|
ट्रॅफिक जॅम - कथा १. आणि हलके हलके तिचा श्वास मंद झाला... संपलं सारं काही शांत शांत कयमची कटकट गेली. आता पुन्हा कधीही traffic jam होणार नाही.आणि मी पुन्हा काही sigalert.com बघत बसणार नाही. पण आता ती नाही म्हणजे चविष्ट जेवणही नाही, घरातली साफसफाई नाही आणि ती करायची तसं कैरीचं लोणचही मिळणार नाही. छान सुखात सुरू होता संसार आमचा. तिलाही नवीन जाॅब खूपच आवडला होता. मीही खूष होतो, ती खूष म्हणून.त्यातच एक दिवस तिला घरी यायला खूपच उशीर झाला. मी वाट पाहून कंटाळलो, घाबरलो काळजीने अगदी हैराण झालो. घरी आली तेव्हा ती म्हणाली " अरे कसला traffic रे..वैताग आला नुसता त्यामुळे अडकले रे मी. " पण मग alternate day हे traffic मधे अडकणं सुरू झालं. आणि मग रोजच...घरी यायला तिला रात्रीचे १० - ११ वाजायचे. एक दिवस आॅफिसमधल्या मित्राने एक site दाखवली sigalert.com , तेव्हापासून रोज मी traffic track करायला लागलो. तसा मी संशयी नाही पण आपलं उगीचच.... आज मात्र तिचा पाठलाग केला तिच्या आॅफिसपासून.... साला, तिच्या गाडीत हा कोण बसला आहे?? छ्या... तेवढ्यात तिने exit घेतला आणि मी मात्र अजिबात traffic नसलेल्या त्या रस्त्यावरून चुकून पुढेच गेलो. अरे..१० मिनिटाच्या आत मी घरी आणि ही मात्र १० : ३० ला उगवली. पुन्हा तेच traffic jam चं कारण. साली डोक्यातच गेली एकदम... आता नाही.मला फसवते.. मला?? बस..श्वासच बंद करून टाकला तिचा. माझ्या संसाराच्या चविष्ट करकरीत लोणच्यात हा साला गुळचट traffic jam भरून राहिला होता. आज तिच्या शेजारी बसलेल्या त्या साल्याला.... पण तो पुरुषच होता ना नक्की??? का बाई होती??? नेमका आज चष्मा विसरलो होतो मी................ } <img src="http://69.94.96.131/hitguj/messages/65003/hdaimages/Traffic_Jam.jpg" align="top" border=0> ट्रॅफिक जॅम - कथा २. मी Sukhadaa Computer Ltd. ची executive director ..एवढ्या लहान वयात केवढा मोठा पल्ला गाठलाय मी!!! आता माणसाने स्वतःचं कौतुक करण्यात सुद्धा किती मजा असते नाही? तेवढ्यात driver च्या आवाजाने भानावर आले. " मॅडम जरा जामच दिसताय ट्रॅफिक बांदयावरून घेवू का गाडी?? " मी.. " नको रे असूदे इथूनच चल.. " पाऊस कोसळत होता, बाहेर कित्ती चिकचिक असेल नाही?? पण A.C car मधे काहीच जाणवत नाही.. सहज काच खाली करून बघायचा मोह होतोय.. बापरे किती लोक आहेत इथे?? ही शेजारच्या बाईकवरची जोडी अगदी छान आहे एकमेकाना साजेलशी. मुलगी तशी फारच लहान वाटते आहे पण देखणी आहे अगदी, मुलगाही तगडा दिसतोय एकदम.. आम्ही दोघेही असेच फिरायचो त्याच्या बाईकवरून, एकमेकाना असेच बिलगून जगाला गुंडाळून ठेवत, भरधाव, तसेच दिवस होते ते. एकदम स्वप्नासारखे, पण नोकरी सुरू झाली आणि अल्पावधीतच मला पहिले प्रमोशन मिळाले. पोस्टिंग California, USA .. त्याचं प्रेम आणि माझी नोकरी यात अर्थातच माझ्या महत्वाकांक्षी मनाने विजय मिळवला. निरोपाच्या वेळी तो एवढा रडला आणि मी मात्र कोरडे डोळे घेवून निघून गेले. ४ वर्षांनी आले तेव्हा त्याचा मित्र सांगत होता, ' तू गेल्यापासून अगदी वेडा झाला आहे तो, हल्ली काहीच उद्योग करत नाही. ' पण आता मी परत आलेय रे, आयुष्यात कुठेतरी set व्हायचंय आणि तुझ्याशिवाय पर्याय नाही पुढच्या आठवड्यातल्या meetings संपल्या की त्याला भेटायचंच.... विचार करता करता डोळे भरून आले.. बाईकवरची जोडी अजूनही त्या traffic jam ला न कंटाळता एकमेकाना तशीच बिलगून होती.. एवढ्यात त्या तरुणाने आपलं helmet काढलं आणि मी बघतच राहिले.............. - सुप्रिया जोशी
|
|