Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
arun
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » arun « Previous Next »

नमस्कार मंडळी

अगदी रंगीबेरंगी असा BB तर मिळाला. पण पंचाईत अशी की, काय लिहायचं हा एक यक्ष प्रश्न डोळ्यासमोर आला. ..

शाळेत असताना एक धड निबंध न लिहिता येणारा मी, अस काय लिहू शकणार आहे इथे, हाच विचार माझ्या मनात घोळतो आहे. नाही म्हणायला office मध्ये कामानिमित्त, जे Procedure Definition करतो, ते मात्र व्यवस्थित लिहिता येतं. (बाकीचे सोडा पण, अगदी office मधले सुद्धा कोणी ते वाचत नाही हा भाग वेगळा :-)

इथे पैसे भरल्यापासून माझ्या डोक्यात हाच विचार चाललेला होता. मुख्य विचार हाच, की या जागेचा उपयोग मी कशासाठी करणार आहे? मला काय लिहिता येऊ शकेल? मी लिहिलेलं कोणी वाचेल का? म्हणजे कोणी वाचण्या इतपत बरं मला लिहिता येईल का? हे आणि असेच असंख्य प्रश्न.

तसे प्रश्न भरपूर आहेत. बरेच प्रश्न, ज्यांची मला अजून नीटशी उत्तरे मिळाली नाहीत किंवा माझ्याकडून त्यांची उत्तरे शोधण्याचा पुरेसा प्रयत्न केला गेला नाही. पण तरीही, ते प्रश्न कधी ना कधी डोकं वर काढून मनात येतात आणि यथेच्छ छळतात.

तरी पण आता मी प्रयत्न करणार आहे. बघुया काही जमतय का! तुम्हा सगळ्यांचे चांगले वाईट अभिप्राय मी अपेक्षित धरतो आहे

चला तर मग
hi Loks,

बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणतोय, पण वेळ मिळाला नाही.

"तिथे सिंहगड रोड वर बागडायला बरा वेळ सापडला " ....

कोण रे ते ??? समोर आणा त्याला इथे

खर सांगायचं तर, वेळ वगैरे काही खर नाही, पण काय लिहावं हेच सुचत नव्हतं.

गेले काही दिवस पुण्यात भरपूर पाऊस पडतोय. ५ ते ७ दिवसांच्या अंतराने मुठा नदीला दोनदा पूर. हे म्हणजे खुपच झालं.
अशा पावसाळी हवेत, सर्वात प्रथम माझ्या मनात कोणता विचार आला असेल तर तो काहीतरी गरमागरम खाण्याचा. एका मागोमाग एक असे असंख्य पदार्थ माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.

सगळ्यात प्रथम आठवली ती गरमागरम कांदा भजी. जरी चातुर्मास चालू असला तरी भज्यांसाठी कांद्याला घरात मोकळिक असावी. कांदा भज्यांप्रमाणेच, इतर प्रकारची भजी सुद्धा मस्त बेत जमवतात. उदा. बटाटा, भोपळी मिरची, फ्लाॅवर वगैरे
दिवाणखान्यात कोचावर बसून TV बघता बघता भजी खायला खुप मजा येते. TV वर एखादं आवडीचं नाटक चालू असावं आणि आपल्या हातात भज्यांची डीश. भज्यांची तिसरी / चौथी प्लेट संपता संपता हातात वाफाळलेल्या काॅफी चा कप यावा.

अशाच पावसाळी हवेत खाण्याचे लज्जत वाढवणारा दुसरा पदार्थ म्हणजे भाजलेलं कणीस. पण ते घरात बसून खाण्यापेक्षा, खडकवासला धरण किंवा पाषाण लेक, इथे जाऊन खाण्यात खरी मजा आहे. (दुर्दैवाने पाषाण लेक आता नावापुरता सुद्धा उरला नाहिये, ही गोष्ट वेगळी ). कोळशांवर भाजलेली कणसं ही बाहेरच जाऊन खायला पाहिजेत. घरी भाजलेल्या कणसांना तशी चव येत नाही.

कधी कधी अशा पावसात वडा पाव सुद्धा मस्त रंग जमवतो. गरमगरम नुकताच तळलेला वडा, ताजा पाव आणि त्याच्या बरोबर, तळलेली हिरवी मिरची किंवा दाण्याची चटणी. अर्थात वडा तळणार्‍या कडे दुर्लक्ष केले तरच वडा नीट खाता येतो. :-)

त्याचप्रमाणे, कांदा पोहे, उपमा हे पदार्थ देखील अशा हवेत मस्त वाटतात

हे आणि असे इतर असंख्य पदार्थ. नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटतं. हे पदार्थ आपण इतर वेळी सुद्धा खातो, पण त्यांचा खमंगपणा या पावसाळ्यातच का खुलतो, हे मला न सुटलेलं एक कोडं आहे
श्र देवींचे पुण्यनगरीत आगमन झाल्यापासूनच काही गडकर्‍यांना GTG चे वेध लागले होते, तर काहींना नेहमीप्रमाणेच बुधवारचे वेध लागले होते.

त्यानुसार, GTG चा कार्यक्रम ठरला आणि निमंत्रणे सगळ्या आजी आणि माजी गडकर्‍यांना पाठवली गेली. बुधवार दिनांक ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता बालगंधर्व येथे भेटायचे ठरले.

सगळ्यात प्रथम मी पोचलो आणि लगेचच का. पो. पण आला. कोण कोण येणार आहेत याची उजळणी सुरू होती तेव्हड्या सखीप्रिया तिथे अवतीर्ण झाली. मग कोणाला कसा आणि कोणी निरोप पाठवला याची चर्चा करत असतानाच श्र देवी तिथे अवतरल्या.

as usual, confused state मध्ये इकडे तिकडे बघणार्‍या श्र ला बघताना आम्हा तिघांची खुपच करमणूक झाली. आम्ही तिघे तिच्या समोर असून देखील श्र ची नजर सैरभैर झाल्यासारखी वाटत होती. :-)

श्र नंतर ५ मिनिटात गंधार पण आला. आणि मग इतर गडकर्‍यांना फोनाफोनी सुरू झाली. गंधार ने DS ला फोन लावला तर श्र ब ला फोन लावत होती आणि मी मिहिर ला.

लगेचच ५ मिनीटात मिहिर बालगंधर्व ला सुखरूप पोचला.

शेवटी काही अपरिहार्य कारणामुळे ब येऊ शकणार नाही असे कळले आणि काहिच अपरिहार्य कारण नसल्यामुळे DS येऊ शकणार नाही हे देखिल कळले. ( कल्याणी नगर हून बालगंधर्व व्हाया रास्ता पेठ, आणि ते देखिल फक्त १० मिनीटांसाठी असा त्याचा दौरा होणार होता. पण काही कारणास्तव तो बारगळला ... )

आता यानंतर कोणी येणार नाही असे वाटल्यामुळे आम्ही कॅंटीन च्या दिशेने आमचा मोर्चा वळवला. कॅंटीन नेहमीप्रमाणे तुडुंब भरले होते.

आम्ही तिथे कोणतं तरी टेबल रिकामं होण्याची वाट बघत असतानाच कूल पण आला. अजून थोड्या प्रतिक्षेनंतर आम्हाला एक टेबल पण मिळालं. समस्त गडकर्‍यांनी त्या टेबल कडे आपला मोर्चा वळवला पण

पण त्या टेबल जवळ फक्त दोनच खुर्च्या होत्या, हे बघून समस्त गडकरी चारही दिशांना खुर्च्या शोधण्यासाठी पळाले. शेवटी एकदाच्या सगळ्यांना खुर्च्या मिळाल्या.

सगळे आपापल्या जागेवर स्थानापंन होतच होतो, तेव्हड्यात अजून एक ओळखीचा चेहरा दिसला. ती किर्ती म्हणजे mepuneri होती.

गडकर्‍यांची ओळख का कार्यक्रम फार वेळ चालला नाही, कारण बरेच गडकरी एकमेकांना ( चांगलेच ) ओळखत होते.

तेव्हड्यात कॅंटीन चा वेटर order घेण्यासाठी आला. काय खायचे किंवा प्यायचे यात गडकर्‍यांनी फारसा वेळ न घालवता, चटकन order दिली. काहींनी वडापाव, काहींनी उसाचा रस, तर चक्क दोघांनी लिंबू सरबत मागवलं.

वडापाव आणि उसाचा रस चांगला होता, पण लिंबू सरबत तितकसं ठीक नसावं. शेवटी लिंबू गडकर्‍यांना लाभत नाही असा एक निश्कर्ष काढून मंडळी मोकळी झाली

खान पान चालू असतानाच किर्तीने एक प्रश्न विचारला. प्रश्न होता की fonts download कसे करायचे? का कोण जाणे पण या प्रश्नानंतर सगळे गडकरी एकदम गप्पच झाले. कोणीच काहीच बोलायला तयार होईना. किर्तीने परत तोच प्रश्न विचारून बघितला. सगळे जण आपले खाण्या पिण्यात दंग. हा वृतांत वाचणार्‍या मंडळींनीच याचे उत्तर शोधावे.
(वि. सू उत्तर शोधणार्‍यास काहीही मिळणार नाही

अशा तर्‍हेने बर्‍याच गपा झाल्यानंतर किर्ती परत गेली, आणि इतर गडकर्‍यांना आज बुधवार असल्याची अचानक आठवण झाली. त्यामुळे श्र आणि सखीप्रिया ला कटवण्याची तयारी सुरू झाली. याचा अंदाज आल्यामुळे कदाचीत, सखीप्रिया घरी गेली. मुख्य प्रश्न होता श्र चा. शेवटी श्र ला कोणाचा तरी फोन आल्यामुळे ती पण गेली. कूल ला लोणावळ्याला पोचायचे असल्यामुळे, तो पण लोकल ची वेळ झाल्यावर निघून गेला आणि मग उरलेले गडकरी त्यांचा GTG नंतरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी निघून गेले.

जाता जाता श्र ने पुढच्या GTG चे आमंत्रण दिले. फक्त त्यासाठी गडकर्‍यांना बंगळूर येथी जायचे आहे. तेंव्हा आत्तापासूनच त्याची तयारी करायला लागावे :-)
खुषखबर!! खुषखबर!! खुषखबर!!

बुधवार व्रत संस्थेचे संस्थापक आणि पट्टीचे बुधवारकर अरुण यांनी बुधवारच्या वृत्तांतांसाठी रंगीबेरंगी मधली त्यांची जागा उपलब्ध करून दिली आहे. याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे.

आता बुधवारचे वृत्तांत वाहून जायची भीती नको; केव्हाही वाचा. :-)
--------------------------------------
बुधवारचं ठिकाण ठरलं आणि ' तुझ्या माझ्या बुधवाराला आणखी काय हवं? ' म्हणत बुधवारकर उत्साहाने गोळा झाले.

' ढग जातील, ढग येतील ' पण आज बुडालेला बुधवार पुन्हा येणार नाही
याची त्यांना पुरेपूर कल्पना असल्यानेच त्यांनी पाऊस कोसळत असतानाही जमण्याचे निश्चित केलं.

या लोकांशी संपर्क साधणे हे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. बुधवारकर पब्लिकच्या फोन्सवर सुद्धा ह्या बुधवारचे अनिष्ट परिणाम दिसून येऊ लागले आहेत. बुधवारी संध्याकाळी सेलफोन आणि त्याचा owner एकाच अंतरिक्षात भ्रमण करत असतात त्यामुळे माझ्यासारख्या
वृत्तांतलेखिकेला कॉल करून माहिती घेण्यासाठी एखाद्या बॅंकेच्या tele marketing executives च्या ठायीच दिसून येणारी चिकाटी ठेवावी लागते.

... काल माझा फोन त्यांना (एकदाचा) पोचला तेव्हा बुधवार सुरु होऊन बराच वेळ होऊन गेला होता.

गंधार आणि दीपसाठी हा (त्यांच्या घरच्यांच्या सक्त आदेशानुसार) शेवटचा बुधवार असल्याने बुधवारवर जणू दु : खाची छाया होती.

त्यातच ' जले पे नमक ' म्हणून अरुणने " तुम्हास वगळता, कधी न होतील (लौकर) ग्लास रिकामे " अशा ओळी गुणगुणायला सुरुवात केली. त्यावर गंधारने त्याच्याकडे रागोवच्या सिनेमातल्या भुतांपेक्षाही जास्त खुनशी नजरेने पाहिले.

खोडलीकर मनापासून बुधवार enjoy करत होते. " हा म्हणजे क्रोसिन आणि coldact पेक्षाही खात्रीशीर उपाय आहे बघा. " त्यांनी उत्साहाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वविच्या सकाळी डोळे फ़िरवणारे
हेच ते खोडलीकर यावर कोणाचाही विश्वास बसला नसता.
" पण का कोण जाणे आज काहीच घशाखाली उतरत नाहीये त्यामुळे काही चढत नाहीये. " असे खेदाने त्यांनी नमूद केले. एवढी चढ उतर त्यांच्या प्रकृतीला झेपणार नाही हे आम्ही त्यांच्या नम्रपणे निदर्शनास आणून दिल्यावर दीपने " बाकीच्यांनाही आता सन्मि मोड लावायची नितांत आवश्यकता आहे. " अशी गर्जना केली. " याला आजकाल नॉर्मल आवाजात नाहीच बोलता येत का? " असे फ गंधारला म्हणाला खरा पण त्याचा आवाज दीपच्या गर्जनेत कुणालाच ऐकू गेला नाही.

गिरीराजने
" समोर वारुणी
शेजारच्या टेबलवर तरुणी
हातात आला
बेगॉनचा प्याला "

अशी पुन्हा एक (काहीच्या काही) कविता सुरु केली होती. त्यावर फने
" एकच प्याला समोर आणि ह्याची कविताही भंगार " असे उत्तर देऊन त्याला वेळीच आवरले.
आज सगळ्यांना कवितेचाच मूड होता. अथकने हा त्याचा (या वर्षातला) शेवटचा बुधवार असल्याचे जाहीर केले आणि रुद्ध कंठाने आपली कविता म्हटली.
" गेलो जरी कुवैतला तरी बुधवार विसरणार नाही जरा
माझी आठवण काढत तुम्ही फ़क्त बुधवार करा. "

त्यांची ही अवस्था पाहून जपानला गेलेल्या कांद्याचेही असेच झाले असेल हे जाणवून बुधवारकरांचे डोळे पाणावले.

अखेर
" पुन्हा वेटरलाच सांगायचे
कुणाला किती ग्लास मांडायचे "

असे म्हणत बुधवारची सांगता झाली.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner arun Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators