Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through March 13, 2006 « Previous Next »

Vaishali_hinge
Monday, March 13, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manuswini, anubhav chaan!!!

sagalech agadee manaapasun lihitayet..........

Milindaa
Monday, March 13, 2006 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांच्या दिसण्याकडे मुलींचा इतका भर असेल असे कधी वाटले नव्हते <<<

एवढेच नाही तर मुलांच्या वाहनाकडे पण लक्ष देतात मुली हे नवीनच कळलं :-)

Soultrip
Monday, March 13, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांच्या दिसण्याकडे मुलींचा इतका भर असेल असे कधी वाटले नव्हते

एवढेच नाही तर मुलांच्या वाहनाकडे पण लक्ष देतात मुली हे नवीनच कळलं
<<<<<

..No wonder today's pretty Kobra/CKP girls are running after Punjabi/North Indian hot males with hot wheels:-) ..Whereas their poor Maharashtrian counter-part is slogging for SSC/HSC/JEE/CET/CAT/GRE/../.. sigh! (ultimately ends up going down memory lane at Hitguj :-(

Arch
Monday, March 13, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

No wonder today's pretty Kobra/CKP girls are running after Punjabi/North Indian hot males with hot wheels>>
खरच की काय?

हा खालचा किस्सा माझ्या नवर्‍याच्या मित्रा बाबतीत Bombay IIT त घडलेला. ह्या North Indian मुलाला, IIT च्या accounts मधली एक मराठी मुलगी खूप आवडायची. हा electical engineering ला होता. दिसायला typical north Indian आहे. ह्याला काम असो वा नसो त्याची रोज accounts dept ला च्क्कर असायची. कोणाला तिकडे काम असल तर मित्रपण त्याला आवर्जून न्यायचे. ह्याला तिची lunch ला जायची, दिवस संपला की घरी कुठच्या बसने ती जाते वगैरे तोंडपाठ होत.

एक दिवस हे महाशय, शेरवानी घालून, हातात एक गुलाबाच फ़ूल घेऊन तिच्या वाटेवर तिच्यावेळी उभे राहिले. ती येताना दिसल्यावर तिला फ़ूल देऊन म्हणाला, " आपकेलिए हमने एक शेर लिखा है, पेश करना चाहते हैं " ती इतक्या जोरात " ईईई SSSS " म्हणून पळून गेली की ह्याला काय झाल ते कळलच नाही. " मराठी छोरीने मेरा प्यार ठुकरा दिया " म्हणत राहिला.

It is possible की तिच्या घरी अस काही चालल नसत. किंवा ती खूपच shy असेल आणि may be त्यामुळेच त्याला आवडत असेल. तर soultrip माझ म्हणन की .....


Amrutabh
Monday, March 13, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु
मलाही
serendipity खुप आवडला....

माझ्या क्रश बद्दल...
मी बारावी मधे
KALRA-SHUKLA क्लास ला जायचे तिथे बायो शिकवायला डॉ.केयुर आम्हाला शिकवायचे..ते दिसायला tall,fair & handsome असे होते...मला अजुन आठवतय आमच्या क्लास मधल्या सगळ्या मुली खुप वेड्या झालेल्या त्यान्च्या साथी...... even i was so mad i ended up in joining his private tutorials
ते नेहमीच एक्दम छान shirts घालुन यायचे आणि त्यनी कुठला shirt कधी घातला हे मी पण लिहुन ठेवलेल आहे....
there was a girl who actually asked him his favourite color ,fav perfume...and actually used to wear his fav colored cloths and perfume..
but our bad luck..the same year he got married to his long time girlfriend:-(

Amrutabh
Monday, March 13, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

well about my recent crushes....
it happens to me everyday....
मी ज्या ward मधे posted अस्ते तिथे मल रोज सकळी एकसो एक handsome ,hunky interns ,RMOs दिसतात...आणि परत दुपारी canteen किवा mess मधे तेच लोक कुठल्या ना कुठल्या मुलीबरोबर जेवत असतात....
(सुखाचे दोन घास पण खाउ देत नाहीत)


Amrutabh
Monday, March 13, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस,निनावी, मनु किस्से फर छान आहेत...

निनावी लवकर टाक ग तुझ्या वरच्या क्रश चा किस्सा....


Deepanjali
Monday, March 13, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढेच नाही तर मुलांच्या वाहनाकडे पण लक्ष देतात मुली हे नवीनच कळलं
<<<:-)हो , Heart throb कसा मस्त bike उडवणारा किंवा car घेउन येणारा अशी image असते मनात , अशा वेळी अचानक ' तो ' साध्या सुध्या सायकल ने येताना दिसला आणि crush संपली .

Jaaaswand
Monday, March 13, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मित्रांनो.. माझाही असाच एक अनुभव....
माझे crush अनुभव मी नंतर लिहिन..पण हा

माझा Crush असलेला नाही..तर जिचा मी crush होतो तिच्या बद्दलचा...

इथे माझा, कुठेही बढाई मारण्याचा किंवा त्या मुलीला कमी लेखण्याचा अज्जिबात उद्देश्य नाही.......तेव्हा चु.भू.दे.घे.
ह्याला crush म्हणता येईल का नाही माहित नाही..कारण माझ्या माहिती प्रमाणे हा प्रकार चांगली ३.५ वर्षे चालला

हे म्हणजे आमच्या Engineering च्या दिवसातले....
नवीनच admission झालेली... group जमलेला..
काय आहे काय नाही.. हे कळायच्या आतच practicals, journals, write-ups , तुफ़ान syllabus ( निदान माझ्यासाठी तरी ) एकदम अंगावर येउन पडले...
मग काय.. प्रत्येक खेपेला ही मुलगी माझ्या मागे असायची ( अहो म्हणजे तिचे आडनाव माझ्या नंतर लगेच होते..त्यामुळे माझ्या नंतरचा नंबर ) :-)

हा write up दे / घे... हा program कसा करायचा..
मग त्या... काॅलेजातल्या नेमक्या ह्याच वेळी येणार्‍या conceptual difficulties .. अर्थात मलाही फ़ार काही कळायचे अशातला भाग नव्हता
( शिक्षकांची मेहेरबानी )

पण माझ्या परीने मी आपलं समजवायचो... मग काय...
एक मुलगा अन एक मुलगी काहितरी " गुफ़्तगू " करतात... अस समज करून घ्यायला ( निदान पुण्याच्या काॅलेजात तरी कुठल्याश्या कोर्स ची गरज नाही :-) ) पब्लिकला शून्य वेळ लागला....

मी आधी काही reaction दिली नाही मित्र-मैत्रिणिंच्या चिडवा-चिडवीला

पण एकूण परिस्थिती लक्षात येऊ लागल्यावर... मला काय करायचे तेच कळेना..
तिचे ते..माझ्या गाडी शेजारीच गाडी लावणे...
( आत्ता इथच पोरी पोरांच्या दाढ्यांबरोबर गाड्याही बघतात असं वाचलं.... मला तर साफ़ चुकिचं वाटलं हो )

अहो माझी ५ वर्षापूर्वीची आरसा नसलेली म-८० होती हो.... :-(...

असो..
तसेच.. उगाचच्या उगाच note books मागणे... मला सांगा वह्या-पुस्तकांना एकतर नवीन आणल्यावरचा एक वास असतो किंवा वापरून वापरून
अन sack मधे ठेऊन ठेऊन, डब्यातून सांडून बाहेर आलेल्या तेलाचा...

माझ्या वह्या " तिकडून " परत आल्या कि त्यांना अत्तराचे वास येत असत

मग माझ्या मैत्रिणी ते बघून मला खात्री करून देत असत कि... फ़क्त माझ्याच notes ला असा सुवास येतो.. त्यांनी दिलेल्या books ला नाही...

मग मी फ़क्त उगाचच हसल्यासारख करायचो

आलोच थोड्या वेळात..मग पुढचं लिहितो
क्रमश:


Ninavi
Monday, March 13, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, पाहिलंत होय तुम्ही!
बरं सांगतेच मग.

मी ज्यूनियर कॉलेजमधे असताना एकदा माझ्या ग्रूपमधल्या मुली आमच्या एका मैत्रिणीच्या मोठ्या भावाबद्दल बोलत होत्या. त्यांच्या मते तो बराच खत्रूड होता, रस्त्यात दिसला तरी ओळख दाखवत नसे, इ. तर मी म्हटलं ' छे, छे, माझ्याशी तर नेहेमी चांगल्या गप्पा मारतो. उलट माझं लक्ष नसेल तर हाक मारून वगैरे बोलतो.'
का ते लवकरच कळून आलं.
त्याचा एक मित्र आमच्याच बिल्डिंगमधे रहायचा. या मित्राच्या आईने त्यानंतर काही दिवसांनी मला काहीतरी निमित्त काढून घरी बोलावलं. बराच वेळ इकडच्या तिकडच्या चौकश्या वगैरे झाल्यावर मग त्या हळूच म्हणाल्या, ' अगं, आपला
xxx आहे ना, त्याने... तुला विचारलंय.'
आणि मी एवढी मॅड, की तरीही मला कळलं नाही. मी एकदम शांतपणे ' काय विचारलंय, काकू?' म्हटलं. त्या एकदम गांगरूनच गेल्या.
पुढे यथावकाश त्याने मला प्रत्यक्ष विचारायचं डेअरिंग केलं... आणि मी त्याला नाही म्हणायचं


Shyamli
Monday, March 13, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता सागर नंतर जास्वंदाचा नंबर दीसतोय....


Mahaguru
Monday, March 13, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली बाई , तुमचा नंबर कधी? :-)

Vaishali_hinge
Monday, March 13, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shyamalee tujhaa number aalaay.. .. .. .. ..

Shyamli
Monday, March 13, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिहीते लिहिते जरा होऊ दे बाकीच्यांच...

Maanus
Monday, March 13, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, आम्ही दोघे अभिनवचे विद्यार्थी आहोत.

माझ्या २-३ मित्रांना reject केल्यावर एकच उत्तर मिळालेले,

" आपन फक्त चांगले मित्र आहोत, मी तुला अजुन त्या नजरेने कधी पाहीलेच नाही "
" मी ज्याला शोधतेय तो अजुन दिसलाच नाही "

तुमच्या कडे ह्या filmi उत्तरांशीवाय दुसरे काही उत्तर नसते का? एकदम hum tum चे गाने पाहील्यासारखे वाटते, त्यांचे किस्से ऐकले की.


Rachana_barve
Monday, March 13, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

north indian मुलं जरा जास्तच fast असतात पण. पुण्याला बाईक उडवणारी NI मुल काही कमी नाहीत. TE ला असताना माझी मॅग्नम बंद पडली तर एका अशाच अतिश्रीमंत NI मुलाने बरीच मदत वगैरे केली. परिक्षा चालू असल्याने मी चुकून गडबडीत पैसे आणले नव्हते. ह्याने ५० रुपये दिले mechanic ला. आणि म्हणाला की ५० रुपये घ्यायला कधी येउ? आणि कुठे येउ. आता ५० रुपये परत करायचे म्हणून मी त्याला ph no दिला ह्या महाशयांचा दुसर्‍या दिवशी घरी फ़ोन. ५० रुपये द्यायला येतेस ना? योगीपाशी भेटू. मी आपले ५० रुपये सुट्टे करून त्याला भेटायला गेले. तो खूप हसला मी ५० रुपये दिले म्हणून. मग आत इथेपर्यंत आलोच आहोत तर कोॅफ़ी पिउयात म्हंटल ok . मग परिक्षा संपली आणि तो लुधीयानाला गेला सुट्टीसाठी. तिथून तो मला रोज फ़ोन करायचा आणि एक दोन तास गप्पा वगैरे. एकदा आईने विचारलच लुधीयानातुन रोज का फ़ोन करतो तो. पण आता मलाही समजायला लागल होत का ते. पण त्याची गाडी जरा जास्तच फ़ास्ट होती. तो परत आल्यावर त्याने भेटून love you वगैरे म्हंटल्यावर मी जी घाबरले ते परत कधीही त्याला भेटलेच नाही. फ़ोन पण उचलणे बंद केले.
बाकी तो होता खर handsome hunk आणि श्रीमंत परत cool bike etc पण घाबरटपणा आड आला :-O.. for me मराठी मुलच बरी. :p


Vaishali_hinge
Monday, March 13, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस, ती काहींची भिती असते,तर काही मुलींची कटवायची पध्दत!!!

Arch
Monday, March 13, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी मुलच बरी>>
रचने मराठी मुल फ़क्त " बरी " असतात का? चांगलीपण असतात की.

Ninavi
Monday, March 13, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, तुला काय उत्तर ऐकायला आवडेल?

Rachana_barve
Monday, March 13, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचने मराठी मुल फ़क्त " बरी " असतात का? चांगलीपण असतात की >> आर्च हो क्युट पण असतात की :-O. आणि जेंव्हा त्यांना बरच काही सांगायच असत आणि सांगु शकत नाहीत आणि त्यांना नक्की काय म्हणायचय हे आपल्याला माहिती असत तेंव्हा तर फ़ार म्हणजे फ़ारच क्युट वाटतात :P आणि वेड घेऊन पेडगावला गेलं की तर अगदीच धमाल येते :-O

Jaaaswand
Monday, March 13, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अरे व्वा...
इतके पोस्ट झाले..इतक्यात :-)
वाचून मजा आली
तर..मी माझे कथापुराण पुढे चालू ठेवतो ( आपली आगाऊ संमती ग्राह्य धरून )

सागर..मी अभिनवचाच रे... पण माझ्या मनात पण तिच्याबद्दल
" तुम्हे ऊस नज़र से कभी देखा नही " असेच भाव होते रे

तर notebooks वरून गोष्ट पुढे निघाली..तशी आश्चर्यकारक वळणेही घेतच...

ती राहायची माझ्याच area मध्ये
आता.. उगाचच तिची नवीन scooty ला १-२ आठवड्यातून एकदा तरी काहीतरी problem यायचा किंवा तिचा छोटा भाऊ.. कुठल्या
मामा मोरे काॅलेजात ती गाडी घेऊन जायचा... ही तिची कारणे...

आणि कोथरूडला जाणारे आम्ही ५ मित्र होतो..बाकिच्यांच्या pairs म्हणजे ह्याच्या मागे तो बसणार हे fix असायचं.. बाकि मैत्रिणी गावात राहायच्या
आमचं नशीब फ़ुटकं.. आमचं ब्यॅक्शीट नेमकं रिकामं.. मग काय
आम्ही आमच्या luxuriuos गाडीवरून कर्वे रोड सारख्या अतिशय प्रदूषण आणि गर्दीसंपन्न रस्त्यावरून मार्गक्रमण करत जायचो..

त्यात ते तिचे अगम्य विषय...बोलत राहणं.. मला अगदी irritate व्हायचं..
पण धाडकन तिला उलटूनही बोलू शकत नव्हतो..कारण मी sure नव्हतो कि खरच असं काही आहे का..माझ्या friends चा बागूलबुवा आहे..

मला मैत्रिणी पिडायच्या नेहेमी कि...
मला आवडते म्हणून तीने cricket चि taste develop केली होती म्हणे

असो नंतर मी... तिची गाडी parking मधे नाही दिसली कि तिला टाळायचे म्हणून रात्री ७-७.३० पर्यंत मित्रांना थांबवून volleyball खेळायचो

नंतर T.E. 1st sem. मध्ये नेमकं group मधे mini project करायचं होतं
आणि आमचे नंबर मागोमाग मग काय.. आम्ही एकाच project मधे....

मग project च्या निमित्ताने तुला काय आवडतं अन काय नाही.... तु ही Stadler ची माझी ०.५ पेन्सिल घेच... floppy घेच

अन तुझ्या घरी कोण आहेत अन कोण नाही.. मी चिडूनच मग त्या वेळी म्हटले होते हा दाखवायचा program आहे का... ती काहिच्या काहि लाजली... मग मात्र कळून चुकले..त्या नंतर कानाला खडाच होता...

नंतर मी तिच्याशी फ़ारसा चांगला वागलो नाही..म्हणजे तिला कधी response दिला नाही.. तरीही ती कधी टाकून बोलली नाही...ती खरच sporty होती..तीने ही कधी वाईट वाटून घेतले नाही.. कारण ही गोष्ट तिच्या खास मैत्रिणीनेच मला सांगितली...

ह्या एका गोष्टीमुळे मात्र मला नंतर कधी तिचा राग आला नाही..
पुढे असे काही events घडले जसे project exhibition , annual day , farewell party की ज्यांमधे काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्याही...

पण मी कधीच पुढाकार घेतला नाही..कारण मला कधी तसं वाटलच नाही..

अजूनही तिचा कधी मेल येतो.. हाय्-हॅलो होतं.. मीही तिच्याशी normal च वागतो..

तिच्याकडून पण मी एक गोष्ट शिकलो आणि तेच मी ब्रीद म्हणून इथे मायबोलीवर माझं favourite quote म्हणून लावलं..

मी पण त्याच दिवसांत दुसर्‍या एकी साठी तिच्या दृष्टिकोनातून जगायचा विचार केला आणि मग तिचा मला कधीही राग आला नाही..वाटलं ते फ़क्त कौतुक...

अर्थात हे तुम्हाला उगाचच खरडल्या सारख वाटेल.. नेमस्तक मग तुम्ही हे उडवू शकता...
कारण हा नक्कि crush होता कि नाही हे मी छातिठोक पणे सांगू शकत नाही.. :-)

निरोप घेतो.... अर्थातच आपल्या प्रतिक्रिया वाचेनच

जास्वन्द...


Maanus
Monday, March 13, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, तुला काय उत्तर ऐकायला आवडेल?>>>
मला ती पान पराग ची ad आठवतेय. शादी और तुमसे... कभी नही. ए अरे ती नायीका कोण होती ह्या ad मधली, मराठीच होती ना ती.

काश पान पराग खाउन तसे झाले असते तर...


Savani
Monday, March 13, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद, एक आगाऊ प्रश्न विचारू का? तू पेठी engineering college मधे होतास का?

Ninavi
Monday, March 13, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर,

सुरेश भटांच्या ओळी आठवल्या..
अजूनही आठवून मी मोहरून जातो
किती किती लाघवी तुझा तो नकार होता..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators