Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
rar
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » rar « Previous Next »

kahI idvasaaMpUvaI- puzzles ba_la ilahayalaa GaotlaM tovha zrvalaM hÜtM kI jao jao AaiNa jasaM jasaM saucatya tsaM tsaM ilahIt jaayacaM. tukDo eka puZo ek jaÜDt jaayacao AaiNa yaa tukDyaatUna kÜNatM ica~ inamaa-Na hÜtMya ka to pahayacaM Æ

vaastivak pahta ha yaa puzzle write up caa XaovaTcaa Baaga. pNa yaalaa last piece mhNaNyaacaM maI AavajaU-na TaLtIyao karNa...

jasaM jasaM maI ilahIt gaolao tsaM jaaNavat gaolaM kI ' naa ho puzzle kQaI pUNa- hÜNaar AahoÊ naa to kQaI kÜNa%yaa caÝkTIt basaNaar Aaho ' ... karNa (a puzzle cao sagaLo pieces maaJyaajavaL Aahot trI kuzoÆ

kdaicat AayauYyaBar maI ho pieces XaÜQat rahInaÊ %yaaMnaa jaÜDt rahIna... (a process maQalaM challenge svaIkart rahIna AaiNa %yaatlaa AanaMd ]pBaÜgat rahIna
....kahI gaÜYTIMnaa caÝkT XaÜBaUna idsat naahI AaiNa maanavathI naahI...%yaaMnaI mau>ca rahavaM AaiNa mau>ca jagaavaM hoca KrM ²

ekda ka ho AsaM pieces XaÜQaNyaacaM AaiNa jaÜDNyaacaM vyasana laagalaM kI %yaa naXaot tumhI svaPnahI pahayalaa laagata....
... maaJaMhI ek lahanasaM kdaicat KUp pÜrkT vaaTola AsaM svaPna Aaho.
pihlyaa pgaaratUna ' jagaatlaM savaa-t maÜ{M ' puzzle GyaayacaM ... 18Ê 000 pieces caM ²
:-)
XauËvaarI saMQyaakaLI ek ]<ama kaya-Ëma eoklaaÊ navho AnauBavalaa²
Da^. ArivaMd qa<ao yaaMcao solo hamaÜ-inayama vaadna²
idvasaBaracaI kamaM Aava$naÊ sagaL\yaaMnaI ek~ yao]na pittsburgh hUna inaGaayalaa saMQyaakaLcao 6.00 vaajalao. %yaapuZo 178 miles caa p`vaasaÊ traffic jam, construction AaiNa yahoo maps cyaa gaMDlaolyaa directions ... cleveland laa maohtaMcyaa GarI pÜcaopya-Mt kaya-Ëma caalaU Jaalaa hÜta. pNa daratca Da^. ArivaMd qa<ao vaajavat Asalaolyaa dugaa- ragaacao svar kanaavar pDlao AaiNa sagaL\yaa p`vaasaacaa ivasar pDlaa.

kaya takd Aaho %yaaMcyaa vaajavaNyaat² AaiNa DÜLo imaTUna samaaQaI laagalyaasaarKo hamaÜ-inayama vaajavaayalaa basatat²

Aa<aapya-Mt Anaok hamaÜ-inayama vaadk maI eoklao Aahot. poTI ho generally ‘saaqa krNyaasaazI ' vaaprtat Asaa maaJaa Anaok vaYa- samaja hÜta. pNa kahI vaYaa-MpUvaI- ArivaMd qa<ao yaaMcao poTIvaadna eoklyaapasaUna maaJaa tÜ gaOrsamaja pUNa-pNao dUr Jaalaa.

Da^. ArivaMd qa<ao yaaMcyaa hamaÜ-inayama caa ’gaLa gaÜD Aaho ‘ yaa eka vaa@yaaiXavaaya %yaacao vaNa-na krayalaa maaJyaakDo Krca Xabd naahIt.

prvaacyaa kaya-Ëmaat %yaaMnaI raga puiryaa klyaaNaÊ raga dugaa-Ê raga kÝiXak rMjanaI AaiNa naMtr raga kaÔI maQalaa ek TPpa vaajavalaa.
maaJyaa maaihtIp`maaNao raga kÝiXak rMjanaI ha maULat hamaÜ-inayama var vaajavaNyaat yaoNaara raga naahIyao ³kÜNaa jaaNakaralaa (a ba_la jaast AaiNa yaÜgya maahItI Asaola tr please saaMgaavaI ²´ tÜ saMtUrvar vaajavaNyaat yaotÜ AaiNa mhNaunaca tÜ hmaÜ-inayama var vaajavaayalaa KUp kzINa Asaavaa.

kaÔI ragaatlaa tÜ TPpa maI maailanaI rajaUrkraMcyaa Aavajaat eoklaa Aaho.
AaiNa qa<yaaMcao hamaÜ-inayama eoktanaa AapNa ha TPpa kÜNaacyaatrI ’Aavaajaat‘ eokt AahÜt AsaMca vaaTt hÜtM²

saaqaIlaa tbalyaavar hÜta hYa-d kanaoTkr. kaya-Ëmaacyaa ]<araQaa-t %yaanao solo tbalaa vaajavalaa. %yaat %yaanao AllaarKasaahobaaMcyaaÊ itr#KasaahobaaMcyaa kahI compositions vaajavalyaa AaiNa naMtr ' laala iklaa ' jyaat tIna vaogavaogaLo tempos vaap$na nagaaáyaacaa effect AaNatat.

kaya-Ëma KUp Cana Jaalaa pNa 2nd half maQao solo tbalaa Asalyaanao ’BaOrvaI ‘ kahI JaalaI naahI AaiNa %yaamauLo kuzotrI ek AQa-vaTÊ ApUNa- AsalyaacaM feeling AalaM...

maI Da^ ArivaMd qa<yaaMcaa live programm eoklaa hÜta 1997-98 cyaa saumaarasa. %yaanaMtr cassettes AaiNa CD var ²
pNa KrM saaMgato (a klaakaraMnaa live vaajavatanaa ikMvaa gaatanaa eokNyaat AaiNa %yaaMcaI tI samaaiQast Avasqaa pahNyaat ek mahana AnauBava AsatÜ.
ekUNacaÊ sauraMcyaa rajyaatlaa ha p`vaasa KUp vaogaLaca Aaho...
Asaa 200 miles caa prtIcaa p`vaasa k$na tÜ saMpNyaasaarKa naahI AaiNa saMpthI naahI ²
:-)
ÉKÉK...
--------------------------
rivavaarcaa NFL playoff maQalaa Pittsburgh Steelers vs Cincinnati Bengals caa game!
ekaca division maQao AsalyaanaoÊ iXavaaya yaa season maQao KoLlyaa gaolaolyaa 2 games caa result 1-1 Asaa Asalyaanao AaiNa mau#yat : playoff game mhNajao 'do or die' situaton Asalyaanao ekUNaca game KUp phaysical AaiNa emotional level var KoLlaa jaaNaar yaacaI klpnaa hÜtIca.

Steelers naI game ijaMklyaanaM maI Aqaa-tca KUYa ...
.... pNa trIhI kala eka ima~anaM ' kaya maga steelers ijaMklao naaÆ game enjoy kolaasa kaÆ ' AsaM ivacaarlyaavar pTkna maaJaM ]<ar ' naahI ' AsaM hÜtM... karNa Cincinnati-Bengals cyaa Carson Palmer caI injury ²

Bengals caa gaolyaa 15 vaYaa-tlaa pihlaa playoff game . ekUNaca team saazI AaiNa %yaathI eka quarterback saazI hI KUp mah%vaacaI gaÜYT.. kalacyaa game maQalaa Bengals caa pihlaaca play ... Carson Palmer caa pihlaaca pass (and that was an amazing pass! 66 yards...)
AaiNa Steelers cyaa defensive lineman Kimo von Oelhoffen caI tackle krtanaa basalaolaI QaDk.
Xyaa² baGatanaaca jaaNavalaM kI hI kahI saaQaI injury nasaNaar² Carson Palmer naMtrcaa game Aqaa-tca KoLUca Xaklaa naahI... hopefully ligament surgery naMtr puZcyaa season pasaUna KoLu XakolaÊ pNa AjaUnahI sagaLM AinaXcaItca ²

Football ha physical game AahoÊ AXyaa p`karcyaa injuries hÜNaar yaacaI klpnaa AsatoÊ (a KoLaDuMcyaa contracts maQao insurance vagaOrocaI yaÜgya tI ikMmat maÜjalaolaI Asato ho iktIhI KrM AsalaM trI eka KoLaDUcyaa KoLacaI ikMvaa %yaanao Aatapya-Mt KoLasaazI Gaotlaolyaa kYTaMcaI ikMvaa %yaanao as a player mhNaUna baiGatlaolyaa svaPnaaMcaI ikMmat kQaIca krta yaoNaar naahI²

NFL maQao ek quarterback mhNaUna KoLNaM ho kahI kÜNaa saaQyaa maaNasaacaM kama naahI. kala Carson Palmer field var pDlaolaa paihlyaavar maaJyaahI nakLt maI manaatlyaa manaat ca@k dovaajavaL p`aqa-naa kolaI "please! tÜ ek caaMgalaa KoLaDU Aaho. (a injury payaI %yaacaM career saMpU nayao " ...

yaÜgaayaÜgaanaM %yaanaMtr lagaocaca Boston University caa ice hocky player Travis Roy caI maulaaKt paihlaI.
vayaacyaa 2­áyaa vaYaI- %yaanao payaat skates GaalaUna ice rink var pa]la zovalao hÜto AaiNa samajaayalaa laagalyaapasaUna ekca svaPna paihlaM hÜtM.. Division I college hocky KoLayacaM.
vayaacyaa 20 vyaa vaYaI- Travis Roy (# 24) caM ho svaPna pUNa- JaalaM ...Ô> 11 saokMdakrta²²
Boston University kDUna KoLNyaasaazI tÜ hocky field var ]trlaa AaiNa AvaGyaa 11 saokMdanaI Jaalaolyaa spinal cord injury naI %yaalaa AayauYyaBarasaazI quadriplegic banavalaM. %yaanaM ija_ saÜDlaI naahIyao..pNa trIhI AapNa Aata prt kQaIhI hocky field var ]t$na KoLU XakNaar naahI ho injury naMtr Aaja 10 - 11 vaYaa-naI pNa svat : laa samajaavaNaM %yaalaa AvaGaD jaatya²

hI AXaI laÜkM paihlaI kI jaaNavatM ' cyaayalaa... iktI hI KoLaba_lacaI passion' ² ... AaiNa maga ' Aaplyaalaa sports AavaDtatÊ KoLaba_la passion Aaho ' AsaM mhNatanaa pNa AapNa KUp lahana Aahot AsaM vaaTayalaa laagatM²
Don't take the game away from us...
---------------------------------
" Come on man! That was an interception...Please, don't take the game away from us...come on..he had the ball long enough...what the XXXX!!!! "

Steelers आणि Colts च्या playoff game ची ५.३० मिनीटे बाकी असताना मी frustrate होउन ओरडत होते. Game Steelers च्या हातात होता. खूप दिवसांनी Steelers चा flawless game पाहायला मिळाला होता.
आणि शेवटची ५.३० मिनिटे उरलेली असताना हे नाटक (नव्हे एका नाट्याची सुरुवात!)

Colts च्या Manning ने केलेला pass Steelers च्या Troy Polamalu नी diving करून intercept केला. Then he tumbled with the ball in his hands आणि नंतर उठून तो पळायला लागला. हे करताना he fumbled the ball but then recovered it .....
अर्थातच Colts चा coach Tony Dungy ने red flag टाकून challenge केले आणि play review केल्यानंतर NFL referee ने चक्क 'it was not an interception' असा निर्णय दिला.
It was a bad decision ! आणि त्यामुळे game चे results बदलू शकतील अशी situation

आणि मग नंतरच्या ५ मिनीटात काय घडले नाही?
Colts नी touch down मारणं, they went for a successful 2 point conversion ! Steelers 21 - Colts 18 score असताना Manning was sacked at IND 2 for 10 yards ... wow, Steelers defense played really well! आता Steelers touch down मारणार अशी situation असताना Steelers च्या Bettis कडून झालेलं fumble, क्षणात colts चा touchdown होणार असं वाटेपर्यंत Steelers च्या quarterback Ben Rothlesburgher नं केलेलं amazing tackle ! आणि त्याहीनंतर colts च्या Vanderjagt कडुन ४६ yard field goal miss होउन finally Steelers जिंकणं!

श्या! प्रचंड tension
पण मुळात ही इतकी नाट्यमय situation निर्माण झाली ती refree च्या ' चुकीच्या ' निर्णयामुळे!

सगळ्या post game shows मधे refree च्या निर्णयावर टीका झाली.

Game नंतर Pittsburgh चा defensive linebacker Joey Porter ने चक्क ही गोष्ट media समोर बोलून दाखवली...

"I know they wanted Indy to win this game; the whole world loves Peyton Manning. But come on, man, don't take the game away from us like that."

या विधानाबद्दल कदाचित त्याला शिक्षा होईल... पण what he said was not wrong!

काल NFL च्या vice president Mike Pereira यांनी 'refree ने चुकीचा निर्णय दिला ' हे जाहीर केले.
Steelers game जिंकले हे कितीही खरं असलं तरी एका चुकीच्या निर्णयामुळे game चा results बदलू शकला असता. आणि यापुर्वी असं घडलयं....
तीन वर्षापुर्वी New york Giants vs San Francisco playoff game मधे San Francisco च्या विरुद्ध pass interference ची penalty दिली नव्हती. जर योग्य निर्णय दिला असता तर Giants ला fiels goal मारायची अजून एक संधी मिळून ते game जिंकले असते. ह्या game मधे Giants 39-38 असे हरले होते!

खरं सांगायचं तर Steelers Colts ला हरवतील असं कोणालाही वाटलं नव्ह्तं. Media नी सुद्धा colts आणि Manning ला उचलून धरलं होतं. एका 6th position team कडुन एक home game advantage असलेली 1st position team हरू शकते हे NFL नी आतापर्यंत कधी पाहिलच नव्हतं!
पण Steelers did it ! :-)

या season चा 28 th Nov च्या monday night game मधे Steelers नी Colts कडून दणकून मार खाल्ला होता. आणि त्यावेळच्या Steelers च्या हरण्यामागे असलेलं मुख्य कारण म्हणजे false start penalties आणि somehow ते Manning ला sac करू शकले नव्हते!

Indianapolis च्या close dome मधे हजारो प्रेक्षकांच्या आवाजात खेळणं त्या वेळी Steelers ना झेपलंच नव्ह्तं. This is what is called as home game advantage!
पण कालच्या game साठी Steelers नी recorded आवाजात, प्रेक्षकांच्या गोंगाटात खेळायची चक्क practice केली होती and it worked ! Not a single false start penalty against steelers in yesterdays game !

( ह्या false start वरून आठवलं. कालच्या game मधे एका play च्या वेळेस Colts ची संपूर्ण defense line हलली, Steelers ला false start penalty दिली नाही, आणि गंमत म्हणजे Colts ला पण penalty दिली नाही. मग नक्की झालं काय? ground var refree नी yellow flag टाकल्यावर कोणत्यातरी एका team ला false start penalty मिळायला नको का? तिथे sideline ला Steelers चा coach Bill Cowher refree शी वाद घालत होता. पण नियमाप्रमाणे false start चा call review करता येत नाही आणि challenge पण करता येत नाही, त्यामुळे कालच्या game मधे कोणत्याही team ला false start ची penalty न बसता false start चा call केला गेला. I am sure लवकरच कुठेतरी या call बद्दल पण वाचायला मिळेल! )

कालच्या game मधे Manning 5 वेळा sac झाला. पण ह्याचं श्रेय Chargers ला द्यायला हवं. Colts undefeted असताना Charges नी पहिल्यांदा Colts ला हरवलं आणि Manning ला sac करता येउ शकतं हे इतर teams ना दाखवून दिलं!

माझ्यासाठी ह्या Superbowl मधली emotional involvement परवा संपली. Big Ben च्या injury पायी steelers काही games हरले, 'wild card entry, all road games' म्हणून media नी comments केल्या... ऐकताना, वाचताना खूप वाईट वाटायचं! I am really happy की Steelers नी Bengals ला आणि काल Colts ला हरवले

आता यापुढे ' कोणताही पूर्वग्रह ' वगैरे नसलेल्या Denver Broncos शी game आहे... no emotional factor is involved for the players also !

So its like new begining ... जो चांगला खेळेल तो जिंकेल

आता माझी फ़क्त एक छोटीशी इcछा आहे... ती म्हणजे Steelers नी शेवटपर्यनंत give up न करता लढत राहावं


The Lords of the Ring...
---------------------------------------
३० एप्रिलला graduation समारंभासाठी Pittsburgh ला आले. मनात अनंत विचार! Pittsburgh मधल्या प्रत्येक दिवसाबद्दल मी काही ना काही लिहू शकेन इतक्या आठवणी!

'माझं' Pittsburgh जसं पूर्वी होतं अगदी तसंच सामोर आलं... एखाद्या 'Open Book' सारखं!
पण Pittsburgh International Airport वर उतरल्यावरच एक बदल जाणवला... तो म्हणजे airport वरचा Steelers च्या Franco Harris चा Immaculate Reception चा life size पुतळा. डोळे विस्फ़ारून मी त्या पुतळ्यासमोर उभी होते.

Franco Harris...Immaculate interception...Steelers चा 1972 चा Oakland Raiders विरुध्धचा playoff game . खेळ संपायला २२ सेकंद उरलेली असताना, Steelers 7-6 ह्या score ने हरत असताना, Steelers च्या Terry Bradshaw चा deflect झालेला pass ground ला hit व्ह्यायच्या just आधी घेणारा आणि Steelers ला जिंकून देणारा Franco Harris!

Pittsburgh Steelers....superbowl...Steelers नी जिंकावं हे स्वप्न...
मनात flashback चालू झाला..

सहा वर्षापुर्वी University of Pittsburgh ची admission accept केल्यावर माझ्या एका मित्राची मला e-mail आली
"Welcome to the land of Steelers, Penguins and Pirates!"

खरं सांगायचं तर भारतात असताना, किंबहुना Pittsburgh ला येईपर्यंत हे Steelers, Penguins and Pirates प्रकरण काय आहे, हे मला माहीत नव्ह्तं.
E-mail मधे Steelers, Penguins and Pirates वाचल्यावर 'म्हणजे आपण नक्की कुठे चाललोय?' अशी मनात क्षणभर
भीती पण वाटून गेली होती. पण थोड्याच महिन्यात ह्या सगळ्यांशी ओळख झाली (काश! Pittsburgh ची basketball team पण असती!!)

मित्रांबरोबर आधी TV च्या screen कडे नुसतं पाहात, मग 'fumble म्हणजे काय?, touchdown म्हणजे काय? इथपासून हे सगळे players field वर असे मारामारी का करतात? इथपर्यंत असंख्य प्रश्ण विचारणारी मी radio वर football ऐकण्यापासून ते conference ला गेले की ESPN zone शोधून football बघणार्‍या school मधल्या अमेरिकन मित्रांइतकी Football प्रेमी कधी होउन गेले ते मलाही समजलं नाही.
माझ्यामधे इतक्या 'परक्या' खेळासाठी passion, interest निर्माण करण्याचं सगळ श्रेय जातं ते Steelers ना आणि माझ्या stupid प्रश्णांना न वैतागता, न कंटाळता उत्तरं देणार्‍या माझ्या मित्रमंडळींना.

28 November, 2006. माझा PhD Defense!
Open defense seminar ची शेवटची slide ... अर्थातच Pittsburgh slide with Steelers, Pirates अणि Penguins चे logos ....
Ph.D.defense नंतर रात्री एकीकडे champaign आणी beer च्या बाटल्या फ़ोडल्या जात असतानाही मी त्या सगळ्या celebration पासून थोडीशी दूर होते. कारण त्या रात्री असलेला Steelers-Colts चा monday night football, Steelers हरत होते.

24 December 2005! रात्री १२ वाजता Mount washington वर Pittsburgh ला पाणावलेल्या डोळ्यात साठवून घेत असताना church bells ऐकल्या आणि मी Pittsburgh सोडलं...
सगळ्या मित्र- मैत्रीणींना 'Steelers superbowl ला गेले तर मी Pittsburgh ला येईन!' असं सांगून pittsburgh सोडलं.

आणि यावर्षी Steelers superbowl ला गेले. ५ वर्ष मी जे स्वप्न बघत होते, ते finally खरं ठरत होतं.
खूप इच्छा असूनही, शक्य असूनही मी Pittsburgh ला आले नाही. मित्रमैत्रीणींना दिलेलं promise चक्क मोडलं लई शिव्या पण खाल्ल्या त्याबद्दल. पण मनात एक विचार होता की कदाचित superbowl जिंकण्यासाठी Steelers माझ्या pittsburgh सोडुन जाण्याची वाट पाहात असावेत!

आणि 5 Feb,2006! Detroit... Steelers superbowl जिंकले!

Steelers superbowl जिंकल्यावर (आणि जिंकले तरच!) गाडीला steelers ची number plate लावायचा हट्ट पूर्ण झाला. घरात भिंतीवर Steelers चा terrible towel आणि Steeler defense चे poster झळकायला लागलं.

...विचार करत करत मी university area मधे कधी आले समजलंच नाही.

मी इतकं Steelers बद्दल का आणि कसं बोलतीये? असं वाटत असेल ना तुम्हाला कदाचित? खूपदा मलाही आश्चर्य वाटतं.
तसं पाहायला गेलं तर कुठलं Pittsburgh, कोण Steelers .. मग तरीही इतकी आपुलकी, इतकी ओढ का?

उत्तर खूप सोपं आहे.
अमेरिकेत येइपर्यंत 'football' हा फ़क्त पायानेच खेळायचा खेळ असतो, ह्यापेक्षा ह्या खेळाबद्दल काहीही जास्त माहिती नसणार्‍या माझ्यासारख्यांच्या मनात ह्या 'परकीय' खेळाविषयी इतकी passion निर्माण होउ शकली ते केवळ माझ्या शहराची Pittsburgh ची home team- हे Steelers होते म्हणूनच.
Steelers नसते तर कदाचित थंडीतल्या गारठलेल्या काही उदासवाण्या रविवार संध्याकाळी मी केवळ घराची आठवण येउन रडत घालवल्या असत्या.
कदाचित school मधली tensions , 16-18 तास काम करूनही experiment fail गेल्यानंतर आलेलं नैराश्य आणि आणि एकट वाटूनं आलेल्या उदासीनं मी काही वेळा खचून गेले असते.
कदाचित माझ्या school मधल्या, lab मधल्या अमेरिकन, जर्मन, जॅपनीज professors आणि मित्र-मैत्रीणींशी मी सचिन तेंडूलकर, अक्रम आणि Steve Waugh बद्दल भरभरून बोलू शकले नसते.

आणि Steelers नसते तर कदाचित माझ्यासाठी अजूनही 'football' हा एक पायानी खेळायचा खेळच राहिला असता!
:-)
विनय देसाईंच्या 'परदेसाई' च्या निमित्ताने तुमच्यापैकी अनेकांची 'भारद्वाज प्रकाशनाशी' ओळख झालेली आहेच. 'परदेसाई' हे वास्तविक माझ्या 'घरचं कार्य'... पण त्यावेळी मी स्वत्:च माझ्या Ph.D thesis लिखाणात मग्न असल्यामुळे, खूप इच्छा असूनही मी 'परदेसाई' ह्या एका चांगल्या पुस्तकाच्या कामात फ़ारशी मदत करू शकले नाही याची खंत मनात आजही कुठेतरी आहेच.
लोकांना चांगलं आणि नवीन काहीतरी वाचायला देण्यासाठी चाललेली आई-बाबांची धडपड आणि याही वयातला त्यांचा उत्साह पाहून, 'प्रकाशनासाठी आपणही काहीतरी काम करायला सुरुवात करावी' हा गेली काही वर्ष मनात असलेला विचार जास्तच पक्का होत गेला.
भारद्वाज प्रकाशनाच्या कामात थोडाफ़ार हातभार लावण्याचा हा एक प्रयत्न..


हरवले ते...
--------------------
एखाद्या संध्याकाळी देवापुढे दिवा लावून नमस्कार करताना तुम्हाला कधीतरी नक्कीच तुमच्या भारतातल्या घरातलं देवघर आणि त्यात तेवणारी 'समई' किंवा 'लामणदिवा' आठवला असेल.
रोजच्या कामात मग्न असताना अचानक कधीतरी नक्कीच डोळ्यासमोर लहानपणी पाहिलेलं आपल्या आजोबांचं लिखाणाचं 'लाकडी डेस्क' आलं असेल.
बार्बीशी खेळण्यात मग्न झालेल्या आपल्या नातीकडे पाहताना आपल्या बालपणीच्या 'ठकी बाहुली' ची आठवण होऊन, आपल्या नातीलाच कौतुकानं "काय ग ठके?" अशी लाडिक हाक मारणारी आजी आपण पाहिली असेल.
एखादं ऐतिहासिक पुस्तक वाचताना किंवा गप्पांच्या ओघात मेणा,खडावा, कुंची,चवरी यासारखे अनेक शब्द आपल्या वाचनात आणि ऐकण्यात आले असतील.

पण वस्तुस्थिती अशी आहे की ह्या आणि अशा अनेक गोष्टी आज काळाच्या प्रवाहात वाहून गेल्या आहे तर अनेक हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

केवळ आपल्या आधीच्या पिढीच्याच नव्हे तर आपल्या पिढीच्याही जीवन पद्धतीचे पुरावे असणार्‍या, त्याबद्दल माहिती देणार्‍या ह्या गोष्टी पुस्तकरूपात का होईना पण जतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न भारद्वाज प्रकाशन करत आहे 'हरवले ते..' या पुस्तकाच्या रूपात!

'हरवले ते...' या पुस्तकात महाराष्ट्रात एकेकाळी सर्रास वापरात असलेल्या, पण आता 'दुर्मिळ' समजल्या जाणार्‍या किंबहुना अस्तंगत झालेल्या अधेली, कमंडलू पासून ते पडशी, रोवळी, शिंकाळे अशा वेगवेगळ्या १०१ गोष्टींची माहिती आणि चित्रांसकट ओळख करून देण्यात आली आहे. आणि ही माहिती अधिक रंजक झाली आहे ती लेखक डाॅ.म.वि.सोवनी यांनी केलेल्या त्या त्या काळातल्या म्हणी, वाक्प्रचार, शब्दरचना यांच्या समर्पक वापरामुळे.

'हरवले ते...' हे केवळ जुन्या वस्तूंचे वर्णन करणारे पुस्तक नाही, तर तो जुन्या संस्कृतीच्या पाउलखुणा जपणारा ऐतिहासिक दस्त-ऐवज जतन करणारा एक अमोल ठेवा आहे.

आपल्यासारखे रसिक आणि अभ्यासू वाचक 'हरवले ते...' शोधण्यात आणि जतन करण्यात नक्कीच हातभार लावतील असा विश्वास आहे!



हरवले ते...
लेखक- डाॅ.म.वि.सोवनी
भारद्वाज प्रकाशन, पुणे ( bharadwaj_prakashan@yahoo.com )
किंमत- $5 + shipping and handling

लेखकाचा परिचय-
डाॅ. म. वि. सोवनी
पुणे विद्यापीठातून बी.ए.(इतिहास), एम.ए. (आर्किओलोजी).
'मराठा कालखंडातील महाराष्ट्राचे अलंकार' या विषयावर शोधप्रबंध लिहून Ph.D.
The World Was Flat...


शाळेत असताना भूगोलाच्या तासाला नकाशाच्या त्या मोठया सुरनळ्या काखेत टाकून शिक्षक वर्गात शिरले की खूप आनंद व्ह्यायचा.
भूगोलाचे शिक्षक फ़ार काही उत्तम शिकवणारे होते असं काही नाही. कारण तसाही भूगोलाचा अभ्यास म्हणजे 'गाईड वाचणे'. त्यामुळे शाळेत शिक्षकांनी भूगोल 'शिकवल्याचे' वगैरे काही आठवतही नाहीये.
पण तरीही ह्या तासाला आनंद अशासाठी व्हायचा की 'चला आता सरांचे किंवा बाईंचे बोलणे ऐकता ऐकता (!) एकीकडे नकाशावर वेगवेगळी ठिकाणं शोधता येतील'!
शाळेतले भूगोलाचे तास सुसह्य झालेत ते केवळ ह्या नकाशांमुळे. आणि अर्थातच शोधायची ठिकाणं ही एकतर सिनेमात असलेली गावं-शहर असायची, किंवा cricket आणि tennis किंवा olympics मधे भाग घेणार्‍या देशांशी निगडीत असायची....

हे सगळं नव्यानं आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी जोडलेलं हे World globe चं puzzle ! (सरडयाची धाव कुंपणापर्यंत तस माझं लिखाणही ह्या puzzles भोवतीच!)

शाळेत कधीकाळी परिक्षेसाठी घोकलेल्या "देश-राजधानी' च्या जोड्या हे puzzle सोडवताना कामाला आल्या. World Cup Soccer च्या निमित्तानं दर चार वर्षांनी केलेली युरोपियन, अफ़्रिकन देशांची उजळणी मदतीला आली.
रशियन राज्यक्रांती, युरोपातल्या चळवळी, सगळीकडे पसरलेल्या डच आणि फ़्रेंच लोकांच्या वसाहती पासून ते oil interest मुळे सतत युद्धाच्या छायेत असलेले इराण इराक...
जगाच्या नकाशावर नखाइतके लहान असणारे पण खेळात नावाजलेले युरोपातले अनेक देश....

खूप काय काय लिहावस वाटतय, विचार प्रचंड वेगानं धावताहेत की त्यात म्हणावी तशी सुसंगती येत नाहीये.... हा writeup लिहीत असताना मी सहज गंमत म्हणून हा पृथ्वीचा गोल हातात घेतला आणि...
त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आला 'The Great Dictator' मधला जगाचा नकाशा असलेला फ़ुगा हातावर खेळवणारा चार्ली चॅपलीन.
चॅपलीन च्या हातातला तो फ़ुगा फ़ुटलेला पाहिल्यानंतर केवळ एकच वाक्य मी लिहू शकले. ते म्हणजे...

हे puzzle सोडवताना मी सुरुवात केली ती शाळेतल्या भूगोलाच्या तासापासून...त्या अंधार्‍या वर्गापासून,पण puzzle पूर्ण होइपर्यंत अक्षरश : सगळं जग फ़िरून आले!
RAR की नजरसे....
-------------------------------------
"1:1.6 is the ratio of a film frame. When one begins to work for films, this ratio gets fixed in his eyes and he cannot help viewing what happens around him through this frame. Even one begins to draw ideas for movies from personal tragedies instead of getting affected by them; in short, cinema becomes more important than life.

सुश्मीताला आपल्या 'dream' चित्रपटाच्या निर्मीतीबद्दल सांगताना 'M' हरवून जातो. दूरवर रोखलेल्या त्याच्या नजरेत एका चित्रपटाच्या निर्मितीचं स्वप्न, तो ध्यास आपल्यालाही दिसायला लागतो, जाणवायला लागतो. मळ्याळम, तामीळ सिनेमासृष्टीमधले एक उत्कृष्ट cinematographer म्हणून ओळखले जाणार्‍या मधू आंबट यांनी दिग्दर्शीत केलेल्या 1:1.6- an ode to lost love' सिनेमातल्या ह्या सीनमधे अतुल कुलकर्णी बोलायला लागल्यावर माझ्यापण मनात कुठेतरी अशाच विचारांची "रिळं" फ़िरायला लागली.

खरय! सध्यातरी सिनेमाशी केवळ 'एक प्रेक्षक' इतकचं नातं असलेली मीसुद्धा अनेकदा ह्या 1:1.6 frame मधूनच आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी बघत असते, बहुतेक वेळा माझ्याही नकळतच!

सिनेमा बघताना एकूणच समोर पडद्यावर दिसणार्‍या सगळ्या गोष्टी, मग ती भितीवरची frame असो, कुठेतरी screen च्या कोपर्‍यात असणारा extra तला माणूस असो किंवा screen वर प्रत्यक्ष न दिसणारं पण तरीही 'असणारं' background music असो.....
थोडक्यात मी सिनेमा कधीपासून "बघायला" लागले मलाही आठवत नाही. पण ह्या सिनेमानीच किंवा ह्या सिनेमावरच्या प्रेमानी डोळ्यावरची 'झापड' उतरवायला थोड्याफ़ार प्रमाणात का होइना नक्कीच मदत केलीये असं मला वाटत.

अशोक राणे, शिरीष कणेकर, भाउ पाध्ये किंवा सुभाष समेळ यांच्यासारखं चित्रपटाचं परिक्षण लिहीणं किंवा गाणी आणि चित्रपटांवर लेख लिहीण्याची माझी पात्रता नाही आणि माझा तितका अभ्यासही नाही. पण सिनेमा पाहायला, सिनेमाबद्दल गाण्यांबद्दल ऐकायला, बोलायला मला मनापासून आवडतं.

Ph.D. करत असताना मी जेव्हा सिनेमाबद्दल, गाण्याबद्दल बोलायचे तेव्हा अनेक जण "तू नक्की कोणत्या विषयात Ph.D करतीहेस?" असं विचारायचे. त्यातल्या फ़ार कमी जणांना "मी सिनेमे पाहते, गाणी ऐकते म्हणूनच Ph.D करू शकतीये" हे उत्तर समजलं असेल. थोडक्यात...माझं सिनेमावर प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे... आणि केवळ ह्या प्रेमापोटीच मी ह्या विषयावर 'काहीतरी' लिहायचं धाडस करणार आहे.

हे लिखाण नक्की कोणाबद्दल असेल? मी किती नियमानं लिहीन?
या क्षणी खरं तर मलाही माहित नाहीये.
कदाचित ह्यात 'पथेर पांचाली' किंवा 'प्यासा' असेल. कदाचित 'सरकार' किंवा 'फ़ना' असेल.
एकही शब्द न बोलता बलराज साहनीकडे चिडून पाहताना नुसत्या नजरेतून बोलणारी 'सीमा'मधली नूतन असेल किंवा पंकीनगरमधल्या घरातल्या लहानश्या खोलीत बसून "लाखो मिलेंगे इन कमिजोंके, बोलिया लगेगी बोलीया, supermodel विम्मी की वो कमिजे जिन्हे पहनकर वो अपने future के dreams देखा करती थी" अशी अखंड बडबड करणारी राणी मुखर्जी असेल.
Inspector शेखर च्या रुपातला CID मधला देव आनंद असेल, किंवा राखीला 'कविता, सखी' आणि त्याचबरोबर ' Madam' किंवा 'मिसेस चक्रवर्ती' अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधणारा बेमिसाल मधला Dr. Sudhir Roy च्या रूपातला अमिताभ बच्चन असेल.
आशाताई, लतादीदी असतील किंवा सुनिधि चौहान किंवा bombay- जयश्री सुद्धा! कदाचित किशोर, रफ़ी असतील कदाचित सोनू निगम, शान, के के असतील.
रवी, सी. रामचंद्र असतील, RD असेल किंवा कदाचित अन्नू मलिक आणि हिमेश रेशमिया!

माझ्या चांगल्या-वाईट काळात साथ करणार्‍या, प्रत्यक्ष न भेटताही सतत आपल्याबरोबर असणार्‍या, ह्या आणि या क्षेत्राशी निगडीत असणार्‍या असंख्य लोकांचं मी एकप्रकारे 'देणं लागते' असं मला वाटतं. ह्या लोकांबद्दल, एकूणच सिनेमाबद्दल असलेलं प्रेम,आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा 'लहान तोंडी मोठा घास' घ्यायचा प्रयत्न करणार आहे.

हे वाचून कोणालातरी क्षणभर का होईना "अरे, आपल्यालापण कधीतरी असंच वाटलं होतं" इतकं जरी feeling आलं तरी...
'चित्रपटातला एखादा अप्रतिम किंवा 'जमलेला' scene पाहिल्याचं' किंवा 'खूप दिवस शोधत असलेलं एक आवडीचं गाणं मिळाल्याचं' समाधान मला मिळेल....
:-)
२६ जूनला सिनेमाबद्दल मोठ्या उत्साहानी लिहायला सुरुवात केली खरी, पण काही वैयक्तीक कारणांमुळे लिहायला जमले नाही. मधल्या काळात काही घटना अशा घडून गेल्या की चित्रपटाशी असलेली माझी मैत्री जास्तच वाढत गेली.
एकूणच (नव्यानं) जाणवायला लागलं की कितीही 'मैफ़िली' जमल्या असल्या तरी शेवटी तुम्ही एकटेच असता. आपली वाटणारी माणसं आज असतात-उद्या नसतात..... आयुष्यात तुमच्या बरोबर, तुमच्या साथीला शेवटपर्यंत काय असणार आहे तर 'तुम्ही, तुमच्या आवडीनिवडी आणि ज्यामुळे लोकं तुमची कायम चेष्टा करतात अशी तुमची व्यसनं!'
ह्या सगळ्या उलट्यासुलट्या विचारात,"आयुष्यातला अंधार थेटरमधल्या अंधारात मिसळून टाकावा" ह्या न्यायानं सिनेमाशी असलेलं नातं थोडं अधिकच घनिश्ट झाल्यासारखे वाटले.
खरं सांगायचं तर काही लिहायला किंबहुना काही विचार करायला लागणारी physical आणि मानसिक 'स्थिरता' या क्षणीही माझ्याजवळ नाही. पण आता वाटायला लागलंय की 'तशी स्थिरता' कदाचित कधीच मिळाली नाही तर?
म्हणून मग शेवटी लिहायचं ठरवलंच.....
-----------------------------------
खूप गोष्टी कराव्याश्या वाटतात, खूप गोष्टी करायच्या ठरवलेल्या असतात, पण काही ना काही कारणानं त्या घडून येत नाहीत... मागच्या वर्षी सोनू निगम आणि हिमेश रेशमियाच्या US दौर्‍याची जाहीरात पहिल्यांदा पाहिल्या पाहिल्या 'चुकवायचे नाही यार....' असं ठरवूनही 'चुकामुक' झालीच. खूप मनापासून इच्छा असूनही हे कार्यक्रम पाहता आले नाहीतच.
'खंत तरी कशाकशाची बाळगायची?' असं वाटायला लागलं असतानाच काही दिवसांपूर्वी अचानक ' MCC Annual international film festival' मधे श्याम बेनेगलांचे चित्रपट खुद्द श्याम बेनेगलांच्या उपस्थितीत पाहायची संधी मिळाली. तसं पाहिलं तर दाखवण्यात येणार्‍या चित्रपटांपैकी मंडी, सूरज का सातवा घोडा, झुबेदा मी आधी पाहिले होते. पण मला हे चित्रपट पाहण्याबरोबरच श्याम बेनेगलांच्या त्यावरच्या comments आणि अ-भारतीय लोकांच्या भारतीय चित्रपटाबद्दलची मतं ऐकण्यात प्रचंड उत्सुकता होती.
हे लिखाण श्याम बेनेगलांच्या काही चित्रपटांविषयी....
"मंडी"
---------
शहराच्या मध्यवर्ती भागातल्या एका वस्तीत असलेला एक कोठा. आजूबाजूला 'गृहस्थाश्रमी' लोकांचा वावर.
ह्या कोठयाची मालकीण रुक्मीणीबाई. तिच्याकडे लहानपणापासून वाढलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या पण एकाच व्यवसायानी आणि एका घराने (एका कोठयाने!) एकमेकींशी नातं जुळलेल्या वासंती, परवीना आणि सगळ्या वस्तीची जिच्यावर नजर आणि जीव आहे अशी 'झीनतजान' यांची ही कहाणी.
शहरातल्या 'so called' नीतीमूल्य जपणार्‍या काही प्रतिष्ठीतांच्या मागणीवरुन 'शहरातील घाण गावाबाहेर टाकण्याच्या उद्देशाने' हा कोठा शहराबाहेरच्या एक ओसाड माळरानावरच्या एका पडक्या जागेत हलवला जातो. योगायोगाने याच ओसाड जागेत असलेल्या पीरबाबाच्या थडग्याचाही जीर्णोद्धार होउन तिथे एक दर्गा बांधला जातो.
ह्या बांधकामावर काम करणारे मजुर,दर्ग़्याच्या आजुबाजूला माल विकणारे दुकानदार, त्यांचे गिर्‍हाईक असं करत करत ह्या कोठयावरही वर्दळ वाढायला लागते आणि रुक्मीणीबाईचा धंदा पूर्वीपेक्षाही अधिक जोमानं चालायला लागतो. हळूहळू गावाबाहेर 'टाकलेल्या' ह्या 'कोठ्याभोवती' एक नवीन गाव वसवलं जातं. पुन्हा एकदा हा कोठा एका नवीन गावाच्या मध्यवर्ती वस्तीतला एक भाग बनतो.... आणि business expansion चं एक model म्हणून, नवीन बांधकामाला, नवीन धंद्यांना वाव मिळावा म्हणून एका नवीन गावाच्या निर्मीतीसाठी परत एकदा हा कोठा गावाबाहेरच्या माळरानावर हलवण्याचा प्रस्ताव मांडला जातो... रुक्मीणीबाई परत एकदा 'बेघर' होत असतानाच माळरानावरच्या एका दगडात तिला देव आणि नवीन 'कोठ्याच्या' खुणा दिसतात..

मंडी चित्रपटाची ही 'मूळ concept ' एका सत्य घटनेशी निगडीत आहे.
अलाहाबादमधे जवाहरलाल नेहरूंचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या जागेच्या जवळच एक कोठा होता. १९२९ मधे जेव्हा जवाहरलाल नेहरू अलाहाबादच्या नगरपालिकेचे सभासद होते, त्यावेळी 'एका प्रतिष्ठीत कुटुंबाच्या घराजवळ कोठा असणे योग्य नाही' असं म्हणून नगरपालिका सभासदांनी हा कोठा गावाबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला होता.
ह्या घटनेवर आधारित गुलाम अब्बास (जे फ़ाळणीनंतर पाकिस्तानला स्थायिक झाले) यांनी लिहिलेल्या 'आनंदी' या लघुकथेवर 'मंडी' हा चित्रपट बेतलेला आहे.

चार पानांच्या ह्या लघुकथेचे अडीच-पावणेतीन तासाच्या चित्रपटात रुपांतर करताना 'मूळ' कथानकाला कोठयावरच्या वातावरणाची, तिथे राहणार्‍या लोकांच्या आयुष्यात घडणार्‍या लहान मोठया प्रसंगांची, गावातल्या प्रतिष्ठीत लोकांच्या कोठयाशी असणार्‍या संबंधांची आणि झीनत-सुशीलच्या 'आगळ्या' प्रेमकहाणीची जोड आहे.

श्याम बेनेगलांच्या team मधे तसं बघायला गेलं तर काम करणारी सगळीच 'बाप' माणसं. मग ती प्रमुख भूमिकेतली शबना आझमी, स्मिता पाटील असो, टुंग्रुस च्या भूमिकेतला नसरुद्दीन शहा असो, कोठयावरच्या मुलींचे फ़ोटो काढण्यासाठी नाना भानगडी करणारा राम गोपाल - ओम पुरी असो किंवा अमरिश पुरी, सईद जाफ़री, खुलभुषण खरबंदा आणि लहानश्या भूमिकेतला पंकज कपूर... सगळेच आपापल्या जागी योग्य आणि 'एक से एक'!

पण 'मंडी' पाहून डोक्यात 'फ़िट्ट' बसतात ते शबाना आझमी आणि नसरुद्दीन शहा.

'मंडी' मधे शबाना आझमीनी केलेली रुक्मीणीबाईची भूमिका अफ़लातून! कोठा चालवणर्‍या त्या 'बाईच्या' सगळ्या 'छटा' तिने व्यवस्थित रंगवल्या आहेत. वेळप्रसंगी कठोर होणारी पण तरीही आपल्या 'मुलींवर' जीव असणारी, कधी 'लटक्या रागानं, कधी कांगावा करून, कधी स्वत्:च्या रूपाचा आणि वेश्याव्यवसाय या धंद्याचा वापर करून समोरच्याकडून हवं ते शिताफ़िनं मिळवणारी.... शेवटी झीनतही पळून गेल्यावर, आपणच सांभाळलेल्या मुलींनी परकं केल्यावर 'स्वत्:च्या आयुष्याला दोष देउन खचलेली' आणि क्षणात जगण्याची नवीन उमेद ठेवणारी रुक्मीणीबाई.
स्मिता पाटीलनी रुपवान, लाडात वाढलेल्या आणि नंतर प्रेमात पडून 'बगावत' करणारी झीनत चांगली उभी केली असली तरी मला रुक्मीणीबाई जास्त जिवंत वाटली, जास्त भावली.

असाच मनाची पकड घेतो तो नसरुद्दीनचा टुंग्रुस.
'टुंग्रुस' हा पाणी भरण्यापासून ह्या बायकांचे कपडे धुण्यापर्यंत 'पडतील' ती कामं करणारा 'हरकाम्या'.
दिवसभर एक शब्दही न बोलता, खाली मान घालून काम करणारा टुंग्रुस रात्री दारुच्या नशेत रुक्मीणीबाईला, कोठ्यावर चालणार्‍या तिच्या बेबंद कारभाराला शिव्या घालत असतो. हा कोठा, तिथे चालणारा वेश्याव्यवसाय, मुलींना फ़सवून आणून विकणं-विकत घेणं, तिथे येणारी लोकं याबद्दल कुठेतरी मनात असलेली सगळी घृणा, राग तो दारुच्या नशेत व्यक्त करत असतो.
नशा उतरली, की परत एकदा 'हरकाम्या'.
पण तरीही कुठेतरी त्याला ह्या जागेबद्दल, रुक्मीणीबाईबद्दल 'आपलेपणा' आहे. कोठा सोडून रुक्मीणीबाई जेव्हा गावाबाहेरच्या जागेत जायला निघते तेव्हा टुंग्रुस तिच्या नवीन व्यवसायात सहभागी व्हायला, नवीन जागेत जायला नकार देतो. पण तो जुना भकास कोठा, ती रिकामी जागा त्याला खायला उठते आणि तो रुक्मीणीबाईकडे परत जातो.
शेवटी जेव्हा मुलीही रुख्मीणीबाईला नाकारतात, तेव्हा हा टुंग्रुसच तिच्या साथ देतो.

बेनेगलांनी बोलताना सांगीतलं की ते मुंबईला ज्या apartment मधे राहत होते तिथे 'टुंग्रुस' नावाचा एक गुरखा होता. असाच 'हरकाम्या'. सगळ्यांची कामं न बोलता, न तक्रार करता करणारा.. पण दारुच्या नशेत असताना 'जे जे लोक त्याला उगाच काम सांगतात, हिडीसफ़िडीस करतात' त्यांच्यावर मनसोक्त तोंडसुख घेणारा.
'मंडी' मधला टुंग्रुस हे ह्या गुरख्याचं पडद्यावरचं रूप. स्वप्नाची नशा उतरली की वास्तवाला 'खाली मान करुन स्वीकारणार्‍या' माणसासारखं.

१०-१२ वर्षापूर्वी मी 'मंडी' पाहिला होता. मला अजून आठवतय की त्यावेळी ते कोठ्यावरचं वातावरण, ते वेश्यांचं जीवन हेच 'अंगावर' आलं होत.
ह्या सिनेमाचा गाभा असलेला 'black humor' समजण्याचं कदाचित ते वयही नव्हतं आणि तितकी समजही नसावी बहुधा त्यावेळी.

पुण्याचा दगडुशेट गणपती आणि त्याच्या जवळची दाणे आळी (बुधवार पेठेचा भाग), वेश्याव्यवसाय करणार्‍या ह्या स्त्रीयांच्या 'चारचौघांसारख्याच' (किंबहुना जरा जास्तच) असलेल्या देवावरच्या श्रद्धेचा उल्लेख असणारे अनिल अवचटांचे लेख, नुकतेच झालेले dance bar वरच्या बंदी सारखे राजकीय issues , खरी नैतिकता आणि so called नैतिकतेचा आव आणणारी माणसं...

परवा सिनेमा बघताना एक 'वेगळीच मी' सिनेमा बघतीये असं वाटत असतानाच जाणवलं....
१९२९ सालची ही मूळ कथा, १९८३ सालचा सिनेमा आणि आज 2007 .
एका अर्थानं तसं पाहायला गेलं तर 'परिस्थिती'मधे काही विशेष फ़रक पडलेला नाही हेच खरं!
भूमिका
---------
१३ डिसेंबर १९८६. स्मिता पाटीलच्या निधनाची बातमी समजली. बाबा खूप अस्वस्थ आणि तरीही 'शांत शांत' होते.
माझ्या आईशी बोलताना ते एकच वाक्य म्हणाले होते 'स्मिता फ़ार गुणी अभिनेत्री होती...फ़ारच लवकर गेली गं'.
एका दहा वर्षाच्या मुलीला त्या वाक्याचा अर्थ समजण्याचं ते वय नव्हतं. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा स्मिता पाटीलचा 'अभिनय' पाहिलाय, तेव्हा तेव्हा न चुकता मला १३ डिसेंबर आणि बाबांचं हे वाक्य आठवलय.
अगदी परवा 'भूमिका' पाहताना देखिल!

'भूमिका' हा हंसा वाडकर च्या 'सांगत्ये ऐका' ह्या आत्मचरित्रावर आधारलेला चित्रपट. कलावंतिण घराण्यातल्या एका स्त्रीच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाची आणि त्याचबरोबर तिच्या वैयक्तीक जीवनातल्या बायको, आई, नात, मुलगी, प्रेयसी आणि तरीही प्रेमासाठी, कोणीतरी समजून घेण्यासाठी कायम भुकेली राहिलेली एक स्त्री अशा विविध 'भूमिकांची' ही कहाणी.

ह्या सिनेमासाठी पहिला 'सलाम' स्मिता पाटीलच्या अभिनयाला!

तिच्या अभिनयाबद्दल मी केवळ एकच वाक्य लिहीणं मला योग्य वाटतय (कारण बाकी मला काय म्हणायचय ते पडद्यावरती प्रत्यक्षच पाहायला हवं!) आणि ते म्हणजे - "उशा, उर्वशीदेवी आणि उर्वशी दळवी ह्या सगळ्याच भूमिका तिनं अतिशय ताकदीनं पेलल्या आहेत."
माझ्या ह्या वाक्याचा अर्थ ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे त्यांना लगेच समजेल.
खरं सांगायचं तर 'उर्वशीदेवी'च्या 'सिनेमातल्या shooting च्यावेळच्या त्या लहान लहान भूमिका, ते scenes पाहण्यासाठी मी अजून किमान तीन-चार वेळा तरी हा सिनेमा परत बघणार हे नक्की.

१९३०-४० च्या दरम्यान एका स्त्रीने चित्रपटासारख्या एका पुरुषप्रधान क्षेत्रात पाउल ठेवणे आणि तिथे स्वत्:चे स्थान निर्माण करणे हीच खूप मोठी गोष्ट होती.
लग्न झालेलं असतानाही चित्रपटक्षेत्रापासून ते जमिनदारपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरुष जिच्या आयुष्यात येउनही सतत सुखाचा शोध घेत भटकणारी आणि आधी अनवधानामुळे आणि नंतर बेदरकारपणे दुखा:ला सामोरी गेलेली ही अभिनेत्री.

मुळात हंसा वाडकरचं आयुष्य इतकं घडामोडीचं, त्यात स्पष्टवक्तेपणानं, काहीही न लपवता आणि कसलेही बुरखे न पांघरता लिहीलेलं 'सांगत्ये ऐका' पण खूपच खळबळजनक... एकदम 'सिनेमा मटेरियल'!
त्यामुळे ह्या कथानकावर आधारित 'पटकथा'( screenplay )लिहीणे तसे सोपे असावे.
माझ्याकडे हे पुस्तक असल्याने आणि मी ते अनेक वेळा वाचलेही असल्याने, सिनेमातले संवाद हे 'जसेच्या तसे पुस्तकातून' घेतले आहेत हे लक्षात येतं.
इतकं ready made script हाताशी असलं, काम करणारी सुलभा देशपांडे,अमोल पालेकर,अनंत नाग, अमरिश पुरी,नसरुद्दीन शहा सारखी उत्तम नट मंडळी असली तरीही माझ्या दृष्टीनं 'भूमिका' हा सिनेमा एका 'दिग्दर्शकाचा सिनेमा' आहे.

एका अभिनेत्रीच्या जीवन प्रवासाबरोबरच,ह्या सिनेमात "सिनेमाचा क्षेत्राचा' प्रवास बघायला मिळतो.
१९३०-१९४०-१९५० ह्या काळात ' film industry ' मधे मोठ्या प्रमाणावर बदल घडत गेले.
चित्रपटाचा कथा केवळ पौराणीक न राहता सामाजिक होत गेल्या हे तर आहेच, पण film technology जाणवण्याइतकी बदलली.
भारतामधे १९३० आणि १९४० ह्या काळात जे सिनेमे बनवले गेले त्यासाठी अमेरिकेहून three-color technicolor हा film stock वापरला जात असे. ह्या films वापरून शूटींग करताना एकतर जास्त प्रकाशात किंवा खूप जास्त exposure देउन shots घ्यावे लागतात, कारण ह्या film चा speed खूपच कमी असतो.
जुने सिनेमा बघताना एक जे एक वेगळं texture , एक वेगळा tone किंवा granularity जाणवते ती ह्या film speed मुळे.
पुढे १९४० मधे fast speed असलेला " Kodak stock " वापरला जायला लागला. त्याही नंतर ' monopack ' आणि त्याहीनंतर ' Eastman color ' वापरात आले.

'भूमिका' मधे त्या त्या काळातले 'सिनेमातले सीन' दाखवताना हे असे सगळे वेगवेगळे प्रकारचे film stocks वापरले आहेत.
त्यामुळेच चित्रपटात वेगवेगळ्या texture चे, रंगाचे, granulation चे सीन पाहायला मिळतात. शिवाय त्यानुसार आरसे वापरून केलेले light effects , out door shooting च्या वेळचे lights , studio मधे चित्रीत केलेले shots ....
सिनेमा पाहताना मला हे जसं जसं जाणवत गेलं, तसा तसा 'दिग्दर्शक' दिसत गेला.
ह्या सिनेमासाठीचा दुसरा 'सलाम' श्याम बेनेगलांना!

एकच सिनेमा अनेक वेळा बघायलासुद्धा माझी कधीही 'ना' नसते.
"सिनेमात काहीतरी पाहायच राहून गेलय" असं मला कायमच वाटत असतं.
आत्ता 'भूमिका'बद्दल लिहीत असताना ही 'राहून गेल्याची' जाणीव जरा जास्तीच तीव्र आहे हे बाकी खरं!
दहा वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यातल्या 'डेक्कन'ला माझ्या दोन मित्रांबरोबर मी हा सिनेमा पाहायला गेले होते. चित्रपट tax free होता... साडेतीन रुपये तिकीट, संपूर्ण थेटरमधे आम्ही तिघे धरून जेमतेम १०-१२ माणसं असतील. सिनेमा संपून बाहेर आलो, तर धो धो पाउस कोसळत होता. 'डेक्कनच्या' बाहेर, hongkong लेनच्या सुरुवातीला एक चहाची टपरी असायची, तिथे चहा घेतला. पत्र्यावर वाजणारा पाउस, भर पावसात चहाच्या कपात पडणारे पाण्याचे थेंब आणि चहावाल्याच्या किटलीतून निघणारी वाफ़... तिघंही शांत.. आपल्याच नादात, एकटे.

तशीच पावसात भिजत घरी आले. घराच्या गेटमधून गाडी आत घेण्याच्या आणि park करण्याच्या style वरून माझे बाबा, मी पाहून आलेला सिनेमा हा 'बात कुछ जमी नही' पासून 'बर्‍यापैकी बरा' ते ' ultimate' ह्यातल्या कोणत्या category मधे होता हे बरोब्बर ओळखत असंत.
त्या दिवशी 'माचिस' पाहून आल्यावर दारातच 'काय, गुलजार ultimate ना!' अशी बाबांनी माझी नक्कल केली होती, आणि त्यानंतर जवळजवळ एक तास मी अखंडपणे 'माचिस' बद्दल त्यांच्यासमोर बडबड केली होती.

माचिस...
Operation Blue Star च्या पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा. १९४७ ची फ़ाळणी आणि इंदीरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ मधले दंगे हे दोन्ही अनुभवल्यानंतर 'पंजाब'मधे अनेक शीख तरूण आतंकवादी गटात सामील झाले ह्या विषयावरचा हा चित्रपट.
एक तर early 90s मधल्या हम है राही प्यारके, कभी हा कभी ना किंवा १९९५ मधल्या दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे ह्या सगळ्याच सिनेमापेक्षा 'माचिस' चा विषय खूप वेगळा होता. शिवाय कोशिश, आंधी, परिचय सारखे विषय 'तरलतेनं' हाताळणार्‍या, पिंडानं एक कवी असलेल्या गुलजारने 'माचिस' सारखा दहशतवादावर आधारलेला चित्रपट काढणं म्हणजे थोडी आश्चर्याची गोष्ट होती.
पण गुलजारच्या संवादांनी, त्यांच्या गीतांनी, एकूणच त्यांच्या दिग्दर्शनानी हा स्फ़ोटक विषयही खूप चांगला हाताळला गेला आहे. शिवाय खास गुलजारच्या सिनेमाला असलेला poetic touch देण्याचं काम माचिसमधे केलयं मनमोहन सिंग यांच्या कमेर्‍यानं.

कोणताही सिनेमा पाहताना माझं पहिलं लक्ष असतं ते सिनेमाच्या screenplay कडे.
माचिसची पटकथा आणि संवाद खूप विचारपूर्वक आणि चांगल्या रितीनं लिहीली गेली आहे असं मला वाटतं.
लेखकाला नुसतीच सिनेमाची सुरुवात नाही, तर शेवट काय करायचा आहे हे पण नक्की माहीत आहे हे जाणवतं. त्यानुसार सिनेमात घडणार्‍या घटना, त्यांचा क्रम, त्यासाठी केलेला flashback चा वापर खूप योग्य वाटतो. नाही म्हणायला, कृपाल आणि वीरा मन्नीकरनला केदारनाथच्या हत्येच्या मिशनसाठी जेव्हा भेटतात तेव्हा सिनेमा थोडा रेंगाळतो.. पण कुठेही विषयाला सोडुन भरकटत नाही ही माचिसची मोठी जमेची बाजू.

माचिसच्या पटकथेमधे संवादाइतकीच महत्व गाण्याच्या शब्दांनाही आहे, नव्हे, सिनेमात अनेक situations मधे ही गाणीच जास्त प्रभावीपणे त्या त्या वेळच्या परिस्थीतीशी आपली ओळख करून देतात.
'जला भी नही था देह का बालन कोयला कर गयी रात, और ना जलाये कोई याद ना आये कोई" मधला विरह काय किंवा 'एक छोटासा लम्हा है खत्म नही होता, मै लाख जलाता हू ये भस्म नही होता' मधली वेदना काय... सगळेच शब्द खूप 'सच्चे' वाटतात, कदाचित म्हणून एकदम 'दिल को छुनेवाले"!

माचिसमधल्या taking मधली मला आवडलेली गोष्ट म्हणजे नैसर्गीकपणा. अगदी चंद्रचूड सिंग सारख्या कोणत्याही angle नी 'हीरो' न वाटणार्‍या माणसाची मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड ते तब्बूची 'याद न आये कोई' किंवा भेज कहार पियाजी बुलाओ' ह्या गाण्यातली अतिशय natural expressions .
कोणाची तरी वाट पाहताना स्वत्:मधेच हरवून जाउन बसल्याबसल्या स्वत्:च्या हाताच्या तळव्याकडे बघणं, नकळत भिंतीचे पापुद्रे नखानं कुरतडणं, डोळ्यातलं पाणी थोपवण्यासाठी दीर्घ श्वास घेउन आवंढा गिळणं.... अतिशय natural , अगदी तुमच्या माझ्या reactions असल्यासारखं.
तब्बूची ह्या 'वीरा'नी तिला National Award मिळवून दिलंच, पण चांदनी बार आणि मकबूल सारखी चांगली projects सुद्धा मिळवून दिली असं मला वाटतं.

ओम पुरीचा 'सनातन' असाच खूप natural . एकूणच ओम पुरी हा माणूसच अभिनयाची, भूमिकेची खूप चांगली जाण असणारा माणूस आहे हे सतत जाणंवतं त्याची एकूणच body language , आवाज वापरण्याची आणि संवाद म्हणायची पद्धत नुसतं बघूनही खूप काही शिकण्यासारखं आहे.

माचिस मला आवडला कारण लहान लहान seenes मधून, गाण्यांच्या शब्दामधून "कधी directly तर बर्‍याच वेळा indirectly नुसती indications देत, न कळत आपल्यालाही विचार करायला वाव देत सिनेमाची कथा पुढे सरकते. खूप प्रसंग सांगता येतील, पण उदाहरणच द्यायचं तर हा एक सीन...

आतंकवादी गटात कृपाल (चंद्रचूड सिंग) खूप नवीन आहे. 'आपल्या मित्राच्या जखमांचा, त्या छळाचा बदला घ्यायचा आहे' ह्या पलिकडे त्याला काही माहीत नाहीये. त्याने अजून कधी बंदूक चालवली नाहीये, की बाॅंब बनवण्याबद्दल त्याला काहीही माहीती नाही. अशा गोंधळलेल्या मनस्थितीत असलेल्या त्याच्याबरोबर आहे सनातन (ओम पुरी). कधी गच्चीवर गप्पा मारताना, कधी नदीवर आंघोळीला गेले असताना, सनातन त्याला 'त्याचे स्वत्:चे विचार ' सांगत आहे, आणि ह्या संभाषणातून कळत्-नकळत कृपाल त्याच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रयत्न करत आहे.

"जब किसी आदमी साथ बिन्साफ़ी होती है, और होती चली जाती है, अकेले वो लढ नही पाता. तब वो अपनी तरह के और लोगोंको इकठ्ठा कर लेता है.....
लेकीन उसकी लडाई होती उसी बेइन्साफ़ी के खिलाफ़ है...
मै किसी आनेवाली नस्लोंके लिये नही लढ रहा हू... मुझे अपना हक चाहिये, और वो भी मेरे जिंदा रहते हुवे.... अभी इसी वक्त"

असं बोलणं सुरु असतानाच शेजारून एक ट्रेन जाते. ट्रेनच्या आवाजात आपला आवाज ऐकू यावा ह्यासाठी साहजिकच ओम पुरी चढलेल्या आवाजात बोलायला लागतो.
ट्रेन निघून जाते, त्या आवाजाने घाबरलेला एक ससा झुडुपातून बाहेर येतो आणि क्षणाचाही बिलंब न करता कृपाल बंदूकीनी त्या सशाला मारतो आणि ओम पुरीच्या चेहर्‍यावर स्मितहास्य.

हेच सगळे संवाद नुसते दाखवले असते, तर ते धर्मविरोधी भावना भडकवणारं एक typical भाषण वाटलं असतं. पण त्या ट्रेनच्या वापरामुळे एक तर चढलेला आवाज असूनही ते बोलणं 'भडक' वाटत नाही, शिवाय कृपालच्या मनातले धावणारे विचारही दर्शवतं. परिणामी आधी बंदूकीला हातही लावायला तयार नसलेला कृपाल 'आता' एका निष्पाप सश्याचा बळी घ्यायला सहजतेने 'तयार होतो'.

मला स्वत्:ला माचिसची गाणी जितकी गुलजारच्या शब्दांकरता आवडतात तितकीच विशाल भारद्वाजच्या संगीताकरताही. हरिहरनच्या base असलेल्या गंभीर पण तरीही soft आवाजाकरता, लताच्या आवाजापेक्षा तिच्या ह्या गाण्यातल्या expressions, mood करता, त्या 'तुम गये सब गया' मधल्या संजीव अभ्यंकरच्या आलापाकरताही.
फ़क्त ते 'चप्पा चप्पा' गाण्यासाठी अजून चांगल्या रितीने वातावरण निर्मिती केली असती आणि ' तुम गये सब गया" हे गाणं 'कृपाल "म्हणतोय" असं न दाखवता केवळ ' background ला' असतं तर अजून effect आला असता... असं आपलं मला नेहमी वाटत राहतं.

एक संगीतकार म्हणून विशाल ते आजचा विशाल भारद्वाज ह्या प्रवासाविषयी लिहायला मला अतिशय आवडेल. पण आत्ता इथे त्याला माझ्याकडून 'योग्य न्याय' दिला जाणार नाही असं वाटतंय..म्हणून त्याविषयी नंतर कधीतरी!

परवा सिनेमा पाहताना 'छोड आये हम वो गलिया' गाणं सुरु झालं आणि reflex action व्हावी त्याप्रमाणे मी म्हणून गेले ' अरे, हा तर आपला के.के'!
के.के. चा आवाज पहिल्यांदा कानावर पडला तो मचिस मधे. त्यावेळी internet वगैरे नसल्याने, आणि रेडिओवर ह्या गाण्याच्या गायकांच्या यादीत हरिहरन आणि सुरेश वाडकर यांच्या बरोबर नाव घेण्याइतका तो 'मुरलेला गायक' नसल्याने, गाण्याच्या सुरुवातीला ते वरच्या पट्टीत 'छोड आये हम वो गलिया' म्हणणारा कोणीतरी वेगळा गायक आहे हे कळत होतं पण त्याचं नाव माहीत नव्हतं. नंतर जेव्हा 'माचिस' च्या गाण्यांची कसेट विकत घेतली तेव्हा ह्या गायकाचं नाव K.Kay आहे असं समजलं. नंतर 'तडप तडप इस दिलसे आह निकलती गयी' मुळे हाच आवाज परिचयाचा झाला... आणि आज तर Kay Kay 'आपला' होउन गेलाय.
सुरेश वाडकरच्या आवाजाला मला अजिबात नावं ठेवायची नाहीत, पण का कोण जाणे त्याच्या कोणत्याही गाण्यात मला 'ओंकारस्वरूपा'चा भास होतो. म्हणजे 'लगी आज सावन की फ़िर वो झडी है....तुज नमो... तुज नमो' असे 'नसलेले शब्द' मला ऐकू येतात. माचिसच काय पण नुकत्याच म्हणलेल्या ओंकारा मधल्या 'जग जा रे जग जा' ह्या सुरेश वाडकरच्या गाण्यातूनही मला काही केल्या हे 'तुज नमो' वजा करता आलेलं नाहीये हे माझं दुर्दैव.

परवा 'माचिस' बघितला आणि वाळवंटात राहत असूनही पुण्याच्या 'त्या दिवशीच्या' पावसात मी परत एकदा भिजले... आपल्याच नादात, एकटी!

'डेक्कनला' माचिस बघून आल्यानंतर मी जो writeup लिहिला असता, तोच आज मी दहा वर्षांनी लिहीतीये. हे शब्द, ही वाक्य 'जशीच्या तशी' डोक्यात होती... फ़क्त ती कागदावर यायला दहा वर्ष लागली इतकंच!

tumacaI dad Aaplaa saMvaad
Archive through September 14, 2005
Owner rar Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators