| 
   | 
| | 
 |  |  |  | Monday, August 29, 2005 - 5:09 pm: |       |  
 | 
 
 
 ima~anaÜÊ
 
 maI jyaa pustkaMcaI vaaT baGat hÜtÜÊ tI sagaLI [qao  NJ  mayao AalaolaI Aahot....  NJ  cyaa gaNaptIcyaa kaya-Ëmaat maI  Stall  laa}na tI ivaËIlaa zovaNaar Aaho. malaa Aalaolaa Kca- vagaOro Qa$na pustkacaI ikmmat  $6  hÜto. Aa<aaca ek dÜna pustkM maI pÜYTat Takayalaa gaolaÜ hÜtÜ.  Media mail  mhNaUna tI [qao Amaoirkot pÜsT krayalaa ek ikMvaa dÜna pustkaMmaagao  $1.42  evaZa Kca- yaotÜ....
 
 jyaanaI malaa maola pazvaUna AaQaIca saaMigatlaM Aaho ³ Rangy, Sandyg15, Naatyaa, minoti, svsameer, hems, Lalu ´ %yaanaa %yaaMcyaa  Copy  maI Aaja ]Va pazvatÜya. tXaI maola pNa Aaja pazvaona..
 
 maaJaI Apoxaa Aaho kI ha AakDa evaZ\yaavarca qaaMbaNaar naahI
   Anyway Ê tumacyaa pOkI kuNaalaa [qao Amaoirkot pustk hvaM Asalyaasa ³ NJ  kr saÜDUna´Ê tumhI malaa tumacaM naaMva p<aaÊ AaiNa saÜbat caok pazvalyaasa maI tI pustkM maola k$
Xakona... AjaUna kahI maaihtI hvaI Asalyaasa fÜna nambarhI dotÜ.
 
 NJ  kranaa Aa<aa ³fÜna k$na´ ikMvaa gaNaptI ]%savaat maaJyaakDUna pustk Gaota yaola....
 
 pustk AavaDlaM tr ja$r kLvaa ³naahI AavaDlaM trIhI kLvaa´ AaiNa [tranaahI saaMgaa....
 
 maaJaa p<aa  Vinay Desai, 16 Hawthorne Drive, Plainsboro NJ 08536, 609-903-7367
 
 ³pustk ivaËItUna kahI fayada Jaalyaasa tÜ Baartatlyaa XaaLaMnaa  Donation  mhNaUna VayacaM zrlaM Aaho´
 
 
 
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Wednesday, September 07, 2005 - 6:34 pm: |       |  
 | 
 Book Front....
 
 
  
 
 |  | | 
 |  |  |  | Friday, September 09, 2005 - 12:43 pm: |       |  
 | 
 
  
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, September 20, 2005 - 1:06 pm: |       |  
 | 
 yaa pustkacaI ek CÜTIXaI jaaihrat VayacaI Aaho.. kuNaalaa kahI  Catchy  saucat Asalyaasa ilahaÊ ... malaa tovaZIca madt hÜla
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Wednesday, September 21, 2005 - 2:53 pm: |       |  
 | 
 
 www.Rasik.com    var Aata ho pustk imaLU Xakola.... hI Gyaa  link
 
 
 http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b65371&lang=marathi
 
 
 |  | | 
 |  |  |  | Friday, December 02, 2005 - 4:43 pm: |       |  
 | 
 गिरीराज  -  परदेसाई प्रकाशन सोहळा
 
 दि.२१ नोव्हे २००५ ला आपले मायबोलीकर श्री.विनय देसाई यांच्या “परदेसाई” या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा पुणे येथील “पाथफ़ाईंडर” येथे संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशन मराठीतील ज्येष्ठ लेखिका सौ.मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत अभिनेते श्री. मोहन आगाशे उपस्थित होते.
 
 कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रकाशक श्री.श्रीराम रानडे उर्फ़ रानडेकाका यांनी भारद्वाज प्रकाशनाविषयी आणि “परदेसाई” च्या पुस्तकरुपात येण्यापर्यंतचा रोचक किस्सा सांगितला. त्याचबरोबर या पुस्तकाचे अमेरीकेत प्रकाशन झाले असल्याचे सांगतांना “अमेरीकेत नोंदणी विवाह झाला असला तरी भारतातल्या वैदिक विवाहाला तितकेच महत्त्व असल्याचे” आपल्या शैलीत सांगितले.
 सौ.मंगला गोडबोले यांच्या हस्ते एका आगळ्यावेगळ्या पद्धतिने पुस्तकाचे प्रकाशन केले गेले.भारद्वाज प्रकाशनाच्या परंपरेप्रमाणे एका सुबक लाकडी पेटीतून पुस्तकाच्या प्रति बाहेर काढून मंगलाताईंनी प्रकाशन झाल्याचे जाहीर केले. त्यांनी केलेले भाषण उत्तम निरीक्षण आणि खुसखुशीत विनोद यांचा भरपेट फ़राळ होता. ‘देसाईंना त्यांच्या लेखनाच्या पहाटेच “भारद्वाज” दिसला’ अशी सुरवात करून त्यांचे भाषण उत्तरोत्तर रंगत गेले. विनयच्या लेखनाबद्द्ल गौरवाने उल्लेख करतांना अनेक उदाहरणे त्यांनी दिली. भाषणाचा समारोप करतांना उपस्थितांना पुस्तक ‘विकत’ घेऊन वाचण्याचे आवाहन केले.
 
 त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते श्री.मोहन आगाशे यांचे भाषण झाले.विनोदी ढंगाने विविध विषय हाताळत केलेले हे भाषण श्री.आगाशे उत्तम अभिनेते म्हणून का ओळखले जातात त्याचीही एक झलक होते. मंगलाताईंनी पुस्तक ‘विकत’ घेण्याच्या आवाहनाला त्यांनी ‘पुणेकर हौशी वाचक असल्याने विकत बिकत घेत बसत नाहीत ‘ म्हणून कोपरखळी मारली. त्यांच्या भाषणानंतर “परदेसाई”मधील काही भागांचे अभिवाचन आणि विनय देसाई यांची मुलाखत असा कार्यक्रम झाला. अभिवाचन श्री.अजित सातभाई यांनी केले.विनय यांनीही त्यांच्या आवडीचा एक भाग वाचून दाखवला.त्याचबरोबर मायबोलिचाही आदरपूर्वक उल्लेख या कार्यक्रमात केला गेला.
 
 संपूर्ण कार्यक्रमात विनय देसाईंची कन्या जुई हिने camera चा flash चमकता ठेवला होता. तिच्या बाल-उत्साहाला मध्ये मध्ये बांध घालण्याचे कामही विनय अतिशय हसत्मुखाने पण आतल्या आत रागवून करत होते. कार्यक्रमाच्या काही वेळ आधी तिच्या dress चा धागा एका खिळ्याला अडकून त्यानंतर ती फ़िरेल तिकडे आणि लक्षात येईपर्यंत दोन तीन खांबांना गुंडाळून छानच गुंता झाला होता.
 हे दोन प्रसंग वगळता विनय पूर्ण कार्यक्रमात उत्साही आणि आनंदी दिसत होते.
 
 या कार्यक्रमाला मायबोलितर्फ़े मी,GS,आरति,sravi,सई,अभिश्रुति,प्रसाद शिरगांवकर यांनी हजेरी लावली होती.साधारणतः दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाच्या आठवणी कायम मनात रेंगाळत राहतील .एका मायबोलिकराच्या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यात आम्हीही ‘मायबोलिकर’ असल्याचा अभिमान वाटत राहिला.
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, December 06, 2005 - 3:03 pm: |       |  
 | 
 mii_varsha_Rituu  यानी लिहिलेला एक नमुना वृतांत
 
 
 रविवार दि.  28/11/2005
 
 पानक्रमांकः  1
 
 'या रविवारी शिवाजीपार्कात  GTG  आहे...... ,' इती किरू.
 
 'काय हां खरंच? ... वा वा अहाहा छान मस्तच आयला काय मजा येईल आता एकदम फूल टू धमाल  !!! ' इती मी.
 
 GTG  म्हटलं की प्रत्येक मायबोलीकराच्या मनात हे आणि असेच विचार, उद्गार,  Expressions , भावना  (
 जुवेकर नाही  sorry गोवेकर नाही हो  ! ) उचंबळून, ओथंबून येतात, येऊन गेल्या असतील आणि नित्यनव्या येतील.( हे हिला कोणी सांगितलं कोण जाणे?  NJ  वाले तर  GTG  चं नाव ऐकून पळ काढतात  )
 
 तर ऐसाच कुछ मेरकुभी लगा. कारण प्रत्येक वेळी माझं  GTG ला जायचं घोडं कुठेतरी ऐकून रहातं. आणि मग ते दरवेळी हळहळणं सहाजिकच. पण यावेळी  GTG  आणि माझा ग्रहयोग जुळून आल्यामुळे मी आजच्या  GTG  चा अनुभव आनंदला, चाखला  (Gypsy)  आणि लुटला  (Bill  कोणी भरलं रे  ?)
 ( बिल मी भरलं  ...  विसरलीस वाटतं लगेच  )
 
 हां, तर  GTG  चा सुगावा लागल्याबरोबर आधी उत्सुकता असते ती, कोणते मायबोलीकर येणार कोण  - कोण येणार, सोबत कोणाला घेऊन येणारची कुणकुण लागलेली असते. मग पहिला फोन केला  RR  ला.  (rupali_rahul)  माझी शाळेतली सिनियर. आणि तिला शक्य तितक्या प्रेमळ  (-  वजा  )  धमकीच्या शब्दात माझ्याबरोबर यायची अट घातली. बिच्चारी  RR  अजून काही राडा होऊ नये म्हणून माझ्या हो ला हो करत गेली.   ( आली नाहीच यावरून लक्षात आलंच )   मग जास्त काही फोनाफोनी कानोकानी झाली नाही. कारण मी आता  Profression Change  केलंय ना  CA (Complete Aaram)  ऐवजी  CK (Complete Kaam) .  ( तू नक्की काय काम करतेस  ?  एक भा. प्र.  )
 
 So, HG  वर हुंदडायला  Time च मिळत नाही.
 (  इति प्रथमोध्यायः संपूर्णः )
 
 पानक्रमांकः  2
 एव्हाना, 'शिवाजीपार्कात मायबोलीकरांचा  GTG  आहे,' ही बातमी माझ्या हाफिसातल्या लोकांनी चार दिवसात १४ वेळा माझ्याकडून अशी ना तशी ऐकली. आणि सर्वानी संगनमताने ठरवलं की सोमवारी  Ear-buds  घालून, आपले कान वर्षाच्या अव्याहत शब्दांच्या वर्षावापासून शाबुत ठेवावेत. हे असंच होतं. 'चांगल्या माणसांबद्दल जग नेहमी वाईटच बोलतं' आणि बोलघेवड्या माणसाला सरळ बडबड्या म्हणून बदनाम करतात. काय पण लोक ना?
 (  बडबड केली हिने, आणि बोल लागतोय त्याना )
 Exception:-  समस्त मायबोलीकर
   
 अरे हो, मंडळी मला माहीत आहे की तुम्हाला वृतांत' वाचायचा आहे. म्हटलं जरा ताणुयात  'Commercial Break'  सारखं.
 
 
  Ting - Tong   
 चला  Break over  झाला आता  direct  मुद्द्याला हात लावते.
 
 Hello Hello, mike check 1...2..3.... testing... OK! ...  खटर्र्र खुटुर्र्र...
 
 मी_वर्षा_ऋतूः ४:५० मी. ला दादर स्थानकात आले. तिथली ही  s s s s s  गर्दी ओलांडून  'Ideal'  मार्गे संवादाच्या' कोपर्यातून शुभेच्छांची शब्दफुले घेऊन आले  ( जरा जास्तच झालं ना )  मग इथे तिथे टंगळ मंगळ न करता थेट शिवाजी पार्क. थोडी चाहुल घेतली कोणी ओळखीचं थोबाड  sorry  मुखचंद्रमा दिसतोय का ते. ठरल्याप्रमाणे मांसाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन चारी बाजूला गरागर डोळे फिरवून पाहिलं  (  त्या दिवशी राज ठाकरे प्रकरणामुळे असे डोळे फिरवणारे बरेच होते तिकडे  ) , तर समोरच एक त्रिकूट दिसलं. अगदी बघताक्षणीच मायबोलीकर असल्याची पुसटशी शंका येऊन गेली. पण सगळेच इजा-बिजा नी तिजा  !  मला हे त्रिकुट चित्रकुट पर्वतावर उभे असल्यासारखे वाटत होते  ( पीळ, पीळ अजून  ) . अगदी शांत  ( वादळाआधीची शांतता असावी ) .
 (  इथे आलेलं वादळ शांततेचा अंदाज घेतंय.. )
 (  इति द्वितियोध्यायः संपूर्णः )
 
 पानक्रमांकः  3
 
 त्रिकूटः  (  डावीकडून उजवीकडे  )
 
 पैकी क्र. १. पितांबर सोडून  Fluroscent  भगवा किंवा अबोली रंगाची वस्त्र नेसून आलेली बटूमुर्ती  - गजाभाव उर्फ गजानन देसाई.  " गजा रे गजा, काय तुझी मजा, कोंबडीने वाजवला बॅंडबाजा "  हे माझ्या बालपणीचं गाणं आठवावं असं प्रसन्न व्यक्तिमत्व.   ( हे पीतांबराचं काही नवीनच ऐकतोय मी  GD  )
 
 क्र. २. आजच्या  GTG ची उत्सवमुर्ती  ' परदेसाई'चे जन्मदाते, सर्वेसर्वा, भटक्या  (  शुध्द शब्दात  Traveller)  साक्षात श्री. विनय देसाई. पाठीवर पुस्तकानी भरलेली पोतडी घेऊन, हातोहात पुस्तक विकण्यास तत्पर  Salesman  च्या थाटात.
 (  मी हातात पोतडी घेऊन सर्वे करायला निघाल्यासारखं वाटतंय  .. BTW  ब्याकप्याक म्हणतात त्याला मराठीत )
 
 कर. ३. तिसरा माणूस जरा विचित्र वाटला. उगाच आपला जाणार्या येणार्यांची/ येणारींची टेहाळणी मासाहेबांच्या मागे उभे राहून चालू होती. होय तोच तो इकडे तिकडे विहरणारा भुंगा भ्रमर विहार  (  काय पण एकेक  ID  असतात ना  !!!)
 बरोबर व्यक्ती तसा  ID   (  काय हे भ्रमरा, मांसाहेबांच्या मागे लपून हे असे उद्योग  ?)
 
 मग मी सांगितलं बघा जास्त गोतावळा जमा होण्याआधी पटापट तुम्ही कोण ते सांगून टाका. आणि तिघानी जराही आढे-वेढे न घेता आपापले नाव गाव  ID  सांगितले.  (  सभ्य मायबोलीकर  Category)
 
 
 विनय देसाई नावाप्रमाणे अगदी तरूण दिसतात
 (  इथि त्रितियोध्यायः संपूर्णः )
 
 पानक्रमांकः  4
 
 विनय देसाई नावाप्रमाणेच तरूण दिसतात.   (  इथे  confirmation  झालं  ...  फक्त नावाप्रमाणे तरूण हा काय प्रकार आहे वाचायला हवं  )   पण त्यांच्या चष्म्याने आणि  60 च्या  Range  मध्ल्या वयामुळे मी त्यांना एकदम काका बनवलं. पण विनयकाका मात्र मी त्याना  ' काका' केलं म्हणून  ' काकाच का?' असा प्रश्न विचारत होते. आणि सारखं आपलं माझ्या बोलण्यावर कां कू करत राहिले. वाटतं विनयकाका माझ्या ह्या कलकलाटामुळे आणि कावकवीमुळे थोड्याच वेळात कावून गेले. शेवटी त्यानी ठरवलं, एक पुस्तक फुकटात  (?)  देऊन हिची कुर्रेबाजी थोडा वेळ बंद करावी. मग मलाच शेवटी माझ्या नवीन काकांची कीव आली अन मी एका कोपर्यात जाऊन दुसर्यांशी कोकलत बसली.  (  मी कोकलत बसली ही मुम्बैची मराठी बरं का  )
 
 (  एकता कपूरला बोलवा हो कोणी  )
 
 KKAHANI KAAKA KKI  किंवा  KAUN? KAISE? KISAKKA KAAKAA?
       
 अच्छा उसके बाद दोन मायबोलीकरणी आल्या   (  चक्री वादळ फेम  ) .  एक  Miss. पांढरे, आणि दुसर्या  Miss.  गुलाबी. पैकी पांढरे बाईनी  ( खाष्ट मायबोलीकर  Category)  तर मला इतकं छळलं. सारखं  ' पैचान कौन?' म्हणून मीच तिला पांढरे हे नांव बहाल केलं  (  तुला बोंबलायचं तेवढं बोंबल बरं  )  पण पांढरेबाईनी मला लगेच ओळखलं  ( आता आम्ही आहोतच तसे  !!! )  मग भरपूर गप्पा झाल्यानंतर  Madam memsaab  ने आपण  'adv.  दक्षा देसाई' असल्याची प्रांजळ कबुली दिली.   (  आडवे म्हणजे  ???  दुसरा भा. प्र.. इथे देसायांची जास्तीची मेजॉरिटी झाली  )  आणि हो मिस. गुलाबी म्हणजे आपल्या अमी७९.   (Summer of 69  च्या तालावर  Ami of 79  गाऊयात का  ?)   (  तुला गायचं तर गा, फक्त आम्हाला ऐकवू नकोस  ...  नम्र सूचना  )
 
 (  इति चतूर्थोध्यायः संपूर्णः )
 
 
 पानक्रमांकः  5
 
 मग आले  ...."  एवढा मोठा भोपळा  ...  आकाराने वाटोळा.... "  अरे हे गाण्याचे सूर कुठून आले  (  कानाचे  Problem  स्वतःच करून घेतलेत  ..  काहीही ऐकू येतं  )   ....OH Background Music  आहे. फिर आये अपने भारदस्त व्यक्तिमत्व  "  गुरूदास  B"  उर्फ गुरूकाका  ( प्रेमळ मायबोलीकर  Category).  सोबत केवड्याच्या रंगाच्या, तसंच मोहक असलेल्या  ' गुरूकाकी' ही आल्या होत्या.
 
 उसके बाद भावनाबाई कुठून प्रगट / प्रकट झाल्या कळलंच नाही.   ( आम्हाला कळलं  ...  तुमचं लक्ष नव्हतं  )   (  शांत मायबोलीकर  Category).  और फिर  Mr.  इंद्रधनुष्य आणि  Mrs.  इंद्रधनुष्यी आले. पण इंद्रधनुष्य अगदी पांढुरकं होऊन आलेलं. बाकी इंद्रधनुष्यीचे दात मला आवडले. स्वच्छ सुंदर सफेद  ! A perfect colgate smile   ( हे कदाचित पांढुरक्या इंद्रधनुष्याचं प्रतिबिंब पडलं असावं  )
 
 :
 :
 
 पैचान कौन  ?  ओळखा पाहू  ?  आपण यांना पाहिलत का  ?  वो कौन है / थी  ?  मै कौन हूं  ?  मी ह्यांव  BB  चा, मी त्यांव  BB  चा... ही आणि अशी कोडी घालणे आणि ती सोडवणे हा सर्व  MB  करांचा  GTG  मधला  Patent item  आहे. आणि बहुतेक सर्वच  MB  करांचा तो आवडता खेळ आहे.  (  नवी माहीती  -  लोक एका एका  BB चे असतात  ?  जाओ पहले उस आदमीका साईन लेके आओ जिसने मेरे हात पर लिखा  '  मेरा  BB  बोर है ')
 
 'नांव घे पोरी लाजू नको,' तसं  ( सुरात वाचा हो.)
 ' ID  सांग तू घाबरू नको  '  आणि येनकेन प्रकारेण ओळखलं तर ठिक. नाही तर सरळ  ' हरलो हरलो' सांगायचं. मग समोरच्याची फटफजीतीचा आनंद मनमुराद लुटून, गदागदा हसणं हा  MB करांचा अजून आवडता उद्योग.  (  काही कळलं का  ?....  होता है  ...  होता है  ....)
 
 varsha_rutu चा सल्ला :- Comedy  नाटक, फिल्म वगैरेवर पैसे  waste  करण्याऐवजी मायबोलीचा  GTG attend  करत जा.   ( सैनंध्रीचा सल्ला माहीत आहे का कुणाला  ?)
 Dose:-  वर्षातून  2  वेळा  (  मी खरं तर हे डोसे असं वाचलं होतं  )
 OverDose:-  झेपत असल्यास.
 
 
 (  इति पंचमोध्यायः संपूर्णः )
 
 पानक्रमांकः  6
 
 अरे हो सांगायचं राहिलं. भावना खरंच भावनाप्रधान व्यक्ती आहे   ( इतका वेळ ती बिच्चारी वाचली होती  )  माणसाची  ' भूक' ही आदिम भावना लक्षात घेऊन भावनाने सर्वांसाठी अळूवड्या आणल्या होत्या   (  म्हणून आठवली  ) . मी तर भराभर हातात जितक्या उचलता येतील तितक्या खाल्ल्या. मग जाणवलं  ( संपल्यावर )  अरेच्चा दुसर्यांचा पण पोटोबा करायचा आहे  ( ? ? ? )
 (BTW  त्याच वेळी कळलं की आता  Hotel  ला सरकायचं आहे. तिकडचं हादडायला थोडी जागा हवी ना म्हणून वरचा सुज्ञ विचार सुवेळी आला  ! )
   
 आमचा खाऊ सम्पतो न संपेतोच किरकिर्या किरू आणि चुलबुळ्या चैतन्य येऊन ठेपले  (  ठेपल्यांची आठवण खाण्यावरून आली असावी  )  मग जास्त गडबड गोंधळ न करता सगळे  ( दिड) शहाणे मायबोलीकर  Gypsy Corner  मध्ये घुसले.  Gypsy  च्या अंगण्यात आल्या आल्या एका काकाने  ( कागा, काक, कावळा) विनयकाकांच्या अंगावर  2-4  फुलं उधळली. कावळा अजून काही उधळेल या भीतीने काका लगेच बाजूला सरले.
 
 नंतर सूरू झाली मनुष्यप्राण्याची प्राचीन परंपरा खुर्चीसंपदन  !  खुर्ची पकडायला पळापळ झाली. खुर्च्या गटवल्यानंतर मी सर्वाना  ' किस्सा खुर्ची का, ' सांगितलं   (  असेलही  ...  पण आठवत नाही  )  आणि काय सांगू लोकहो, ज्याचा त्याचा येऊन जाऊन माझ्या खुर्चीवर डोळा
  ) 
 या खुर्चीखाली दडलंय काय
 
 माझ्या जागेवर अतिक्रमण करणारे महाभाग/महाभागिणी
 
 1.  रांपास्वामी
 2. दक्षाबेन
 3. ami79 (  वजनही  79  असावं बिच्चारी खुर्ची  )
 
 मग बसल्या बसल्या किरूने त्याच्या  ' ष्टाईल' मारायला आणलेल्या  Camera  तून  3 -4 danger - danger  फोटो काढले. ( दुर्दैवाने ते फोटो मी, दक्षा असल्या पक्चट  ( ? )  लोकांचे आहेत. लोकहो बघितल्यावर घाबरू नका, फक्त राम राम म्हणा
       
 (  इति षष्ठोध्यायः संपूर्णः )
 
 पानक्रमांकः  7
 
 Hmmm , इंद्र सुध्दा कोपर्यात चैतन्य्/सोहमच्या शेजारी बसून काय माहीत कुणा कुणाचे फोटो काढीत होता. नक्की आमचे  ?  इंद्रीचे की रस्त्यातून येणार्या जाणारींचे  ?  हो म्हणजे पोरीने चिडून पाहिलं तरी चैत्याला बघून पोरगी खुश होणार  (  चैतन्यच्या चेहर्यावर  Smile please  गोंदलेलं आहे का बघायला हवं  )
   
 Indra  तुझा डाव आता सर्वाना कळला,
 Better luck next time !
 
 मध्येच कधीतरी आजच्या सभेचा वक्ता कोण होणार, यावर मी  Smart   (?)    उपाय सुचवला.  आकाराने आणि वयाने गुरू  असलेल्या गुरूकाकानाच भषणाचा मान देण्यात यावा. बाकी कोणी येऊन धुडगूस घालू नये  (  हे वाक्य मला असावे ) . पण गुरूकाकांनी माझ्या विनंतीला मान न देता कोपर्यात बसून कोपरखळ्या मारायला सुरूवात केली. सरतेशेवटी मीच भाषण केलं. (भाषणाचा विषय कोणता हा मोठा गहन प्रश्न सर्वानाच पडलेला). पण तरी आपापले चेहरे जराही पडलेले न दाखवता सर्वानीच भाषणाचं कौतुक केलं.  (  याबद्दल खरं तर सर्वांचं कौतुक करायला हवं  )
 
 आता  Interval
 
 Pizza Break  नंतर बाकीची श्टोरी सांगते.
 
 Function Celebrate  करायला आमच्याकडे  Shampen   (Champagne  असं  spelling  आहे त्या चीजवस्तूचं )  नव्हती. म्हणून आम्ही लिंबूपाण्यात सोडा टाकून पसफसता फेस केला  (  लिम्बू कुठेही टपकू शकतो, याचं हे उदाहरण आहे )  अहो परवडत नाही म्हणून नाही काय तर आपली मस्ती. आपलाच लिंबू, आपलाच सोडा, आणि आपलेच मायबोलीकर.
 
 (हो कळलं मला. तुम्ही आता वृतांत वाचून जाम कंटाळलात.  so  इथेच संपवते हा  Topic!  पण माझा ससेमिरा अजून बाकी आहे. अरे अजून तर काहीच सांगितलं नाहीये.)
 
 
 (  इति सप्तमोध्यायः संपूर्णः )
 
 पानक्रमांकः  8
 
 मला आता घटनांचा क्रम आठवत नाहीये. बहुतेक सोडा चढलेला दिसतोय. हां आठवलं. आपले  RampaSwami  यांचा नवीन मंत्र आहे  '250  रुपये द्या आणि सहीचं अगदी सहीसही पृथ्थकरण  ( पृथकरण) घ्या'.  (  खूप वजनदार झाला ना शब्द  ?)  यांची सुध्दा
  अलिखितमायबोलीकरांच्या अलिखित कराराप्रमाणे यथेच्छ थट्टा केली.  (  म्हणजे काय ते पुढे कळेल, अशी अपेक्षा करूया  ....  दुसरं आपण काय करू शकतो  ?)
 ( अगदी  Mutual Understanding  होतं ना रे किरू
   
 या सर्व प्रकारात मात्र भारदस्त गुरूकाकांचा लेखक म्हणून भाव वधारला. आणि इथे आमचे मुळ,  Original,  पुस्तकाचे लेखक विनुकाका  (  आता परत विनूकाका, झक्की आजोबाना बघितल्यापासून बाकीच्या  NJ  करांचा काका करून टाकला हिने  )    मात्र गरीब, गोंडस, पण  Sweet, white panda  सारखे गप्प राहिले. मनाचा मोठेपणा शिकावा तर विन्या देसायाकडून
   
 नंतर अजून एका जुन्या  MB  कराचे आगमन झाले. सर्वानी त्यावर नाना प्रश्नांच्या फैरी झाडूनच नंतर बसायला परवानगी दिली  (  समोरच्या  Pizza  चा प्रश्न होता  ) . ज्याच्या त्याच्या मुखी
 
 Bombay why king ?
 
 आता लवकरच हे दक्षाने दिलेल्या  ID  वर  Login  करणार आहेत.
 
 ID-  उपटसुंभ
 BB-  आव जाव सब  BB  हमारा है.
 
 (  इति अष्टमोध्यायः संपूर्णः )
 
 
 पानक्रमांकः  9
 
 Points to be noted about today's GTG, and points remained to be discussed on HG
 
 आता मला सोमवारी सकाळी लवकर उठून हाफिसात जायचं आहे हो, बाकीच्यानी ह्याचा काथ्याकूट करावा आणि कीस पाडावा ही विनंती  (  अगो बये, मी तुझ्या आधी विमानात बसायला गेलो, तेव्हा तूच काय ते कर  )
 
 १. विनयच्या  Next  पुस्तकाचे नांव,  Exterior  आणि  Interior Design .  . . . .  पुस्तकाची जाडी.
 २. गुरूकाका कौनसे चक्की का आटा खातात  ?  गुरूकाकी  Fair & Lovely ad  साठी  perfect model  आता मी आणि काकी दोस्तीण झाल्या आहोत. चला  next time  ठाण्याला गेल्यावर पोटाची चिंता मिटली   ( चक्कीचा आटा मिळणार बहुतेक )
 ३. गजाभाव आणि  Mrs.  इंद्रू जरा शांत शांत वाटले.  I think  मी दक्षा, अमी सारखे अशांत प्राणी आळीपाळीने तिथे येऊन बसलो त्याचाच हा  (  दुष् ) परिणाम.
 ४. सोहम  -  चैतन्य एक चिकणा पोरगा.  alias MBCMB  अर्थात  Mumbai born confused  मराठी बोलीकर  !  याला झक्की आजोबांच्या शाळेत घालायची अघोरी शिक्षा विनयने दिली. अरे हो इसनेच मेरेकू  Future  में  ' नेतू' बननेका फोकटका  advice  दियेला है.
 ५.  Ami , अमि, ऍमि, एमि, आमी, कुछ भी बोलो, नाम में क्या रखा है  ?  हिच्याकडून मी कुत्रचावेत्तम'  ( अरंगेत्तमचं  Latino Version)  हा नवीन  Dance  शिकणार आहे. अजून कोणाला यायचं आहे का  ?  बुकिंग उद्यापासून सुरू त्वरा करा  ... त्वरा करा  limited seats.  ही  Offer  फक्त प्रिय मायबोलीकरानाच   (  शांत, सरळ असल्या  Category  सारखी  ' प्रिय '  ही नवीन  Category  असावी  )
 who let the Ami out ( who who who )
 
 (  इति नवमोध्यायः संपूर्णः )
 
 पानक्रमांकः  10
 
 ६. भावना गोवेकर, त्यांच्या  ' भावना' कशा मांडतात, लिहितात, बोलतात हे प्रत्यक्षिक पहायचं राहिलं.
 
 ७. 'गिरी गिरी' हा  Codeword GTG  ला येणार्यांसाठी ठेवावा की नाही  ?  यावर आपलं काय मत आहे  ? BTW  हा प्रश्न फक्त त्रिकुटालाच आहे. बाकी कुणी उत्तर देण्याचा आगावूपणा करू नये  (  नेहमीसारखा  )
 
 ८. यंदा  Ami79  चे कर्तव्य आहे  ( आता कळलं फोटोंच रहस्य  )
 ( हे बहुतेक  ' ला कर्तव्य आहे' असे वाचावे  )
 
 ९. श्री.  'BombayViking'  दारू पीत नाहीत, हे त्या पीटरच्या किश्श्याचं सार'
 
 १०. भ्रमर्_विहार हे छान गुणगुणतात. गाणं अजिबात नाही. भुंग्यासारखे  !    (  भुंग्याचं गाणं  ?)  त्यानी मला जरा उडून पण दाखवलं एका कलिकेच्या मागे.
  (Mrs.  भ्रमरांचं काय म्हणणं आहे यावर  ?) 
 ११. दक्षासारखा  (  बें  silent  आहे  )  भरवशाची  Advocate  मला मिळाली म्हणजे आपला पुढे मागे काय राडा किंवा लफडा बिफडा हो गया तो, निस्तरायला बरं. नुसतं दक्षाच्या  (  डेसिबेल )  च्या आवाजानेच समोरच्याची पाचावर धारण बसेल. गिर्या काळजी घे हो तुझ्या कानाची  (  आता गिर्या कुठे आला इथे? बहुतेक किर्या असेल  )
 
 १२. विनयचं सर्वाना  New Jersey ला पायधूळ झाडायचं प्रेमळ, अगत्यशील आणि विनयपूर्वक आमंत्रण.
 
 (  इति दशमोध्यायः संपूर्णः )
 
 पानक्रमांकः  11
 
 १३. किरू कुरकुरे यांनी  CrackJack  हा पार्ले कंपनीचा बिस्किटपुडा दिवसातून २ वेळा खावा. म्हणजे डोकं असं  Crack  होत नाही. म्हणून सांगते  ( अ )  प्रिय किरूकाका, आत्ताच स्मृतिभंशावर उपाय करा. काळजी घ्या हो स्वतःची, होतं असं कधी कधी म्हातारपण आल्यावर.
 
 
 विनय देसाई उर्फ काका  (  मध्ये विन्यापर्यंत आलं होतं आता परत काका  )  आजचा हा  GTG  खास तुमच्यासाठी होता. असे भरपूर  GTG  करायला दरवर्षी तुम्ही
 भारमायभुमीत, मायबोलीकरांसोबत भेटावे हीच बाप्पाला माझी प्रार्थना. आजचा हा वात्रट वृतांत  Specially dedicated 2 U!  जाता जाता  (  ओ जानेवाले  ...)  या दोन ओळी तुमच्या साठी
 'फानूस बनकर, जिसकी हिफाजत हवा करे,
 वो शम्मा क्या बुझे, जिसको रोशन खुदा करे'
 
 (  मी कोकणी आहे म्हणून लगेच फणसावरती कविता करायलाच हव्यात का  ?)
 
 मी_वर्षा_ऋतू
 
 
 (  इति कथाकथन संपूर्णः )
 
 
 
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Thursday, December 08, 2005 - 3:10 pm: |       |  
 | 
 प्रकाशनाचे फोटो
 
 
   
 
 |  | | 
 |  |  |  | Thursday, December 08, 2005 - 3:13 pm: |       |  
 | 
 
   
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 4:23 pm: |       |  
 | 
 NJ  भेट.. एक अशक्यप्राय शक्य
 
 
 होणार होणार अशी गर्जना करणारं  NJ  करांचं  GTG  एकदा पार पडलं.  GTG  म्हणायचं नाही असं कितीही म्हटलं तरी सतरा वेळा एका एका  NJ  कराच्या मागे लागावे लागल्यामुळे तो शब्द लेखणीत, दातात अडकलेल्या माश्याच्या काट्यासारखा, अडकलेला आहे. माश्याचा, काट्याचा आणि या  GTG  खरं तर काहीच सम्बंध नाही. पण लालूला माश्याचे काटे मिळणार की गुलाबाचे याचा निर्णय न झाल्यामुळे ती आलीच नाही, म्हणून विषय ओढून टाणून तिथे आणावा लागला. बहुजन समाजासाठी मात्र ए.वे.ए.ठि. उ. रा.श.. अरे चुकलेच बहुतेक. मला वाटतं ए. वे. ए. ठि. ह. ... असं काहीतरी..  नाही पुन्हा चुकलीच  Marco  त्यात लालू आणि मंडळीनी ए. वे. ए. ठि. वे. वे. सारखे  ' तकनिकी' बदल, इत्यादीमुळे माझाच घोळ होतोय... तेव्हा नक्की काय ती  Macro  मी अनिलभाईना सगळ्यात वरती, म्हणजे  Mods  च्या ठिकाणी पोष्ट करायची विनंती करतो. त्यात नेहमी हवा असणार्या  HH  ने पुन्हा  GTG  असा शब्द वापरून आमच्या ए. वे. ए. ठि. ला जमीनीवर उतरण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न मी हाणून पाडायच्या प्रयत्नात आहे....
 
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 4:55 pm: |       |  
 | 
 
 रविवारची सकाळ उजाडली, ती शनिवार रात्रीची झोप डोळ्यात घेऊन. शनिवारी रात्रीच्या पार्ट्या रविवारी पहाटे पर्यंत न संपल्यामुळे जावं की नाही जावं ते ठरत नव्हतं. सकाळीच उठून  HG  वर जाण्याचा प्रयत्न केला, पण  HG  बंद, तेव्हा  NJ  करांच्या भेटीचे दूरगामी परीणाम काय काय होऊ शकतील याचा अंदाज आला. गेल्या आठवड्यात शतकोत्तर बर्फ पडून न्यु यॉर्क, न्यू जर्सी बंद पडलं हा पुरावा असताना, अजून काहीतरी बंद पडायला नको हे लक्षात घेऊन एविएठी बंद, रद्द किंवा लांबणीवर टाकणं जरूरीचं वाटलं पण  ' गडाचे दोर' निनावी आदी मंडळीनी केव्हाच कापून टाकलेले. तिकडे माणूस झुकझुकगाडीत बसून सिमोल्लंघन करून चुकलेला  ( म्हणजे हरवलेला नव्हे), तेव्हा आता पाऊल मागे घेतल्यास अस्सल पुणेरी शिव्या वाचाव्या लागतील या भीतीने बाहेर पडावे लागले. माणसं  ( माणूस नव्हे  -  तो स्वतः न मुरलेला पुणेकर वाटला) पुण्याबद्दल वाट्टेल ते बोलली तरी शिव्या देताना त्याना पुणेरी कशी जमते कोण जाणे?
 
 bridgewater  ला जाऊन पोहोचलो, तर  ' एक नवरा सेलफोनवर, एक मुलगा जाकेटात लपेटलेला, तर एक बायको' हातात लाडवांची पिशवी घेऊन  ( लाडवांचा पहिला उल्लेख्) देवळाच्या दारात काकडत उभे असलेले दिसले. पिशवीत बेसनाचे लाडू होते, किंवा लाडू होते हे मला नंतर कळलं  ( झाले एकदाचे तीन उल्लेख, नाहीतर  ' लाडवांचा सांग लाडवांचं सांग' असं शर्टाची बाही खेचत बसली असती), लाडू हातात आल्यावर, आणि नंतर टाळूला न चिकटता पोटात गेल्यावर भरल्या पोटी तारीफ केल्याचं ही आठवतंय अंधूकसं  ( रात्रीच्या जागरणाचा परीणाम, रं. पा. चा नव्हे).. यापुढचा सर्व कार्यक्रम हा देवळाच्या परीसरात असल्यामुळे  ' माश्यांचा' आणि रंगीत पाण्याचा कोणताही उल्लेख या लेखात येणार नाही. एकदा पवित्र वातावरणात शिरलो की शिरलो.
 
 आता आलोच आहोत तर व्यंकटेशाचं दर्शन घेऊन टाकावं म्हणून त्या सेलफोन धारी नवर्याला त्याच्या कुटुम्बाच्या तावडीत ठेऊन मी लगेच वरती म्हणजे देवळात सटकलो. तुकतुकीत, तुकतुकीत असे झक्की दारातच भेटले. व्यंकटेशाच्या समोर उभे असले तरी त्यांचं लक्ष दाराकडेच होतं, त्यामुळे माझ्याकडे त्यांचं लक्ष आपोआप गेलं. ते स्वतः चेहर्याने आणि वाणीने लक्षवेधकच आहेत  (  न दिसणार्या फोटोत देखील  HH  त्याना पाहू शकते हे लक्षात घावं). अनिलभाईही त्या देवळात अवतरले असून ते गजाननाच्या दर्शनार्थ पडद्यापुढे उभे आहेत असं कळलं. त्यादिवशी गणपतीचं दर्शनही होत नव्हतं अशी बातमी आहे. मी  ' प्रथम तुला वंदितो, व्यंकटेशा' म्हणत दिसल्या देवाला मनातल्या मनात दंडवत घातला, आणि लगेच खाली आलो. विठोबा ऐवजी पोटोबाकडे लक्ष देणारे आम्ही दुसरं काय करणार?...
 
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 5:20 pm: |       |  
 | 
 
 खाली भेटलेल्या कुटुम्बाला  '  वरती देवळात जा', अनिलभाई आणि झक्की तिथेच आहेत सांगून वरती पाठवलं आणि मी बाहेर आलो. इतकावेळ मी या कुटुम्बाचा उल्लेख कुटुम्ब म्हणून करतोय, त्यावरून  ' वो कौन थी' हे तुमच्या लक्षात आलं असेलच. खरं तर तिचं नांव वगैरे न सांगून सस्पेन्स वाढवावा असा काही माझा विचार नाही, पण जिला नांवच नाही तिचं नांव कसं सांगणार? नवर्याला त्याने ठेवलेली खाजगी नांवं विचारावीत, तर तो सेलफोनवर. आणि कोण नवरा आपल्या बायकोला ठेवलेली नांव तिच्या तोंडावर इतराना सांगेल? तेव्हा त्याना वरती शोधार्थ पाठवून मी अचानक कुठून तरी प्रकट झालेल्या संदीप बरोबर देवळाच्या बाहेर पडलो. खरं तर ह्या अचानक प्रकट होण्यामुळे तो  '  एका वेळी दोन अगर जास्त ठिकाणी असू शकेल' यावर माझा विश्वास बसला, त्यामुळे त्याला तिथल्या तिथे  Technically Disqualify  करायला हरकत नव्हती, पण मुळात जमणार चार डोकी त्यात असले  Technical Fault  काढले तर  '  मी आणि माझे एविएठी' असा प्रबंध लिहावा लागला असता. नंतर केलेल्या लालूकडील चौकशीतही तो त्याचवेळी व्हर्जिनियात असल्याची शंका तिने टायपून दाखवली, पण हा सगळा त्याच्या फिरतीच्या नोकरीचा परीणाम आसावा अशी पळवाट काढून आम्ही त्याच्यावर संशय घेणं तात्पुरतं रद्द केलेलं आहे.
 तेव्हा संदीप नक्की कुठून उगवला याची पर्वा न करता मी त्याच्याबर मी देवळाच्या बाहेर पडलो. येणार्या मायबोलीकरांच्या आणि विशेषकरून मायबोलीकरणींच्या बडबडीचा  (  नाही ती इथे आली नव्हती) त्रास इतराना होऊ नये म्हणून देवळाबाहेरची एकादी जागा सोईची पडेल असं मला वाटत होतं. त्यात वर देणार्या काही  (kul)  व्यक्ती अजून पोहोचल्या नव्हत्या, त्याही बाहेरच कुठेतरी फिरत असतील तर त्याना बरोबर घावे असा विचार होता. तिकडे अनिलभाई गणपतीच्या दर्शनाला अडून बसले होते म्हणे....
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 7:04 pm: |       |  
 | 
 बाहेर थंडी एवढी होती, की हां हां म्हणता दात दाखवणारे क्लिपआर्ट वापरणार्या मंडळींचीही तोंडं बंद झाली असती. तेव्हा मी संदीपला आपण इथेच भेटायचं ठरवूया असं म्हणण्याच्या बेतात होतो. पण थंडीमुळे ते शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडले नाहीत, आणि आपण आतमध्ये भेटावं सगळ्याना असं मी म्हणत असेन असा त्याचा गैरसमज झाला. तो कॅफेटेरियात शिरल्यामुळे मलाही त्याच्याबरोबर जावं लागलं. जागा अडवण्यावर आमच्या वाटाघाटी सुरू झाल्या. न्यू जर्सीकरांचा स्वभावाला तो नवखा असल्यामुळे आपण चांगले दोन मोठ्ठे बाक अडवून ठेऊ असं म्हणत होता. पण  '  हो हो नाही नाही' करत शेवटपर्यंत हो की नाही हे कळू न देणारे सगळे  NJ कर माझ्या परिचयाचे असल्यामुळे मी  ' आधी येऊ देत लोकाना मग जागा अडवू' असा सबूरीचा सल्ला देत होतो. मागच्या  mini GTG  ला  (  सगळे  GTG  मिनीच होतात आमचे) इतरांबरोबर झक्कीनी आम्हाला टांग दिली होती हे माझा स्मरणात होते. त्याना मात्र ते आठवतही नव्हतं, असं त्यांच म्हणणं. माझ्या विरोधाला आणि शंकेला थोडासा मान देऊन संदीप एक बाक  ( फक्त) अडवायला राजी झाला. आता तिथेच बसून इतरांची वाट बघण्यास पर्याय नव्हता...
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 7:52 pm: |       |  
 | 
 स्वाती फारसा वेळ न दवडता लगेच कॅफेटेरियात शिरली. तिला एवढे  world famous  झक्की कुठे दिसले नाहीत म्हणे. त्यात अनिलभाई नावाच्या कुणा गुजराथी माणसाला शोधून आली असं ही म्हणत होती. ते गुजराथीच आहेत, आणि तसा बर्याच मायबोलीकरांचा समज आहे असं काहीतरी बोलत होती. एकंदरीत बरळणं बघता तिला भूक लागली असावी हे आमच्या लक्षात आलं, पण ते खिलाडूपणे मान्य करण्याचं धाडस आदित्यने दाखवलं  (I am always Hungry)...  खरं तो  Mom  विषयी बोलायला घाबरला नसता, पण त्याचं लक्ष तेवढ्यात इडल्यांकडे वेधण्यात आलं. अनिलभाई नामक गृहस्थ गुजराथी नाहीत हे तिला पटवायला बराच वेळ लागला कारण  ' हातचे कंगन' गणेश दर्शनाला अडकून बसलं होतं. आणि दिसण्यावरून गुजराथी नाही तरी  ' भाई' आहेत नक्की असा दुसराच समज दृढ झाला असता. झक्की चार पायर्या उतरून खाली आले तेव्हा ते आपल्याला भेटायला आले आहेत याची खात्री पटली. खर्या पुणेकरा प्रमाणे... जाऊ दे. आल्या आल्या त्यानी लग्न न झाल्याचे दुष्परिणाम आम्हाला ऐकवले, पण आमची सगळ्यांचीच  ( वेगवेगळ्या व्यक्तींशी) लग्न झालेली असल्यामुळे कुणालाही नवल वाटले नाही. हे सर्व मिसेस झक्की आणि  ' स्नेक्स' खाणारा मुलगा बरोबर न आल्याने ऐकावे लागले. तिकडे गणपती पडद्यात असून तो भाईना दर्शन देत नाही ही माहितीही त्यानीच आम्हाला दिली.
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 8:10 pm: |       |  
 | 
 
 अनिलभाईनी सरते शेवटी आम्हाला दर्शन दिलं. हा गणपती दर्शनाचा परिणाम नसून, भाईनी पुजार्यावर भाईगिरी केली की काय अशी शंका मला आली. विचारणार होतो, पण भाई लोकांसमोर तोंड उघडताना  (  तेही तोंडात इडली असताना) मला जरा कठिण जातं. त्यात भाईंबरोबर एक जुनी  (  म्हणजे जुना  ID  असलेली) मायबोलीकरीण हजर झाली.  NJ  कर  HG  वर येतात ए.वे.ए.ठि.... ला नाहीत, तर ही फक्त ए.वि.ए.ठि....ला येते,  HG वर नाही. असे ही मायबोलीकर असू शकतात हे पाहून मला गदगदून आलं आणि एकातरी  MB  करावर विश्वास ठेवता येईल असं वाटायला लागलं. भाईंबरोबर आलेले भाईंचे कुटुम्बीय मात्र एकेकटे  (  पलिकडच्या बाकावर्) बसून इडल्या वगैरे खात होते ही बातमी त्यानी आम्हाला लागू दिली नाही. जान्हवी बरोबर आलेला देवेन  (  तिचा नवरा -  गैरसमज नसावा ही विनंती) त्याच्या नावापुढे भाई लावत नसल्यामुळे, त्याची  Turn  येईपर्यंत रांगेत उभा होता. मी भीत भीत माणसाला फोन केला, म्हटलं भलताच माणुस निघायचा. पण तो आपलाच माणूस निघाला. तो नुकताच पाय उतार होऊन समीर आणि वरदा बरोबर देवळात शिरला होता. या सगळ्या गडबडीत म्हणजे लालू ऐवजी जान्हवीच्या  Surprise entry  मुळे आरती, वरदा, समीर, अनिरुद्ध आणि बरोबर  ' माणुस' केव्हा येऊन बसले कळलंच नाही स्वाती आणि झक्की इतके बोलत होते, त्यामुळे पण असेल कदाचित्)
 
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 8:36 pm: |       |  
 | 
 
 पमा नामक कुणीतरी  ID  बद्दल फारच काहीतरी गैरसमज आहेत. झक्कीनी आपण वात्रटपणा करतो, तेव्हा पमा असतो अशी प्रांजळ कबुली दिली, आणि तेवढ्यात पमा नामक व्यक्तीचा फोन आला. आता झक्की सवटःच एका वेळी दोन ठिकाणी असतात की काय अशी शंका येऊ लागली. फोनवरील पमाचा आवाज, झक्कींच्या पुणेरी, नागपुरी आवाजाशी जुळतो का हे बघण्यासाठी मी तिचा फोन घेतला.  'Weekend ला स्वातीला मिळणार्या फुकट मिनिटांसाठी नव्हे', पण तिचा तसा गैरसमज झाला. फोनवरचा पमा बायकी आवाजात बोलत होता  ( तुझा आवाज गोड आहे रे)... त्यामुळे मला ते झक्कीच आहेत असं वाटेना. अधिक तपासणीसाठी मी त्यानाच फोन दिला  (  फोन स्वातीचा होता, माझं काय जातं?) तर ते मग स्वतःशीच फोनवर बोलू लागले. मग मात्र ही तपासणी आवरावी लागली. समोर इडली, वड्याच्या राशी बरेच लोक रिचवत होते, तेव्हा आपणही त्यामागे लागावे अशी एक टूम निघाली आणि एकमताने रांगेत उभं रहायचं ठरलं. सौ. झक्कीना कॅलिफोर्नियात आपल्या मायबोलीकरांचे वाईट अनुभव कसे आले, आणि त्यामुळे त्या आल्या नाहीत हेही कळलं  ( शिल्पाच्या घरी वाटतं). आलेल्या महिलावर्गाने सोबत आपापल्या ह्यांना आणलेलं असल्यामुळे त्याना खुशाल रांगेत उभं करून त्यानी लगेच  NJ  च्या  ' महिला चॅप्टर' एका कोपर्यात सुरू केला, आणि चकाट्या पिटत बसल्या.  ' तिथलं गोड काही घेऊ नका, मी लाडू आणले आहेत, त्यांचं कौतूक कोण करणार?' अशी तंबी मिळाल्यामुळे कोणी तिथला गोड प्रसाद घ्यायला धजवले नाहीत. काही लोकानी आम्ही त्या लाडवांचा तीन तीन वेळा उल्लेख करू असा शब्द दिला तेव्हा कुठे सुटका झाली....
 
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 9:32 pm: |       |  
 | 
 
 झक्कींनी मात्र या गडबडीत गायब होऊन सगळ्यानी आपापली बिलं दिल्यावर प्रकट व्हायची करामत करून दाखवली.  ' अरे बिल दिलत की काय? मी देणार होतो' हेही ऐकवलं. ते याबाबतीत प्रसिध्द आहेत हे त्यांच्या निदर्शनाला आणून देताच,  ' मी हे पुण्यात शिकलो' अशी माहितीही त्यानी दिली. पुणेकरांसमोर बसून आणि तेही जुन्या जाणत्या पुणेकरांसमोर  (Reference:  पेशव्यांचा पत्ता) असं बोलून त्यानी आपण शूर आणि दिलदार आहोत हे सिध्द केलं. त्यानंतर एकाही पुणेकराला अगर करणीला बोलू न देता ते एकटेच बोलत होते, आणि  ' तुम्ही पण बोला ना,' म्हणत कोणाला बोलू देत नव्हते. मला आधी वाटलं की हा बेसन लाडू टाळुला चिकटल्याचा परिणाम असावा  (Reference:  झक्की वगळता सर्वानी लाडू खाल्ले), म्हणून मी आणखी एक लाडू खाऊन बघितला, पण तोही चांगला निघाला. हजर असलेले पुणेकर  ' जाज्वल्य अभिमान' वाले नव्हते बहुतेक.... त्यामुळे तुम्ही बोला असं त्याना सांगून स्वतःच बोलत असलेल्या झक्कींना ते अडवू शकले नाहीत.  ( स्वाती झक्कींच्याच गल्लीत रहायला गेल्यामुळे तिला  ' वाण नाही पण गूण लागला असावा' असं वाटू लागलं.. ती बोलत होती)... चहा मात्र आता झक्कींनीच द्यायचा असं ठरलं तेव्हा झक्कीं सोबत दोन तगडे गडी देऊन त्यांना रांगेकडे पाठवण्यात आलं. ते पैसे देऊन आले तेव्हा वाटायला लागलं की तो गार्डन रेस्टॉरंटचा किस्सा खरं असावा.
 
 चि. आदित्यने मध्यंतरीच्या काळात पूर्ण देऊळ फिरून घेतलं.. लाडू इडल्या खाऊन घेतल्या... मधल्या वेळात आपल्या मम्माचं वय चार चौघात जाहिर करून घेतलं. सोळा अधिक आदित्यची सात हे त्या आकड्यापर्यंत कसे पोहोचतात ते कळलं नाही, पण लाडू समोर असताना असल्या शंका विचारू नयेत, याचं भान सगळ्यांना होतंच. झक्कींनी सामोश्यापासून गुलाबजामूनपर्यंत सगळ्या पदार्थांची त्यांची रेसिपी सांगितली.  (  सौ. ना ऑर्डर सोडावी). त्यांच्या सौंनी वापरलेली रेसिपी सगळ्याना, आणि विशेष करून महिला चॅप्टरला आवडली  (  दुकानातून घेऊन या)...  HG वर झक्कींना एकापेक्षा जास्त बायका आहेत असा समज असल्याचीही चर्चा झाली. 'खरं की काय?' कुणीतरी विचारलं,  ( स्वाती असणार दुसरं कोण?) पण हा प्रश्न गैरसमजाबद्दल होता, बायका असल्याबद्दल नव्हे, नाहीतर झक्की एक नाहीतर दुसरी घेऊन आलेच असते, नाही का?
 
 आमची बडबड वाढत असली तरी कॅफे मधली गर्दीही वाढत होती. एका हातात खाण्याचा ट्रे आणि एका हातात लहान मुल घेऊन उभ्या राहून  '  आम्ही कधी उठतो' याची वाट बघणार्या बायका बघून मग तिथे बसवेना. पटकन उठून त्यांना जागा रिकामी करून देत आम्ही सगळे बाहेर पडलो. वरती देवळात बसून सगळ्यानी गप्पा माराव्या असा विचार होता, पण भाईंची भाईगिरी पाहिलेला पुजारी अजूनही सदम्यात होता असे कळले. खरंतर व्यंकटेशाची आरती चालू असताना त्याला आपल्या गप्पा ऐकू येणार नाहीत असं सर्वांनुमते ठरल्यामुळे बैठक मोडली. आता बाहेरची थंडी आणि आता बसायला जागा नाही अशी परीस्थिती झाल्यावर निघायला पर्याय नव्हता. फोटो काढतो म्हणून दोघा चौघानी कॅमेरे बाहेर काढले. ते चालू होते, की नुसते दाखवायला आणले होते ते कळेलच लवकरच. अनिलभाईंनी एवढा वेळ लाम्ब ठेवलेल्या आपल्या कुटुम्बाला आमची सर्वांची ओळख करून दिली. त्यात माझ्याकडे बघून  ' बरैलें' असं काहीतरी म्हणाले. लिखाणा विषयी काहीतरी असणार असा माझा समज झाल्यामुळे मी हा वृतांत लिहायला घेतला. तिकडे  ' गुजराथीत असां शब्द आहे का हे शोधायला हवं' अशी स्वातीने तिच्या डायरीत नोंद केली. पुन्हा कधीतरी भेटूच असं मी म्हणणार होतो, पण त्यापूर्वीच  ' अजयकुमार' यांनी  ' विनयच्या घरीच भेटा' अशी सूचना करून टाकली.  NJ  करांचा स्वभाव माहीत असल्यामुळे मीही  'GTG  ना? माझ्या घरी करू' असं सांगून टाकलं( एविएठी नाही).
 ' तुमचं पुस्तक वाचायला हवं एकदा' असं म्हणणारे परस्पर निघून गेले, तेव्हा ते नक्की कुणी वाचायला हवं हे विचारायचं राहून गेलं...
 
 
 समाप्त
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 10:04 pm: |       |  
 | 
 
 
 या लेखातून बरेच नवीन गैरसमज निर्माण होणार हे उघड असल्याने काही तळटिपा देणे आवश्यक आहे....
 
 १. अनिलभाई गोव्याचे असून त्यांच्या नावातील भाईचा भाईगिरीशी काहीही सम्बंध नाही.
 २. स्वाती, उर्फ निनावी  (  हे सांगायलाच हवे का?) ने घेतलेला  ID  तिच्या मुलालाही  Noname  वाटला.
 ३. स्वातीने आणलेले बेसनाचे लाडू, खरोखरच उत्तम होते, आणि त्याची दाद मनापासून द्यायला हवीच.
 ४. समीर, थोडासा मनोज बाजपयी सारखा दिसतो.
 ५. स्वाती तुझ्या घराण्याचं अभिश्रुती बरोबर नातं आहे का बघ, तुमच्या साम्य आहे.
 ६. आरतीला पुढच्या एविएठिला बरपूर बोलायचा चांस देण्यात येईल....
 ७. अजयकुमार आणि आदित्यने  GTG  ला येऊन, आणि एकमेव सौ. झक्कीनी  GTG ला न येऊन झक्कीना बोलायला चांस दिला.
 (Jokes apart  सौ. आनंदराव आल्या असत्या तर आम्हाला आवडलं असतं).
 
 ८. कॅलिफोर्नियात कुणाच्यातरी घरी सौ. झक्कींच्या हस्ते वयस्कर म्हणून कुणाचा तरी  Baby Shower  झाल्याचे कळते. त्यात वयाला मान दिल्यामुळे त्या रागावल्या, आणि आमच्या एविएठिला आल्या नाहीत. पुढच्या वेळी हजर असलेल्या महिलावर्गाने  Pregnent  नसल्याचा दाखला आणायचा अहे.
 ९. अजयचं नांव अजयकुमार आहे, हे शिक्रेट अनिलभाईनी कसं शोधलं हे अजून कळलेलं नाही, पण त्याबद्दल ते सांगतील कधीतरी.
 १०. वरदाचं नांव ती सारखी सारखी  NJ BB  वर येत नसल्याने मी  ' हर्शदा' समजलो. ती सतत हसत असते त्यामुळे हा गैरसमज झाला असावा. (Sorry)
 ११. संदीप पुढच्या एविएठीपर्यंत एविदोठि असल्याचे कळल्यास त्याला, आणि तोतया पमाला एविएठीला आमंत्रण मिळणे कठीण आहे...
 
 आणि शेवटी..
 
 १२. वरच्या सर्व लिखणासाठी  (Please)  सगळ्यांनी मोठ्ठाले दिवे घ्याच...
 
 
 
 
 |  | | 
 |  |  |  | Tuesday, February 21, 2006 - 10:28 pm: |       |  
 | 
 फोटोंसाठी हे ट्राय करा..
 निनावे, आदित्यचा फोटो मस्त आला आहे...
 
 http://community.webshots.com/myphotos?action=orderPrintsAlbum&albumID=547849948
 
 
 |  | | 
 |  |  |  | Thursday, February 23, 2006 - 9:50 pm: |       |  
 | 
 
 नया अंदाज़च्या निमित्ताने
 
 
 न्यू जर्सीमध्ये अगदी बॉलिवूड श्टायल ही एकमेव स्पर्धा असते. गेली पंधरा वर्षं ही स्पर्धा चालू आहे. बॉलिवूड श्टायल अशा साठी म्हणालो, की ह्या स्पर्धेचे परिक्षक म्हणून कुणीतरी फिल्लमवाले येतात. आणि  NJ कर उत्साही मंडळीना फिल्लमवाल्यांचे तर बरंच कौतुक आहे. बॉलिवूड मध्ये कुणाचं जमलं कुणाचं मोडलं, यावर मनापासून चर्चा करणारे पालक मी बर्याच वेळा पाहिले आहेत. मला भीती होती, उगाच सल्लूभायला बोलवायचे. म्हणजे तो कार्यक्रम सोडून हरणं मारायला शोधत फिरला असता.
 
 या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली, निदान आमच्या दृश्टीने गणपती दरम्यान. कुठला नाच, कुठलं गाणं त्यासाठी लागणारे कपडे, दागिने वगैरे तयारी एकाद्या लग्नाच्या तयारीपेक्षा कमी नसते. आणि ही सगळी तयारी कार्यक्रमाच्या आधी नव्हे सिलेक्शन साठी करावी लागते. गेल्यावर्षी म्हणजे  2004  च्या सेलेक्शनला आमच्या ग्रुपला, साध्या कपड्यात आल्यामुळे स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं होतं. या सिलेक्शनला जवळपास सत्तर, ऐंशी ग्रुप येतात, आणि निवडले जातात फक्त वीस.
 
 सिलेक्शन पासून कार्यक्रम होईपर्यंत मात्र मुलाना सतत प्रॅटिस, प्रॅटिस, प्रॅटिस करावी लागते, आणि मगे दिवस उजाडतो तो कार्यक्रमाचा.
 
 यंदा म्हणजे कार्यक्रमाच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त, महिमा चौधरी परीक्षक म्हणून आली होती. यापूर्वीही ती एकदा या स्पर्धेला आली होती म्हणे. सध्या तिकडे फारश्या फिल्म येत नसाव्यात तिच्या. आमच्या मागे बसलेला गुज्जूभाई, आपल्या आठ दहा पोरां पलिकडे बसलेल्या दक्षाबेनला  ' ए पोपुलेर छे? ए पोपुलेर छे?' असं काहीतरी विचारत होता.
 
 कार्यक्रम न्यू जर्सीच्या  State Theater  ला. महिमा चौधरीच्या हाजिरीची किम्मत दोनशे डॉलरच्या पहिल्या सीटपासून पंचावन्न डॉलर शेवटच्या सीट. ती सुध्दा आणि आरक्षण असेल तरच, कारण थियेटर गच्च भरलेलं. भाग घेणारी मुलं सकाळी नऊ पासून तिथे हजर, कारण त्याना स्टेज प्रॅक्टिस घ्यायची होती. मुलांच्या आया पण खूश, कारण मुलांची तयारी, मेकप इत्यादीची त्यांच्या नेहमीच्या जबाबदार्या नव्हत्या, त्यामुळे प्रेक्षकात बसून सगळा कार्यक्रम बघता येणार होता... खरं तर कुठल्यातरी हायस्कूलच्या थेटरात घेतली असती स्पर्धा, तर पंधरा वीस डॉलरला तिकिटं देता आली असती, पण  ' नया अंदाज़' चं  prestige  मध्ये आलं असावं..
 
 
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
| हितगुज गणेशोत्सव २००६ |  |  
   |