| 
   | 
| मला वाटत  QLC  चा अर्थ चुकीचा घेतला जातो आहे.  QLC  म्हणजे रुटीनचा कंटाळा येणे, बोर होणे पेक्षा काहीतरी जास्त आहे.
 20-30  वयोगटातली मुलं, मुली करीयर  path  वर गोंधळून जातात आणि वैयक्तीक  path  वर पण. कधी कधी पुर्वीच बरं होत अस वाटत. सर्धोपटमार्ग निवडून आई वडीलांनी घेतलेले  Decisions  बरोबर आहेत म्हणून डोळे मिटून हो म्हणायचे. आजकाल  maturity  जास्त येते मग लग्नासारख्या गोष्टी ज्या पुर्वी इतक्या सोप्प्या होत्या त्या अवघड वाटायला लागतात. दुसर्यावर विश्वास टाकणे कमी होते. आधी मैत्री करण्याकडे कल वाढतो. दोघेही जण इतके  busy  असतात की  relationship  पुढे नेण्यासाठी  communications, trust  ह्याची गरज असते विसरून जातात मग गैर्समज वाढतात आणि त्यातून ताण,  personal life  वर हे ताण तर  job life  मध्ये  compition  इतकी वाढली आहे आणि  market  इतक विचित्र आहे की उद्या काय होईल सांगता येत नाही. बरं  job  गेला तर दुसरा मिळेल हा  confidance  असायला  personal life  बळकट असाव लागत. दोन्हीही नसल्याने अजून तणाव वाढतो. दोन्हीकडे अपयशी ठरतोय का ह्याची भिती.
 पण दुसरी बाजु ह्याची ....  तरूण वय आहे. हातात पैसा आहे. जे पुर्वीची पिढीने ५०शीला मिळवले ते आज २०शीतच आपल्याकडे आहे. स्वातंत्र्य भरपूर आहे. मग कसला त्रास आहे? खर तर सुखी असायला पाहिजे. अस होत नाही ना पण?
   
 
 |  | | Chioo 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 7:53 pm: |       |  
 | 
 इथल्या जुन्या-नव्या सर्व सदस्यांबद्दल आदर ठेऊन  (  उगाच गैरसमज नकोत.
  ) मलापण  arch  आणि  ninavi  यांची मते पटली नाहीत. 
 arch , कधीकधी  job , मित्र-मैत्रिणी पुरेसे नसते. जर तो/ती चे लग्न झालेले नसेल,  family  जवळ नसेल तसेच बरोबरच्या मित्रांची लग्न झाली आहेत खरं स्वत:चे नाही तर  QLC  चे  symptoms  दिसतात.  job  असलाच तर तो किती मनासारखा आहे तेपण आहेच. इतरांना  company  चांगली म्हणून  job  चांगला वाटतो. पण काम मनासारखे नसेल तर? हे सगळे  respective  आहे. सध्या  tentions  पण खूप असतात.  career  साठी सर्वच प्रयत्न करत असतात. माझ्या काही मैत्रिणी, बहिणी, कही काळ मी स्वत:, आम्हाला लग्न झाल्यावर  job मुळे एकटे रहावे लागले. हा जरी दोघानी मिळून घेतलेला निर्णय असला तरी एकटे रहण्याचा ताण येतोच. लग्न झालेले नसेल तर  working hours शी जोडीदार जुळवून घेइल का ही शंका असतेच. त्यामुळे या सर्वावर केवळ ३४;सुख खुपतय३४; ही प्रतिक्रिया खटकली. आणि ती जुन्या-जाणत्याकडून आल्यामुळे जरा जास्तच खटकली.
 
 ninaavi , हा  BB  मुळात  QLC  ची चर्चा करण्यासाठीच आहे. तेव्हा इथे कुणी दु:खी अनुभव लिहिले तर ते अपेक्षितच आहे. तेवढेच मन मोकळे होते. आणि त्यावर अमेयसारखा कोणी सुंदर उपायही सांगू शकते. अमेय, तुझा उपाय अगदी मनापासुन पटला.
   
 
 |  | | Chioo 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 8:06 pm: |       |  
 | 
 रचना, अगदी अगदी. तू अगदी मला काय म्हणायचं आहे तेच लिहिलंस. मी उगीच खूप फ़ाफ़टपसारा मांडला.
   
 
 |  | एवढच म्हणेन रचना, अगदी तु बरोबर अर्थ घेतलास मी काय सांगायचा प्रयत्न करतेय
 एथे हे दर्शवत नाही की तक्रारी का कोणी खरोखरच  QLC  ने पछाडलय म्हणून
 
 पण हे एक माध्यम आहे जिथून थोडास दिलासा मिळू शकतो असे मला वाटले म्हणून लिहिले.
 
 सुख बोचत वगैरे  remarks  जरा चुकिचे आहेत असे मला वाटते.
 
 तसे जासव्द चे  post  मला बरोबर वाटले.
 
 मी  actually interest  निघून जाणे जरी त्या गोष्ट्ट आपाल्याला आवडत असताना एकाकी वातणे वगैरे
 
 मला स्वःताला काही  QLC  माहित नव्ह्ते पण वाचल्यावर वाटले अरे असे काही तर नाही ना
 चला एथे विचारावे की कधी कधी असे होत का
 
 अमेय
 प्रय्त्न करेन
 
 श्यामली,
 मी तरी  bounce back quickly   व्यायचा प्रय्तन करते तु सांगतेस तशी गाणी एकून पण अलिकडे जरा ज्यास्तच कंटाळा आलाय त्याच त्याच गोष्टीचा
 
 मी कधी कधी लहान मुलांबरोबर खेळते  mood change  होतो
 
 
 
 |  | मनस्विनी कंटाळा येण्याचाच कंटाळा आला की मग सुटेल बघ हा प्र्Cब्लेम.
 
 
 |  | फक्त रचना,जासंवद आणि चिऊ
 तुम्ही मनातले बोललात  100% right
 मला स्वःताला जमत नव्हते काय सांगू
 
 
 लग्न जमवणे, नोकरी तली  compitition ,एकटेपणा सगळे असह्य होते कधी कधी
 मी तर  cheerful  म्हणून ओळखली जाते पण कधी कधी मलाच कळत नसते कधी सुटणार हा गुंता?
 
 .बाकी  normal  आहे हो मी..
   
 
 |  | एक आहे ही माय्बोलि खूप मदत करते
 आणि  friends  जरी ते  bore  वाटले  attimes
 
 
 
 |  | आणखी एक रचना तु म्हनतेस तसे अगदी डोळे मिटून कराव लग्न आणि द्यावा सोडून  job  आणी जपाव्या आपल्या आवडी निवडी
 पण यार ते पण नाहे ना करु शकत  so easily
 
 जावु दे
 
 india लाच  visit  करते
 
 जरास  change  ईतक्या  deadlines  मधून बापुला कसे पटवू हाच विचार करतेय सध्या
 
 
 
 |  | | Ninavi 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 8:30 pm: |       |  
 | 
 रचना, थोडक्यात छान लिहीलंयस.
 मूडी, कोण भेटलं नाही का सकाळपासून?
   तरीही मला असं वाटतंय की अमेय म्हणतोय तश्या सोप्याच गोष्टी कठीण करतोय का आपण?
 रूटीनचा कंटाळा, बदल हवासा वाटणं, त्याच बदलाची धास्तीही वाटणं या सगळ्यांतून सगळ्याच पिढ्या जातात. त्याकडे  part of life म्हणून बघता यायला हवं ना? नाहीतर  maturity तरी कशाला म्हणायचं?
 प्रॉब्लेम्स नसतात कुणाला? आणि नुसती नावं देऊन ते सुटतात का?
 पिढ्या बदलल्या तरीही जगात मैत्री, प्रेम, परोपकार, सहानुभूती आहेच ना शिल्लक?
 मूडी म्हणत्ये तसं ते बघायला लांब जायला नको. इथे मायबोलीवर आपण एकमेकांना काळे की गोरे न पहाता इतक्या गोष्टी शेअर करतो, सल्ले देतो-घेतो..थट्टामस्करी करतो तसंच कौतूकही करतो. अजून काय हवं असतं माणसाला?
 
 
 |  | | Lalu 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 8:41 pm: |       |  
 | 
 हवाई,
  . रचना, चिऊ चांगलं लिहिलंय. मला पण हल्ली बोअर होते, पण ते या बीबी वर लिहिता येईल का? की  'MLC'  नावाचा नवा बीबी उघडू, मिलिन्दा?  ~D
 निनावी, बोलत बसण्यापेक्षा,  ' शाश्वत' टाक जा तिकडे कविता बीबी वर.
 
 
 |  | मनुस्विनी तू म्हणतेस तसं होत असेल ही पण ह्या गोष्टींची उत्तरं फ़क्त आपल्याकडेच असतात... आपल्या मनाची काळजी परदेशात सारखं दुसरं कोण घेत रहाणार! शेअर करून जरी बरं वाटत असलं तरी ते फ़ाईनल सोल्यूशन नाही होऊ शकत...म्हणजे शेअर करणं हे प्रॉब्लेम नंतर येतं...पण ते प्रॉब्लेम्चं उत्तर नव्हे.
 आणि हो माहितीये हे सगळं कळतयं पण वळत नाहीये असंही होत असेल...
 
 
 |  | | Ninavi 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 8:49 pm: |       |  
 | 
 कुठली  ' शाश्वत' गं लालू?
  
 
 |  | पण ते क्यू. एल. सी.  हे नाव कसलंच वाटतयं.
  मी आत्तापर्यंत हजार दा हसलो ती अक्षरं उच्चारून   म्हणजे मला क्यू. एल. सी. झालाय हे भारतात कुणाला सांगितलं तर घाबरतील घरची मंडळी!
 
 
 |  | | Arch 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 9:03 pm: |       |  
 | 
 जास्वंद, माझ वाक्य डोक्यात गेल असल तर त्याबद्दल दिलगिरी.
 
 पण ज्या कोणाला हे  QLC  झालय किंवा होईल अस वाटतय त्यांनी शिवराज गोर्लेंच  "  मजेत कस जगाव  "  हे पुस्तक जरूर वाचाव.  depressed  वाटत असेल तर छंद जोपासण्यासारख दुसर काही नाही.
 
 
 |  | आर्च तूम जियो हजारो साल!
   
 
 |  | | Maanus 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 9:21 pm: |       |  
 | 
 QLC  आणि गुलमोहर मधे कुणीतरी लिहीलेले ३० शीच्या ऊंबरठ्यावर... एका संकटातुन निघत नाही की दुसरे उभे.
 
 कामात काहीतरी विरंगुळा हवा... एक काम संपले की लगेच दुसरे काहीतरी हवे... एक काहीतरी गोष्ट  achive  झाली की लगेच काहीतरी दुसरे पाहीजे... पुणे पुणे पूने, खुप झाले पुणे... चलो बेंगलोर... सहा महीन्यात अरे बास की बेंगलोर... झाले बघुन ते... आता  america ... काम करायचे तर  wall st.  वरच... वर्ष झाले बासकी  wall st.  पुराण. आता काय?  photography;  खुप झाले  computer  बास... आता  fashion, portrait photography.
 
 हे असे काहीतरी बहुतेक ह्या  QLC phase  मधे होत असावे. एका कोणत्याही गोष्टीत  interest  न राहने, सतत नवचैतन्याचा शोध. अस नाही झाले कि एक प्रचंड विचीत्र मन्:स्थिती होते... ते कदाचीत  QLC  असेल.
 
 तिनच मित्र होते  US  मधे माझे... बघता बघता सगळ्यांची लग्न झाली... एकाचे तर गेल्या आठवड्यातच आणि मग एकदम वाटायला लागले की आता आपन परत एकटे झालो. आता कुणाशी बोलायचे?
 
 
 |  | | Maanus 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 10:04 pm: |       |  
 | 
 ह. ह. हे तुझ्यासाठी  कंटाळ्याचा कंटाळा
 
 
 |  | QLC चा लॉन्ग फ़ॉर्म काय हे?
 त्याचा मराठित काय अर्थ हे?
 
 
 |  | लिम्बू आर्काइव्ह वाच वरचा
   
 
 |  | QLC - Quarter Life Crisis
 अमेय वाचला रे भो, पहिल्याच पोस्ट मधी हे, बारीक अक्षरामुळ दिसल नाय मला!
 हिथ  HLC  होऽऽल लाईफ़ क्रायसिस हे त्या पावशेर क्रायसिसच काय घेवुन बसलासा!
 म्या दोन दिसान्नी पोस्टिन हिथ!
 तोवर तुमच चालुद्या!
 
 
 |  | | Shyamli 
 |  |  |  | Saturday, March 04, 2006 - 6:38 am: |       |  
 | 
 >>>>>>>>हिथ HLC होऽऽल लाईफ़ क्रायसिस हे त्या पावशेर क्रायसिसच काय घेवुन बसलासा
   लिंबुभाऊ.. .. .. .. ..
  
 
 |  | | Ninavi 
 |  |  |  | Saturday, March 04, 2006 - 12:07 pm: |       |  
 | 
 आता या बीबीची व्याप्ती वाढणार तर!
  
 
 |  | | Neelu_n 
 |  |  |  | Saturday, March 04, 2006 - 12:24 pm: |       |  
 | 
 लिंबुभावु..  HLC
   आता  HLC  साठी नवीन बीबी काढावा का?
 निनावी
   लिंबुभावु ते पोस्टल्यानंतर सारांश टाकायला विसरु नका
   
 असा असावा का कंटाळ्याचा कंटाळा?
   
  
 
 |  | नमस्कार मायबोलीकरांनो
 
 मी नुकत्याच लिहिलेल्या  QLC  ह्या लेखावर इथे झालेली चर्चा सहज वाचनात आली. बरे वाटले. अर्थात बर्याच जणांच्या जणींच्या मनात  confusion  दिसतेय की काहीतरी रोजच्या रुटीनला कंटाळलेल्या मनाचे हे खेळ आहेत.
 मी लेखात म्हंटलेच आहे की आजच्या तरुण पिढीला कॉलेज लाईफ़ संपल्यावर वास्तव जगात दाखल झाल्यावर ज्या एका विशिष्ट परिस्थितीला सामोरे जावे लागते ती खुपच वेगळी आहे. अनेक नव्या संधी, नव्या करिअर्स, नवी आव्हाने आणि  peer pressure , अपेक्षेला उतरण्याच दडपण, स्पर्धेचे दडपण, निर्णयाचे बरेवाईट परिणम झेलण्याची कुवत अंगी येण्याच्या आतच ते घ्यावे लागणे, ग्लॅमर, पैसा ह्यांना जरुरीपेक्षा जास्त मह्त्व, योग्यवेळी प्रायॉरिटीज न ठरवणे असे अनेक  aspects  हा  QL  क्रायसिस निर्माण होण्यामागे आहे. ह्याला जबाबदार आजची परिस्थिती आणि तरुण पिढी तसेच त्यांचे पालक ही आहेत. हा लेख लिहिल्यावर मला जी प्रचंड संख्येने ह्या वयोगटातील मुलामुलींची पत्रे आली त्यावरुन हा प्रश्न खरोखर त्यांच्या दृष्टीने महत्वाचा तर आहेच पण त्यांना मार्गदर्शनही हवेसे वाटण्याजोगा आहे हे स्पष्ट होते.
 वयाची तिशी उलटून गेली की हा प्रश्न आपोआप सुटणारा नाही. उलट तो पुढच्या आयुष्यात खेचला गेला की भावी सहजीवन आणि नातेसंबंध ह्यावर विपरीत परिणाम करणारा ठरु शकतो हे लक्षात घ्यायला हवे.
 चर्चा चालू राहू द्यात. प्रश्न सोडवण्याच्या दिशेने चर्चा हे नेहमीच पहिले पाऊल ठरत असते. i
 
 
 |  | | Champak 
 |  |  |  | Saturday, March 04, 2006 - 2:40 pm: |       |  
 | 
 लिम्ब्या.... स्पेलिंग नीट कर......  whole life crisis  असे   not HLC
  bcoz it means Half Life crisis   
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |