निसर्ग  foolproof  नाहि असं मला वाटतं त्याला बरीच कारणं आहेत  ..  त्यातलं एक आज लिहायचा प्रयत्न करते  ..  
 
 Natural calamities ..  दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, भूकंप,  tornados, typhoons, tsunamis etc.,  का घडतात? मी बर्याच वेळा ऐकलं आहे की ही निसर्गाची स्वतःचा  balance  राखण्याची तर्हा आहे  ..  माणसाने ज्या प्रकारे निसर्ग  exploit  केलाय आणि ह्यामुळे जो  imbalance  निर्माण झालाय तो  control  करण्यासाठी ह्या  calamities  घडतात  ..  पण मग ह्यात प्राण मात्र किती निष्पाप लोकांचेही जातात ना? त्यात बळी जाणार्या सर्वांनीच निसर्गाचा अवमान केलेला नसतो  ..  ओल्याबरोबर सुकंही जळतं, असंच काहितरी होतं  ..  पण जर निसर्ग किंवा पर्यायाने देव  almighty  आहे,  just  आहे,  foolproof  आहे, तर ज्यांच्या हातून चूक घडलीये त्यांनाच आणि फ़क्त त्यांनाच शिक्षा व्हायला हवी  ..  निसर्गाचा असा न्याय चुकीचा नाहि का?