Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 21, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through March 21, 2006 « Previous Next »

Mane_guruji
Wednesday, March 15, 2006 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टुलिप,
>त्यावेळी खुप वाटल की त्याने म्हणाव की जाऊ नकोस. वगैरे पण काही बोललाच नाही

ज्याला तुम्ही खरोखरच आवडला होतात, तो असे काय म्हणु शकेल? उलट तुमचं जास्त चांगलं व्हावं, परदेशात जाऊन तुम्हाला जास्त शिकायला मिळावं असंच वाटलं असेल त्याला. आणि अजुनही तुम्ही दोघे एकटे असाल तर वेळ गेलेली नाही :-)

Ajjuka
Thursday, March 16, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माने गुरूजी सोला आने सच..
संदीप आणि मी लग्न करायचं ठरवलं जून मधे आणि मी US ला शिकायला गेले त्याच ऑगस्ट मधे. जूनच्या आधी ८ - ९ महिने आमच्य डोक्यात ही गोष्ट होती आणि US ला जायची तयारीही चालू होती माझी. तयारी म्हणजे GRE etc . एका शब्दाने कधी जाऊ नको म्हणाला नाही पठ्ठा. अर्थात म्हणाला असता तर मला अवघड झालं असतं कारण त्याच्यासाठीही ही संधी सोडणं मला जमलं नसतं. आणि त्यालाही ते आवडलं नसतं. तर bottomline is... त्याचं प्रेम असेल तर तो तुझ्या मार्गाच्या आड नक्कीच येणार नाही. तेव्हा ट्यु.. there is still hope if you both are still single!!


Asdf
Thursday, March 16, 2006 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Detroitkar, Crush Sharvari jamenis war hota ka? mazya ek batch pudhe hoti ti.

My celebrity crushes
Robert redford ( too good looking !!! )
paul Newman
Noah Wyle ( ER )
Mr Big ( from and the City )
Amitabh ( when he was really angry YOUNG man)



Tanyabedekar
Thursday, March 16, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता हे एव्हडे वाचुन मलाही लिहायची भयंकर इच्छा होती आहे. तेव्हा ही माझी ष्टोरी.

एम बी ए नुकतेच सुरु झाले होते. अकाउंट्स आणि कम्युनीकेशन स्किल असल्या भयाण विषयांनी माझ्या सारखे एंजीनीयर वैतागले होते. आणि दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखे मी होतो ओपरेशन्स स्पेशलायझेशन मध्ये. त्यामुळे मुलींचा भयानक तुटवडा. आणि एच आर वाल्या माल मुली त्यांच्या ग्रुप मधेच राहायच्या.

आणि एके दिवशी ती आली. एकदम गोरी गोरी. थोडीशी गुलाबी. आम्ही कम्युनीकेशनच्या क्लास मध्ये रोल प्ले नावाचा एक युसलेस प्रकार करत होतो. ती सर्वांपेक्शा वीस एक दिवस उशीरा आली होती. होती एच आर मधेच पण उशीरा आल्यामुळे आमच्या क्लास मधे तात्पुरती वर्ग केली होती. आणि तीला पाहिल्या पाहिल्याच माझा कलिजा खलास झाला.

मी लगेच तीला माझ्या स्किटच्या ग्रुप मधे घेतले (स्किट हा एक कम्युनीकेशनच्या क्लास मध्यला भयाण प्रकार). मग थोडा वेळ होता तेव्हा तिच्याशी बोलायला सुरुवात केली. एक मेकानिकल एंजीनीअरला मुलीशी बोलणे हे व्हायव्हा देण्यापक्षाही अवघड काम असते. पण मी धीर करुन सुरुवात केली. ती दिल्लीची होती. उशीरा आली होती कारण तीची ग्रजुएशन परीक्षा उशीरा संपली होती.

फाउन्डेशन एक्झाम तोंडावर आली होती. मी तीला मथ्स, रीसर्च मेथॉडोलॉजी वगैरे विषय शिकवायला सुरुवात केली. ती पहिल्यांदाच घराबाहेर पडली होती. खूप रडायची आणि खूप छान दिसायची. मी रात्री उशिरा तिला लायब्ररी मधे समजावत बसायचो.

मग परीक्षा संपली. आम्ही दोघे बाजुच्या टेकडीवर फिरायला गेलो. तो मझ्या आयुष्यातला मुलीबरोबर फिरायला जाण्याचा पहिलाप्रसंग होता. काय मजा आली होती त्या दिवशी. वारा असा बेभान सुटला होता. तिचे केस भुरुभुर उडत होते आणि ती सारखे चेहर्‍यावरून केस मागे सरकावत होती.

मग पुढच्या ट्रायमिस्टर सुरू झाल्या. तुम्हाला सांगतो मी इकॉनॉमिक्सशी रिलेटेड प्रत्येक विषयामधे टॉप केले पूर्ण कॉलेज मधे ते सगळे वर्ष. कारण ती इकॉनॉमिक्सची ग्रजुएट होती ना. तिला मी प्रत्येक असाइनमेंटम्धे मदत करायचो.

मी कधी परीक्षेच्या काळात अभ्यास करायचो नाही. तसा मी कधीच करायचो नाही. पण हीला शिकवायचे म्हणुन मी सकाळी भल्या पहाटे उठून लायब्ररी मधे यायचो. तिथे ही लाल डोळे घेवुन बसलेली असायची. मग मी तिला अभ्यास कमी आणि टेंशन घेवु नकोस वगैरेच जास्ती संगायचो.

क्रमश्:


Deepanjali
Thursday, March 16, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Teen age मधला ( बहुदा बारावीची सुट्टी असताना ) एक party crush :-)
माझी एक चुलत बहिण खडकवासल्याला रहाते , तिच्या ओळखीच्या एका Army officer च्या घरच्या लग्नाच्या मेहेन्दी पार्टी साठी NDA ला गेले होते . :-)
तेंव्हा अजुन आमच्या घरी phone नव्हता .
मला as usual पार्टी संपायला atleast बारा तरी वाजणार होते , पण ज्यांच्या घारी जाणार होते ते Uncle स्वत : सोडायला होणार होते , त्यामुळे आईला चिंता नव्हती .
अजुन आठवते ती crowd... एक तो North Indians उपरसे ' फ़ौजी crowd' :-)
मी attend केलेल पहिल वहिल north Indian function.
सगळ्यांचे दिलदार स्वभाव , बिंधास्त nature, sense of humour आणि संगीत पार्टीतला हंगामा पाहून मी फ़ारच impress झाले होते .
त्या पार्टीत मी bride ची मेहेन्दी काढत होते , लोक मस्त हंगामा , मस्ती करत होते .
त्या सर्वांच्यात centre of attraction होता एक असाच फ़ौजी serial मधे शोभेल असा handsome मुलगा .
अगदी हसरा , डोळ्यात चमक, बारीक केस आणि थोडा tan झालेला गोरा रंग ....
मस्त होता तो , मी दूल्हन ची मेहेन्दी काढताना तो बरेचदा डोकावून गेला आणि नकळत अमची बरेचदा नजरा नजर झाली , त्याचे looks एकदम जादुभरे होते , कदाचित teen age magic मुळे ते looks मला जरा जास्त भिडत होते :-)
नंतर एकदा दूल्हन ने आमची ओळख करून दिली , तो Air force कि Navy मधे होता आठवत नाही पण विशाखापट्टणम ला होता .
एकदा ओळख झाल्यावर तो खूपच मस्त गप्पा मारत होता ..
अगदी पार्टी संपूच नये अस वाटत होत ...
पण काय करणार शेवटी पार्टी कधी तरी संपणारच , ती रात्री एक ला संपली .
पण खरी गंमत नंतर ..
त्या दूल्हन च्या बाबांची म्हणजेच त्या Uncle ची car काही केल्या start होत नव्हती , मी मात्र चिंतेत पडले , घरी phone नव्हता , request phone शेजार्‍यांचा होता , पण इतक्या उशीरा कसा कोणाला phone करायचा जर गाडी start नाही झाली तर ...
माला त्या family मधल्या सगळ्यांनी गाडी सुरु नसल्याचे सांगितले आणि विचारले उद्या सकाळी गेल तर नाही का चालणार , कारण two wheeler वरून NDA-kothrud route फ़ार safe नाही .. तो रस्ता चांदनी चौक आणि बर्‍याच सुनसान भागातून जाणारा होता ,
पण मी सकाळ पर्यंत थांबण अजिबात शक्य नव्ह्तं , मी त्यांना सांगितल की माझे आई बाबा तर पोलिसांकडेच जातील मी गेले नाही रात्री तर .
माझा चेहेरा पाहून शेवटी त्यानीच idea काढली , म्हणला , कुछ नही होगा guys, चलो 4-5 two wheelers लो और चलो , कोई कुछ नही करेगा .
त्यानी मला त्याचं jacket घालायला दिला आणि चेहरा दुपट्ट्यानी बांधायला सांगितला , इतर चार मित्रांना त्यांच्या kinetc, bikes घ्यायला संगितल्या आणि बरोबर काठ्या सुध्दा .
मला त्यानी त्याच्या मागे black kinetic वर बसायला सांगितलं .
त्यानी गाडीवर बसताना परत एकदा सांगितलं , Face पूरी तरह से cover लेना & don't worry, you'll be @ home very soon'...
त्यानी धीर दिला आणि मी निर्धास्त झाले:-)
शेवटी पाच सहा bikes च्या ताफ़्या सह पहाटे तीन ला मी सुखरूप घरी पोचले .
मला सोडून परत जाताना तो खट्याळपणे म्हंटला ,' कभी मेरी भी शादी के पार्टी के लिये तुम्हे ढूंडनेमे आसानी होगी , इतने मुश्कील से घर drop किया है , रस्ता हमेश याद रहेगा .' :-)
अजुन ही आठवतो त्याचा तो मिश्कील चेहरा , मध्य रात्री इतक्या सुनसान रस्त्यावर दीड तास गाडी चालवणार्‍या फ़ौजीला खरच Seven salutes
:-)

Dakshina
Thursday, March 16, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कुणाला ऐश्वर्या राय नाही आवडत वाटतं?

माझे Celebrity Crushes

भरत दाभोळकर
विजयेंद्र घाटगे



Shankasoor
Thursday, March 16, 2006 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. नर्गीस दत्त हिच्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाहित.
पंछी बनू उडते फ़िरू मस्त गगन मे

२. हेलन she is my altime favourite dancer आजकालच्या कमी कपडे घालून नाचणार्‍या पोरींपेक्षा कधीही वरचढ ठरेल.
मुंगळा मुंगळा मध्ये काय नाचलिये

३. serena and venus williams खरतर या मुलींकडे बघितल्यावर मला माझी लाज वाटते काय muscles / built आहे

४. आमच्या gym मध्ये येणारी एक russian मुलगी. जन्मजात athlete आहे असे वाटते. तिचा gym मधला work out बघून मी थक्क झालो.


Lopamudraa
Thursday, March 16, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे सेलेब्रिटी क्रश,

उपकार चा मनोजकुमार

संजीव कुमार (सीता और गीता, अनामिका,नया दीन नयी रात,कोशिष वा!!!)

मोहनीश बहेल,

अपुर्व अग्निहोत्री

मैने प्यार किया चा सलमान...



Tanyabedekar
Thursday, March 16, 2006 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग एक पंजाबी मुलगा पण तिच्याशी सलगी करु लागला. आता हा होता डोक्याने भंपकच पण पंजाबीना!! मग ती त्याच्या बरोबर वगैरे बाहेर जाउ लागली. कुठे हॉटेल मधे, नाहीतर सिनेमाला वगैरे वगैरे. मग मी मुद्दाम लाम्ब चेहरा करुन कॉलेज च्या बाहेरच्या कंटीन मधे सिगारेटी प्यायला लागलो. खरेतर माझा खर्च फारच जास्ती व्हायला लागला. एका वेळी मी पाच पाच ओढायचो. मग मात्र तिच्या लक्षात आले. ती येउन मला सॉरी वगैरे वगैरे म्हणाली. इतकी गोड दिसायची ना ती.

मग एके दिवशी तिच्या रूममेट ने मला संगितले की तिचा दिल्लीमधे एक दोस्त आहे म्हणुन. झाले. मी परत देवदास. पण या वेळी मी तिला लगेच विचारले तर तीने सांगितले कि तो एक्स आहे म्हणुन. माझ्या जीवात जीव पडला.

आमचे हेल्प करणे सुरुच राहिले. पॉवर पॉइंट पासुन नोट्स देण्यापर्यंत सर्व काही केले. मग हळुहळु शॉपिंग मॉल्स वगैरे मधे जाणे सुरु झाले. मला पहिल्यापासुनच खरेदी हा प्रकार भयानक चीड आणतो. म्हणजे मला स्वत:लाच नाही तर दुसर्‍याच्या खिशाला पण चाट बसली की वाइट्ट वाटते. असो. मी इमाने इतबारे तिची सोबत करु लागलो.

मग शेवटी शेवटी, म्हणजे प्लेसमेंट झाल्यावर आम्ही रोज हॉटेल मधे रात्री जेवायला जायचो. तीला जाम चढायची वगैरे. मग मी तिला कसाबसा हॉस्टेल वर सोडायचो.

अशाच एका धुंद रात्री, म्हणजे रात्र नॉर्मलच होती पण अस्मादीक धुंद होते, मी तिला धाडस करुन विचारले, बाइ, माझ्याबरोबर कायम राहशील का? आणि ती चक्क हो म्हणाली. मी एकदम सातवे आसमान पर वगैरे वगैरे. मग गाडीवरुन फिरायला, सिनेमा बघायला, अगदी मेस मधे जेवायला सुद्धा एक वेगळीच मजा यायला लागली.

पण आपापल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्याची वेळ येउन ठेपली होती. ती दिल्लीला गेली आणि मी हैद्राबादला आलो. मग फोनचे बिल हजाराचा आकडा क्रॉस करु लागले. माझे बीपी पण असेच वरती जायचे बिल बघितले की.

मग तिने छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडायला सुरुवात केली. मला काही कळेना हिला झाले काय. मग एके दिवशी एकदम आज से हम दोस्त नही है वगैरे वगैरे.

अजुन पर्यंत तीचा फोन आला नव्हता. माझा फोन ती उचलत नव्हती. मी गेले सहा महिने रोज कामावरुन आल्यावर बाल्कनी मधे बसुन तिच्या आठवणी उगाळत सिगारेटी पीत बसायचो. बरोबर आरती प्रभुच्या कवितांपासुन काम्युच्या स्ट्रेंजर पर्यन्त किंवा ह्रुदयनाथच्या गाण्यांपासुन पिंक फ्लॉइड पर्यंत काहिही मागे सुरु असायचे. पण डोक्यात सतत तीचाच विचार. एकुणच प्रेमभंगी असण्यात सुद्धा एक रोमंटीक पणा आहे ना.

काल तिचा फोन आला लग्न ठरले आहे म्हणुन. मी काहिच विचारले नाही. काहीही बोललो नाही. शांतपणे ठेवुन दिला. किमान मी आता शांत होतो कारण संबंध तुटण्यामधे माझा दोष नव्हता. फक्त तिने मला जर स्पष्टपणे सांगितले असते की तिला आता माझ्यामधे इंटरेस्ट नाहिये तरी मला इतके दु:ख झाले नसते.

आता तुम्ही लोक म्हणाल की हे सगळे पारायण मी इथे कशाला लिहिले. ह्यामधे क्रश तो काय? पण माझ्यासाठी हा प्रेमभंग नसुन क्रशच आहे. म्हणजे एक सुन्दर जपुन ठेवण्यासारखी आठवण. (काही आठवणी तेवढ्या बाजुला काढुन ठेवायला लागतील). आणि सिअगरेट प्यायला सुद्धा काही कारण लागतेच ना!!!!!!


Arch
Thursday, March 16, 2006 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं तर आधी लिहिलेल्या post मधल्या मुलीवर माझ्या नवर्‍याचा आणि मित्रांचा crush होता तर एका त्यांच्याच batch मधल्या एकाच एकतर्फ़ी नितांत प्रेम होत. ती electrical ला तर हा Mech ला. summer मध्ये ह्या मुलाने सगळे प्रयत्न करून ती कुठे practical training ला जाणार हे माहिती करून घेतल आणि स्वतःपण त्याच गावात मिळवल. मग ती कुठे रहाते वगैरे सगळी चौकशी करून तिकडे जायला निघाला. सगळ्यांनी त्याला चाबी मारली " तू तिला भेटच. तिलाही तू आवडत असणार. तू इतका हुषार, तुझ्याबद्दल तिला माहिती असणारच. पण तू तिला भेटायला जाताना नुसती फ़ुल घेऊन जाऊ नकोस कारण फ़ुल काय कोणीही देत. तू छानशी latest साडी ने. " आता खर तर ही मुलगी modern दिसायला छान. ह्याने एवढा तरी विचार करायचा न की हे लोक साडी न्यायला सांगतायत तर आपली खेचत असणार. पण नाही. पदरचे पैसे घालून ह्याने साडी घेतली आणि तो तिच्या गावाला training ला गेला. मग तिच्या घरी गेला साडी घेऊन. weekend ला सगळे त्याची वाट बघतायत काय झाल असेल म्हणून. weekend ला हा घरी आला. कळल्याबरोबर हे टोळक गेल की त्याच्याकडे. " काय रे काय झाल? भेटली का ती? "

तो : भेटली न.
टोळक : मग दिली का साडी? आवड्ली का तिला? "
तो : नाही रे. She didn't accept it. म्हणाली I can't accept such a gift. I don't even know you

मग ह्या टोळक्याला वाईट वाटल की नाही कोण जाणे! गेल्या खेपेला India ला गेलो असताना ह्या सगळ्या IITians च get-to-gether झाल. तेंव्हा त्याला बघायला मिळाल. गरीब बिचारा. तरी त्याच्या न कळत कोणीतरी त्या किस्स्याची आठवण काढलीच. मलाच वाईट वाटल.


Lopamudraa
Friday, March 17, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रश.... म्हटल्यावर आठवते,


ते झरझर डोळ्यासमोरुन सरकुन जाते,
उचकुन स्वप्न मी काही पाहुन घेते,



मला तो दिवस आठवतोय जेव्हा त्याने मला पहील्यांदा पाहीले, माझ्याकडे internal exam che book होते, office मधुन फ़ोन आला " नविन probationary IAS आलेत, इथे एकच पुस्तक होते तेही तुमच्याकडे,त्यांना हवेय! आताच्या आत्ता येउन देउन जा, ते खुप चिडलेत " ( mpsc, upsc internal papers same asataat )
मी धावत पळत १५ मि.त पोहचेले, clark वर ओरडले " काय एवढ्या मोठ्या off. मध्ये फ़क्त एकच पुस्तक ठेवतात? " तीने डोळ्यांनीच मला खुणावले.. मागे कोणीतरी बसलेय!
मी मागे वळुन पाहीले " नवीन साहेब! " एक रुबाबदार तरुण हाताच्या तळ्व्यावर हनुवटी टेकवलेली, कपाळावर आठ्या..
" हेच वाटते ते..."( probation madhye koNi kuthehee basate ,shikanyasathi ) protocol वगैरे सगळ विसरुन मी त्याच्याकडे पाठ करुन चालु लागले.

नंतर बर्‍यच्दा meeting मध्ये कुठे traningl ला बसलेलं असतांना मला असं intution व्हायचे, कोणीतरी आपल्याकडे सारखं बघतय.... मी इकडे तीकडे बघितल्यावर माझ्या लक्षात यायचे. तोच तो समोर तीच pose तळव्यावर हनुवटी टेकलेली आणि जादुई नजरेने भारवल्यासारखे पाहणे, खुप मोठ्या function मध्येही मधल्या १००-२०० जणांना ओलांडुन माझ्यापर्यंत येउन पोहचायची.... एक टक... तीच pose .. हळवी नजर..

एकदा तर मी family सोबत नाटकाला गेले होते, तीथे ही स्वारी दिसली म्हटले चला आता तरी याच्या लक्षात येइल, एका क्षणी नजरानजर झाली आणि तो (मुर्ख) शोधतच फ़ीरु लागला, माझी लपता लपता धांदल उडाली,मी घरातल्यांना म्हटले आत जाउन बसु यात, तीथे तो पहिल्या रांगेत होत, मागे वळुन शोधत होता, मी ४रांगा मागे होते, सारखे काहीतरी खाली पाडायचे आणि उचलायचे असे नाटक सुरु होइप्रयंत करत होते!(त्याला दीसले आणि घरच्यांना कळले तर!)
नाटक संपल्यावर स्वारी exit च्या दारातच थांबली, तरी बर त्याच्यासोबत आइ आणि मला वाटते त्याची बहीन असावी...
त्याला मि single नाहीये हे कळले कि नाही कोण जाणे!

नंतर बरेच दिवस traning वेगवेगळ्या गावंना होते म्हणुन दीसलाच नाही,
मैत्रीणिमध्ये त्याची बरीच चर्चा व्ह्ययची त्याच्या दिसण्याची, कामाच्या पध्दतीची, हुशारीची, ...
अचानक exaam ला परत तेच intution. जाणवले त्याच pose मध्ये स्वारी समोर....
तेव्हा त्यदिवशी एका मित्राने त्याची ओळख करुन दिली,
............ त्यानेच सांगीतल्यानुसार..
पण त्याला एक शब्द ही बोलता येत नव्हते, इतकी बोबडी वळत होती त्याची त त प प... करत होता नुसता( कस काय IAS ? ) मला हसायला आले पण मग हे serious होतेय असे वाटायला लागले!
मी माझ्या त्या मित्राला पकडले " धाड्धाड सांगितले कसेही कर त्याच्यासमोर माझा विशय काढ आणि त्याला माझ्याबद्दल काहीही सा.ग स काहीही सांग, पण हे थांबव!!!
पण
दोनच दिवसांनी एक मोठा project होता त्यासाठी एका मोठ्या hall मध्ये जमलेलो, आणि अचानक समोर येउन उभा राहीला, मी एक report dectate करत होते, आजुबाजुचे सगळे धडपडत उभे राहीले, त्याने शांतपणे report हातात घेतला हळुच पुट्पुटला " मला तुझ्याशी बोलायचे आहे " झटक्यात आला तसा निघुन गेला!
मला सगळ्यांसमोर काय वाटले, कसलाच विचार केला नाही तशीच बसुन, पुढचे काम करत राहीले...................
थोड्यावेळाने येउन जळजळीत कटाक्ष टाकुन गेला..
एकदा वाटले बोलावे का? पण ज्या गावाला जायचेच नाही त्याचा रस्ता का विचारायचा? म्हणुन मनात विचार येउ दिले नाहीत.
हळव्या नजरेचा प्रवास तीथेच संपला होता... परत कधीच ती नजर दिसली नाही

रेंगाळुन नजर गेली,
समजुन न समजले मी...
विचारलेच नाही मनाला
त्याचे मत..
स्वताला फ़क्त सांगीतले
ही वेळ च चुकली होती....
एका नजरेने जाता जाता
थांबुन सहारा मागितला होता
बाकी काही नाही..........

हळव्या नजरेचा प्रवास आता संपला होता!!!


Arch
Friday, March 17, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आठवण झाली. आम्ही सुट्टिच्या दिवसात प्लॅंचेट करायचो. ज्याच्यावर crush आहे त्याच्याशी मैत्री होईल का पासून लग्न होईल का पर्यंतचे प्रश्ण विचारायचो. दोघिंचा एकावरच crush असेल तर पाटावरची वाटी गोलगोल फ़िरायची. in the sense , जिने प्रश्ण विचारला आहे तिला " हो " उत्तर मिळू नये म्हणून मला वाटत ज्या दुसरीचा तोच crush असेल ती विरुध्द बाजूला ओढत असेल. म्हणजे जरा समजूत आल्यावर ते जाणवल. पण त्या प्लॅंचेटने किती crush सफ़ल होतील म्हणून सुट्टी आनंदात गेली म्हणून सांगू

Rupali_rahul
Saturday, March 18, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा क्रश

मला माहित नाही याला क्रश म्हणता येईल का? पण तरीही देत आहे.तसे तर पाॅप्युलर पर्सनालिटी वैगरेंवर खुप आहेत पण मनापासुन होता तो एकावरच आणि दुर्दैवाने फ़क्त क्रशच राहिला.

काॅलेजात असतानाची गोष्ट होती तो आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या शेजारी रहायचा होता. शेजारच्या काकी(त्याची आई) यांची माझी, त्यांच्या मुलिची आणि मझ्या बहिणिची फ़ारच चांगली मैत्री होती. आम्ही चौघी नेहमी कुठे ना कुठे फ़िरायला जात असु. अजुनही त्याची आई मस्त एकदम फ़्रेंडली वागते आमच्याशी.

तो दिसायला एकदम छान, गोरापान, दाट कुरळे केस, दाट पण रेखीव भुवया, उंची साधारण ५.४ वैगरे आणि पठ्ठा एकदम स्काॅलर. शाळेतुन वैगरे पहिला नंबर आलेला काॅलेजातसुद्धा पहिला नंबर थोडक्यात काय तर अगदी पुस्तकी किडा. त्याला बघण्यासाठि, भेटण्यासाठी मी वरचेवर काकींकडे रहायला किंवा भेटायला जात असे. त्याची आवडनिवड, चंद सगळे सगळे अगदी तोंडपाठ. त्याला आवडतात म्हणुन मी ही तेच पदार्थ खाउ लागले ते कसे बनवितात ते लक्ष देउन बघुअ लागले जमल्यास ट्राय ही करु लागले. त्याच्या फ़ेवरेट बंडची गाणि ऐकु लागले. अगदी समरसुन अभ्यास वैगरे करु लागले.

अगदी कोणते रोमॅंटीक गाणे वैगरे लागले की मी त्याचा विचारात गुंग. ंअग आई, भाउ काय बोलतोय याच्याकडे लक्षच नाही. र्‍आत्र रात्र जागु लागले कारण झूपच यायची नाही. तेव्हा " दिल तो पागल है " पिक्चरमधील एका गण्याचे कडव अगदी अपल्यासाठीच लिहिल असल्याची खात्री झाली होती. अगदी आजही ते माझ फ़ेवरेट कडवं आहे.

जिसपे हम मरमिटे उसको पता भी नही
क्या गिला हम करे वो बेवफ़ा भी नही
हमने जो सुन लिया उसने कहा भी नही
ए दिल जरा सोचकर………
प्यार कर ओ हो हो प्यार कर


भरपुर रात्री आणि दिवस त्याच्या आठवणीत काढल्या पण त्याला कधीच कळु दिल नाही. आजही त्याला काहिच माहित नाही. आम्ची चांगली मैत्री आहे पण फ़क्त मैत्री बाकी काहिच नाही.


Anumi
Saturday, March 18, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचा क्र्श फारच हुशार होता
पाहिले पाहिले अन राखी पोण्रीमेला राखीच बाMधुन घेतली की हो
आमची एकदम दंडीच उडाली
आज पहिल्याण्दाच हे संगायला मिळाले

Pra_amr
Saturday, March 18, 2006 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा आजचा दिवस नुसताच क्रश वाचन्यात गेला.

वया च्या १७ ते आज २१ पर्यत माजे सहज शे दिड्शे क्रश ज़ाले असतील.

तसा मी मुली (अनेक वचन) करीता ख़ुप लकी असावा कारण सहसा मी जीच्या मागे लागतो तीची लगेचच कुणाशी तरी एन्गेजमेन्ट होते व नन्तर लग्न.

सन्दीप


Vinaydesai
Saturday, March 18, 2006 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pra_amr वधूवर सुचक मंडळ काढा,
'मुलिच्या मागे लागून मिळेल.. दोन महिन्यात लग्नाची खात्री...'

दिवे घ्या..


Maitreyee
Saturday, March 18, 2006 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसा मी मुली (अनेक वचन) करीता ख़ुप लकी असावा कारण सहसा मी जीच्या मागे लागतो तीची लगेचच कुणाशी तरी एन्गेजमेन्ट होते व नन्तर लग्न.
>>>>

Manuswini
Saturday, March 18, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा एक crush
actually मला हा खरेच खुप आवडला होता की अगदी वाटले की लग्नासाठी propose करावे पण राहिलेच. ..

त्या दिवसात मी अगदी स्वपने वगैरे बघितली एका वेगळ्याच जोशात असायची gym मधे मी तासंनतास त्या विचारात(स्वपनात) एकाच equipment वर असायची :-)

तसा आमच्या आजुबाजुला एकतर मद्रासी(ते पण तेलगू) नाहीतर गुज्जु
unmarried असुन सुद्धा,सगळे पेटुमल आणी अगदी typical
तोंड उघडले की ते मद्रासी English
अशीच एका मद्रासीने मुलाच्या b'day party ला आग्रहाने बोलाविले madam( all madrasi will call madam here also), you have to come एवढ्या आग्राहाने दात विचकत, डोळे फडफडवत तो म्हणाला
मनात म्हटले लग्न झाले तरी बोलायची शिश्त नाही
दुसरी गोष्ट म्हणजे हाच तो नेहमी लघळपघळ येवून desk जवळ बोलायचा, आणी मी मनात लग्न झाले आहे ना मग जाना घरी :-).
आणी फालतु प्रश्ण so madam when are you getting married?
anyways झाले काय ईच्छा नसताना गेले आणी अहम आश्चर्य दारातच एक छानसा attractive मुलगा चक्क मराठी उभा होता तो मद्रास्याच्या जुन्या office मधे होता आणी co-incidentaly एथे बहिणीकडे असताना मद्रास्याने त्याला बोलविले होते.
आता मद्रास्याच्या party त मराठी मुलगा?
तो ही जरा odd feel करत होता..
त्यामुळे त्या मद्रासि गोंधळात आम्ही कधी एकमेकांशी गप्पा मारायला लागलो कळलेच नाही.
नंतर कळले की मी ज्या मराठी family ला ओळखते तिचा भाऊ आहे हा
मधेच तो मद्रासि कुसकट्पणे so madam you have company रा
बर्याच गप्पा मारुन मग आम्ही फोन exchange केले आणी निघालो.
साधारण दोन दिवसाने त्याच्या बहिणिने(जी माझी एक kind of friend होती तिने फोन केला आम्ही असच एक get together ठेवतोय तु येशील का?
सुरवातिला मला odd वाटले कारण ती काही माझी खुप जवळची मैत्रिण न्हवती, तिची सुद्धा अशीच ओळख झाली होती कुठेतरी आणी त्यांनतर बोललो न्हवतो पण बहुतेक हा असेल असे वाटले आनी गेले. तो ही खुप खुश्मसकर्या होता आणी एथे तो जरा स्वःताच्या घरात खुलला होता. ज्यात गट्टी झाली. मधुन मधुन मलाच जरा odd वाटायचे कारण ती मैत्रिण मधेच एक कटक्ष टाकायची.
शेवटी काय अधुन मधुन तो कामासाठी boston ला यायचा तेव्हा आम्ही बोलायचो. त्या वेळेला तो दोन महिने होता, रोज फोनवर गप्प होवुन सुद्धा काहिच बोलु शकले नाही.
गप्प काय तर office मधिल कारटी,त्यांचे राज्कारण, हा picture तो picture , camping ला कुठली जागा चांगली
बस ईती

त्यालाही मी बहुतेक आवडत असावे कारण time difference असुन सुद्धा तो Arizonaa ला गेला की फोन करायचा office वेळेत पण
काही नाही झाले
मी नंतर busy झाले कारण माझा सुद्ध travelling job europe trip ला गेले तीन्-चार महिन्यासाठी आणी त्यांनतर फोन आलाच नाही त्याचा
जेव्हा जाणार होते तेव्हा फोन केला तेव्हा oh ..thats sad .. will miss chattign with you.. बाकी काही नाही

खुप वाट बघितली फोन ची अशीच...

एक तर रोज सवय झाली होती, की फोन वर बोलायची आणी रोज रोज सवय झालेली कठिण असते
थोडी हळवी सुद्धा झालेले.

त्याचा फोन वरचा आवज एवढा आवडायचा की मी कित्येक दिवस त्याचे voicemails जपुन ठेवले आणी एकत असायचे :-)
आवज खुप छान होता बाकी :-)
उगाच जराशी चिडचिडी झाले होते
पण त्या चार महिन्यात लोक बहुतेक विसरतात :-(
मला आठवते मी अगदी वैतागले होते london ला असताना
सुरवातिला रोज फोन होते पण tiemdifference was too much मग बंद झाले.
पुन्हा गप्पा काय तर एथे london कसे सुंदर आहे
एथे weather छान आहे
एखद दुसरे jokes ,
आणी recipe sharing का तर त्याला cooking ची आवड ना..

खुप वाटले की पुन्हा एकदा भेट झाली असती in person तर काहीतरी झाले असते
पण त्याला कधी असे वाटले होते का ्याचा मी कित्येक दिवस विचार करत होते

बरे फोन करायला उगाच भीती वाटली कोणास ठावुक त्याचे लग्न झाले अशी news दिली तर त्याने
I am not sure but I had strong liking for him or was it that I was so much used to of talking with him?? I really missed him for so many days or months. many times I thought he would call, everytime my phone rang,I would feel might be his phone. he would call me using his office phone and that would come as 'unavailable' so all unavailable calls increase my dhakdhak .
i had no guts to call and hear the news if at all he was married or whatsoever. so this is still question to me wehther he liked me or what went wrong that he never called me?

कारण नंतर जेव्हा जेव्हा त्याची बहिण भेटली तेव्हा भावाचे लग्न करायचा विचार आहे विचार आहे सांगत होती

आणी त्यांनतर मी गेले europe trip ला

माहित नाही काय झाले
:-(


Manuswini
Sunday, March 19, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग नाही ग ती काय माझी खास मैत्रिण न्हवती
आणी त्या party त ती जरा अस्वस्थ वाटली जेव्हा जेव्हा आम्ही दोघे मोकळे पणाने गप्पा मारत होतो त्यानंतरच ती जेव्हा जेव्हा भेटली मला तेव्हा आम्ही त्याचे लग्नाच्या घाईत आहोत असे सांगायची
मला काहीच कळायचे नाहे की ही मला का असे सांगते?
मला हेही माहित नाही की त्याला आवडले होते की नाही?
का आपला तो असाच फोन करत होता
एक तर तो सर्व बाबतीत match होता as a friend .
sense of humor, educated, nice natured, discplined वगैरे वगैरे
आम्ही सहसा in-person भेटलोच नाही पहिल्या एक दोन भेटीनंतर... त्या भेटी खुपच formal पणे त्या मैत्रिणिच्या घरात झाल्या ना... :-) नुसत्या फोनवर गप्पा होत्या.

काश पुन्हा एकदा in-person भेट झाली असती तर असे मात्र राहुन राहुन वाटायचे तेव्हा आता काही नाही पण..

झाली त्याला दोन वर्षे... boston सुद्धा सुटले आता
मी एरवी बडबडी असली तरी मुद्द्याचे कधीच बोलु शकत नाही असे वाटते :-(

त्यानंतर काहीच असे crush झाले नाही तर हा शेवटचा serious crush

ईती संपुर्ण :-)
एथे तर मद्रासि एके मद्रासी आहेत शी CA मधे...
आणी आता पोह्याचा प्रकार फक्त :-) तिथे कुठले crush होतात हा आणखी वेगळा विषय आहे न बोलले बरे :-)




Anandneha
Sunday, March 19, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi friends there was one cruch for me in my college days. i was in vaze college at mulund. i was arts student and she was in Bsc. i used to see her in liberary when i used to go there.(obviously not for study)but then after i use to go in liberary again and again and used to seat in front of her. she comes to know that im looking at her. one of her friend was good friend of mine. so asked her to introduced me with her..but i was very affrid...i used to do lot trakking in my college days and also use to act in inter collegiate drama competiton cause of that i was bit popular in staff and students. our treaking club organised one trak at Vasota at satara....i was not going for that trek as there was drama competition ahead and i had rehersal for that...but then i come to know that she is comming for treak..being a Jt. secratery for the trekking club i postpone the dates. and we went for treak.....the journy was enjoyable...i was leader...then the actual trek start...it was not easy treak..i just saw its very diff. for her to climb up with her loaded bag so i ask her to give the bag to me...and we were walking then i ask her name...formalities over in that 5 days we become good friends...but it was very hard for me to say her what i feel for her...we used to meet everday in college she used to come to my rehersal and my competition too to cheer me. day by day our friendship becoming strong and strong..then i finish my collage and took admission for mba and she took for msc. then meeting each other was bit diff. but we used to phone each other everyday. my friends used to ask me why dont u prapose her....we finished our studies and started our job. one day she phoned me and ask me to meet...we meet in evening..she told me anand i know what u think abt me...even i like u...the way u think...ur attitude...but u never askd me or told me what u think abt me...now my parents are looking for guy for me...and already there is one praposal form one guy in New York..that time i cant speak that time...now she is happily married in New York...ust remeber all that things when i read all this i remember

Rucha285
Sunday, March 19, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सगळा वेळ crushes वाचण्यातच गेला
तर आता मलाही इथे लिहावस वाटलं
त्याला पहिल्यादा बघितलं ते आमच्या शाळेच्या
gatheringच्या वेळी तो photographer होता आमच्याच शाळेचा माजी विद्यार्थी
दिसायला तर जाम
cute hota
nantar gatheringche photo dyayla ala hota teva aamchya vargache photo ghyayla malach bolavale hote. So teva parat bhetla.
pan nantar ekda kalale ki he is married.
actually disayla to itka motha nahi vataycha.
Any way . Nantar pan majhe barech crush hote. tyabaddal punha kadhitari
- Rucha


Pra_amr
Monday, March 20, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ासला नजरोका धोका भी तो हो सकता है
वो मीले या ना मिले हाथ बढाकर देखो
जिंदगी क्या है किताबो को हटाकर देखो.
पर जिंदगी किताबो मे ही रही.


kharech re Avdhut !!!

Aamhi dhokejan 12th madhe hoto. Ti disalya ekdumch sundar i.e. Gora rang, Ghare dole (KOBRA), maazya pekha ti vaya ne 1 varsh aani height ne 4 inch mothi. aachi purn batch tichya var line maryachi.

Well yethavkash me tila propose kele aani 8 divasani maazya dokyat career banvinyache bhut shirle tya nadat ek dhokyache valan lagale aani ..............

maazi boat sutli.

Zindgi ke safar me gujar jaate hai jo mukaam

wo phir nahi aate.....






Dear all I will write my story if you could please allow me to upload jpg file casue its very difficult to write in marathi here.

Muktrasika
Monday, March 20, 2006 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तेव्हा सातवीत होते.तो माझ्याच वर्गात होता. आम्ही २री-३री पासुन एकाच वर्गात होतो. आम्ही दोघे उंचीला सारखेच होतो त्यामुळे तो मुलांच्या रांगेत पहिल्या बाकावर बसे आणी मी मुलींच्या रांगेत पहिल्या बाकावर. आम्ही खूप चांगले फ़्रेंड्स होतो. आभ्यासातही दोघे तोडीचे होतो.त्याचा चेहेरा गोल होता अगदी चंद्रासारखा. तुम्हाला वाटेल कि मी मुलाच्या चेहेर्याची काय एवढी स्तुती करते ते ही मला त्या वयात जाणवाव,पण तसं नाहिए.
तो जेव्हा आठवीत शाळा सोडून गेला तेव्हा मला जाणवलं की मी त्याला किती मिस्स करते.तो कराटे शिकायचा.त्याच्या टुरनामेंट्स असल्या कि तो शाळेत येत नसे आणी ज्या दिवशी यायचा त्या दिवशी त्याला झालेल्या जखमा दाखवायचा,मला ही खूप त्रास व्हायाचा कधी-कधी त्याच्या जखमा पाहुन मग तो छान समजुत काढत.खर तर आमच्यात किन्वा इव्हन माझ्या मनात काही नव्ह्ते,केवळ निखळ मैत्रि होति.पण झाले असे एका वरषी,सहावीत असताना मी थोडी आजारी पडले आणी माझा वर्ग बदलला,त्या वरषी माझ्या इतर कोणीच अगदी मैत्रीणी ही माझ्याशी बोलेनाशा झाल्या.(तेव्हा त्या वयात कस आभ्यासात चढाओढ ही होतीच की.)पण तो मात्र आवर्जून माझ्याशी बोलायचा माझी टिंगल करायचा अगदी छान मैत्री जपली त्याने. अधुन्-मधुन माझे कान पिळायचा आभ्यास कर चांग्ला आणी परत १ल्या डिविजन ला ये म्हणून समजावायचा.
एके दिवशी असेच काही बोलताना मी त्याला म्हटले की पुढच्या वर्षी बघ मी परत येते तुला सतवायला. तेव्हा तो मला म्हणाला की तु येचं पण मी नसेन.मी शाळा सोडतो आहे,बाबांच्या बदलीमुळे पण मुम्बईतच असेन.तेव्हा त्या क्षणाला त्याच्या आणी माझ्या डोळ्यात गच्कन पाणी आले आणी फक्त तो एक क्षण आम्हाला वाटले कि आम्ही दूर होऊ आता आणी तसेच झाले.त्या नंतर ते वर्ष संपायला खर तर थोडेच दिवस बाकी होते पण का कोण जाणे आम्ही त्या नंतर जितक्या वेळा समोरा-समोर आलो तित्क्या वेळा खरतर नजर चुकौ लाग्लो आणी झालीच नजर्भेट तर मग एक स्मित-हास्य ओठांवर आणून निघुन जायचो.
वय कोवळे अस्ल्याने त्याचा फोन नं घ्यायचे सुचले नाही अनि जरी घेतला अस्ताअ तरी करायचे धाडस झाले नसते त्या वेळी.पण आता वाटते,तेव्हा नाही पण आता तरी त्याची खुशाली कळली असती मला.
कदाचीत तुम्हा सरवांना हे विचित्र वाटेल ही कारण ते वय खूपच कोवळे होते पण मला फार लवकर एक सुंदर भावना अनुभऊन गेले.


Prajaktad
Monday, March 20, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!हा बीबी popularity चे रेकॉर्ड तोडणार तर!...
माझे celebraity crush
आमिर खान..
अभिशेक बच्चन
रिशि कपुर(बॉबी व कर्ज मधला)


Pra_amr
Tuesday, March 21, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़े सेलीब्रेटी क्रश

राणी (*******)
निलम शिर्के (*******) (पहा वादळवाट)

करीना
प्रीती
एश
शील्पा शेट्टी
प्रीती ज़ीगानिया (पहा मोहबते)
कटरीना कैफ़
मुनाल कुलकणी




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators