Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
dwidhamedha
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dwidhamedha « Previous Next »

शुक्रवारी मायबोलीकर अनामिक च्या कृपेने यू पेन मधून पाच सात पुस्तके मिळाली. माणसे अरभाट आणि चिल्लर एकदा वाचून संपलं. परत एकदा वाचून आणि झेरॉक्स मारून ठेवावी म्हणतेय. त्यात शेवटचं भुशुंड पक्ष्याला उद्देशून लिहिलेलं स्वगत एकदम भारी आहे. नव्याने जी ए वाचणार्‍यांनी ह्या पुस्तकापासून सुरुवात करावी.

आता गूढयात्री सुरू करायचंय आनि नंतर गाथा सप्तशतीचं वाईट इंग्रजी भाषांतर. एकदा चक्रवर्ती राजगोपालाचारींचं महाभारत वाचायला लावलं होतं वडिलांनी. त्याची आठवण आली ते चाळताना. वडिलांनी कधी शिक्षा केली नाही, मारणं, हात उगारणं तर सोडाच, कधी आरडा- ओरडा पण नाही. पण सातवीत असल्या पासून, तेही मराठी माध्यमात illustrated weekly वाचायला लावणे, सातवीनंतरच्या सुट्टीत Oliver Twist वाचायला लावणे, अकरावीत असताना एकटीला सांताकृझ पासून Old Customs House मधे जाउन Domicile सर्टिफ़िकेट करायला लावणे असले बरेच 'लाड' केले. राजाजींची पुस्तके वाचायला लावणे हा सुद्ध त्या लाडाचांच भाग. पुन्हा मला त्यांची भाषा आवडत नाही फार बोजड आणि विनाकरण क्लिष्ट आहे म्हटल्यावर वैतागले होते. आता सुद्धा मला डिकन्स आणि इनॉर्गॅनिक केमिस्ट्री, एम वी कामत आणि थर्मोडायनॅमिक्स सारखेच आवडतात.


यु पेन मधे मला तरी त्या गाथा सप्तशतीचं मराठी भाषांतर सापडलं नाही. कुणाला गाथा सप्तशतीच्या मराठी भाषांतराबद्दल माहिती असेल तर लिहा प्लीज? जगनबुवांनी दोन-चार श्लोक लिहिले होते त्यानंतर अधून मधून इतर साहित्यात पण हे उल्लेख आले आहेत पण अजून पुस्तक वाचायचा योग नाही आला.
एक झेन प्रश्न्:

त्या What would you like on your epitaph वाल्या सेमिनार मध्ये अजून एक प्रश्न विचारला होता
If a tree falls in forest and no one hears it, is there sound or not? . आमच्या पैकी बी एस सी, बी ई वाल्या मंडळींनी sound energy वगैरे फंडे मांडले होते. तर इतर म्हणाले होते की ऐकायला कोण नसेल तर कसला आवाज आणि कसलं काय!

मग मी म्हटले की समजा मी मर्सिडिज गाडी घेतली आणि ती पहायला कोणी नसेल तर माझ्याकडे मर्सिडिज नाहीच असं धरायचं का? त्यावर सगळ्यांनी माझी यथेच्छ टिंगल केली होती- सायकल पण नीट चालवता येत नाही तू गाडी कशी चालवणार आणि ती सुद्धा मर्सिडिज इ. इ.

त्यानंतर सात आठ वर्षांनी गाडी घेतली. पहिली गाडी एका अक्सिडेंटमधे गेल्यावर चक्क मर्सिडिज पण घेतली. ती मर्सिडिज विकली त्यालाही तीन-चार वर्षं होउन गेलीत. पण त्यावेळच्या मित्र मैत्रिणींपैकी कोणी ती मर्सिडिज पाहिली नाही ही खंत मात्र आहे.

If a tree falls in the forest and no one hears it, there really is no sound! हेच खरं की काय
कॉकटेल अळुवड्या

माझ्या घराजवळच्या देशी दुकानात अळु कधी मिळत नाही. त्यामुळे कधीही एडिसन ला गेलो की मी आवर्जून अळु घेते. तिथले दुकानदार फार हुशार. अशा खुबीने एखादं ताजं पान वरती दिसेल असं पॅकिंग करतात. कितिही पारखून घ्यायचं म्हटलं तरी नक्की कशी पानं निघतील ते सांगता येत नाही.

बरीचशी पाने कोमेजलेली, बावलेली निघतात. मग फ, किंवा चणे घालून आळवत्ती ( कोकणी प्रकार आहे तो) करण्याखेरीज पर्याय नाही.

काल चक्क सर्व पानं ताजी निघाली. अगदी छोटी छोटी पानं होती. आई किंवा मावशी इथे असती तर त्यांनी प्रत्येक पानाची बारीक वळकटी करून गाठ मारून भाजी केली असती. मला ते कुठलं जमायला.

तरी नवरा म्हणाला ' पात्रा बनाने को नहीं जमेगा क्या?' . मग इतक्या छोट्या पानांच्या वड्या करता येणार नाहीत वगैरे त्याला सांगून पाहिलं. तर तो म्हणाला ' अच्छा है, छोटे पत्ते हैं. जादा काम नहीं लगेगा और फेकना पडा तो भी ज्यादा बुरा नहीं लगेगा.'

मायबोलीवर शोधण्याइतका वेळ नव्हता. आई, मावशी, गेलाबाजार एखाद्या मैत्रिणीची आई, सासू कोणीच अमेरिकेत नाही म्हणून शंख करून झाला. भारतात पहाटे पाच वाजता उठवून अळुवड्यांबद्दल विचारले तर नक्की शिव्या मिळतील हे ही सांगून पाहिलं. मग रुचिरा, पर्फ़ेक्ट रेसिपी आणि रसचंद्रिका यांची तुलना करून झाली. शेवटी बेसनाचं मिश्रण लावलेल्या वड्या त्यातल्या त्यात सोप्या असा विचार करून एकदाच्या अळुवड्या करायला घेतल्या.

चार पाच इंच रुन्दीची पानं होती. अर्धा कप बेसन, एक पाकळी लसूण, अर्धा से मी आलं, हळद, तिखट, हिंग, मीठ, चमचाभर कच्चं तेल पाण्यात कालवून लावून तीन छोट्या छोट्या वळकट्या केल्या. पीठ जरा पातळच झालं होतं त्यामुळे पीठाचा थर अगदी पातळ ( नीट लावलेल्या मेकपसारखा) दिसत होता. कूकरमधून वाफवून वड्या कापल्या आणि तेलावर मोहरी, हिंग आणि तिळाची फोडणी करून त्यावर परतून घेतल्या.

साधारण १ इंच व्यासाच्या त्या वड्या पाहिल्यावर नवरा म्हणाला ' न ये कोंकणी वडी लगते हैं न घाटी न गुज्जु. ये तो कॉकटेल वडी लगते हैं'. त्याने सगळ्या एका प्लेट मधे काढल्या, दोन ग्लासात वाईन ओतली आणि म्हणाला 'अगली बार थोडा जादा बनाना. चीअर्स.'
अमेरिकेतल्या पहिल्या नोकरीच्या ठिकाणी एकदा एका माणसाने meeting मधे Whoville चा उल्लेख केला. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह अनेकांनी पाहिलं आणि meeting संपल्यावर लगेच Dr. Seuss ची धावती ओळख करून दिली. दुसयाच दिवशी एका अति उत्साही मित्राने The Grinch who stole Christmas ची animated cassette आणली आणि ती सर्वानी मोठ्या conference room मधे बसून पाहिली. खरं तर बाकी सर्वांनी ती अनेक वेळा पाहिली असणार पण परत माझ्या बरोबर पाहताना त्यांना अगदी नव्याने पाहिल्या सारखी मजा येत होती.

दोन चार दिवसात सगळ्यांनी त्यांच्या घरी असतील नसतील तेवढी Dr Seuss ची पुस्तकं आणून दिली आणि बर्‍याच पुस्तकांच्या त्या conference room मधे बसून सामुहिक वाचन होऊ लागलं. सोपे सोपे शब्द, rhyming च्या tricks आणि मजेशीर गोष्टी Dr Seuss नी माझ्या मनात घर केलं लगेच. कधी कोणा लहान मुलांना वाढदिवसाला किंवा इतर कारणांनी काही भेट द्यायची असेल तर मी Dr Seuss ची पुस्तकं देऊ लागले.

कधी कधी पुस्तकांच्या दुकानात ( हो, amazon च्या आधी पासून मी अमेरिकेत आहे आणि तेंव्हा पुस्तकं घेण्याकरता चक्क दुकानात जावं लागत असे) चांगलं deal असेल तर एकाच वेळी बरीचशी Dr Seuss ची पुस्तकं घेत असे. माझ्या घराजवळच्या Borders मधे लहान मुलांच्या पुस्तकांचा भाग अगदी प्रशस्त आहे. मुलांना बसायला छोटी छोटी बाकं आहेत. काही खेळणी आहेत. कधी कधी फळा आणि खडू पण ठेवलेले असतात. तिथल्या बाईने हळू हळू मला इतर पुस्तकांची, लेखकांची ओळख करून दिली.


त्यातलं एक होतं Good night moon . एका लहानग्या सश्याची बेडरूम त्यातल्या वस्तू आणि क्रमा क्रमाने सगळ्यांना good night म्हणणे अशी साधीशीच गोष्ट आहे. पुष्कळ पुनरुक्ती, थोडे प्रासबद्ध, पण छोटे छोटे शब्द आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला भरपूर चालना देणारी चित्रं.

मी ते पुस्तक अनेक छोट्यांना घेऊन दिलंय. माझ्या मुलांकरता गेल्या चारेक वर्षे ते शेकडो वेळा वाचलं असेल. पण अजुनही वाचताना कधी कधी काहीतरी नवीनच लक्षात येतं.

इथल्या लहान मुलांचा मला फार हेवा वाटतो. त्यांच्याकरता असणारी Good night moon आणि Chicka chicka boom boom सारखी पुस्तकं हे एक मोठंच कारण आहे.
लायब्ररीतून घाईघाइत ( नुसतं पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठ बघून) बागकामावरची पुस्तकं आणली होती पाच सहा. सगळीच्या सगळी लंडन आणि आयर्लंड मधली निघाली- त्यातून एक जात सगळी पुस्तकं शेकडो वर्ष जुन्या Gardens बद्दल. मोठाल्या बागा, जुने, ऐतिहासिक किल्ले, महाल, गढ्या इत्यादी मधल्या फ़ॉर्मल बागा. भरपूर वेळ, हौस आणि मनुष्यबळ असलेल्या पिढीजात श्रीमंत घराण्यांच्या बागांबद्दल वाचून मला काय मदत मिळणार डोम्बल.

मला स्वस्तात मिळणारी, दर वर्षी फुलणारी ( शक्यतो दोन आठवड्यापेक्षा जास्त बहर टिकेल अशी) , जास्त निगराणी न लागणारी, आखूड शिंगी, बहुदुधी अशा झाडांची माहिती हवीये. Walmart gardening for Dummies नावाचं किंवा Frugal Gardening for Busy People नावाचं पुस्तक असतं तर मी ते विकतही घेतलं असतं

सध्या तरी heirloom गुलाब, टोपियरी, espallier अशा Horticulture 950 लेव्हलच्या विषयांवरील पुस्तकं वाचते आहे ( कोण रे तो 'चित्रं पाहतेय फक्त' म्हणतोय?)

जुन्या घरात आधीच्या मालकिणीने बराच विचार करुन झाडं लावली होती. मार्च च्या सुरुवातीला पांढरे, जांभळे आणि पिवळे क्रोकस, मग डॅफ़ोडिल्स, मग फ़ोर्सिथिया. त्यांचा बहर ओसरे पर्यंत लायलॅक. इतकी भरभरून फुलत लायलॅक! घरात, ऑफ़िसमधे, मित्र मैत्रिणींना वाटून सुद्धा भरपूर उरत. त्याच्या पाठोपाठ पेओनी ( Peony) , पांढरे आणि गडद गुलाबी. ती पण एकेका झाडावर भरपूर फुलं. त्याच सुमारास अझेलिया आणि डच आयरिस.


एका वर्षी नवरोबाने बरीच मेहनत करून दहा बारा grandiflora टाइपचे गुलाब लावले होते ( म्हणजे मोठी, कापून फुलदाणीत लावण्याजोगी फुले असतात तसले). जून च्या पहिल्या आठवड्या पासून सतत गुलाब फुललेले असायचे.

मार्चच्या मध्यापासून घरात ठेवायला फुलं विकत आणायची गरज नसे.


या घरात तसलं काहीच नाही. यंदा एक लायलॅक आणि दोन्-चार फ़ोर्सिथिया लावलेत. पण त्यांना फुलं येईपर्यंत अजून दोन्-तीन वर्षं जातील. ट्युलिप आणि आयरिसच्या कंदांसाठी कॅटलॉग मागवून ठेवलेत.जुन्या घराच्या मानाने जागा आणि उजेड भरपूर आहे. अजून काय काय लावता येईल याबद्दल संशोधन चालू आहे.
Deathly hallows एकदा वाचून आणि दोन चारदा चाळून पण झालं. आता ती पुस्तकं परत कितीही वेळा वाचली तरी ती नव्याची हुरहुर नाही राहणार.

नाही म्हणायला Paolini च्या तिसर्‍या पुस्तकाची अजून वाट पहाते आहे.

अगदी लहानपणी मौसम ची गोष्ट धर्मयुग मधे दर आठवड्याला येत असे, फारसं कळत नसताना सुद्धा अगदी उत्सुकतेने ती वाचत असे. त्यानंतर आहे मनोहर तरी चे काही भाग पेपरात आले होते ( म टा) तेंव्हा त्या पुस्तकाच्या प्रकाशनाची आतुरतेने वाट पाहिली होती.

वर्तमानपत्रात किंवा मासिकात असं ' धारावाही' काही लिहिण्याची फ़ॅशन मोडकळीत निघालीये आजकाल :-(

माझी मुलं जेंव्हा स्वत:हून वाचायच्या वयाची होतील तेंव्हा त्यांना पण असं काही तरी वाट पहायला लावणारं वाचायला मिळेल अशी आशा आहे!
माझ्या घराजवळ एक YMCA आहे. बहुतांश सबर्बन पालकांप्रमाणे आम्ही शनिवारी सकाळी मुलांना पोहायला शिकवायला नेतो. ( नूतन समर्थ आणि तनुजा समर्थ यांना शिकवून मग आमच्या सारख्यांना पोहायला शिकवणारे भिडे सर आणि छोट्या शाळेची विहीर ज्यांच्या मालकीची होती,ते ( परांजपे बहुतेक) मला क्षमा करतील. )
तिथे काउंटर वर कार्डं तपासतात त्या जागे पाशी काही टेबल खुर्च्या आहेत, एक दोन vending machines आहेत. बरेच पालक तिथे बसून पेपर वाचत असतात. तिथेच लायब्ररीत असतात तशा पुस्तकांच्या ट्रॉली आहेत. येणारे जाणारे आपल्याला नको असलेली पुस्तकं तिथे ठेवतात. ज्याला कोणाला हवी असतील त्याने/ तिने ती घेऊन जायची. वाचून परत केलीच पाहिजेत असा आग्रह नसतो. मी जेम्स फ़्रे चं पुस्तक तिथनंच आणून वाचलं. तिथुन मिळालं म्हणून Nanny diaries सुद्धा वाचलं. काल तिथे Katharine Graham चं आत्म चरित्र मिळालंय. ते मात्र परत करणार नाहिये मी.
गोष्टी पूर्ण करायच्या आहेत म्हणून फक्त पहिली पंचवीसेक पानं वाचली काल. गोष्टी पूर्ण झाल्या की इथे त्या पुस्तकाबद्दल लिहीन.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Archive through March 02, 2007
Owner dwidhamedha,shonoo Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators