| 
   | 
| एकदा एका मित्रीणीकडे गेले ,
 घरात भींतीवर एक  photo  दिसला .
 तिला विचारल ,  तुझे आजोबा का  ,  बर्यापैकी तुझ्या बाबां सारखाच आहे .'
 ती हसून लोळू लागली  ,  म्हणाली  , 'Einstein  आहे  .'
   
 
 
 |  | मी ४ थित होते मी आइ पप्पा, बहीण असे पुण्याला जात होतो,जळ्गाव रेल्वे स्टेशन वर महाराश्ट्र  express  ची वाट बघत होतो, ती तीथे फ़क्त ३ मिनीट थांबायची तेवढ्यात आम्ही चुकीच्या  platform  वर आहोत हे पप्पांच्या लक्षात आले आणि त्यांनी चला जाउया तीकडे म्हणुन सामान घेतले, तीतक्यात समोरुन मालगाडी आली मी तीचे डबे मोजु लागली,  गाडी निघुन गेल्यावर मागे वळुन बधते तर कोणिच नाही इतकी घाबरले समोर प्रंचंअड गर्दी!! मी अंदाजाने समोरचा जीना चढायला सुरवात केली,
 तर सगळे मला शोधत परत येत होते,
 Mhaaraashtar express  ची. वेळ होत आली होती मग आम्ही घाइघाइने  propar place  गाठले.
 
 
 |  | 
 तारीख माहीत नाही..पण बहुदा २० अप्रिल नंतरची गोष्ट आहे.. साल १९९८..
 इंडिया आॅस्ट्रेलिया शारजात मॅच चालू होती..सचिन फ़टकावून काढत होता..सेमी-फ़ायनल... होती...
 
 अजहर त्याच्या बरोबर खेळत होता... एकदम.. हातघाईवर बात आली होती..फ़ायनला क्वालिफ़ाय व्हायला... आ
 
 आणि अचानक.. फ़ोन वाजला... आणि तिकडून विचारणा झाली..
 सचिन आहे का... मी पटकन..बोलून गेलो.. शारजात खेळतोय.. थांबा जरा..  ( अर्थातच  wrong number  होता )
 नंतर ती मुलगी जोरात हसली... आणि मी पटकन फ़ोन ठेवून दिला
   
 
 |  | | Bee 
 |  |  |  | Friday, March 17, 2006 - 10:19 am: |       |  
 | 
 एकदा काय झाल मी चहा ठेवला आणि साखरे ऐवजी चक्क मिठ घातल चहात आणि आपल्याच तंद्रीत चहा पिला सुद्धा. जसे विचार्याच्या तंद्रीतून बाहेर आलो तशी चव कळायला लागली आणि बघतो तर कपात शेवटचा घोट शिल्लक होता.
 
 
 एकदा मी  office  मध्ये आलो, माझा  PC  काही केल्या  login  होईना. मग पाच दहा मिनिटे प्रयत्न करुन थकलो. एकाला बोलावले तू  login  करून पहा इथे. तर त्याचे  login  झाले माझे नाही. नंतर कळले मी  Bee  ह्या मायबोलिच्या  ID  ने  login  करत होतो.
 
 
 |  | | Avdhut 
 |  |  |  | Sunday, March 19, 2006 - 7:34 pm: |       |  
 | 
 >> मि ४ थित असेल, बाबानी मला २ रु काहितरी आणण्यासाथी दिले. मी शाळेत नेवुन ते विकायला थेवले
 दोन रुपये केवढयात विकायला ठेवले होते?
 
 
 |  | >>> दोन रुपये केवढयात विकायला ठेवले होते?
 
 
        
 
 |  | | Tanya 
 |  |  |  | Monday, March 20, 2006 - 7:21 am: |       |  
 | 
 गेल्या आठवड्यातीलच गोष्ट. इथे मुलांना गेल्या आठवड्यात शाळांना सुट्टी होती. मुलाला  disney on ice show  दाखवायचा म्हणुन नवर्याला त्या  show  ची  tickets  दोन महिने आधिच काढायला लावली. नवर्याने त्याचे  ticket  स्वत:कडे ठेऊन आमची  tickets  माझ्याकडे दिली. गेल्यावर्षी  disney on ice चा  show  इथल्या  expo  मध्ये होता, त्यामुळे मी  ticket  वरचे  details  न बघता मुलाला घेऊन सरळ  expo  मध्ये गेले. जवळ जवळ तासभर आधिच पोहोचलो होतो, त्यामुळे  expo  च्या इतर  hall  मधील  activities  बघत बघत  disney show  च्या  hall ला जायचे असे ठरवल्यामुळे टंगळ मंगळ करीत चाललो होतो. मुलाला  cold drink  प्यायचे होते, म्हणुन ते घेत असताना सहज  show ची  नक्की वेळ काय असावी म्हणुन  show चे  ticket  उघडुन बघितले तर बापरे!  show चा  venue,   expo  नसुन  indoor stadium  होता. झालं, फक्त अर्धातासात  indoor stadium  गाठायच होत.   taxi  कधी नव्हे तर  traffic  मध्ये अडकली.  नवर्याचे  hand phone  वर प्रश्न चालुच. कुठे आहात,  show  चालु होईल, घरुन बर्याच लवकर निघालात तर अडकलात कुठे  etc. etc , मुलाची चुळबुळ, " i am going to miss this show"  बाप रे!  atlast   indoor sta.  ला पोहोचलो, फक्त ५ मि. उशिर. काळोखातुन सिट शोधत शोधत बसलो, नवरा आधिच तिथे बसला होता. मुलगा  show  बघण्यात दंग झाला, पण शेवटी म्हणालाच," U R too much ".
 कानाला खडा, परत  tickets  वरची  details  न बघण्याचा वेंधळेपणा करायचा नाही.
 
 
 |  | | Babunana 
 |  |  |  | Tuesday, March 21, 2006 - 10:51 pm: |       |  
 | 
 Tanya ..simlar thing happened with me  मी प्रसन्न  travel  चे  ticket  काढ्ले नागपुर साठी... दीवाली च्या सुमारास. सोबत आई आणि बहीण होती. २५ चे  ticket  होते. सो गेलो  Devi Heights  ला टाइमावर... तर तिथे  already  कोणीतरी आमच्या  seats  वर बसले होते... मग झाली सुरु तावातावानी भांड्ण. प्रसन्न चे लोक आले आणि  tickets  चेक केली. तर लक्षात आले की आमचे  ticket  हे मागच्या महीन्याच्या २५ तारखेचे होते... झाले कल्याण....  ticket  काढल्या नंतर  date  चेक नव्ह्ती केली. मग भांड्णाचा सुर उतरुन  request  वर आला.  the other passenger gave one seat to my mom and to my sister prasanna gave one chair which was put in the center aisle.  मी  driver  बरोबर बस च्या केबीन मधे सोबत  cleaner  आणी त्या दुसरया  passenger  चा मुलगा. रात्र भर बसच्या दारा मधे  on stairs  काढ्लेली रात्र अजुन लक्षात आहे... म्हनुन  ticket  घेतल्यानंतर सर्व गोष्टी नीट चेक करणे गरजेचे आहे..
 
 
 |  | | Dakshina 
 |  |  |  | Wednesday, March 22, 2006 - 5:54 am: |       |  
 | 
 मी पण एकदा रात्री १२.३० च्या एशियाड चे  Reservation  केले होते, आणि  Stand  वर जरा लवकरंच गेले होते, बस उभी होती, चढले... माझ्या सिटवर आधीच कोणीतरी बसलेलं मी  Reservation  दाखवलं त्याला आणि भांडून उठवलं
 
 तो बिचारा तोंड इतकसं करून उतरून निघून गेला... मी बसले आरामात.
 कात्रज घाटात  Conductor  आला मी ऐटीत माझं  Reservation  पुढं केलं.  Conductor  म्हणाला  "  ओ बाई, उतरा खाली ही बस साडेबाराची नाही पावणेबाराची आहे."
 
 कात्रज घाटात रात्री कुठे उतरणार?  Reservation  वाया गेले ते सांगायला नकोच...
 
 
 |  | | Vyom 
 |  |  |  | Friday, March 31, 2006 - 11:39 am: |       |  
 | 
 एकदा मी खुप थकुन, टेन्शनमध्ये घरी आलो. तोंड धुवायला मोरीमध्ये गेलो. ओंजळीत पाणी घेतले,तोंडावर मारले. नंतर कळले चष्मा काढायचा राहीलाय.
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |