Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
धार्मीक पर्यटन एक सुंदर अनुभव ...

Hitguj » My Experience » भटकंती » धार्मीक पर्यटन एक सुंदर अनुभव « Previous Next »

Moodi
Wednesday, March 15, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या घरात आधीपासुन खुप धार्मीक वातावरण आहे. माझे बाबा शेगावचे श्री गजानन महाराजांचे उपासक तर आई श्री स्वामी समर्थांची उपासक त्यामुळे ज्या व्यक्ती भेटत गेल्या त्या पण नेमक्या धार्मीक निघाल्या अन त्यांचे अनुभव पण ऐकता आले.

कोल्हापूरची श्री महालक्ष्मी म्हणजे जिला आम्ही अंबाबाई अशी प्रेमाने हाक मारतो ती माझ्या माहेरची कुलदेवता.

कोल्हापूरला त्यामुळे सतत जाणे असतेच.आताही लग्न झाल्यावर दर्शनासाठी म्हणुन आम्ही गेलो होतोच. खरे तर मला दर वर्षी तिथे जावेसे वाटते, पण काही कारणांनी ते शक्य होत नाही. अतिशय सुंदर प्राचीन बांधणी, भव्य आवार, खांबांची महीरप, प्रशस्त गाभारा, चहू बाजुने इतर सर्व देवांची, संतांची लहान मोठी देवालये, बाहेर कुंकु, हार, कमळे घेऊन बसणारे तसेच खास कोल्हापुरी थाट अन महत्व असणार्‍या वस्तु हे सर्व वारंवार डोळ्यात साठवते.

पुणे ते कोल्हापूर हा मार्ग रेल्वे किंवा आपले वाहन कशाही रितीने छान वाटतो अन म ssss स्त प्रवास होतो.

काही वर्षापुर्वी माझी चुलत बहीण, तिचे यजमान अन माझी भाचे मंडळी आमच्या घरी आले होते. माझे मेव्हणे पण खुप धार्मीक.त्याना सज्जन गड पहायचा होता, मग काय मी, माझे आई व बाबा असे सर्व त्यांच्याबरोबर निघालो.
क्रमश


Lopamudraa
Wednesday, March 15, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuthe gayab jhalees, pudhacha bhag tak lavakar, mee kolhaapur pahilele naahee ...

Moodi
Thursday, March 16, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटोची साइज कमी केली की फोटो टाकेन.

आम्ही सर्व आधी कोल्हापुरला पोहोचलो. मंदिराजवळच उतरलो. तिथुन मग दर्शन, खाणे वगैरे आटोपुन थोडे फिरुन मग कोल्हापुरहून निघुन आधी श्रीनृसिंहवाडी म्हणजे नरसोबाची वाडी या ठिकाणी पोहोचलो. अतिशय सुंदर परीसर आहे हा. अथांग पसरलेली कृष्णा नदी, श्री दत्तमंदिर अन रमणीय घाट याने मन अगदी तृप्त होते. दर्शन सुद्धा खुप छान झाले.
नंतर मग तिथुन निघुन चाफळला पोहोचलो. चाफळचे श्रीराम मंदीर श्री रामदास स्वामींनी वसवलेय. मंदिराजवळ मोठी नदी आहे.आधी पायर्‍या चढुन गेले की मग एक मोठा दरवाजा लागतो, अगदी जुन्या काळातल्यासारखा. आत गेले की उजव्या साईडला धार्मीक पुस्तकांची दुकाने, डाव्या बाजुला पाण्याचा मोठा हौद.
पाय धुतल्यावर आम्ही मंदिरात गेलो. अप्रतीम सात्वीक सौंदर्य असलेल्या श्रीराम, सीता अन लक्षमणाच्या संगमरवरी मुर्ती आहेत, चेहेर्‍यावर त्यांच्या एक विलक्षण गोडवा अन तेज आहे. मंदिराचा गाभारा ही मोठा आहे.
दर्शन आटोपुन आम्ही मंदिराच्या मागच्या साईडला असलेल्या घरगुती हॉटेलमध्ये गेलो. अगदी उत्कृष्ट चवीचे जेवण तिथे मिळते.
जेवण आटोपुन मग आम्ही तिथुन जवळ असलेल्या एका टेकडीवर गेलो, तिथे पण श्री हनुमानाचे एक मंदिर आहे.
हे सगळे आटोपुन मग आम्ही सज्जनगडाकडे रवाना झालो.

सज्जनगड तसा भरपुर उंच, चढायला वेळ लागतो. माझ्या बाबाना थोडा त्रास झाला सवय नसल्याने. पण माझे मेव्हणे एकदम उत्साही, जय जय रघुवीर समर्थ अश्या घोषणा देत आम्ही मग गड चढलो. गडावर भाविकांसाठी रहायला उत्तम सोय आहे. तिथे चाळीसारख्या बांधलेल्या खोल्या रहायला दिल्या जातात. तिथे आम्ही सामान ठेवले, अन आधी जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा वगैरे घेतला, मग काय एकदम उत्साह. दर्शनासाठी सकाळी लवकर उठावे लागेल ही घरच्यांची ताकीद.
मग आम्ही तिथे असलेल्या श्री श्रीधर स्वामींच्या मंदिरात आधी गेलो. श्रीधर स्वामी हे समर्थांचे शिष्य. अन एक महान उपासक. रात्री मग गडावरच मंदिरात आरती झाल्यावर जेवण होते. ते जेवलो. अन मग आराम केला.

क्रमश


Milindaa
Thursday, March 16, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही कारणांनी मी इथे काही फोटो देवु शकत नाही, साइज कमी केली की टाकेन.
<<<

खी खी खी मूडी... काही कारणांनी काय.... सरळ सांग ना की साईझ जास्त आहे म्हणून फोटो देउ शकत नाही

Moodi
Thursday, March 16, 2006 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा हाणीन तुला, पक्का मुंबईकर दिसतोय. थांब तुझी पण कधी तरी वेळ येईलच मग बघते.

Champak
Thursday, March 16, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाणीन तुला>>>>>>>>>लै दिसानी ह्यो शबुद ऐकला भो :-)

Ameyadeshpande
Thursday, March 16, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी कोल्हापुरात जाऊन महाद्वार रोड वर चोरघे मिसळ नाही का खाल्ली? ती पण देवळाइतकीच प्रसिद्ध आहे की :-)
आणि रंकाळ्यावर नाही का गेला? तो म्हणजे मिनी चौपाटीच आहे. मोठ्या घेराचा बांधीव कठडा आणि समोर शालीनी palace ची जुनी भक्कम इमारत एखाद्या किल्ल्यासारखीच. आणि कोल्हापुरातले सगळे नाजूक सुंदर पक्षी पण तिथेच येतात संध्याकाळच्या वेळेला...


Moodi
Thursday, March 16, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रे अमेय. तेवढा वेळच नव्हता. अगदी दर वर्षा आड जाऊन देखील ज्योतिबा अन कोल्हापुरातील बाकी ठिकाणे राहीलीत, जमेल तेव्हा करेन.

Champak
Thursday, March 16, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि कोल्हापुरातले सगळे नाजूक सुंदर पक्षी पण तिथेच येतात संध्याकाळच्या वेळेला>>>>>>> lol:-)

Phdixit
Wednesday, April 05, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडे असे लिहिता लिहिता थांबलीस का ?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators