Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 26, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » vinaydesai » Feedback » Archive through September 26, 2006 « Previous Next »

Vinaydesai
Tuesday, August 22, 2006 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, 'ए. वे. ए. ठि.' म्हणजे एका वेळी एका ठिकाणी... (मी ए. वि. चूकून लिहिलं..)...

काही करामती NJ कर एकाच वेळी दोन ठिकाणी असण्याची किमया करतात, तर काही कधीच एका ठिकाणी सापडत नाहीत, म्हणून NJ मध्ये GTG ला ए. वे. ए. ठि. म्हटले जाते (पहा NJ BB )

झुपडी नावाचं एक गुजराथी खाद्यगृह आहे, जे NJ मध्ये बर्‍याच लोकाना माहीत आहे.

MR काड्या.. काड्या... काड्या.. चालू देत.. (विमानांच्या तिकिटांचे बोललो नाही तर असा सूड?)



Zakki
Thursday, August 24, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, स्वानुभवावरून सांगतो. काऽहीहि विचार करू नका. उगीच डोक्याला ताप. असे भारतातल्या परिस्थितीचा विचार करत बसलात तर डोकेदुखीखेरीज काहीहि मिळणार नाही.

मुख्य म्हणजे असले derogatory विचार या मायबोलीवर मांडू नका. इथले लोक लगेच म्हणतील, 'आमचे दोष काढायची गरज नाही. अमेरिकन पण वाईट असतात'. नि पुढे काऽहीहि होत नाही, उगाच मनस्ताप.

प्रत्येक देशाचे काहीतरी वैचित्र्य असतेच की. असे म्हणायचे नि गप बसायचे. भारतीयांबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल इथे काऽही लिहायचे नाही.

(फक्त पुण्याबद्दल लिहावे, मज्जा येते. कुणि जाम भडकतात, तर कुणि रडतात! पण कुणि मान्य करत नाहीत की आहोत बाबा आम्ही थोडे विक्षिप्त).



Rupali_county
Thursday, August 24, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय जी

तुम्चा २४ तारखेचा लेख वाचला.. मुम्बापूरी बद्दल अतिशय योग्य तेच तुम्हि लिहिल आहे... पण एक प्रश्न.. मुम्बई तील लोकसन्ख्या किती हे तुम्हाला ठाउक आहे का? लोकसन्खे पाइ तिथे सर्व काम वेळेवर व्यव्स्थित करून देने आणि घेने हे अतिशय कश्टाच आणि जिकरि च काम आहे, मि स्वत: तेथे राहीले आहे चान्गली १५ वर्श... खूप वेगळे अनूभव आलेत...

मला इथे कूणालाही दूखवायच नाही...

आभार

रूपाली


A_sayalee
Friday, August 25, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, वरती रुपालीने म्हटलंय तसंच मलाही वाटते. परदेशात जे लोकं एवढे, बस, ट्रेन अथवा इतर सार्वजनीक ठिकणी "पहेले आप, पहेले आप" करत सौजन्य दाखवतात ती resources आणी infrastructure मुबलक असताना. इथे बस, ट्रेन मधे चढणार्‍या प्रत्येकाला बसायला मिळेल ह्याची हमी असते बहुतकरून.
ह्याच्या अगदी विरुध्द आपल्याकडे...मग धक्काबुक्की करणं, लोकांच्या अंगवळणीच पडलंय असं मला वाटतं, त्याला ते तरी काय करणार?


Vinaydesai
Friday, August 25, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी मान्य.. मीही मुम्बईत राहिलोय.. आणि तिथे धक्काबुक्की करावी लागते हे मलाही मान्य.... पण धक्काबुक्की करायाला कुणीच नाही म्हणून सहप्रवाश्याला ढकलून द्यावं हे पटण्यासारखं आहे का?
:-)

Zakki
Friday, August 25, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते मुख्य मुद्दा असा होता की 'गरज नसताना' उगीचच 'मुद्दाम घुसेन' सारखे वागणे हे बरोबर नाही असे विनयला म्हणायचे असावे.


म्हणजे शंका येते की चांगले संस्कार नाईलाजाने बाजूला ठेऊन धक्का बुक्की, घुसाघुसी करायची, की संस्कारच असे की धक्काबुक्की करायची नि घुसायचे, आणि ते संस्कार काही परिस्थिती बघून बाजूला ठेवता येत नाहीत.


Mrinmayee
Wednesday, September 13, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, याला म्हणतात अगं अगं म्हशी...
पण वाचला, वाचला, अख्खा वृत्तांत वाचला. जीव कसा शांत झाला. आता रात्री सुखाची झोप लागेल!
सगळ्या सोहोळ्याला कशी एक कारुण्याची झालर वाटते! ढोकळे-मिरच्या भक्षणाचा भाग आणि त्यानंतरचे त्याचे परीणाम याची कल्पनासुद्धा करवत नाही!! :-)


Raina
Wednesday, September 13, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय- दिल्यानदिल्यासारखा वृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद. हा न(व) वृत्तांत मस्तच!एक(च) शंका आहे- हे 'आनंदराव " कोण, आणि ते ढोकळा प्रकरण शब्दश: वाचायचे का? की त्यामागे काही रुपकात्मक (नवसाहित्यासारखा दुर्बोध) सखोल आशय दडलाय?

Vinaydesai
Wednesday, September 13, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Raina हा Report होता वृत्तांत नाही.. आनंदराव कोण असा प्रश्न HG वर विचारू नये, इथे पुण्यातील पुणेकर सगळे येतील, हिंजेवाडी सकट....
बाकी तू म्हणतेस ते खरं ढोकळा हे एक गुजराथी पदार्थाचे प्रतीक आहे, आणि मिरच्या हे झोंबण्याचे प्रतीक... त्यामुळे अर्थ आवडेल तसा घ्यावा..
दिवे दिवे..



Swaatee_ambole
Wednesday, September 13, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, बरेच दिवसांनी आले तुझ्या पानावर. सगळेच वृत्तांत ( आणि न-वृत्तांतही) - नेहेमीप्रमाणेच - छान जमले आहेत.

Zakki
Wednesday, September 13, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला विनय, फुकट काहीतरी काय लिहितोस? त्यात काही प्रतिक, रूपक, सखोल आशय, दगड धोंडे काऽहीहि दडले नाही. ढोकळे वाढणे नि त्यात भरपूर मिरच्या असणे यावरून ती एक प्रसंगजन्य गोष्ट! आता त्यात विनोदी काय हे बघणार्‍यावर अवलंबून. पण बाकी काही नाही.

या साहित्यिकांना नको तिथे उगीच काहीतरी गूढ, सखोल आशयाचे असे वाटत असते, स्वत:चा मोठेपणा दाखवण्यासाठी

असो.




Anilbhai
Wednesday, September 13, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे आनंदराव म्हणजे झक्कींचे अगदी फ़ास्ट फ़्रेंड दिसताहेत.
त्याना काही बोलल की ह्याना मिरच्या का झोंबाव्या बरे?.
:-)

Zakki
Thursday, September 14, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता हे सगळे New Jersey च्या BB वर न्या!! तिथे बघून घेईन!

Seema_
Saturday, September 16, 2006 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय तुम्ही दुर्बोध लिहायला घेतलत कि काय? कविता ऐवजी व्रुतांत दुर्बोध अशी सुरुवात का? ~DD

Lopamudraa
Monday, September 18, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालवण चा लेख मस्त आहे.. अगदी त्या गोड भाषे सारखा...!!!

Vinaydesai
Monday, September 18, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, अगं नुसतं साधं काहीतरी लिहायला घेतलं तर इथे धमक्या येत आहेत... मी कसलं आणि काय लिहिणार?


Dineshvs
Monday, September 18, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, भावना, आमचे घर मेढ्यातच. शाळेच्या मे महिन्याच्या सगळ्या सुट्ट्या तिथेच घालवल्या. साळगावकरांचे देऊळ मात्र अजुन बघितलेले नाही.


Zakki
Tuesday, September 19, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं नुसतं साधं काहीतरी लिहायला घेतलं तर इथे धमक्या येत आहेत
अहो विनय, असे घाबरता काय फुसक्या धमक्यांना! तुम्ही बेधडक लिहीत जा, आम्ही आहोतच तुमच्या मागे उभे.

एऽऽ कोण रे तो म्हणतोय् 'तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो!' खरारडा खोटारडा!


Milindaa
Tuesday, September 26, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, तुमचा आयडी येथे (किंवा कोठेतरी) द्याल का? मायबोलीवरुन एकावेळी सलग २ पेक्षा जास्त निरोप पाठवता येत नाहीत

Vinaydesai
Tuesday, September 26, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे लक्षात नाही आलं....

माझा E-mail Id आहे
vinay1desai@gmail.com ...

जर गीतकार संगीतकार माहीत नसतील तरी चालेल, फक्त तसं लिहा...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators