Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 31, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through March 31, 2006 « Previous Next »

Deepanjali
Friday, March 17, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा एका मित्रीणीकडे गेले ,
घरात भींतीवर एक photo दिसला .
तिला विचारल , तुझे आजोबा का , बर्‍यापैकी तुझ्या बाबां सारखाच आहे .'
ती हसून लोळू लागली , म्हणाली , 'Einstein आहे .'



Lopamudraa
Friday, March 17, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ४ थित होते मी आइ पप्पा, बहीण असे पुण्याला जात होतो,जळ्गाव रेल्वे स्टेशन वर महाराश्ट्र express ची वाट बघत होतो, ती तीथे फ़क्त ३ मिनीट थांबायची तेवढ्यात आम्ही चुकीच्या platform वर आहोत हे पप्पांच्या लक्षात आले आणि त्यांनी चला जाउया तीकडे म्हणुन सामान घेतले, तीतक्यात समोरुन मालगाडी आली मी तीचे डबे मोजु लागली, गाडी निघुन गेल्यावर मागे वळुन बधते तर कोणिच नाही इतकी घाबरले समोर प्रंचंअड गर्दी!! मी अंदाजाने समोरचा जीना चढायला सुरवात केली,
तर सगळे मला शोधत परत येत होते,
Mhaaraashtar express ची. वेळ होत आली होती मग आम्ही घाइघाइने propar place गाठले.


Jaaaswand
Friday, March 17, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तारीख माहीत नाही..पण बहुदा २० अप्रिल नंतरची गोष्ट आहे.. साल १९९८..
इंडिया आॅस्ट्रेलिया शारजात मॅच चालू होती..सचिन फ़टकावून काढत होता..सेमी-फ़ायनल... होती...

अजहर त्याच्या बरोबर खेळत होता... एकदम.. हातघाईवर बात आली होती..फ़ायनला क्वालिफ़ाय व्हायला... आ

आणि अचानक.. फ़ोन वाजला... आणि तिकडून विचारणा झाली..
सचिन आहे का... मी पटकन..बोलून गेलो.. शारजात खेळतोय.. थांबा जरा.. ( अर्थातच wrong number होता )
नंतर ती मुलगी जोरात हसली... आणि मी पटकन फ़ोन ठेवून दिला :-)


Bee
Friday, March 17, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा काय झाल मी चहा ठेवला आणि साखरे ऐवजी चक्क मिठ घातल चहात आणि आपल्याच तंद्रीत चहा पिला सुद्धा. जसे विचार्‍याच्या तंद्रीतून बाहेर आलो तशी चव कळायला लागली आणि बघतो तर कपात शेवटचा घोट शिल्लक होता.


एकदा मी office मध्ये आलो, माझा PC काही केल्या login होईना. मग पाच दहा मिनिटे प्रयत्न करुन थकलो. एकाला बोलावले तू login करून पहा इथे. तर त्याचे login झाले माझे नाही. नंतर कळले मी Bee ह्या मायबोलिच्या ID ने login करत होतो.


Avdhut
Sunday, March 19, 2006 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> मि ४ थित असेल, बाबानी मला २ रु काहितरी आणण्यासाथी दिले. मी शाळेत नेवुन ते विकायला थेवले
दोन रुपये केवढयात विकायला ठेवले होते?

Ameyadeshpande
Sunday, March 19, 2006 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> दोन रुपये केवढयात विकायला ठेवले होते?



Tanya
Monday, March 20, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या आठवड्यातीलच गोष्ट. इथे मुलांना गेल्या आठवड्यात शाळांना सुट्टी होती. मुलाला disney on ice show दाखवायचा म्हणुन नवर्‍याला त्या show ची tickets दोन महिने आधिच काढायला लावली. नवर्‍याने त्याचे ticket स्वत:कडे ठेऊन आमची tickets माझ्याकडे दिली. गेल्यावर्षी disney on ice चा show इथल्या expo मध्ये होता, त्यामुळे मी ticket वरचे details न बघता मुलाला घेऊन सरळ expo मध्ये गेले. जवळ जवळ तासभर आधिच पोहोचलो होतो, त्यामुळे expo च्या इतर hall मधील activities बघत बघत disney show च्या hall ला जायचे असे ठरवल्यामुळे टंगळ मंगळ करीत चाललो होतो. मुलाला cold drink प्यायचे होते, म्हणुन ते घेत असताना सहज show ची नक्की वेळ काय असावी म्हणुन show चे ticket उघडुन बघितले तर बापरे! show चा venue, expo नसुन indoor stadium होता. झालं, फक्त अर्धातासात indoor stadium गाठायच होत. taxi कधी नव्हे तर traffic मध्ये अडकली. नवर्‍याचे hand phone वर प्रश्न चालुच. कुठे आहात, show चालु होईल, घरुन बर्‍याच लवकर निघालात तर अडकलात कुठे etc. etc , मुलाची चुळबुळ, " i am going to miss this show" बाप रे! atlast indoor sta. ला पोहोचलो, फक्त ५ मि. उशिर. काळोखातुन सिट शोधत शोधत बसलो, नवरा आधिच तिथे बसला होता. मुलगा show बघण्यात दंग झाला, पण शेवटी म्हणालाच," U R too much ".
कानाला खडा, परत tickets वरची details न बघण्याचा वेंधळेपणा करायचा नाही.


Babunana
Tuesday, March 21, 2006 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tanya ..simlar thing happened with me मी प्रसन्न travel चे ticket काढ्ले नागपुर साठी... दीवाली च्या सुमारास. सोबत आई आणि बहीण होती. २५ चे ticket होते. सो गेलो Devi Heights ला टाइमावर... तर तिथे already कोणीतरी आमच्या seats वर बसले होते... मग झाली सुरु तावातावानी भांड्ण. प्रसन्न चे लोक आले आणि tickets चेक केली. तर लक्षात आले की आमचे ticket हे मागच्या महीन्याच्या २५ तारखेचे होते... झाले कल्याण.... ticket काढल्या नंतर date चेक नव्ह्ती केली. मग भांड्णाचा सुर उतरुन request वर आला. the other passenger gave one seat to my mom and to my sister prasanna gave one chair which was put in the center aisle. मी driver बरोबर बस च्या केबीन मधे सोबत cleaner आणी त्या दुसरया passenger चा मुलगा. रात्र भर बसच्या दारा मधे on stairs काढ्लेली रात्र अजुन लक्षात आहे... म्हनुन ticket घेतल्यानंतर सर्व गोष्टी नीट चेक करणे गरजेचे आहे..

Dakshina
Wednesday, March 22, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण एकदा रात्री १२.३० च्या एशियाड चे Reservation केले होते, आणि Stand वर जरा लवकरंच गेले होते, बस उभी होती, चढले... माझ्या सिटवर आधीच कोणीतरी बसलेलं मी Reservation दाखवलं त्याला आणि भांडून उठवलं

तो बिचारा तोंड इतकसं करून उतरून निघून गेला... मी बसले आरामात.
कात्रज घाटात Conductor आला मी ऐटीत माझं Reservation पुढं केलं. Conductor म्हणाला " ओ बाई, उतरा खाली ही बस साडेबाराची नाही पावणेबाराची आहे."

कात्रज घाटात रात्री कुठे उतरणार? Reservation वाया गेले ते सांगायला नकोच...


Vyom
Friday, March 31, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मी खुप थकुन, टेन्शनमध्ये घरी आलो. तोंड धुवायला मोरीमध्ये गेलो. ओंजळीत पाणी घेतले,तोंडावर मारले. नंतर कळले चष्मा काढायचा राहीलाय.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators