Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बीन टाऊनच्या बाता ...
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » बीन टाऊनच्या बाता « Previous Next »

बॉस्टनच्या सिंफनी हॉल मधे माझं गाणं होऊन नुकतंच एक वर्ष झालं.

पाश्चात्य शास्त्रीय संगीताच्या दुनियेत जगातलं २ किंवा ३ क्रमांकाचं हे प्रेक्षागृह. इथे गाणं तर सोडाच पण त्या प्रेक्षागृहाला नुसती भेट देणं हे काशीयात्रेला गेल्याचं पुण्य मिळवून देतं म्हणतात.

http://en.wikipedia.org/wiki/Symphony_Hall,_Boston


प्रेक्षागृह खच्चून भरलं होतं. आपली थोडीशी चूक झाली तरी नाक वर करून चालणारे बोस्टनवासी "बोस्टन ब्राह्मण" मला कच्चा फाडून किंवा New England Choudar मधे घालून खाणार याची पूर्ण कल्पना होती. कलेच्या प्रांतात अटलांटिकच्या या बाजूला बोस्टनची ख्याती पुण्यासारखी आहे. Afterall it is called "The hub of universe." बोस्टनवासियांच्या पसंतीला उतरल्याशिवाय तुम्हाला गाता येतं असं समजत नाही. आणि त्यातही सिंफनी हॉल मधे गाणं म्हणजे सवाई गंधर्वमधे गाण्यासारखं.
गाणं होतं मोझार्ट नं १७७६ साली साल्झबर्ग मधे लिहिलेलं Litaniae de venerabili altaris sacramento in E flat

http://www.mozartproject.org/compositions/k_243__.html
असं म्हणतात तेंव्हाच्या पारंपारिक संगीताच्या नियमांना झुकारून, प्रेक्षकांपर्यंत गाणं नेण्यासाठी मोझार्टनं केलेला हा बंडखोरपणा होता. वर दिलेल्या दुव्यावर असलेली या गाण्याची अधीक माहिती वाचण्यासारखी आहे. हे गाणं तसं म्हणायला सोपं आणि सोप्या पट्टीतलं. (E Flat) . गाण्याची निवड कळल्यावर बोस्टनचे समीक्षक लांडगे मला "अजून बच्चा आहे" म्हणून सोडून देतील किंवा फारतर मी अजून सिंफनी हॉल मधे गाण्याच्या लायकीचा नाही म्हणून अनुल्लेखानेच मारतील अशी आशा तेंव्हा माझ्या मनात डोकावून गेली. पण कुठल्याशा ऐतिहासिक प्रसंगाचा वारसा त्या ऐतिहासिक सभागृहात आपण चालवत आहोत याची धुंदीच जास्त होती.

गाण्याला सुरुवात झाली आणि ते संपलं देखील. खरंतर मी घेतलेल्या जागांपैकी एकही आज मला आठवत नाही. आठवतं ते
गाणं संपल्यानंतरची दोन सेकंदाची संपूर्ण शांतता आणि सुमारे चार हजार रसिकांनी, सिंफनी हॉलचे छप्पर उडवेल असा केलेला टाळ्यांचा कडकडाट. लोक इथेच थांबले नाहीत तर उठून उभे राहून standing Ovation ही दिले.

स्वस्तुतीचा दोष पत्करून आणि शपथपूर्वक सांगतो यातला शब्द आणि शब्द खरा आहे.

त्याचं असं झालं, कार्यक्रमाचा संचालक (conductor) ग़्रॅंट लेलविनने मोझार्टच्या श्रोत्यांपर्यंत हे गाणं नेण्याच्या मूळ हेतूला आणखी पुढे नेवून सभागृहात बसलेल्या आम्हा चार हजार रसिकांकडुन ते गाऊन घेतलं :-). माझ्या शेजारची एक बाई मधूनच बेसूर गात होती. उगीच खवचटपणे कुणीतरी, माझ्या दिशेने बेसूर शब्द येत होते आणि मी C Sharp मधे गात होतो, असे म्हणायच्या अगोदर, आधीच स्पष्ट करतो.

आज त्याच सभागृहात "व्यासपीठावर" माझ्या मुलीचा कार्यक्रम आहे.मुख्य कार्यक्रमातला एक छोटासा भाग म्हणून. तिला शुभेच्छा देताना मी म्हणालो"तू छान गाशील याची मला खात्री आहे. लोक उगीचच सिंफनी हॉल चा बाऊ करतात. अगदी व्यासपीठावर नसलो तरी तिथून काही फुटावर मी आत्मविश्वासाने गायलो आहे. आहे काय त्यात एवढं. शेजारी कुणी बेसूर गाणारं नसेल एवढी काळजी घे म्हणजे झालं. "
"एक सिगारेट काढ !"
"सॉरी, मी दुसरीत सोडली. "
"?XX**+$$%%"

अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना कॉलेज सोडून कूठे नाटकं कर, मासिकं चालव, वैद्यकीचा अभ्यास कर असले धंदे केल्यामुळे बर्‍याच "कलाकार" मंडळींचा सतत सहवास असायचा. त्यामुळे वर लिहिलेला संवाद वरचेवर व्ह्यायचा आणि मी एक विनोद केला असं म्हणून लोक सोडून द्यायचे.

पण मी खरंच दुसरीत सिगारेट सोडली.

लहानपणी सिगारेटचं आकर्षण वाटायचं. ते काय आहे हे कळायचं नाही. पण त्याबद्दल मित्रांबरोबर काहीतरी बोलल्याचं अंधुक आठवतंय. माझी शाळा घराच्या अगदी जवळ होती. तेंव्हा माझा मी मित्रांबरोबर घरी चालत येत असे. एकदा घरी येत असतांना वाटेतल्या बस स्टॉप वर एक माणूस सिगारेट ओढत होता.
तेव्हढ्यात बस आली म्हणून त्यानी ती सिगारेट पटकन टाकली. लगेच अस्मादिकांनी ती उचलली आणि एक झुरका घेतला. काय झालं ते नक्की आठवत नाही पण श्वास टाकला की आपल्या तोंडातून सिगारेट चा वास येतो असा शोध लागला. लगेच बरोबरच्या मित्रांना प्रात्यक्षिक सुरु झाले.
"ए हे बघ माझ्या तोंडाला कसला वास येतो"

लगेच मी एकदम हीरो झालो.

घरी आल्यावर मी आईला करून दाखवलं.

"आई हे बघ माझ्या तोंडाला कसला वास येतो."

!!!!!!!!!!!!

आईने दिलेली श्रीमुखात, अजून लक्षात आहेत.

दुसरीत सिगारेट सोडायची, म्हणजे केव्हढा मनाचा निश्चय करावा लागतो हे तुम्हाला काय कळणार ? :-)

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators