Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
घरची बाग

Hitguj » My Experience » घरची बाग « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 05, 200620 05-05-06  9:57 pm
Archive through July 31, 200620 07-31-06  4:34 am
Archive through August 17, 200620 08-17-06  5:53 pm
Archive through June 05, 200720 06-05-07  1:00 pm
Archive through June 29, 200720 06-29-07  9:55 am

Ravisha
Monday, July 02, 2007 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा नलिनी,आलं लक्षात...पण म्हणजे कोवळे बी नको होते टाकायला... मग आता तू वरती सांगितलेस तसे सुकलेल्या लाल मिरच्यांचे बी लावते कुंडीत,बरोबर ना?

Marhatmoli
Sunday, July 22, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला घरि कुंडित लसुण लावायचा आहे, कुंडिचा आकार, माति, किति वेळेला पाणि घालायच इ. बद्दल please कुणि माहिति देवु शकेल का?

Bee
Monday, July 23, 2007 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहसा, आपण ज्या भागात राहतो त्या भागातील कस असलेली माती घ्यायची. जर ती कुंडीत घालून लसूण पेरायचा असेल तर कुंडी किंवा मातीचे पात्र पसरट असावे. मातीत आधी आठेक दिवस पाणी घालून भुसभुशीत करावी. नंतर फ़क्त ओलावा राहील इतपत पाणी शिंपडावे. लसणाच्या पाकळ्या उभ्या आडव्या कशाही पेराव्यात. रोज वरचेवर पाणी शिंपडावे. खूप साडळ करू नये मातीला. छान पात येईल पंधरवड्यात. पण लसणीचे गाठे धरतील का माहिती नाही. ह्याच रितीने धणे, कांदे पण पेरता येतील. सुर्यप्रकाश मिळेल अशा जागेवर ही कुंडी ठेवावी. हातबोट नाही होईल ह्याची काळजी घ्यावी. कोवळ्या भाजीपाल्याला हातबोट लावू नये. त्यांची वाढ खुंटते तसे केले तर. त्यांना फ़क्त आपल्या नजरेने कुरळवावे.

Marhatmoli
Monday, July 23, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Bee ,

मला मुख्यत: पातिसाठिच लसुण लावायचा होता. आता तुम्हि सान्गितल्याप्रमाणे करुन बघते, बघुया लागतोय का माझ्या कडे लसुण. Thanks once again .


Rr38
Monday, July 30, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आमच्या नव्या घराच्या गच्चीवर एखादा बाराही महिने हिरवागार असणारा, शक्यतो फुले येणारा वेल (पराबोलावरती) वाढवायचा आहे. मधुमालतीच्या वेलाला फ़ुलाच्या गोडव्यामुळे मुंग्या येतात तर कृष्ण्कमळीवर सुरवन्ट येतात, असे अनुभवि व्यक्तिंनी सान्गितले आहे. घर सातव्या मजल्यावर (टॉप फ़्लोअर) नवी मुम्बईमध्ये आहे. तरी जाणकारांनी माहिती द्यावी, ही विनंती.

Nalini
Monday, July 30, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाराही महिने हिरवागार असणारा>>
गारवेल लावा. सतत हिरवा तर असतोच, अगदी उन्हाळ्यात सुद्धा त्याखाली मस्त गारवा असतो.
मराठीमोळी, लसूण लावणे खुप सोपे आहे. लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या. साधारण ४ बोटांच्या अंतरावर त्या कुंडीत साधारण एक ते दिड ईंच खोल उभ्या करुन ठेवायच्या, मातीने वरून झाकुन घ्यायच्या. मग पाणी घालायचे. उन्हाळ्याच्या दिवसात साधरण २-३ दिवसात तर इतरवेळी आठवड्यातुन एकदा पाणी घालत जा. पातीसाठीच लावला तर मग त्याची पात खुडून घेतली तर ती परत वाढते.


Marhatmoli
Monday, July 30, 2007 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks णलिनि,

मी कुंड्या आणुन ठेवल्यात. पुढच्या आठवड्यात बाहेर गावि जातेय तिकडुन आले कि आल आणि लसुण दोन्हि लावायचा विचार आहे. प्रगति कळविनच.


Rr38
Tuesday, July 31, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक धन्यवाद, नलिनी! तिथे रहायला जायला अजून कहि महिने आहेत, पण वेल लावल्यावर नक्कि कळवीन.

Meghdhara
Thursday, August 02, 2007 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आल्याला कोंब आले होते म्हणुन एक डब्यात थोडं पाणी ठेवून त्यात आलं ठेवलं होतं. चांगली पातही वर आली मग काढून फ्लॅट समोरच्या मातीत लावलं. नेमका दोन दिवस इथल्या मानाने बराच पाऊस पडला. काय चुकलं असेल? की पाण्यात जास्त राहिल्याने जीव धरला नाही?
आमच्या घरासमोर दोन वाफे आहेत दारासमोरच्या वाफेतला जास्वंद अगदी मस्त फुलतो. पण मोगरा आणि रातराणी लावलेय त्यांची काही वाढ होत नाहिये. मुळांच्या बाजूने खाली खणून पाहिलं. मोगर्‍याखाली काही लाद्यांचे तुकडे होते. काढले तरी काही वाढ नाही. गेल्या वर्शी मस्त फुलं येऊन गेली. रातराणीचं काही अजून पाहिलं नाही. मधे तिची पानं आत वळलेली रहायची. आता पानं ठीक आहेत. पण बहर येतो नी नंतर फुलं वेगळीच वाटतात. सुगंधही येत नाही.
काही सजेस्ट करशील?

मेघा



Karadkar
Friday, August 03, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, अग मोगर्‍याला तशी पाने कमीच असतात. आणि जर बटण मोगरा असेल तर त्याला पाने कमी येतात. फुलांचा बहर वसंत आणि ग्रीष्मात असतो. मोगरीला खुप फुले धरण्यासाठी महाशिवरात्रीच्या आसपास झाडाची सगळी पाने काढुन टाकावी आणि १ दिवस सोडुन पाणी घालावे आणि तिथुनपुढे रोज व्यवस्थित पाणी घालत रहावे. त्या फुलांचा बहर छान येतो. आणि पावसाळ्यात पाने पण चान येतात. फुले वाळल्यानंतर त्याच्या खालचा भाग कापुन टाकावा.

Nalini
Friday, August 03, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, तुम्ही रहायला कुठे आहात? मिनोतीने तुम्हाला मोगर्‍याविषयी सगळी माहिती दिलीच आहे. तुम्ही कुठे रहाता हे कळले तर आपण झाडांची नेमकी काय काळजी घ्यायला हवी ह्याविषयी चर्चा करु शकतो.
मिनोती, छान माहिती दिलीस.


Meghdhara
Monday, August 06, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी मी गझियाबादला रहाते.
मिनोती धन्यवाद. खुपच छान माहिती दिलीस. आता नीट काळजी घेईन.
नलिनी वाट पहातेय.

मेघा


Kashi
Thursday, January 24, 2008 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

olya kachrya pasun khat kase karave??

Raviupadhye
Thursday, January 24, 2008 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा गाझियाबादला कुठे असता? मी तेथे ९ वर्षे होतो व महाराष्ट्र समाजाचा जनरल सेक्रेटरी होतो.,डो उदय जोशी माझे चांगले मित्र आहेत

Vaishali10
Monday, February 04, 2008 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Limbu chi bee lavun limbu che zad yeiil ka?kiti varshani limbe yetil..?

Vaishali10
Monday, February 04, 2008 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Limbu chi bee lavun limbu che zad yeiil ka?kiti varshani limbe yetil..?

Sneha1
Thursday, July 17, 2008 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा,तुम्ही मिनरल वोटर च्या बाटलीत मुळा कसे लावायचे?आणि तशी गाजरे पण येतात का?अशी कमी जागेत अजुन कोणती भाजी लावता येइल?

Admin
Friday, July 18, 2008 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग इथे हलवला आहे
/node/2692

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators