Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through March 13, 2006 « Previous Next »

Psg
Saturday, March 11, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, तुझ्या positve attitude च खूप कौतुक वाटल. ALL THE BEST !! :-)

Devdattag
Saturday, March 11, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर.. मीही अभिनवचा.. तुझ्याच बचचा रे भाऊ..

Deepanjali
Sunday, March 12, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बारावीत असताना T.Y.BCS चा एक उंच गोरा , brown डोळ्यांचा एक North Indian hunk मला(आणि अर्थातच सगळ्या पोरींना) खूप आवडायचा पण एकदा त्याला मी cycle वरून येताना पाहिले आणि अचानक तो मनातून उतरला ...
Heart throb, आणि सायकल वरून फ़िरणारा ?? Noways...


Maanus
Sunday, March 12, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त
इकडे ये तिथे बोलु

Bhagya
Sunday, March 12, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस! तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला तुझे प्रेम लवकरच भेटो!!

Giriraj
Sunday, March 12, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक क़यामत....

मी नुकताच lecturer म्हणून आमच्याच college मध्ये join झालो होतो. त्याकाळातली ही क़यामत!

त्याच कॉलेजात असल्याने आधी मी तिला पाहिलही होतं पण ती काळजात घुसायला पावसाचं निमित्त झालं. दुपारची वेळ होती आणि काहीतरी निमिताने attendance कमी होता आणि दुपारपर्यन्त सगळेच पळून गेले होते. त्यामुळे मी पहिल्या मजल्यावरच्या लॅबबाहेर गॅलरीत उभा होतो. चारपाच पोरी होस्टेलला परतत होत्या.(त्या माझ्या विद्यार्थिनी नव्हत्या!) तितक्यात झिमझिम सुरू झाली.इतर पोरी भराभर चालत आडोश्याला जाऊन उभ्या राहिल्या मात्र ही पावसाचा अगदी मनमुराद आनन्द लुटत अजूनच हळूहळू चालू लागली.त्यातच ओढणी पसरवून पाऊस झेलण्याचा प्रकारही झाला. ढगांनी अर्धवट झाकलेल्या निळ्या आभाळातून पडणारे थेम्ब पुन्हा निळ्याच ओढणीत सामावून जात होते. या सगळ्या प्रकाराने मी पुरता 'खल्लस' झाल्यातच जमा झालो होतो.ईतर पोरी ओरडू लागल्याने तिने वर पाहि पाहिले आणि मला पाहून छनच लाजली आणि पटकन मैत्रिणींबरोबर झाडाच्या आडोश्याला निघून गेली.

तिचं नाव 'विमलजित कौर'! पन्जाबी, अगदीच बांधेसूद,सतत हातात पेन घेऊन त्याच्याशी खेळत रहायची सवय!
त्यानतर मला उगीच मी सरदार असण्याचे भास व्हायला लागले! पण पुढे गेल्यावर एक सरदार आधीच आहे असे कळले. मग माझा तात्पुरता हृदयभंग झाला. पण आजाही पुण्यात कधीतरी दिसेल अशी आशा वाटते!(त्यावेळेस तिचे वडील पुण्यात कोणी मेजर म्हणून होते!)





Deepanjali
Sunday, March 12, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पावसाचा अगदी मनमुराद आनन्द लुटत अजूनच हळूहळू चालू लागली.त्यातच ओढणी पसरवून पाऊस झेलण्याचा प्रकारही झाला. ढगांनी अर्धवट झाकलेल्या निळ्या आभाळातून पडणारे थेम्ब पुन्हा निळ्याच ओढणीत सामावून जात होते. या सगळ्या प्रकाराने मी पुरता 'खल्लस' झाल्यातच जमा झालो होतो.

<<<वा , चांदनी मधली श्रीदेवी आठवली .
BTW, त्या ' रिमझिम गिरे सावन ' लिहिण्याचे inspiration ही सरदारनी का:-)


Moodi
Sunday, March 12, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस मस्त लिहीलेस. best luck पुढील वाटचालीकरता..

Manuswini
Monday, March 13, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा आणखी एक किस्सा

मी college ला असताना आमचा एक छान ग्रूप होता त्यावेळी dance compition होती, कोणीही कुठेल्याही batches मधून एकत्र येवून dance बसवायचा होता एथे पण माझी best friend प्रिया होतिच
आम्ही ऊत्साहाने सगळ्याना जमा केले, सुरवातिलाच एक छानसा उंच, sharp features , डोळे बोलके,(यार डोळे, smile आणि height नी मला नेहमिच खल्लास केले आहे), athletic body (त्यावेळी सुद्धा athletic body, kind of muscled body in 12 th std ) एक मुलगा आला.
dance egyptian होता. खुप खटपट केली की त्याची partner व्हायची पण शेवटी कळले की त्याला कोणती तरी दुसरीच आवडते आणी ती partner होण्यासाठी तो मगजमारी करत होता. जरासा राग आला. मुद्दाम तिच्या steps wrong आहेत करून बघितले पण हे महाशय अगदी चिकटाचिकटी करून तिला शिकवायचे, शेवटी dance झाला आणी तिने सर्वान घरी बोलावले होते. आणी तिथे हा अगदी उड्या मारत पुढे. तिथे काय तिने(राखीने) ओळख करून दिली, की तिचे लग्न fix झाले आहे. सिंधी होती आणि business family तेव्हा बारवी मधेच सगळे fix . जाम मजा आली. जवळ्पास सर्वानी एतकी खेचली त्याची. मग काय माझा interest कमि होता, पण आम्ही छान दोस्त झालो. :-) त्यानंन्तर त्यानेच मला सांगितले की मी त्याला आवडते पण मलाच नंतर तो आवडेनासा झाला होता :-). हे जर dance च्या वेळी दोन वर्षापुर्वी सांगितले असते तर बात कुच और.. पण दिसायला मात्र खुपच handsome होता. आणि हुशार सुद्धा. एथे USA आला MBA ला तेव्हा भेटला तेव्हा परत वाटले अरे यार क्या लगता है, एकदम गब्रु जवान पण पुन्हा missed the boat कारण ह्या वेळेला तो पुन्हा booked
जावु दे झाले गेले गंगेला मिळाले ( खरे सांगते त्या दुसर्या मुलिचे नाव पण गंगा होते )
पण ह्या वेळेला भेटला तेव्हा खरेच वाटले ह्याला 'हो' म्हणायला हवे होते :-)
कारण तो दिसायला सुंदर असला तरी एकदम हुशार, down to earth,educated and from good family होता.
त्याचे smile आणी डोळे खुपच सुंदर होते. मला आठवते की एथे School मधे बर्याच मुली मागे असत पण हा अगदी girlfriend व्रता सारखा गंगेच्या मागे.

गेल्या वेळी NY ला भेटला पण काही अंदाज आला नाही की त्याचे लग्न झाले आहे का नाही.
जवु दे गंगेलाच मिळाले असेल

परत एकदा last year लाच अचानक india ला भेटला आणी का माहित नाही पण त्याने मला विचारले would you like to have coffee now and spend some time? उगाच पटकन no, thanks आले.
जेव्हा तो पटकन वळला तेव्हा 'उगिच' वाटले अरे मी नाही का सांगितले ह्याला. माहित नाही पण no reason? मी हळहळले अर्रेरे मी नंबर तरी घेतला का नाही असे वाटले.


घरी जावून old diari त नंबर शोधला त्याचा पण एतक्या वर्षत India तले नंबर पण बदलले असे कळले.
mtnl-mumbai शोदुन झाले
एथे USA ला नाव सांगून 411 ला विचारुन झाले पण काहिच शोध लागला नाही

ती coffee भर दुपारच्या उन्हात प्यायला हवि होती काय? काय म्हणता तुम्ही?








Arch
Monday, March 13, 2006 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, तू इतकी indecisive कशी ग?

Bee
Monday, March 13, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांच्या दिसण्याकडे मुलींचा इतका भर असेल असे कधी वाटले नव्हते :-)

Maanus
Monday, March 13, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मला पन, आता gym join करावी लागनार असे दिसतेय.

Maitreyee
Monday, March 13, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का रे बी दिसण्यावर मुलींचा भर नसायला काय झालं :-)
मुलींच्या (पण) बर का डोळ्यातली कुठलीशी नस थेट हृदयापर्यन्त जाते असे कुठेसे वाचलेय मी :-O
मनु काय हे! इतक्यावेळा बोट चुकली म्हणजे तो तुझ्यासाठी नाहीच आहे गं
:-p

Manuswini
Monday, March 13, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च,

अग indecisive नाही गं,
आधी त्याच्या मनात न्हवते, नंतर मग ती गंगा कोण आहे त्याची हे न विचारताच मी पुर्वग्रह केला,वाटले की आता मी नाही ह्याला भाव देणार
आणी नंतर काळ लोटला की ते crush feeling ही निघुन जाते असे वाटते :-(

हळहळ ही आपली उगिच कारण काही गोष्टी कुछ खोने के बाद पाने को मन करता है :-)
बी,
जगातील सुंदर गोष्टेचे का नाहे कोणाला काही वाटणार?
आता हे नको सांगुस की एखादी सुंदर मुलगी तुला दिसली तर तुला भुरळ नाही पडणार किंवा
एखादी सुंदर,हुशार,मनाने चांगली मुलगी तुझी मैत्रिण असेल तर तुला ती हविहवीशी नाही वाटेल. then I would say you are hypocrite

मैत्रेयी,
हो ग बोट माझ्यासाठी नाही हे कधिच कळले ग मला
ती coffee पिवून भले acidity झाली तर चालली असती असे आपले उगिच वाटते
..पण नको सध्या Acidity चा त्रास आहेच काहिना काही कारणामुळे... त्यामुळे गतम न सौच्यम :-)


Manuswini
Monday, March 13, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी serendipity पाहिला आहे का?

माझा अतिशय fav movie

त्याच्यामुळे never leave the hope !! asehee mhaNaavese vaaTate :-)


Lampan
Monday, March 13, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसला खुन्खार timepass बीबी आहे हा ... मलापण काहीतरि लिहायचय आता इथं ......

Bee
Monday, March 13, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटल मुलींची ओढ ही मुलांच्या career कडे जास्त असते. बाकी ते दिसायला कसेका असेणात :-)

मनुस्विनी, गळाला मासा अजून लागलाच नाही का :-) त्या मुलाचा शोध घे.. कदाचित गळाला मासा लागू शकेल :-)

नाही पण असे खूपदा होते. आपण नंतर पस्तावा करतो का आपण तिला नाही सांगितले.

नाही मी hypocritic नाही. सुंदर मुलींचा हा problem असतो की तिच्यामागे आधीच बरीच मुले असतात. मग खटाटोप करुन जर ती नाही मिळाली तर उगाच heart break कशाला करून घ्यायचे. पण आता देशात नाही म्हणजे असे प्रसंग भुतकाळात जमा झाले आहेत. इथे तो छेडखानी करणे, मुलींच्या मागे लागणे, त्यांना Bus stop वर गाठणे, कधी आपले वाहन घेऊन त्यांच्या मागे पुढे करणे हे सगळे चित्र देशातले आहे. नेट वर असे होऊ शकेल का :-)


Shyamli
Monday, March 13, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बी all the best

अद्वैत लिही लिही.... सगळेच लिहितायत....


Lampan
Monday, March 13, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटल मुलींची ओढ ही मुलांच्या career कडे जास्त असते >>
तिथेच तर चूक होते ना ... तुम्ही करिअर करिअर करत बसता आणि सेटल झाल्यावर चांगल्या मुलीच उरलेल्या नसतात .. आणि मुलांचा हत्ती होतो :P

Dakshina
Monday, March 13, 2006 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या Office मध्ये एक D.G.M. आहे. साऊथ इंडीयन असूनही चक्क गोरा आहे. चाळिशीच्या आसपासचा असेल. तो पुण्यात Join होण्या आधीपासूनच का कुणास ठाऊक मला त्याला पहायची मला जबरदस्त इच्छा होती. आणि पहिल्यांदा भेटल्यावर पण माझा अपेक्षाभंग झाला नाही. जशी कल्पना केली होती तसाच निघाला तो.

आमच्या Annual Picnic च्या वेळी मी लांब उभं राहून Zoom करून करून त्याचे Photo काढले होते.


Deemdu
Monday, March 13, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

detroitakar नाव declare करु का सगळ्यांना? अरे माझ्या आधी दोन बॅच

Vaishali_hinge
Monday, March 13, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा BB चांगलाच रंगलाय, आता रोजच उघडला जातो!! वाचायला मजा वाटते,

खर तर college मध्ये असतांना फ़ारसे आवडण्यासारखे कुणी नव्हते, आणि MSc ला असतांना तर hostel ला घरची इतकी आठवण यायची की सारखी रडायचे, पण आपलं नसल तरी मुलांचे लक्ष असते हे दिसुन आले जेव्हा होळिला विद्यापीठात सगळेच्या सगळे fishponds फ़क्त माझ्या एकटीवर होते, आणि तेही मेन गेट वर मोठ्ठे पोस्टर अगदी वर कोणाचा हात पोहचणार नाही अशा ठिकाणी लावले होते, मी कसबसा class attend केल आणि मझी एक मैत्रीण होती dashing तीने एका मित्राच्या मदतीने ते table आणुन फ़ाडुन टाकले!! शिवाय class मध्ये आणि इतर मुलांकडुन तीने काढुन घेतले हा प्रकार कोणी केला म्हणुन आणि सगळ्यांना दमही देउन आली परत कोणी हा प्रकार केला तर याद राखा म्हणुन!!!
मला नन्तर तीच्याकडुन असेही कळले की मुले एकमेकांना म्हणत माझा नाद सोडुन दे ती इतकी रडते की घराशिवाय काही बोलतच नाही, फ़ारच रडुबाइ होते मी!!!


Soultrip
Monday, March 13, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

If she is a well known, public figure (assuming she is actress),why not?
Sonali Kulkarni?? Mrinaal Dev???

Soultrip
Monday, March 13, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटल मुलींची ओढ ही मुलांच्या cअरीर
तिथेच तर चूक होते ना ... तुम्ही करिअर करिअर करत बसता आणि सेटल झाल्यावर चांगल्या मुलीच उरलेल्या नसतात .. आणि मुलांचा हत्ती होतो :P.....
>>>>>>>>>

I fully agree with you Lampan! Ask me, how many crushes I nipped in the bud since 4th std.:-( I don't repent exactly; my head still rules the heart! But I do become senti. rememebering all those crushes/puppy love etc. etc. I still wonder where they are! & feel like seeing them once! This BB is a good vent for all those suppressed romantic feelings!

Shyamli
Monday, March 13, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा मराठीत लिहुन बघा बर...
लिहायला आणि वाचयलापण छान वाटेल....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators