Bee
 
 |  |  
 |  | Saturday, June 10, 2006 - 1:52 am:    |  
 
 
 |   
  |   
 लालू, तु सोनीवरच  Candy Floss  बघतेस की काय.. अगदी तशीच शैली आणि तशाच स्वरुपाची झलक आहे? पण छान लिहिलस       please  त्या तिन्ही फोटोंची नावे सांग आणि हो ते ताट माझ्यासाठी वाढलेलं आहे सगळे काही परत वाढ.. संपलय ताटातलं आणि आंबे जेवणानंतर चालतील मला.. तुझ्या बीबीवर छान पाहुणचार झाला      तू 'जिवेत शरदः शतम्'      जीवेत नाही जिवेत.. कळल का ताईसाहेब   
 
  | 
Ninavi
 
 |  |  
 |  | Saturday, June 10, 2006 - 3:34 am:    |  
 
 
 |   
  |   
 सुधारला की नाही मूड अजून? की  ' तोच तो'?   
 
  | 
Shonoo
 
 |  |  
 |  | Monday, June 12, 2006 - 1:31 pm:    |  
 
 
 |   
  |   
 अगदी माझ्या मनातलं बोललात बाई साहेब. फ़क्त ती गडांवरची भटकंती सोडून.    आहारशास्त्रा मधे आता  challenge  मेनू असा नवा बीबी पाहिजे.कांद्या लसणा शिवाय मेनू, टोमॅटो शिवाय मेनू असे लिमिट घालून मेनू लिहायचे  
 
  | 
Lalu
 
 |  |  
 |  | Wednesday, June 14, 2006 - 4:05 am:    |  
 
 
 |   
  |   
 अजून तसाच आहे. ढग वगैरे बघायला मान वर करायला वेळ नाही. बी, ते सोनी वगैरे काही नाही रे, नाहीतर मी त्या फेर्यात अडकले असते. तुझा सामान्य ज्ञानाचा अभ्यास कुठवर आला?  शोनू, कसं काय? बोम्बील सम्पले का?  ते सगळं गंमतीत लिहिलं आहे. दिनेश आणि  GS  दिवे घेतीलच.  
 
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Wednesday, June 14, 2006 - 6:14 am:    |  
 
 
 |   
  |   
 लालु, तुझा लेक आहे का हा...     त्या फोटोंची नावे सांग ना जरा.. वरचे ते ३ फोटो    माझा अभ्यास.. बापरे.. अभ्यास वगैरे म्हंटले की काटा येतो अंगाला. सद्या मी ऐतिहासिक पुस्तके वाचतो आहे सावरकरांची त्यातून जे काही मिळाल नविन तेच.. बाकी इतर नविन असे काही नाही नाही..  
 
  | 
 लालु  ,   राहुल खूप  cute  दिसतो आहे  ...   कशी  celebrate  केली मग  'Grad Party'?   
 
  | 
 केवढा मोठा दिसायला लागला हा   सही   
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Thursday, June 15, 2006 - 9:14 am:    |  
 
 
 |   
  |   
 मला हा फ़ार फ़ार तर ५व्या ६व्या वर्गातला वाटतो. कुणीच म्हणू शकणार नाही की हा २१ २२ चा मुलगा आहे. लालू खरच तुझ्या इथल्या लिखाणावरून कधीच असे भासले नाही तू काकू बिकू असशील म्हणून   
 
  | 
Maitreyee
 
 |  |  
 |  | Thursday, June 15, 2006 - 10:46 am:    |  
 
 
 |   
  |   
 कुणीच म्हणू शकणार नाही की हा २१ २२ चा मुलगा आहे.>>>>>>>>>   बी अरे ग्रॅज्युएशन २१ व्या वर्षीच होते असे का वाटले तुला   
 
  | 
 मैत्रेयी, अग बी चे प्रश्ण पामाणीक असतात ग! त्यान्ना असे हसण्यावारी नेवु नकोस!    मी बघ कस बीच्या  प्रश्णाला इथे एक बाऊन्सर टाकला हे  DDD   लालु तुझा मुलगा छान गोड हे ग!   
 
  | 
  अरे बी, इथे बालवाडीतून खर्या शाळेत जायचं असलं तरी त्याला ग्रॅजुएशन म्हणतात....    लालू आणि काकू?   कोल्हापुरी पायताणाने हाणेल....     
 
  | 
 मला हा फ़ार फ़ार तर ५व्या ६व्या वर्गातला वाटतो  <<<बी ,   पाचव्या सहाव्या वर्गातला कि पाच सहा वर्षांचा    असो  ,  बी इथे  Graduation  देशा सारखे नसते रे  ,  दर वर्षी एक इयत्ता संपताना मुलं  graduate  होतात  .  अगदी  Play group  मधली मुल सुध्दा  !    Btw,   तुला तो  21  वर्षांचा असणार अशी शंका आली का खरच ?   
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Thursday, June 15, 2006 - 3:09 pm:    |  
 
 
 |   
  |   
 बापरे.. मी बराच गोंधळ केला वाटते.. ह्याला कारणीभूत खुद्द लालूबाई आहेत.. इतके  short cut posts  टाकले तर माझ्यासारख्यांचे हालच आहे. एक तर आधी म्हाणली ही बघा टोपी.. मला वाटल हा गुलाबी कांतीचा आणि डोळ्यांमधे  American  झाक असणारा मुलगा कुणी  model  लालूने घेतला असेल रंगीबेरंगीसाठी. वर  grad  वरचे पोष्ट्स वाचून विचारच केला की हा मुलगा इतक्या लहान वयात कसा बरे  graduate  झाला असेल.. नंतर रचनाचे पोष्ट्स वाचून मी आपले गृहीत धरले की लालूचा नवराच मुळात कुणी  American  असेल..      लालू      आणि लिंबटल्या तू काय  bouncer  टाकतोस.. माझे प्रश्नच तुला  bounce  जात असतील खरे तर   
 
  | 
Ninavi
 
 |  |  
 |  | Thursday, June 15, 2006 - 3:43 pm:    |  
 
 
 |   
  |   
 लालू. गोड आहे गं तुझा ग्रॅड.     >>> कुणीच म्हणू शकणार नाही की हा २१ २२ चा मुलगा आहे.  बी, आणि तुझ्याशिवाय कुणीच म्हणालेलंही नाहीये तसं.   
 
  | 
Dineshvs
 
 |  |  
 |  | Friday, June 16, 2006 - 1:24 am:    |  
 
 
 |   
  |   
  लालु, बेटा फोटोतच समजुतदार दिसतोय. आहेच म्हणा तसा तो.  बाकि शोनूने सुचवलेले चॅलेंज काहि विशेष नाही. न खातायेण्याजोगे पदार्थ, असे काहितरी लिहिता येईल.  
 
  | 
 ह्यातला एक जास्त समजुतदार आहे का? आईच्या वळणावर कोण गेलंय मग?    आहेत मात्र दोघेही गोड एकदम! 
 
  | 
Raina
 
 |  |  
 |  | Friday, June 16, 2006 - 7:11 am:    |  
 
 
 |   
  |   
 किती गोड मुलं आहेत दोघेही  !!
 
  | 
Storvi
 
 |  |  
 |  | Friday, June 16, 2006 - 5:17 pm:    |  
 
 
 |   
  |   
 दोघंही गोड आहेत अगदी. धाकटा जरा खट्याळ वाटतोय, आई वर गेलेला दिसतोय  
 
  | 
 लालु  ,   मानस चा  photo  पण मस्त अलाय  .. BIG Boy ..   
 
  | 
Sayonara
 
 |  |  
 |  | Friday, June 16, 2006 - 5:22 pm:    |  
 
 
 |   
  |   
 लालू, तो वरचा मानसचा फोटो आहे की काय? मला वाटलं दोन्ही राहुलचेच. एक लहानपणीचा आणि एक आत्ताचा. केवढा मोठा दिसतोय मानस.त्याच्या डोळ्यांची ठेवण मला माझ्या गाववाल्यांची आठवण करुन देतेय. 
 
  |