Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 15, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through May 15, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Wednesday, May 10, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रवास म्हंटला की तो बैलगाडीपासून ते विमानापर्यंत कुठलाही असो, काहीना काही गोंधळ, गमती, विचित्र सहप्रवासी, थरारक अनुभव असं बरच काही घडत असतं. विनय देसाईंसारखं पुस्तक लिहिण्याइतके अनुभव नसले जमेला, तरी इथे टाकण्यासारखं काही घडलं असेल तर वाचायला आवडेल बघा. तेव्हा करा सुरु अनुभव कथन...

Maudee
Thursday, May 11, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान विषय.....
मी वेळ मिळाला की नक्की लिहेन


Mrinmayee
Friday, May 12, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा किस्सा मी अनुभवलेला नाही पण आमच्या नात्यातल्या २ व्यक्तिंबाबतचा आहे.
बाप्पाकाका (वय वर्षे ८०) आणि त्यांचे धाकटे भाऊ (सुरेश काका)प्रवास करत होते. बाप्पाकाकांच्या प्रवासभर खूप गप्पा सुरु होत्या अन, सुरेश काका एका वहीवर लिहून उत्तर देत होते. असं १-२ तास चाललं होतं. समोरच्या सीटवर बसलेल्या बाईंना बाप्पाकाकांची प्रत्येक ओळ patiently वाचून respond करण्याची कृती फार वाखाणण्यासारखी वाटली असावी. त्यांनी स्तुतीसुमनं उधळणं सुरू केलं. शेवटी बाई म्हणाल्या, "किती करताय मुक्या भावासाठी"! तरी बाप्पाकाका मख्ख! शेवटी न राहवून सुरेशकाका म्हणाले, "अहो मी मुका नाही तो ठार बहिरा आहे"!!! :-)


Atul
Friday, May 12, 2006 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्नाटकातल्या एका खेडेगावातील फाट्यावर घडलेला किस्सा आहे. आम्ही ५ जण एक बस (के एस आर टी) ची वाट पहात होतो आणि बस बराच वेळ झाला तरी येत नव्हती. भाषेचा खूपच प्रॉब्लेम होता. आम्हाला कोणालाच कानडी बोलता आणि वाचता येत नव्हत (अजुनही येत नाही). ऐकीव माहिती नुसार या फाट्यावर थाम्बणारी प्रत्येक बस जवळच्या गावातून जाणार होती आणि अम्हाला त्या गावातुन पुढची पुण्याची बस पकडायची होती. पुढची गाडि चुकली की दुसरी गाडी दुसर्या दिवशी, त्यामुळे लवकर पोहोचणे महत्वाचे होते. शेवटी एक्दाची एक बस आली आणि फाट्यावर थाम्बली, बसवर ची पाटी अगम्य होती (जिलब्या). आम्ही बस मध्ये घुसलो (तिकडे बस मध्ये घुसावेच लागते ) आत मधली माणसे अम्हाला आत येऊ देत नव्हती, खूप कल्ला झाला. आम्ही काय बोलतोय ते त्यान्ना कळेना आनी ते काय सान्गतायत ते अम्हाला कळेना. शेवटी बस चा ड्रायवर उतरुन आत आला; त्याला तोडके मोडके हिन्दी येत होते. तो म्हणाला "अरे भाइ ये शादि का गाडी है और इधर चाय पिने के लिये रुका है", तेन्व्हा आमच्या डोक्यात प्रकाश पडला कि बस वरच्या पाटी वरच्या जिलब्यान्चा अर्थ "प्रासन्गीक करार" असा होता. :-) आम्हि ओशाळून खाली उतरलो

Maitreyee
Friday, May 12, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही किस्से सही आहेत

Mrinmayee
Friday, May 12, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतुल खूप हसले तुझा किस्सा वाचून. माझा नवरा बंगलोरचा (आहे मराठीच). तेव्हा तिथल्या वास्तव्यात हे भाषेचे problems आणि त्यामुळे होणार्‍या गमती खूप अनुभवल्या. त्यासाठी वेगळा BB उघडावा लागेल. पण तुझा किस्सा मस्तच.

Lopamudraa
Friday, May 12, 2006 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतुल
हसु आवरता आवरत नाहिये.. रे!!!


Storvi
Friday, May 12, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिलब्या

Manuswini
Friday, May 12, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा आम्ही maglore ला चाललेलो
कोकण expresS होती जवळ्पास तुल्लु आणि कन्नडा लोक होती
आईला ह्या भाषा समजतात / बोलते आणि मला थोड्याफार कळतात
गम्मत ही झाली की आमच्यासमोर एक जोडपं होते बसलेले same compartment मधे त्यातील बाई ही खुपच तरुण वाटत होती पुर्ण प्रवासात ती आप्पा म्हणत होती.

बोलताना पण तुल्लु मधे आप्पा म्हणायची बरोबरच्या माणसाला.
आईला ती सुरवातीला सुन वाटली .. 'आप्पा' असे सासर्‍याला / वडीलांना म्हणु शकतात तुल्लु मधे.

बोलण्यावरुन ते वडील नसावे हा अंदाज येत होता म्हणुन मला सुद्धा तो माणुस सासरा असेच वाटले.

७-८ तास प्रवास होता निघताना ती बाई उठुन सामान काढत होती तेव्हा आई तुल्लुमधे म्हणाली तुमची सुन खुपच छान आहे...
दोन मिनुटे तो माणुस गप्प झाला आणि मग तुल्लु मधे म्हणाला ही माझी भार्या(बायको) आहे.

नंतर निघताना म्हातार्‍याचे लक्ष नाही पाहुन ती म्हणाली मी दुसरी बायको आहे पहिली बायको गेली त्यांची. त्यांची मुले 'आप्पा' म्हणतात तर मी सुद्धा त्यांना 'आप्पा' म्हणते.(???)

मी तर जाम चकित. एक साधारण २५-३० वर्षाचे अंतर असेल दोघांमधे.

नंतर ते जोडप manglore ला बरेचवेळा मंदीरात दिसले आम्हाला पाहुन म्हातारा मान चुकवायचा :-)


Kalandar77
Friday, May 12, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हातारा काय म्हणते, 'आप्पा' म्हण!

Manuswini
Friday, May 12, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kd मी कशाला 'अप्पा' म्हणु?

Mrinmayee
Friday, May 12, 2006 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, ही खरच भाबडी चूक आहे. प्रवासात नाही पण शेजारी राहणारा रशियन 'आप्पा' ५ वर्षाच्या मुलाला सोडायला बस स्टॉपला यायचा. एकदा त्या मुलाची आई आली सोडायला आणि मी म्हंटलं "आज आजोबा busy का'? तर फणकार्‍यानं म्हणाली "माझा नवरा आणि मुलाचा बाप आहे तो." मी बरेचदा sorry म्हणाले पण त्यानंतर ती मला पाहून तोंड फिरवायला लागली. काय करणार?

Atul
Friday, May 12, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चन्दिगड ते दिल्ली रेल्वे प्रवासात घडलेला किस्सा आहे हा. मी आणि माझा मित्र चेअर कार चे तिकीट न मिळाल्याने शेकन्ड क्लास रिझर्व्ड ड्ब्यातुन प्रवास करणार होतो. आमच्या चन्दिगड मधिल हितचिन्तकनी सुचना देऊन ठेवली होती की जनता जरा राउडी असते तेन्व्हा जरा जपून. आम्ही जेन्व्हा गाडीत चढलो (खरेतर लढलो) तेन्व्हा आधिपसूनच दोन फेटाधारी व्यक्ति आमच्या जगेवर बसल्या होत्या (गाडी वरुनच (?) भरुन आली होती). आम्हि दोन तीन विनवण्या केल्या तेन्व्हा अम्हाला आमच्या रिझवड शीटा मिळाल्या. तेन्व्हा समोरील एक फेटाधारी व्यक्ति आम्हाल म्हणाली. "बहुत ही शरीफ़ थे, मै होता तो कभी सीट नही छोडता". हे सभ्य(?) ग्रुहस्थ आपल्या जागेवर बसले नव्हते याबद्दल देवाचे आभार मानीत आम्ही दिल्ली गठली बाकिचे बरेच लोक रिझर्वेशन असून देखील उभे रहुन प्रवस करत होते :-)

Manuswini
Monday, May 15, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतुल
अगदी अगदी,
ही दिल्ली, north indian जनता हो खुपच रॉउडी असते
आमच्या पण दिल्ली प्रवासात हेच झाले होते आम्ही पण नविन

भांडताना असे भांडतात की सीट त्यांची reserved सीट आहे. .. वर ज्याची बूकिंग असेल त्यालाच दमात घेतात हम क्या करे अगर आप ने बूकिंग की है तो और हम पेहले बैठ गये
शप्पथ असे dialogue एकायला मिलाले होते मला


Bee
Monday, May 15, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मी मुंबईला विदर्भनी चाललो होतो. माझे RAC होते तरीही मला जागा काही मिळाली नाही. मग रात्री जेंव्हा सगळी ट्रेन सामसूम झाली तेंव्हा मी माझ्याकडची एक बेडशीट काढली आणि खाली अंथरली. लगेच वरची बाई खेकसली अंगावर. त्यावेळी मी फ़क्त २३ २४ वर्षांचा असेल. इतकी धम्मक अंगात नव्हती. त्या बाईने मला जी तंबी दिली ते ऐकुण मी गर्भगळित झालो. ती म्हणाली जर मी इथून उठलो नाहीतर तू माझ्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप लावीन. मला इतके दुऽःख वाटले तिचे हे वाक्य ऐकूण कारण मी स्त्रि जातिचा सन्मान कराणारा जीव आहे. मला असे कुणी म्हणू शकेल असे कधीच वाटले नाही.

तसेच बाबासाहेब आंबेडकर जयंती असली की विदर्भ ट्रेनचा लोंढा बघावा लागतो. ही अधिवेशनाला जाणारी मंडळी इतकी भयंकर असतात की असे वाटते अपरिचिताशी कधी पाला पडूच नये. ऐरवी बसमध्ये बाहेर कुठेही चांगली व्यक्ती भेटतात.

ह्यवेळी मी AC 3 tier नी आलो पण इतकी बेक्कार अवस्था आहे की पैसे पाण्यात गेले असे वाटले. ती हावडा मुंबई गीतांजली ट्रेन होती. नाशिकच्या पुढे कुठे जागा मिळाली तीही फ़क्त सीट टेकवायला.

खरच असे वाटते नागपूरलाही एक international air port लवकर होऊन जावे जसे पुण्याला झाले.


Moodi
Monday, May 15, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तसेही नाहीतरी आजकाल त्या लोकांचा उद्दामपणा व असभ्य वागणे पाहुन कुणीही त्या काळात मुंबई ते नागपूर हा प्रवास पुढेच ढकलतात.

माझ्याच मैत्रीणीचा हा अनुभव. ती त्याच दरम्यान(२००० साली) मुंबईला चालली होती. तिला जागा व्यवस्थीत मिळाली होती. अन ती ज्या डब्यात होती तो डबा मिलीटरीच्या लोकांनी पूर्ण भरला होता. हे अधिवेशनवाले लोक चढले त्या डब्यात, अन त्या मिलीटरीच्या लोकांना अन इतर माणसाना धमक्या द्यायला लागले. मुंगी एवढी जागा देखील नव्हती बसायला, पण तुम्ही उभे रहा आम्हाला काय माहीत नाही असा आरडाओरडा करुन त्यांनी एका जवानाला मारले, हे बघुन ते सगळे जवान उठले अन त्यांनी या लोकांना इतके मारले की त्यातल्या काहींनी तर गाडी इगतपुरी स्टेशन यायच्या आधी जशी स्लो झाली तशा पटापट खाली उड्या मारल्या.
माझी मैत्रीण ते पाहुन एवढी घाबरली की आता देखील या अधिवेशन वगैरे असल्या वेळी ती बसने येणेच पसंत करते.

आणि नागपुरला आंतर्राष्ट्रीय एअरपोर्ट नाही? मग दुबई ते नागपूर सेवा कोणती


Bee
Monday, May 15, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, मलाही आता ह्या अधिवेशनाची भिती वाटते. पण इथे असल्यामुळे वर्षातून फ़क्त एकदाच काय प्रसंग येतो ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा. पण पुढे कधीतरी हा प्रवास परत एकदा नियमित होईल तेंव्हाची मला भिती वाटते आहे. सणवार असले की वर्‍हाडाकडे जाणार्‍या गाड्या तुडुंब भरतात. तू म्हणतेस त्याप्रमाणे मुंगी येऊ जाऊ शकेल इतकीही जागा उरत नाही.

दुबई नागपूर आहे का? मला माहिती नाही. पण मग गावी चर्चा झाली होती मित्रांमध्ये की नागपूरला international air port होते आहे म्हणून. म्हणून अंदाज बांधला की अजून व्हायचे आहे. मागे देशोन्नती मध्येही वाचले होते की भुमीपूजन झाले म्हणून. चांगली बातमी आहे. सिंगापुर नागपुर झाले की चांगली सोय होईल खरच. सहा तासात घर गाठता येईल शिवाय कुणाकडे मुक्कामी रहायची गरज भासणार नाही. नाहीतर आत्ताच्या परिस्थितीनुसार ३ दिवस मुंबईमध्येच जातात संपूर्ण सुट्यांमधले. तेंव्हा नागपूर International Air Port ची कल्पना कशी रमणीय वाटते आहे :-)


Dhani
Monday, May 15, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा नाहि पण माझ्या आईने २ वर्षानपुर्वी अनुभवलेला एक प्रसंग. माझी आई एकादा माझ्या मामान्च्या कुटुन्बा सोबत कोकाणात असलेल्या आमच्या गावी जात होती. मामा, मामी, त्यान्ची सुन, तिची २ मुले, मम्मी, दुसरा एक मामेभाउ व ड्राय्व्हर अशी ८ लोक सुमोतुन जात होते. mumbai-goa माग्रावरच एक मामा राह्तात कोलाड्ला तेथे रत्रिचा मुक्काम होता.कोलाड अगदि १५-२० मिन्टन्च्या अन्तरावर असताना एक नि:ज्रर्रन रस्ता लागतो,म्हनजे तेथे वस्ति नाही. त्या दिवशी ही मन्ड्ळी प्रवास करताना तेथे ट्रफिक मध्ये त्या रस्त्यावर थान्बले. पुडे एस. टि., तसेच मागे हि. मे महिना असल्याने रस्त्यावर वाहने फ़ार होती. रात्री ८ च्या सुमार होता. अचानक एक दगड सुमोच्या front काचेवर पडला.काय झाले, काय झाले म्हणता-म्हणता १०-१२ लोक मोठे सुरे आणि लाकडी जाड बान्बु (मन्डप बान्धताना वापरतात ते)हातात घेयुन त्यान्नी गाडीला वेड्ले (surrounded). दरवाजा उघडुन मामा आणि वहिनीच्या गळ्यावर चाकु थेवला. पेसॆ, watches,मन्गळ्सुत्र, बान्गड्या, कानातले असे जे काहि मिळतील ते दागिने खेचुन काड्ले. मम्मी मध्ये बसली होती तीने विशेष काही दागिने घातले नव्हते तर तिला मारले. तिचा हात फ़्रक्चर झाला. मामाना बाहेर खेचत होते. पन त्यांना मम्मीने एका हाताने पकाड्ले होते. एका हातावर मार झेलत होती. सर्व काहि ओरबाडताच होते. मुलांना पण मारले. व लगेच पळुनही गेले. ५मिनिटातच चहुबाजुने हल्ला चड्वुन काहि कळायच्या आत पळुनहि गेले. जाताना गाडिची चावी न विसरता घेवुन गेले. ड्रायव्हर त्यान्च्या मागे गेला खुप मार खाल्ला तरि सुध्हा गेला नाहि तेव्हा कुठे चावि दिलि.त्या लोकांनी त्या रात्री अनेक गाड्या लुट्ल्या. हा प्रसंग मला कायम लक्षात राहणारा आहे.

Mrinmayee
Monday, May 15, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनी, तुझ्या आईवर आणि इतर कुटुंबियांवर आलेला प्रसंग वाचून काटा आला अंगावर!
नागपूरला दसर्‍याला दिक्षाभूमीवर खूप मोठा समारंभ असतो. आता electrification झालय म्हणून नाहीतर गाडी'वर' बसून लोक येत. extra trains पाठवूनही हा गर्दीचा आणि reservation करणार्‍या प्रवाश्यांना होणारा त्रास वार्षानुवर्ष तसाच आहे


Moodi
Monday, May 15, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनी इथे तर हा अनुभव आम्ही वाचुनच शहारतोय, तिथे प्रत्यक्षात तुझ्या सगळ्या नातेवाईकांची काय मनस्थिती असेल याची कल्पना पण करवत नाही.

अग मृण्मयी रेल्वेने हजार गाड्या सोडल्या तरी हेच होईल, कारण त्या अधिवेशनाच्या काळात फुकट जायला मिळतय म्हणुन बाकी जाती जमातीचे लोक पण आपण मागासवर्गीय आहोत असे खोटेच सांगतात, मग आरक्षण करा नाहीतर चढाओढीत भाग घ्या, हेच होणार.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators