Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रवासात घडलेल्या गोष्टी... ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 15, 200620 05-15-06  2:32 pm
Archive through May 18, 200620 05-18-06  7:26 pm
Archive through May 23, 200620 05-23-06  5:48 am
Archive through June 05, 200620 06-05-06  7:42 pm
Archive through June 12, 200620 06-12-06  3:39 pm
Archive through August 10, 200620 08-10-06  4:57 pm
Archive through September 27, 200620 09-27-06  10:06 pm
Archive through September 28, 200620 09-28-06  3:06 pm
Archive through September 28, 200620 09-28-06  7:01 pm
Archive through September 29, 200620 09-29-06  9:23 am
Archive through October 09, 200620 10-10-06  12:05 am
Archive through December 15, 200620 12-16-06  3:54 am
Archive through January 27, 200720 01-27-07  6:48 am
Archive through February 02, 200720 02-02-07  2:51 pm
Archive through March 02, 200720 03-03-07  4:12 am
Archive through March 20, 200720 03-20-07  2:31 pm
Archive through May 30, 200720 05-30-07  11:38 am
Archive through June 28, 200720 06-29-07  3:33 am

Zakasrao
Friday, June 29, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं! लिम्बु वाइट प्रसंग होताच म्हणा. पण लिहिता लिहिता तुझी काहि चुक झाली का? तुला जास्त वेळ लागला असेल जायला. कारण पुणे नाशिक २५० किलोमिटर तरि असेल ना. आणि तो रोड चाकण पर्यंत तरी मी ४ पदरी पाहिलाय. पण तरिही इतका कमी वेळ?
सिंगल लेन,डिव्हायडर नाही,रात्राची वेळ आणि जोराचा पाउस म्हणजे सगळी परिस्थिती कठिण असते अशा वेळी.


Limbutimbu
Friday, June 29, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही झकोबा, चूक नाही झालेली!
उलट चाकणपर्यन्त खुपच ट्रॅफिक होत, त्यामुळे वेगावर मर्यादा येत होती! त्यात टोल नाक्यावरल वेटिन्ग, मधेच भोसरीतल ट्रॅफिकजाम, वाटेत पाय मोकळे करायला थाम्बण आणि धाब्यावरली पन्धरा मिन्टे वगैरे वेळा देखिल याच साडेचार तासात हेत! (प्रत्यक्षात रनिन्ग किती वेळात झाल???)
साडेआठ ते एक ह्या वेळा पक्क्या हेत! त्यात चूक नाही!
फक्त धाब्यावर किती वाजता पोचलो अन तिथुन निघालो किती वाजता यात थोडा डाऊट हे!
:-)

Phdixit
Friday, June 29, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या तुझ्या मुळे मला ही आठवण झाली.....

दिवाळीचे दिवस होते उद्या पासुन दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती. बरोबर दुचाकी सातार्‍यात नेली होती त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पुण्याला येण्याऐवजी चिपळुनला जाण्याचे ठरवले. आंधार पडायच्या आत पोहोचण्याच्या उद्देशाने ३ च्या सुमारास ऑफीस सोडले, रुम वर जाउन दोन दिवसांसाठी लागणारे कपडे घेतले. सातार्‍याचे पेढे पुजेसाठी घेतले. वेगाने सातारा मागे टाकत उंब्रज च्या दिशेने सुसाट सुटलो, उंब्रज्ला पुरेसे पेट्रोल टाकले, सुंदर रस्त्याने सुसाट वेगाने गाडी हाणली. वाटेत काही लहान गावे लागतात. कोयननगरच्या अलीकडे एक गाव लागते. संध्याकाळ होत आली होती. अचानक कोंबड्यांचा समुह रस्त्यावर घुसला मनात कोणताही ब्रेक दाबायचा विचार न येऊ देता त्याच वेगाने घुसलो एक कोंबडी मझ्या पायावर आदळली आणी तिथेच तडफडत पडली बाजुच्या घरातुन ३ / ४ लोक धावत आले पण एक क्षणही न थांबता तिथुन पोबारा केला. मी जर ब्रेक दाबला असता किंवा थांबलो असतो तर माझी अवस्था त्या कोंबडी सारखी झाली असती. पुढे थेट कुम्भार्ली च्या घाटमाथ्यावर थांबलो एका टपरीवर चहा पिला. सुर्यस्त झाला होता. तरी आजुनही बराचसा उजेड होता. सावकाश घाट उतरलो. पायथा गाठेपर्यंत आंधार पडला होता. इतर गाड्याच्या लाईटचा प्रखर प्रकाश्झोतात हेल्मेट ची काच लाऊन गाडी चालवणे अवघड वाटु लागले म्हणुन विना हेल्मेटची गाडि चालवू लागलो. ह्या दिवसात भात कापणी जोरदार सुरू असते. संध्याकाणी शेतातले असंख्य किटक उडत असतात. गाडी वेगात तर सोडुनच द्या पण नुसती चालवणे पण मुश्किल झाले. दर किमी ला थांबा घेउन डोळ्यात जणारे किटक बाहेर काढावे लागत होते. परत हेल्मेट चढवले आणि सावकाश चिपळुन शहरा जवळ येउन पोहोचलो. मामाचे नेहमीचे घर बदलले होते. सातार्‍यातुन चिपळुन्ला घरी पोहोचायला साडेतीन तास लागले. घरी फोन करून मी सुखरूप पोहोचल्याचे सांगीतले.

सकाळी अभ्यंग स्नान केले व परत त्याच दिवशी पुण्यात येण्याचे ठरवले. असे अचानक मनात का आले माहीत नाहि. पण मामाची परवानगी घेतली. मस्त सोलकधी डाळिम्ब्याची उसळ खीर, श्रिखंड असा मेनु हादडला आणि थेट पुणॅ गाठायचे ह्या उद्देशाने २ वाजता चिपळुन सोडले. गाडीमधे पुरेसेच पेट्रोल टाकून कुम्भार्ली घाट ओलांडला आणी गाडी अचानक गचके देत बंद झाली. माझा माहीती प्रमाणे मी गाडीची तपासणी केली. काही किक्स मारल्यावर गाडी सुरु झाली उम्ब्रजच्या दिशेने प्रवास सुरू केला. नंतर लक्शात आले की एका ठरावीक वेगा पेक्शा अधी वेगाने गाडी चालवली तर ती बंद होते आहे. मग पुढचा प्रवास २० - ३० घ्या वेगाने.

उम्ब्रज ला हाय्वे वर आलो. गाडी हळु हळु वेग धरु लागली होती. २ लांब आकाराचे ट्रेलर रस्ता व्यापुन एका पुढे एक चालले होते. मला गाडी चालवताना त्याच्या धुराचा त्रास होत होता. म्हणुन आजुन वेग ४० वरुन ६५ पर्यंत वाढवुन एकाला मागे टाकले दुसराही ओलांडत चालकाच्या केबीन शेजारी आलो. आणी गाडीचे इंजीन एकदम बंद झाले. मागुन काही गाड्या भरगाव वेगाने येत होत्या पण मधे काही अंतर होते. त्या क्शणी मला जे काही जमले ते मी केले. प्रथम गाडीचा उजव्याअ बाजुचा इंडीकेटर चालू केला आणी गाडि दुभाजकाच्या एकदम बाजुने कडेला घेतली, मागुन येणार्या गाड्यांना त्यामुळे एकदम बाजुने निघुन गेल्या. त्या ट्रेलर वाल्याला माझ्या गाडीत काहीतरी घोटाळा असल्याचे जाणवुन त्याने त्याची गाडी रस्त्याच्या अधीक कडेला घेतली त्या मुळे मागुन येणार्‍या बाकीच्या मोठ्या गाड्यांना पुढे येण्यासाठी व्यवस्थित जागा मिळाली. इंजीन बंद झाले तरी न्य्ट्रल वर घेतल्या मुळे आणी उतारामुळे गाडी चालतच होती. गाडी रस्त्याच्या एका बाजुला घेतली. इंजीन खुप गरम झाले होते. जरा वेळ थांबलो. गाडी सुरू केली आणी सावकाश सातार्‍यात पोहोचलो. संध्याकाळचे ६.३० वाजले होते. लक्ष्मी पुजन तिथेच केले आणी दुसर्‍या दिवषी पुण्याकडे पहाटे ५ लाच निघालो पण एकदम सावकाश. घरी ८ वाजता पोहोचलो. गाडी गॅरेज मधे नेली कळाले की चोक ची वायर तुटली असल्याने हा सगळा प्रकार झाला.


Limbutimbu
Friday, June 29, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फदी, चिपळुणला गेलेलास???
अरे कुम्भार्ली घाट म्हन्जे डेन्जर घाट!
अन त्यात तो चिलटान्चा त्रास एकदम बेक्कार! तुझी मोटरसायकल होती की स्कुटर?
रात्री हेल्मेटची काच चमकते अन काढावी तर चिलटे डोळ्या नाका तोन्डात जातात! त्यातुन थन्डीचा सिझन तर विचारायलाच नको!
तू एकटाच गेलेला की जोडीला कोण होते सोबतीला?
एकट जायच तर अधिक वैतागवाडी होते!
ट्रकपाशी नशिबाने वाचलास! टेक केअर!
:-)

Phdixit
Friday, June 29, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकटाच गेलो होतो रे मोटारसायकल वरून..

Storvi
Friday, June 29, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तुम्ही काही एक बोलु नका, तुमची तत्वज्ञान तुमच्या पाशी ठेवा, मला त्यातल काही एक ऐकायच नाही हे>>लिंबुभाव, म्हणजे ही सवय फ़क्त मायबोली पुरती मर्यादित नाही तर :-O

Limbutimbu
Saturday, June 30, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसली ग सवय? मला काही कळ्ळ नाही!

Dineshvs
Saturday, September 01, 2007 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईत कुर्ला स्टेशनहुन वांद्रा टर्मिनसला जाणारी ३१० नंबरची बस आहे. हा मार्ग बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधुन जातो आणि वाटेत बरिच महत्वाची ठिकाणे व सरकारी कार्यालये लागतात.
डबल डेकर बस, भरपुर फ़्रीक्वेन्सी असली तरी, बसला सकाळच्या वेळी अतोनात गर्दी असते. तरिही या बसच्या कुर्ला स्टेशनच्या स्टॉपवर एक अनोखे दृष्य रोज बघायला मिळते.
या बसला व्यवस्थित बांधलेला स्टॉप आहे. पण बसची रांग या स्टॉपच्या कितीतरी बाहेर जाते. एकावेळी सहज ५०० माणसे रांगेत असतात.
या मुख्य रांगेव्यतिरिक्त आणखी दोन रांगा या बससाठी लागलेल्या असतात. त्या कशाला ते बघु.
या बसेस ५ / ५ मिनिटाला आहेत. हि बस आली कि मुख्य रांगेतील माणसे शिस्तीत बसमधे चढतात. त्यानी मोक्याचा जागा पटकावल्या कि ती लाईन आपोआप थांबते. तरिही कुणी उत्साही असेल तर त्याला हि रांग मोडुन जाता येते.
मग उभे राहुन प्रवास करणार्‍यांसाठी असणारी लाईन कार्यरत होते. या रांगेतली माणसे शिस्तीत चढुन उरलेल्या जागा, व उभे राहण्याच्या जागा पटकावतात. आता बस काठोकाठ भरली कि आणखी तिसरी लाईन सुरु होते. ती असते लटकुन प्रवास करणार्‍यांची. ही माणसे चालती बस पकडुन मिळणार्‍या टिचभर जागेत उभे राहुन प्रवास करतात.
तिथे खुपदा बेस्टचा अधिकारी असतो, पण तो नसला तरी या तिन्ही रांगा सुरळीत चालतात. कुठली लाईन कधी कार्यरत व्हायची याचे अलिखित नियम काटेकोरपणे पाळले जातात. अजिबात धक्काबुक्की होत नाही. रांगा तोडल्याही जात नाहीत.
नव्याने येणारा माणुस वा बाई, आपली क्षमता, घड्याळातील वेळ वैगरे बघुन यापैकी कुठली रांग धरायची, ते ठरवतो.
शिवाय या बसचा कंडक्टर बसच्या बाहेर येऊन रांगेतच तिकिट विकतो.
वेल, हे फक्त मुंबईतच होवु शकते.


Nandini2911
Saturday, September 01, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा... असेच दृष्य सांताक्रुज़्ह स्टेशन ते जुहु बसलापण पहायला मिळते. अंधेरी ते सीप्झवाल्या बसला पण. नवीन नवीन असताना खूप गंमत वाटायची हे बघून. आता सर्व रांगामधून चढता येते.

Suja
Sunday, April 27, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा सारखीच गोश्त.
सकालच्या वेळी स्टेशन बाहेरच्या बस स्टाप. भली मोठि रान्ग
दोघ जण येउन रान्गेत उभे रहातात.
लक्शात येत दोन रान्गा आहेत.
लगेच दोघ दोन वेगवेगल्या रान्गेत उभे.
थोड्या वेळाने एकाला शन्का येते
तो रान्गेत्यल्या माणसाला विचारतो. दोन्ही बसच्याच रान्गा ना?
तो म्हणतो नाही. ही "सुलभ सौचालयाची रान्ग आहे


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators