| | Ninavi 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 3:50 pm: |       |  
 | 
 पिनाज़, आता म्हटलं तर तुला अजून राग येईल, पण तुझ्या या पोस्ट्स त्या पाटीपेक्षा कमी विनोदी नाहीयेत.
 
 आणि तू कर ना सुरू मुंबईचा बीबी. आम्ही येऊ की वाचायला.
  
 
 | 
| | Pinaz 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 3:56 pm: |       |  
 | 
 झोंबले का ग निनवि?
   आता म्हटले तर राग येईल तुलापण, पण मि इतकेच म्हतले मुम्बैकरांबद्दल तर झोंबले.. मग आम्ही पुणेकर किती सहन करतो बघा की. राग आला तरी दिवा घ्यायचे विसरू नकोस बर का
  
 
 | 
| पिनाझ..
 तू एकटीच स्वत: ला पुणेकर समजू नकोस..
 मी पण आहे त्या  " आम्ही पुणेकर "  मध्ये
   अगदी सदाशिव पेठी बरं का..
 पण.. पुण्याच्या गमती वगैरे.. अश्या गोष्टींचा त्रास करून घ्यायचा नसतो..  त्यामुळे.. सहन करायचा प्रश्नच नाही...
 
 
 
 
 | 
| पिनाझ आमचं एवढच म्हणणं आहे की "पुणेरी नमुने" हा  bb  फ़क्त "पुणेरी नमुन्यांसाठीच" वापरावा... मुंबई साठी इच्छुकांनी नवीन  bb  उघडल्यास तिकडे बोलता येईलच
   
 
 | 
| हो हो, आणि नागपूरचा देखिल!! पण त्यावरच्या वर्षभराच्या  post  ची संख्या असेल २! आणि आमच्यासारखे आळशी नागपूरकर माना टाकत येतील वाचायला, चुकून माकून!
  आता सांगा, ह्या सारखा नांदता गाजता  BB  इतर गावांचा असू शकेल का? वेड्यासारखं वैयक्तिक पातळीवरही लिखाण करतात काही लोक. पण स्वता:च्या  computer वर टाईप करणार्याचा का हात धरता येतो?
 
 
 | 
| | Ninavi 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 4:14 pm: |       |  
 | 
 अमेय, मृण्मयी,
   जास्वंद, तू दोन्ही बाजूंनी काय रे बोलतोस? त्या पाटीचा फोटो कुणी टाकला होता? पुणेकर कुठला!!
  
 
 | 
| | Moodi 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 4:17 pm: |       |  
 | 
 झक्की मोड ऑन :
 
 *  पुणेकरांवर टिका करण्याचा फक्त माझा एकट्याचाच पहिला हक्क आहे, अन तो मी सोडणार नाही.  *
 
 झक्की मोड ऑफ.
 
 झक्की..
  
 
 | 
| | Ninavi 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 4:23 pm: |       |  
 | 
 मूडी, चुकलं. दिवे पण झक्की मोडमधेच देतात.
  
 
 | 
| अग निनावि..
 
 मी कुठे दोन्ही बाजूने बोलतोय.... मी फ़क्त पुणेरी बाजू घेतोय
   आणि हा कुठला नियम..
 एखाद्या पुणेकराने.. पुण्याविषयी पुणेकरांविषयी.. बोलायचेच नाही म्हणजे काय
   हा पुणेकरांचा घोर अपमान आहे..
   
 अजून काही पाट्या मिळाल्या तर नक्कि टाकीन इथे...
   
 
 
 
 | 
| | Lalu 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 4:33 pm: |       |  
 | 
 नमुना (पुण्यातला)
 एक कार पार्क केलेली होती त्यावर बरीच धूळ जमली होती. त्या धुळीतच कोणीतरी बोटाने लिहिले होते  " आता तरी पुसा! "
   
 
 | 
| | Moodi 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 4:35 pm: |       |  
 | 
 निनावी मला ती मोडची चिन्हे कुठे देतात तेच आठवेना म्हणुन तसे टाकले.
   झक्की तुम्ही दिवा मोडात आलाय असे समजा.
 
 
 | 
| मित्रांनो
 घ्या अजून पुणेरी पाट्या...
 
  
 
 | 
| कुत्र्याला कुणाच्या अंगावर जायचं ट्रेन करून ठेवलयं का? की कुत्रा पण पुणेरी आहे?
   
 
 | 
| खि खि खि जास्वंद....
 
   
 
 
 | 
| | Asami 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 5:21 pm: |       |  
 | 
 मायबोली गुजराथी  fonts support  करते का  ?  मुंबईच्या पाट्या लिहायच्या तर लागेल न म्हणून म्हटले
   
 निनावे रुपारेलच्या दुकानाबाहेरच्या पाटीपासून सुरू कर बघू. आठवतेय का  ?
 
 
 | 
| | Ninavi 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 5:56 pm: |       |  
 | 
 कुठली रे? रुपारेलमधे मी काय पाट्या
 टाकायलाबघायला जात नव्हते ना, त्यामुळे आठवत नाहीये.  SK  मधला ओनियन उत्तप्पा तेवढा आठवतोय अजून. 
 
 | 
| मला वाटलं जेऊन येईपर्यंत मुंबई चा  bb  उघडला असेल पण घोर निराशा झाली
   
 
 | 
| अमेय, आता तु तरी पुढाकार घेऊन उघड मुंबई चा  BB . पिनाझ देईल तुला उदघाटनाचं एक सणसणित  post
   
 
 | 
| | Ninavi 
 |  |  |  | Wednesday, May 24, 2006 - 6:02 pm: |       |  
 | 
 अजून एक डुलकी काढून ये. तोवर उघडतोय का बघू.
  
 
 | 
| छे मला वाटतं वेगळ्या  bb  चा मान फ़क्त पुण्याला असू शकतो... आमची मुंबई तर सात भिकार... मग वेगळ्या  bb  वर अजून काय बोलायचं
   
 
 |