Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
wakdya
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » wakdya « Previous Next »

सुचीपत्र
१. प्रतापगडाचा फोटो
२. नोटांच्या हाराचा फोटो
३. कन्येचा फोटो
४. पुनःश्च हरिओम - मृत्युशी लपंडाव (१)
५. मृत्युशी लपंडाव (२)
६. मृत्युशी लपंडाव (३)
७. मृत्युशी लपंडाव (४)
८. डुलकी



<***************************>

पुणे जी टी जी दिनांक ११ एप्रिल, २००४
स्थळ इस्क्वेअर चित्रपट गृह
निमित्त श्वास चित्रपट बघणे नि जमल्यास अज्जुका नि तिच्या टीमला भेटणे
वेळ ११.३० सकाळी
हुश्श्य!
उपस्थित आय्डीज
१. गिरिरज
२. सायबरमिहिर
३. इट्समी
४. कुलगाय
५. आपलेकर
६. बडबडी
७. जीएस
८. सई
९. अक्षय
१०.मिल्या
११.धृव
१२.संस्कृती
१३. वकड्या
१४. सौ वकड्या

अभ्यागत
१. सव्यसाची नि त्याचा मित्र
२. एक जपानी की कोरिअन मुलगी

अनुपस्थित
वरील यादीत जे नाहीत ते सर्व

सर्वप्रथम, मिहीर आणि इट्स्मी चे नि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन! कारण जवळपास २००० रुपयांची तिकिटे अंगावर पडण्याची भिती न बाळगता त्यांनी आधिच खरेदी करुन ठेवली आणि अगदी आयत्या वेळेस तिथे पोहोचलेल्यांना देखिल उपलब्ध करुन दिली! वर १४ आय्डिज चि नावे लिहिली आहेत, पण प्रत्यक्षात सगे सोयरे धरुन व्यक्ती जास्त होत्या, नि सगळीच नावे माझ्या लक्षात नाहीयेत, तेव्हा जे कोणी राहिले असेल त्यांनी कृपया सुचित करावे हि विनंती.
तर मंडळी, त्याचे झाले असे की आम्ही नेहेमीप्रमाणेच पेन्शनरांच्या वेळेत म्हणजे वेळे आधी तब्बल अर्धा तास तिथे पोहोचलो. थिएटरची वास्तु नविन, वातावरण नविन, माणसे नविन, तेव्हा त्या वातावरणाचा नाही म्हणले तरी माझ्या वर थोडा परिणाम झालाच होता! तशात माझी गोची झालेली, नेहेमीचाच प्रश्र्न! आता माझ्या कडे तिकिटे नाहीत म मी आत जावुन दोन नंबरची सोय कशी काय करु? तरी पार्कींग लाॅटमध्ये जावुन तिथली सोय बघितली! ती काही मनास पसंद पडेना, तेव्हा एकटाच सरळ रिक्षाने शिवाजीनगर स्टॅंडवरच्या सुलभतेचा आसरा घ्यावयास गेलो, नि परत आलो तोवर पावणे बारा होत आलेले!
जीएस, अक्शय, सव्यसाची असे काहीजण तिथे आलेले होते! माझ्या पत्निने त्यांना ओळखले होते! तेव्हा त्यांच्याकडे गेलो! मग प्रत्येकाशी ओळख करुन देणे घेणे वगैरे नेहेमीचेच उपचार! अरे मला जरा चांगला आय डी द्या रे कोणीतरी? हे काय आपले वाकड्या म्हणुन सांगताना प्रत्यक्ष भेटीत मला फ़ारसे काही नाही वाटले तरी ऐकणार्याचा विचार नको का करायला? तर असो.
मग आम्ही स्टिलच्या रेलिंग पाशी टेकुन उभे राहिलो तर तिथे एक भले मोठे स्टिलचेच पिंप! मग कळले की ती कचरा पेटी होती! वाकड्याला उभे रहायला दुसरी जागा पण मिळाली नाही का? तेव्हड्यात एक जण सिगारेटचे थोटुक टाकायला आला! झाकण कसे उघडायचे ते समजेना तर बाजुच्या कडीतुन ते थोटुक आत सरकते का बघु लागला! पोस्ट पेटीला कसे असते ना पत्र टाकायची जागा तशी ती कडी दिसत होती. त्याने तसेच थोटुक खाली टाकले ते शेवटी मी विझवले! च्च्या बुवा!
तेव्हड्यात इट्स्मी तिकिटे वाटु लागली! बहुतेक तिला माहीत नसावे पण तिची गाडी काही माझ्या कडे वळेना, म्हणले उगाच नंतर अडचण नको व्हायला! तेव्हा तिच्याकडुन तिकिटे मागुन घेतली, तिने दिलीही! पण पैशाचे कोणच बोलेना? मी आपली तिकिट नामाक त्या चपट्या चिठ्ठीवर काय काय लिवलय ते उत्सुकतेने वाचत होतो! असे उघड्यावर वाचायचे नसते असा काही रिवाज आहे का हो? कारण बाकी बराच मोठा समुदाय माझ्या वाचण्याकडे कसलेतरी गालातल्या गालात हसुन बघत होता! काय की बुवा! आकड्याच्या चिठ्ठीसारखे ते तिकिट मला तरी नविन होते! हो, पण मी लग्गेच तिकिटाचे पैसे देवुन टाकले बरे का मिहिरकडे! हो विचारुन घ्या हवे तर त्याला! तेव्हड्यात सव्यसाचीने त्याच्या डिजिटल कॅमेरॅतुन फ़ोटो काढला! म्हणजे असे तो म्हणाला! मी फ़्लॅशची वाट बघत होतो पण तसे काहीच घडले नाही की नाही आवाज आला क्लिक चा!
आत जायचे की नाही यावर एकमत होत नसल्याने पहले आप पहले आप करीत सिनेमा संपुन जायचा तरी आम्ही आपले तिथेच असे व्हायला नको म्हणुन मग मीच पुढे झालो! आतील काहीच माहीती नव्हती तर बावळटासारखे नव्हे तर शहाण्यासारखे विचारीत विचारीत ३ र्या मजल्यावर पोहोचलो! सगळीकडे पाॅपकाॅर्न चा घमघमाट सुटला होता! सुरवातीस बरे वाटले. नंतर मात्र तो वास डोके उठवु लागला!
सिनेमागृहात आम्ही स्थानापन्^न झालो! सिनेमा बघितला! सर्वजण बाहेर आलो! खरे तर येव्हडा सुंदर सिनेमा बघितल्या वर कुणाचीच कुणाशी बोलायची सुरवातीची काही मिनिटे तरी तयारी नव्हती! कारण सरळ होते! सिनेमातील घटनांचा झालेला परीणाम इतक्या झटकन पुसला जाणे केवळ अशक्य! तरीही औपचारिकता पार पाडीत, ज्यांना लवकर जायचे होते ते आमच्या सहीत हळुन कटले! बाकीचे जण थांबले होते! आता त्यांनी काय काय केले गे सांगावे!
काय फ़लित या जी टी जी चे? काय निश्कर्ष? तर एका मायबोलिकरिणीचा सहभाग असलेला चित्रपट, तो देखिल मराठी, पहाण्यास पंधरा एक मायबोलीकर आवर्जुन उपस्थित रहातात! एकत्र येतात! या उप्पर अजुन वेगळे ते काय असते? हे तर सहजिवनाचा आस्वाद घेवु इच्चीणार्‍या मनुष्या प्राण्याच्या जिवंतपणाचे लक्षण नव्हे काय?
मायबाप वाचक मंडळी, बोअर झाला असाल तर माफ़ी असावी!
कुठे जागा नाही मिळाली म्हणुन हे इथे लिहिले आहे!
kala 15 eip`laÊ Aadlyaa idvaXaI AgadI Acaanak zrvalao kI p%naI ina mauilaMnaa saÜbat mhNauna %yaaMcyaabarÜbar baÜirvailalaa jaayacao² Balyaa phaTo 4 caa gajar laavalaolaa hÜta² pNa jara naMtr jara naMtr ]zu Asao krta krta savvaa paca vaajalao² itqauna puZo paNaI tapvaNaoÊ AaMGaÜLI vagaOro naOima<aIk kamao² baayakÜcaI sava- Aavara AavarIcaI taraMbaLÊ %yaat tI dÜna caar idvasa naahI mhNajao AÜTa ksaa ca@k idsalaa pahIjao karNa naMtr pdBaar saasau kDo naa² saasaulaa ³mhNajao maaJyaa Aašlaa hÜ´ jarahI psaara ina ADgaL Kpt naahI² AaiNa baayakÜcao psaara Gaatlyaa iXavaaya kamaca sauÉ hÜt naahI² Asao Asato kI lahanapNaI vaa ekMdrIt jagalaolyaa AayauYyaat saurvaatIcyaa kamao iXakNyaacyaa Avasqaot kuNaalaa iktI jaagaot vaavarayalaa imaLalaolao Aaho yaavar doiKla kÜNa iktI psaara Gaalaola ho AvalaMbauna Asato. Aašcao maaJyaa jaaNato pNaatlao sava- AayauYya caaLItlyaa eka KÜlaIt gaolaolao² tovha vastu jaagacyaa jaagaIca Asalyaa paihjaot ha kÜba`a kTaxaÊ tr p%naI KoD\yaatIla maÜ{\yaa Garat pirsarat vaavarlaolaIÊ tovhDa Ôrk AsaNaarca. iXavaaya Aašlaa AamhI maulao tXaI iXastIcaI hÜtÜ hܲ ho ho hllaIcyaa yaa kaT\yaa-MsaarKI baoiXast kiQaca navhtÜ AamhI² eokt naahI naa kuNaIÆ maga izko. tr saaMgaayacaa mau_a ha kI 6.30 laa inaGaayacao to pavaNao Aaz vaajalao. inagaDI naa@yaavar basacaI vaaT phat ]Bao raihlaÜ. puZcaa pavauNa tasa vaogavaogaL\yaa basa yaot hÜ%yaa jaat hÜ%yaa² pNa ekhI eiXayaaD dadr krta vaa baÜrIvalaI krta AalaI naahI² ]nho var caZu laagalaI hÜtI naI AaQaIcaI laamba saavalaI jaavauna caTko basau laagalao hÜto. ]Bao rahuna paya duKayalaa laagalao. pÜirMnaI yaovhD\yaatca ikr ikr sauÉ kolaolaI. XaovaTI ekdacaI basa AalaI baÜirvailacaI. tr naohoimacyaa e@sapT- laÜkaMnaI JaTkna caZuna Gaotlao ina AamhI raihlaÜ XaovaTIÊ sTÐiDga maÜD maQyao² Aailayaa BaÜgaasaI... ² mauilaMcyaa caoháyaavar ]Bao rhayalaa laagalyaacaI kaLjaI idsat navhtI maa~ baakI jaNa basalaolao ina AapNaca ka ]Bao Asaa baalasaulaBa p`Ena maa~ idsat hÜta² maI manaaXaI mhNalaoÊ ha-vauVat ]ByaaÊ jara kLudo trI baakIcao jaga ksao Asato toÊ mhNajaoca maga Aaš baap kXaI kaLjaI Gaotat AaplaI to jaaNavaola. e@sp`osa hayavao laa laagalyaavar kMD@Tnao- itkoTo Vayalaa sauÉvaat kolaI²
itna Ôula ek haÔ² haÔ kuzo AahoÆ tI pha itkDo² haM zIk Aaho² %yaanao itikTo idlaI² eka itna saITcyaa baakavar AiDca basalao hÜto² %yaa AiDcacyaa maQyaat AamacaI AQaI-laa sqaanaapnna krvauna kMD@Trnao %yaa baakavar puNaa-MkI saM#yaa saaQalaIca iXavaaya maaJaa duvaa pNa Gaotlaa² naahItr kÜNa hÜ hllaIcyaa jamaanyaat svatÁhuna jaagaa kÉna dotayaÆ ]laT AQyaa- itikTat Ôula jaagaa imaLtI naa vaaprayalaaÊ to pNa Ôu@kTÊ ma Gyaa vaapÉna² AsaÜ. maÜqyaa maulaIsa dusarIkDo eka maa}ilanao saamaavauna Gaotlao² Aa##yaa basa maQyao AamhIca dÜGao ]Bao² kaya pNa namaunao Asatat naa ekok jaNa² saITacyaa kDolaa paz Tokvauna rs%yaacyaa idXaolaa AaDvao tÜMD kÉna dÜnhI payaavar Baar saavarIt naIT ]Bao raihlao mhNajao ba`ok laagalyaavar pDayacaI iBatI rhat naahI naI hat laTkvauna duKvauna GyaayacaI garja Baasat naahI² AhÜ pNa jar tumhI ]Bao Asalaolyaa isaTacyaa cahubaajausa saaLkayaa mhaLkayaa AsatIla trÆ tumacao itqao ]Bao rhaNao psaMt pDt nasalyaanao ]gaacaca ragaIT itKT jaLjaLIt kui%sat vagaOro p`karcao kTaxaaMcaa maara tumacyaavar hÜt Asaola trÆ tXaat maaJyaa samaÜrcyaa isaTvarIla baašnaoÊ gaujaraqaI kI maarvaaDI hÜtIÊ Aaplaa paya par baahor kaZu sarL taNavalaaÊ AaQaIca k^irDa^r jaomatoma icaMcaÜLoÊ tXaat itcaa paya Asaa baahor Aalaolaa jyaacyaa pasauna kovaL kahI saoMTIimatsva-r maaJaa payaÊ mhNajao jar caukuna Qa@ka laagalaa tr iXavyaaXaap ina ipTaš hÜNyaacaIca jaast Xa@yata² maI baayakÜlaa najaronaoca KuNaavauna tÜ p`kar daKivalaa² %yaa baašcyaa payaalaa Qaka laagau nayao mhNauna malaa maaJaa ]javaa paya yaovhD\yaa AvaGaDlaolyaa Avasqaot taNauna ekaca jaagaI zovaavaa laagalaa hÜta kI saaMgata saÜya naahI² mhNalao kuzuna dubau-wI JaalaI Asalyaa saava-jainak izkaNaI yaayacaI² pNa jaavauVa² iktI vaoL Asaa laagaNaar AahoÆ maI AaiNa p%naI yaa sava- baabaIMcaa AanaMdanao Aasvaad Gaot hÜtܲ Aata p`%yaok pirisqatIkDo ivanaÜdI AanaMdacyaa Bauimakotuna phayalaa hLu hLu iXaktÜ AahÜt²
pnavaola pya-Mt AamhI ]Bao² vaaTot ÔuD maa^la var kMD@Trnao saucanaa idlaI kI Amauk Amauk naMbarcyaa dÜna isaT pnavaola ÔaT\yaavar ]trNaar Aahot² huXXyaa² imaLalaI ekdacaI jaagaa² tÜvar AaiQaca iDsk p`a^blaoma Asalaolao maaJao kMbarDo par maÜDuna gaolao hÜto²
ek vaajata baÜirvailat naMisa ka^lainacyaa sTa^pvar ]trlaÜÊ irxaa kÉna d<apaD\yaat pÜhÜcalaܲ tr kaya² sagaLo dRYyaca badlalaolao² naivana AÜvhr iba`jaÊ jaunao Ëa^isaMga idsatca navhto² jaunyaa rs%yaaMcyaa jaagaI naivana rsto ina vas%yaa² kÜNataca laM^Dmaak- maaJyaa pircayaacaa navhta² 94 naMtr Kupca badlalao Asao maI baayakÜlaa pTvauna dovau phat hÜtܲ maulaIÊ baabaa punha irxaa kra kI AXaI maÜlaacaI saucanaa krIt hÜ%yaa² caar vaogavaogaL\yaa izkaNaahuna ÔÜna krayacaa p`ya%na kÉnahI ÔÜna laagat navhta² emaTIenaela cyaa naavaanao iXamagaa krIt maaJao [kDuna itkDo ina itkDuna [kDo Bar ]nhat payaI payaI Ôoáyaa maarNao caalauca hÜto² XaovaTI pÜilasa caÝkIt iXarlaܲ itqalyaa saahobaaMnaI sahanauBautI daKivat pÜsTacaa rsta daKivalaa² pÜsTatIla eka KakI vaid-tlyaa maaNasaanao saaMgaayacaa p`ya%na kolaa pNa @!Trvarcyaa maaNasaanao punha baahorcyaa esaTIDI bauqa caa rsta daKivalaa² AayalaaÊ sakaLI mauzBar nauDlsa KallaolaoÊ %yaavar pÜTat Annaacaa kNa naahI ina ho kaya naiXabaat Bar duparI mauMbašcyaa Gaamaojalaolyaa Aavasqaot Bar TLTLIt duparI KaMVavar vajanadar ba^ga laTkvauna iÔrNyaacao kma-Æ Asaܲ tovhD\yaat tÜ pÜsTatlaa KakI maaNausa baahor yaovauna Aamhalaa Ajauna ek rsta daKvau laagalaa² %yaanao daKivalaolyaa rs%yaanao gaolyaavar maga malaa maaJyaa maaihittlao jaunao AÜLiKcao TPpo saapDlao² XaovaTI Gar pNa saapDlao² tr saaMgaayacaa mau_a ha kI tÜ KakI Xauw gaavarana marazI baÜlat hÜta ina tovhD\yaa vaoLot pÜilasa ina tÜ KakI saÜDlaa tr itqalao kÜNaIhI marazI baÜlat navhto² hÜÊ irxaavaalaa pNa naMtr marazItuna baÜlalaa² AamhI maa~ h+anaoÊ Aaga`hI Bauimakotuna marazItca baÜlat hÜtܲ
Ajauna kayaÆ itqao baayakÜ mauilalaa saÜDunaÊ dÜncaar gaPpa maaÉnaÊ caha Gaovauna AQyaa- tasaat baahor pDlaÜÊ punha naM^saI sTMNDvar AalaÜÊ to samaÜr zNao maagao- puNyaakDo jaaNaarI basa inaGaalaIca hÜtI² itlaa qaaMbavauna Aat caZuna Gaotlao² paya psaÉna iKDkIcyaa isaT maQyao basalaܲ tovha 2 vaajalao hÜto² zaNyaat vaMdnaa sTa^pvar dha imainaTo basa qaaMbalaI tovhDIca² naMtr kuzohI na qaaMbata basa qaoT inagaDIt 5.30 laa AalaI. maI ]trlaܲ Bauk jaama laagalaI hÜtI ibasalarIcaI baaTlaI p`vaasaatca saMplaI hÜtI² tovha AaQaI pÜTÜbaa kolaa ina maga Gar gaazlao²
tr Asaa jaatÜ ekok idvasaÊ ikMvaa Asao mhNau hvao tr kI ekoka idvasaacao rMga AsaohI Asatat ina to ksaohI Asau Xaktat²

maMDLIÊ baáyaaca kalaavaQaInaMtr punha [qao yaayacaa p`ya%na krtÜ Aaho
yaa ivaBaagaakrta EaI Ja@kInaI pOsao Barlao hÜto %yaaMcao QanyavaadÊ maa~ maaigala kaLat yaa ivaBaagaacaa maI jarahI ]pyaÜga kÉna Gaovau XaklaÜ naahI² Asaܲ kaL kuNaasaazI qaaMbat naahI pNa tÜ jasaacyaa tsaacahI rhat naahI² kaL badlatÜÊ pirisqatI badlato² 2003 saalaI kÜkNaatlyaa T/Ipcyaa vaoLosa mahabaLoXvarcyaa GaaTatuna idsaNaaáyaa p`tapgaDcaa ha ek fÜTܲ kalaprvaaca tÜ rÜla QautlaaÊ ha fÜTÜ baáyaapOkI vaaTlaa mhNauna [qao Taklaa Aaho

eka pasaYTI XaaMtIcyaa inaima<aanao kolaolaa dha ÉpyaaMcyaa 100 naÜTaMcaa har

kÜkNaatlyaa AaDrs%yaavar pacaÜL\yaacyaa saD\yaat laÜLt pDlaolaI maaJaI maulagaI... sana 1998
itlaa tsao kÉ doNao ha vaoDopNaa hÜta karNa kÜkNaatlyaa AXaa palaapacaÜLaca kaya dgaDaKDkavar doiKla ivaMcaukaT\yaacaI iBatI Asato
पुनःश्च हरी ओम!

मृत्युशी लपंडाव (१)

बर्‍याच महिन्यांच्या खंडानंतर काहीतरी लिहाव असा विचार केला. सहज सर्व जुने विभाग चाळताना मृत्युशी भोज्जा की अशाच काहीतरी नावाचा विभाग दिसला ज्यात योग, सव्यसाची, दिपस्तंभ इत्यादिकांचे थरारक अनुभव दिले आहेत. विचार करताना मला जानवले की इतक्या तोलामोलाचे नसले तरी काही अनुभव आपल्याही गाठीशी आहेत ते लिहुन काढावेत.

काही वर्षांपुर्वी मी जिद्दीने एक सेकंड हॅंड फियाट घेतली होती. त्यावेळच्या प्रचलित शिरस्त्याप्रमाणे आणि वर्तमानपत्रातील जाहीरातीस भुलुन या गाडीला LPG कीट बसवले जे बेकायदेशीर होते. प्रति किलोमिटार वाचणार्या दोन रुपयांची भूल आणि सगळेच करतात तर आपण केले तर कुठे बिघडले असा विचार.
ज्यांना माहीत नसेल त्यांचेकरीता सांगतो की हे कीट म्हणजे मागे डिक्कीत घरगुती गॅस सिलेंडर आडवा ठेवला जातो, तेथुन तांभ्याच्या पाइपने गॅस पुढिल भागात नेला जातो. गाडीत दोन स्वीच असतात ते बंद चालू केले असता गॅस आणि / किंवा पेट्रोल वर गाडी चालते. स्वीच बंद चालू केले असता बॅटरीतुन वीजपुरवठा अशा उपकरणाला होतो की जे उपकरण गॅस किंवा पेट्रोलचा बंद केलेला मार्ग मॅग्नेटिक पाॅवरने उघडा करते. जोवर करंट उपलब्ध असतो तोवर इंधनाचा प्रवाह सुरळीत रहातो.
या सगळ्या तंत्रात एक बाब अशिही होती की आधी गाडी जर पेट्रोल वर चालवित असाल आणि तुम्हाला गॅस वर चालवायची असेल तर पेट्रोलचा स्वीच बंद करावा लागेल पण गॅसचा स्वीच लगेचच चालु करायचा नाही कारण काॅर्बोरेटर मधे असलेले सर्व पेट्रोल वापरले जाइस्तोवर गॅसचा पुरवठा होउन चालत नाही. गाडी घुर्र घुर्र असा आवाज करु लागली की इंधन संपत आल्याचे जाणवले की तत्काळ गॅसचा स्वीच चालू करावा लागे. गॅस मात्र वायुरुप असल्याने त्याचा पुरवठा तत्काळ होत असे. नेमके या उलट गॅस वरुन पेट्रोलकडे जायचे असल्यास गॅसचे बटण बंद करुन चालत नसे तर आधी पेट्रोलचा स्वीच चालु करायचा, पेट्रोल पुरेसे खेचुन इंजिनपर्यंत पोहोचायला वेळ लागतो, ते पोहोचले की गाडी विशिष्ट घुसमटलेला आवाजात चालू रहायची, की लगेच गॅसचा स्वीच बंद करायचा. हे तंत्र नीट पणे पाळले तर बाकी या कीटचा तसा काही त्रास नव्हता.

तर असेच एकदा मी कुटुंबियांसमवेत या गाडीने खेडशिवापुरकडुन पुण्यास येत होतो. गाडी बर्‍यापैकी चालविता येत असल्याने व्यवस्थित वेगात येत होतो. माझी नित्याची सवय म्हणजे पुढिल गाड्यांप्रमाणेच मागुन येणार्‍या गाड्यांवरही सदोदित लक्ष ठेवणे. त्यामुळेच माझे मागे रारावत येणार्‍या ट्रक वरही माझे बारीक लक्ष होते. होता होता मी कात्रज घाटाच्या पहिल्याच वळणापाशी पोचलो, त्या वळणा आधी थोडा उतार लागत असल्याने व पुढे चढ सुरु होत असल्याने मी गाडी वेगात काढली होती. शिवाय मागिल ट्रकवाल्यालाही केव्हा एकदा तो मला ओव्हरटेक करतो अशागत चिकटायला येत होता. त्याचा ट्राक माझ्या गाडी मागे साधारणतः पंधरा फुटांवर असेल. आणि ते अचानक घडले.
गाडी वळणावर चढायला सुरुवात झाली अन अचानक एका क्षणात गाडीचे इंजिन बंदही पडले. इंजिनाचा तो खणार्धात बदलुन बंद पडत चाललेला आवाज माझ्यातल्या नकळत जागृत असलेल्या सिक्स्थ सेन्स ने टिपला व प्रतिक्षिप्त क्रियेने झटक्यात मी केवळ क्लज दाबला व स्टिअरिंग जीवखावुन डावीकडे फिरवले ते करत असता असताच खिडकीतल्या आरशातुन मागे देखिल पहात होतो. इंजिन क्षणार्धात बंद पडल्यावर तेही चढावर तर वेग कमी होउन गाडी थांबेल हे समजुन घ्यायला फार अक्कलेची गरज नव्हती पण ते समजुन समजुन तरी किती वेळात घ्यायचे? सगळ्या गोष्टी सेकंदाच्या काही भागात झाल्या, आरशातुन मागे बघत होतो तर माझ्या छातीत चर्र झाले, तो माझ्या मागे असलेल्या ट्रकवाल्याने त्याचा स्पीड जराही कमी न करता मात्र त्याचा ट्रक जीवाच्या कराराने उजवीकडे घेवुन मला ओव्हरटेक करुन पुढे गेला, त्या ट्रकचा क्लिन्नर ट्रकच्या दरवाज्यात उकीडवा बसुन एक हात बाहेर काढुन " अब्बे तेरेको कुछ समझता नही क्या " अशा अर्थाचे हातवारे करीत बोंबलत होता असे फक्त जाणवले. आरशातुन बघितले तेव्हाचा तो क्षण अजुनही डोळ्यासमोर आहे. ट्रक केवळ एक इंच येवढ्या अंतर बाजुने गेला होता. क्लज दाबला गेला नसता तर गाडीचा वेग गिअर अडकुन थांबल्याने गाडी जाग्यावरच उभी राहीली असती आणि तो ट्रक येवढ्या वेगात इतक्या जवळ मागे होता की त्या वेळेस त्याने कितीही उजवीकडे ट्रक नेला असता, म्हणजे कट मारला असता तरीही माझ्या गाडीच्या डिकीला त्याची धडक बसली असतीच असती.
क्षणभर माझ्या अंगावर शहारा आला. झाल्या घटनेचा विचार मी धक्क्यातुन सावध होउन करु लागलो, दरम्यान मी गाडी पेट्रोलवर करुन चालु करायचा प्रयत्न करीत होतो पण ती चालू होत नव्हती, आणि माझी ट्युबलाईट पेटली. गॅसचा सिलेंडर तर नविनच होता म्हणजे गॅस संपण्याची शक्यताच नव्हती तर गाडी अचानक बंद का पडली? आणि आता पेट्रोलवर स्वीच करुनही गाडी चालू होत नाही, कशामुळे? मी गाडीला धका मारुन बाजुला घेतली, बाॅनेट उघडले, शांतपेणे म्हणजे कुटुंबियांना फारसे काही झाले नाही असे दाखवित पेट्रोलचा पाईप स्वीचपासुन काढुन डायरेक्ट कार्बोरेटरला जोडला. एक दोन स्टार्टर मध्ये गाडी चालू झाली. नेमके असे घडले होते की त्या वेळेस माझ्या गाडीला जुन्या पद्धतीचा डायनोमा होता जो पुरेशा प्रमाणात वीज तयार करुन बॅटरीला चार्ज करु शकत नसे. त्यामुळे व प्रवासातील एकंदरीत स्विचेसच्या वीज वापरामुळे बॅटरी उतरत आली होती व जरी स्टार्टरला ती वीज पुरली तरी स्वीचेसना ती पुरत नव्हती, व एका विशिष्ट क्षणी गॅसचा पुरवठा चालू करुन ठेवणारे स्वीच बंद पडुन त्यामुळे भर रस्त्यात वेगात असलेली गाडी बंद पडली, सुदैव येवढेच की बंद पडायच्या आधी असलेला वेग जागच्या जागी कमी न होता क्लच दाबुन धरल्याने हळु हळु कमी होत गेला व मला गाडी डावीकडे घेणे शक्य झाले.
यातला जीवावरचा धोका असा होता की समजा एरवी अशा पद्धतीने साठ च्या स्पीडमधिल ट्रकची धडक चढावर असलेल्या माझ्या गाडीस जरी बसली असती तरी मागची बाजू डिकी चेंबली जावुन गाडी दोंगराच्या बाजुला फेकली गेली असती, तरीही किरकोळ जखमांशिवाय प्रवाशांना अधिक काही झाले नसते. पण या वेळेस डिकीत भरलेला स्पेअर गॅस सिलेंडर व गाडीला लावलेला काही वापरला गेलेला सिलिंडर होते, ट्रकच्या धडकेने जर त्यांचा स्फोट झाला असता तर? असा स्फोट होऊ शकतो! आणि झाला असता तर त्या ठिकाणी केवळ कोळसा शिल्लक राहीला असता.
देव अन दैवाची तशी इच्छ नव्हती, म्हणुन हे लिहायला मी शिल्लक आहे
बर्‍याच दिवसांनी लिहित असल्याने भाषेच्या आणी व्याकरणाच्या चुका असणार याची मला कल्पना आहे, त्याबद्दल क्षमस्व
मृत्युशी लपंडाव (२)
या गाडीनंतर, स्वःस्तात मिळाली म्हणुन अजुन एक जुनी फियाट घेतली, सलुन मॉडेल १९८१ चे. कुटुंबियांना घेवुन नाशिकची ट्रीप योजली. गाडीत मी सोडुन सर्व म्हणजे सहा स्त्रीया, एक लहान मुलगी, दोण बाळे. शिवाय मोटरसायकल वर सोबतीस दोघजण ज्यांच्याजवळही एक मुलगी. तर असा लवाजमा घेऊन निघालो असताना प्रथम ब्रेक सिलेंडर जाम झाल्याने रीम तापुन वास येवु लागला म्हणुन सकाळी सकाळी चाकण जवळ दुरुस्ती करुन घेतली, संगमनेर आधी गाडी एकदा पंक्चर झाली, व नाशिकरोड जवळ पुलावरुन आत शिरायच्या आधी एकदा पंक्चर झाली. दोन्ही वेळेस सोबत असलेली स्टेफनी बदलुन पुन्हा नजिकच्या दुकानातुन पंक्चर काढुन घेतले. जुन्या गाडीचे टायर जुने रिमोल्डेद असल्याने हे घडत होते. एक विचार नाशिक मध्ये नविन टायर ट्युब घेण्याचा करत होतो पण तेवढी रोख रक्कम बरोबर नव्हती अन नाशिकमध्ये क्रेडिटकार्डवर कुठे टायर मिळतील हेही समजायला मार्ग नव्हता. ज्यांच्याकडे जाणार होतो, त्यांच्याकडे पैसे मागणे प्रशस्त वाटत नव्हते. शेवटी तो विचार तसाच सोडुन दिला.
दुसर्‍या दिवशी सर्वजण वणीला देवीच्या दर्शनास गाडीतुन गेलो, तो दिवस माझ्या आठवणीप्रमाणे मंगळवार होता व दर मंगळवारीवर जायचा घाट रस्ता दुरुस्तीसाठी बंद ठेवला जात असे. त्यामुळे अत्यंत हिरमोड होऊन आम्ही परत निघालो. पायवाटेने दर्शनाला जाणे तसे खुपच अवघड आहे त्यामुळे ते रद्द केले. परत येताना वाटेत एका स्थानिक प्रवासी जीप वाल्याने मला ओलांडुन पुढे जाताना अतिशय तिरका कट मारला ज्यामुळे मला गादीचा वेग तत्काळ ब्रेक मारीत कमी तर करावा लागलाच पण गाडी डावीकडे रस्त्यावर उतरवायला लागली. असा नेहेमीचाच अनुभव आहे की टू व्हीलरवर किन्वा गाडीत स्त्रीया असतील तर आपले शौर्य किंवा वेगळेपण किंवा अस्तित्व दाखवायला अनेक प्रकारचे वाहनचालक असली कृत्ये करतात. एक सणसणीत शिवी हासडीत आता त्याला आडवेच जायचे असे ठरवुन त्याचा पाठलाग सुरु केला. तीन ते चार मिनिटे मी सत्तर ते ऐंशी च्या वेगाने पाठलाग चालू ठेवला पण माझी गाडी फारच जुनी असल्याने अन मी चिडुन पाठलाग करतो आहे असे समजल्याने तो जीपवालाही गाडी जोसात दामटीत होता. आणि एका क्षणात माझ्या मनात तो विचार चमकुन गेला. त्या जीप मध्ये प्रवासी खच्चुन भरलेले होतेच, पळुन जाण्याच्या नादात त्या जीपला काही झाले तर? आणि लगेचच माझी ट्युबलाईट पेटली, की अरे, माझ्याही गाडीत प्रवासी आहेतच की, तेव्हा उगिचच ही डोकेफोड नको करायला, आणि मी स्वस्थ झालो, शांतपणे गाडी चालवित नाशकात घरी पोहोचलो.
यावेळचा मृत्युशी झालेला लपंडाव अम्हाला कळला मात्र दोन दिवसांनी.
दोन दिवसांनी आम्ही सगळे जण पुण्याच्या परतीच्या वाटेवर लागलो. आणि कुणाचा विश्वास बसणार नाही, नाशिक सोडल्या सोडल्या नाशिक ते सिन्नरच्या दरम्यान गाडी पुन्हा पंक्चर झाली. तसे म्हणले तर त्यात काय विशेष? पण हा पहिलाच शेवटचा पंक्चर नव्हता. मंचर पर्यंत पोहोचेस्तोवर एकुण पाच वेळा मागिल दोन चाके आलटुन पालटुन पंक्चर होत राहिली आणि दर वेळेस स्टेफनी बदलल्यावर पुढे सापडेल तिथे पंक्चर काढुन घेणे ओघानेच आले. नशिबाने, बदललेल्या स्टेफनीचा पंक्चर काढुन घेण्याचे आत दुसरे चाक पंक्चर झाले नाही. गाडीतील सर्वच सहप्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत होत आला होता. दुपारी अडिचला नाशकातुन निघुन साधारणतः साडेपाच ते सहा तासात म्हणजेच रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान आम्ही मुक्कामी पोहोचणे आवश्यक होते
प्रत्यक्षात या पंक्चरच्या भानगडिंमुळे साडे आठच्या सुमारास आम्ही मंचरच्या अलिकडेच होतो. वैतागुन मी सगळ्यांना मंचरला ST बस पकडुन पुण्यात जाण्याची सुचनाही केली, पण कोणीच त्यास राजी झाले नाही. त्यात वाटेत दोन तीन वेळेस पाऊसही लागला ज्यामुळे मोटरसायकल वरील सहप्रवाशांची भिजल्यामुळे चांगलीच अडचण झाली.
यात मृत्युशी लपंडाव कुठे होता? तर नाशिक सोडल्यावर झालेल्या पाच पंक्चरपैकी एक जरी पंक्चर वणी ते नाशिक दरम्यान मी जीपच्या करीत असलेल्या ७० ते ८० किलोमीटर वेगातील पाठलागाच्या वेळेस झाला असता तर? आजही कल्पना जरी केली तरी अंगावर शहारा उभा रहातो, आणि मी देवाचे आभार मानतो की समोरील जीपमधिल प्रवाशांना काही होइल अशी शंका माझे मनात उभी केली.
एक विशेष म्हणजे त्यावेळेस गाडीत एक नवोढा म्हणजेच लग्नास पुरते एक वर्षही न झालेली नववधु होती.
बाकी प्रवासी तो प्रवास विसरलेही असतील, ज्यांचे लक्षात आहे त्यांना जाताना दोन नी येताना पाच वेळेस काढलेल्या पंक्चरमुळे झालेली माझी फटफजिती आठवुन हसु येत असेल पण मला मात्र वणी पासची रेस आणि नंतर झालेले पंक्चर यातला दुवा कळुन येवुन आजही देवाचे आभारच मानावेसे वाटतात

शुद्धलेखनाच्या चूकांबद्दल क्षमस्व.
मृत्युशी लपंडाव (३)
असेच एकदा नव्यानव्याने गॅसकीट बसविलेले असताना माझी पहिली फियाट घेवुन मी ऑफिसला चाललो होतो. गॅसच्या डीलरचे दुकान वाटेतच असल्याने सकाळी सकाळीच त्याला उठवुन नविन गॅस सिलेन्डर घेतला व घाईगडबडित बसवला. तिथुन माझी कंपनी साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर होती. अर्धा पाऊण किलोमीटर पुढे जात नाही तोच मला पेट्रोलचा वास येवु लागला, तेवढ्यात शेजारुन खरोखरीच एक टॅन्कर गेल्याने मी त्या वासाकडे दुर्लक्ष केले, मात्र हा अतिशय तीक्ष असा वास अधिकच येवु लागल्याने मन शंकित झाले, पण मी विचार करीत होतो की गाडी जर चालते आहे तर माझ्याच गाडीतुन गॅसचे लिकेज कसे काय होत असेल? लिकेज होत असत तर गाडी बंद पडली नसती का? आणि गॅसचा वास असा पेट्रोलच्या वासा सारखा थोडीच येतो? हे होइस्तोवर कंपनीच्या अलिकडचे वळण आले, तिथुन पंचवीस तीस मीटर अंतरावर कंपनीचे मेन गेट. काय सुबुद्धी झाली मला माहीत नाही पण मी खिडकीतुन डोके बाहेर काढुन शुद्ध हवा घेतली, तसेच वासाचे उगमस्थान गाडीत आहे की बाहेर याचा अंदाज घेतला, आणि माझी खात्रीच पटली की वास जरी पेट्रोल सारखा येत असला तरीही तो वास एल.पी.जी. चाच आहे. आणि मनात क्षणार्धात विचारांचे तांडव सुरु झाले, मी हळुवार पणे गाडी कंपनीच्या गेटमधुन आत नेली, नशिबाने सिक्युरीटीला फारसा संशय आला नाही किंवा आला असेल तरी त्याने तो बोलून दाखविला नाही. गाडी रिव्हर्स मधे घेऊन मी शब्दशः धडपडत उतरलो आणि कारची डिक्की उघडुन बघतो तर काय? रेग्युलेटर जाग्यावरच होता पण रेग्युलेटरच्या कडेमधुन करंगळीच्या जाडीची द्रवरुपातील गॅसची धार पडुन खालच्या रबर मॅटवर थारोळे तर्यार झाले होते. सर्वप्रथम मी रेग्युलेटर काढुन टाकला व सिलिंडरवर बुच बसवले. हे करताना कोणी नाक खुपसुन बघायला येत नाहीना याची धास्ती होतीच. झटक्यात डिक्की बंद करुन कार्ड पंच करुन मी माझ्या जागेवर पोहोचलो तेव्हा घामाने निथळत होतो. धातीतील धडधड कानांना स्पष्ट ऐकू येत होती.
असे काय झाले होते किंवा झाले असते?
वळणावर असताना मनात विचारांचे जे तांडव सुरु झाले होते त्यात एक विचार असाही आला होता की गॅस गळला तर डिक्कीतच गळणार आणि ज्यांना फियाटची डिक्की माहित असेल त्यांचे लक्षात येईल की हा गॅस मागिल टेल लॅम्प पर्यंत पोहोचला असता नी त्याच वेळेस मी ब्रेक मारल्याने जेव्हा दिवा लागेल त्या उष्णतेने किंवा दिवा लागताना कदाचित उडु शकणार्‍या स्पार्क मुळे तो सहजच पेटु शकला असता. फियाटमधिल टेललॅम्पचे ओपनिंग डिक्कीतच असते व ही गोष्ट घडणे सहज शक्य होते. वळणापासुन मी शक्यतो ब्रेक न लावण्याची खबरदारी घेत गाडी कंपनीजवळ तर आणली पण गेटमधुन आत शिरताना व रिव्हर्स घेवुन गाडी लावताना ब्रेक मारावेच लागले होते. केवळ नशिब जोरावर असल्यानेच हंडाभर पाणी जमिनीवर ओतल्यावर जसे थारोळे होइल तेव्हडा गॅस गळुनही ब्रेकच्या दिव्यांच्या धगीने तो पेटला नाही. सकाळी गाडि सुरु करताना आदल्या रात्री चालुच राहीलेले दिवे बंद करण्याची खबरदारी घेत असल्यानेच केवळ रात्री चालु रहाणारे लाल दिवे स्वीच ऑफ केल्याने चालू नव्हते. काळ आला होता, मृत्युही अक्षरशः आसपास घोटाळला रेंगाळला होता, पण वेळ आली नव्हती हेच खरे.

गॅस अशाप्रकारे गळण्याचे कारण तपासता असे लक्षात आले की रेग्युलेटर बसवताना काही चूक झाली नव्हती मात्र सिलेंण्डरच्या तोंडाच्या आत एक रबरी ओ रिंग असते ती खराब झाली होती किंवा तिचा आयडी साईझ रेघुलेटरच्या आतील पुंगळीच्या ऑडीशी जुळत नव्हता.
तिथुन पुढे अशा पाच सहा ओ रिंग्ज जवळ बाळगत पुढिल वर्ष दीड वर्ष गाडी तशीच गॅसवर चालविली. नंतर या गाडीचे कीट काढुन दुसर्‍या गाडीसही घरच्या घरीच बसवले. मात्र नंतर खाजगी एल.पी.जी च्या किंमती वाढल्याने व गॅसवर गाडी चालविणे मला धोकादायक जाणवु लागल्याने नंतर गाडी पेट्रोल वर वापरली, जेव्हा पेट्रोलहि परवडेनासे झाले, गाड्या भिंतीकडेला लावुन ठेवुन दिल्या, आवारातल्या मांजरींकरता त्या गाड्या म्हणजे छानसे घर झाले आहे, त्यांच्या तीनचार तरी पिढ्या त्या गाड्यांमध्ये जन्माला आल्या.
मृत्युशी लपंडाव (४)

बर्‍याच वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्यावेळेस पुणे लोणावळा मार्गावर मुंबईसारख्या फक्त दोन युनिट लोकल्स धावायच्या, व बाकी लोकल्स या प्रवासी गाड्यांचे जुने डबे एकत्र करुन बनविलेल्या असायच्या. मी ज्या स्टेशनवर उतरायचो तिथे स्टेशन केवळ मंजुर झालेले होते पण स्टेशन नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता त्यामुळे नेहेमीचे प्रवासी स्टेशनच्या आगोदर चेन खेचुन गाडी थांबवायचे व रेल्वेतच कामाला असलेले कुणी माहितगार डब्याच्या वरच्या कोपर्‍यात बाहेरून असलेली ब्रेकची चावी पुन्हा बंद करायचे. गाडी थांबल्यावर धडपडत उड्या टाकणे व कधी पाय मुरगळुन तर कधी खडीवर गुढगा आपटल्याने खरचटणे सगळ्यांनाच नेहेमीचेच रडगाणे होते. हे स्टेशन येण्या आधी एक भले मोठ्ठे वळण होते, त्या वळणावर गाडी आली की उतरणारे आपापल्या डब्याच्या पिशव्या वगैरे घेवुन दरवाजात येवुन उभे रहात असू. घरी लौकर जायची ओढ असल्याने व बरीच इतरही कामे हाता वेगळी करावी लागत असल्याने लोकल मधुन लौकर उतरुन घरी पोहोचण्याची घाई बर्‍याच जणांना असे, त्याला मी ही अपवाद नव्हतो. आणि त्यामुळेच वळण आल्यावर आधी पुढे जाऊन दरवाजात उभे रहाणे व गार हवा खाणे ही आवडीची बाब होती. हे वळण खुपच मोठे असायचे व आधीचे स्टेशन सोडल्यावर इथे पोहोचेस्तोवर गाडी खुपच वेगात असायची. मोठे वळण असल्याने ज्या दिशेला वळण त्या दिशेला रेल्वे कललेली असायची.
त्या दिवशीही, नेहेमीच्या सरावाने मी सर्वप्रथम दरवाजात येवुन उभा राहीलो. गाडी ज्या दिशेला कललेली असायची त्याच दिशेकडे मला उतरायचे होते. कस कोण जाणे पण त्या दिवशी विचारांच्या खुपच तंद्रित होतो आणि दरवाजाजवळ येवुन एका हाताने दरवाजा जवळच्या उभ्या बारला पकडुन उभा राहिलो उभा राहिलो ते दोन्ही पायाचांचे पुढेचे बोटांकडील तळवे कडेच्या बाहेरच राहीले ते कळलेच नाही. विचारांचा नादातच एका हातात पिशवी सांभाळीत असतानाच अवचितपणे उभ्या बारवरील हात सोडला गेला. अर्थात हात सोडला गेला म्हणजे काही माणुस लगेच पडत वगैरे नाही. पण नेमक्या त्याच क्षणी, आमच्या कललेल्या डब्याने रुळांच्या जॉईंटवर एक जोरदार हेलकावा घेतला आणि माझा तोल सपशेल पुढे गेला. पायाची बोटे आधारच नसल्याने, त्यावर तोल सावरणे शक्य होत नव्हते. जीवाच्या कराराने अंदाजानेच हात उभ्या बारकडे नेला पण तोही झटदिशी पकडीत आला नाही. माझ्या मागिल दोनचार सहप्रवासी तर "गेला गेला" असेच ओरडले व मागिल प्रवाशाने झटदिशी हात पुढे करुन माझ्या शर्टाची कॉलर मागुन पकडली. हा सर्व खेळ सेकंदाच्या आत झालेला, तो मागिल माणूस मला पकडण्याचा प्रयत्न करीत असता असताच मी उभ्या बारवर पकड जमवु शकलो होतो. तो पर्यंत केवळ टाचेवर पुढे गेलेला झोक मागे करण्यासाठी शरिरातील स्न्यायुंची झालेली जीवघेणी प्रतिक्षिप्त धडपड आठवली की आजही अंगावर काटा उभा रहातो. गाडी येवढ्या वेगात होती की तिथे पडल्यास कपाळमोक्ष निश्चितच ठरलेला. मागिल सहप्रवासी आत्ता वाचलास म्हणुन अभिनंदन करू लागले तर काही जण कशाला येवढी घाई असे म्हणत सांभाळुन रहाण्याचे सल्ले अधिकारवाणीने देवू लागले.
ती वेळ गेली तेव्हा मला लगेच फारसे विशेष असे जाणवले नाही मात्र घडल्या प्रसंगाचा अर्थ जेव्हा लक्षात आला तेव्हा माझ्या उतरण्याच्या ठिकाणी उतरताना पाय शब्दशः थरथरत होते व घरी पोहोचेस्तोवर त्या धक्क्याने मन कावरे बावरे होऊन सैरभैर झाले होते. घरी पोहोचल्यावर घडली गोष्ट आईला सांगितल्यावर मग थोड शांत वाटू लागले.
असे क्षण आयुष्यात अनेकदा येवु शकतात, त्यातिल काही लक्षात रहातात काही विसरलेही जातात तर काही क्षण येवुन गेले तरी त्या क्षणांची ओळखच आपल्याला पटत नाही
डुलकी
GS1 यांची येथिल गोष्ट वाचुन मलाही माझ्याबाबत घडलेली अशीच गोष्ट आठवली.
चारएक वर्षांपुर्वीची घटना, त्या दिवशी सर्व दिवसभर ऑफिसमध्ये खुपच धावपळ झाली होती. चारचारदा तीन मजल्यांच्या इमारतीत वर खाली करुन आणि पुण्यात जावुन आल्यामुळे अतिशय थकायला झाले होते अन केव्हा एकदा अंथरुणाला पाठ लावतो असे झाले होते. तरीही घरी पोचायला आठ तरी वाजले. आता थोडावेळ टीव्ही बघुन लगेच झोपावे असा विचार करीत असतानाच माझा एक मित्र सांगत आला की सातार्‍यापासुन जवळ असलेल्या गावातील त्याची आई वारली आहे आणि सर्वांना लगेच निघायला हवे. आम्हि एकदोघांनी ट्रॅव्हलच्या गाड्या मिळतात का ते बघितले तसेच एकदोन मित्रांकडे पण चौकशी केली. ऐनवेळेस यायला कोणी तयार होईना आणि जे तयार झाले त्यांनी अवाच्या सवा भाडी सांगितली. शेवटी मित्रा एक जीप ठरवुन काही माणसे पुढे पाठवली, काही जण एसटीने गेले. तरीही अजुन काही जवळचे नातेवाईक शिल्लक होते. शेवटी माझी जुनी फियाट काढावी असे ठरले. आणि तसेही मलाही तिकडे जाणे आवश्यकच होते.
तेवढ्या थोडक्या वेळात गाडीची तपासणी करुन ब्रेक ऑइल वगैरे बघुन, गाडीत पुरेसे पेट्रोल भरुन घेवुन तसेच प्यायचे पाणी काही खाद्यसामुग्री वगैरे घेवुन रात्री साडेदहाच्या सुमारास घर सोडले ते साधारणतह दीडच्या सुमारास सातार्‍याजवळील महागाव येथे पोहोचलो.
येथपर्यंत सर्व ठीक होते. घरात जावुन दर्शन घेवुन आलो, रडणारी मंडळी बघुन कालवाकालव होत होती. मला असले प्रसंग झेपत नाहीत. मी बाहेर येवुन गाडीतच झोपायचा विचार करीत होतो तर माझा मित्र सांगत आला की त्याच्या मामाला म्हणजे मृत आईच्या वयस्क भावाला घेवुन येणे आवश्यक आहे. मला नाही म्हणता येणे शक्यच नव्हते मात्र येताना समोरील गाड्यांच्या दिव्याच्या उजेडाने डोळे दिपत राहिल्याने मी आधिच हैराण झालेलो होतो त्यात नविन अनोळखी निर्मनुष्य रस्त्याने रात्रीचे जायचे म्हणल्यावर मला जरा काळजीच वाटत होती. सोबतीला मित्राला आणि अजुन एकाला घेवुन आम्ही निघालो. कोरेगावच्या पुढे पुसेसावळी आहे तिथुन डावीकडे वळुन दहा पंधरा किलोमीटर अंतरावर ते गाव होते. पुसेगावपासुन आम्ही डावीकडे वळलो ते एका अत्यंत चिंचोळ्या रस्त्याने जाऊ लागलो. मला झोप अनावर होत होती पण कसोशीने डोळे ताणताणुन उघडे ठेवायचा प्रयत्न करीत होतो. कसही करुन पाठ सीटाला टेकणार नाही याची दक्षता घेत होतो. स्टेअरिंगवर ओणवे होऊन पुढे वाकुन डोळे ताणताणुन समोरील काचेतून पुढे दिव्यांच्या उजेडात रस्त्यावरची नजर ढळू न देता गाडी चालवित होतो अन एका चढावरील तीव्र वळणावरच नेमकी मला एखाद सेकंदाची असेल, डुलकी लागली. खर तर त्याला मी डुलकी असही म्हणु शकत नाही. शरीराने डोळ्यांनी आता काम करण्याचा निषेध करीत तेवढ्या सेकंदाकरिता जणु संपच पुकारला. कसे कोण जाणे मी झटकन त्या धुंदीतुन जागा झालो. गाडीचे उजवे चाक रस्त्याची उजवी बाजु उतरले होते नी रस्ता डावीकडे वळत असल्याने समोर खड्डा होता. हे वर्णन करायला फारच वेळ लागतो. प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी निमिषार्धात घडुन गेल्या, मी जीवाच्या कराराने स्टेअरिंग डावीकडे फिरवले व गाडी नीट रस्त्यावर घेतली, शेजारी बसलेल्या मित्राकडे पाहीले, तो चांगलाच दचकलेला होता. अरे सांभाळुन रे, हवे तर इथे गाडी थांबव आणि थोडी झोप काढ असे तो म्हणाला, पण मी ते नाकारले, त्याच्या कडुन पाण्याच्या बाटलीचे बुच काढुन घेवुन माझ्या एका हातावार पाणी घेवुन ते डोळ्यांना लावले, यथावकाश त्या गावातुन त्याच्या मामाला घेवुन परत महागाव येथे पोचलो. पुढील तयारी होइस्तोवर मात्र मी सरळ गाडीमध्येच झोपुन गेलो. सकाळी साडेआठ नंतर सर्व विधी उरकल्यावर बाराच्या सुमारास आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
कधीकधी असेही अनुभव येतात जेव्हा काही एक शक्ती कार्यरत असुन तुमचे रक्षण करतात असे जाणवते अन्यथा त्या क्षणी लागलेली डुलकी एखाद सेकंद जरी अधिक टिकती तर आमची गादी शब्दशः खड्यात गेली असती.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner wakdya Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators