीत तर आमची काहीच मागणी नाही असं माझ्या सासू सासर्यांनी सांगितलं होतं. गम्मत वाटेल पण आईने हौसेने दिलेलं सगळं रुखवत माझ्या सासूबाईंनी परत धाडलं. म्हणाल्या सुनेच्या रुपाने लक्ष्मी नेतेय घरी बाकी काही नको आम्हाला. सांगायचा मुद्दा हाच की असे सुखद अनुभव देखील असतात.

Sandu
Tuesday, July 25, 2006 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी चे पटते मला. भौगोलिक प्रदेश नुसार काही वेळा बदलतात. आजुबाजुचे लोक आणि त्याच्या विचाराचा खोल परिणाम आपल्या मनावर होत असतो.

Atul
Tuesday, July 25, 2006 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो दागिने घातलेला फोटो पाहुन असे वाटते की नवरी मुलगी पायात नेकलेस अडकून नक्कीच पडेल :-)

Prajaktad
Wednesday, July 26, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलाकडचे लोकांना मुलिच्या वडीलांनी हे सांगणे जरुरि असते की मुलिला दागिने काय काय आणि किती तोळे घालणार
मने!हे यासाठी असत की सासरचे लोक पण मुलिला काही दागिने घालतात रिपिट होवु नये म्हणुन विचारत असावे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators