Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
adityaranade
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » adityaranade « Previous Next »

ओम आदित्याय नम्:

ha!ha!!

सुरुवात तर झाली

आता पहिल्यांदा काय लिहायच ते बघू..
चंपक, श्यामली, अमेय
स्वागताबद्दल धन्यवाद!

राजापूरच्या आठवणी

काल्-परवा कधीतरी होळी झाली ना?
क्लीवलंडमध्ये महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम झाला अस ऐकल आणि आमच्या राजापूरातल्या होळीची आठवण झाली!

होळीचा आदली रात्र म्हणजे 'होम'! अम्हा पोरा-सोरांना रात्री १२-१ वाजेपर्यंत भटकायची फुल परमिशन मिळण्याचा एकमेव दिवस! रात्री सगळ्या आळीत हिन्डून लाकडे गोळा करयची..प्रत्येक घराच्या समोर जाऊन घरमालकाच्या नावाने बोंबा ठोकायच्या..उदहरणार्थ.."मामा जोश्यांच्या बैलाला..!"
घरमालक बाहेर येऊन लाकडे देईपर्यंत बोंबा थांबत नसत! होळीच्या दिवशी मात्र कोणाला त्याचे काही वाटत नसे.. एकदा लाकडे गोळा झाली की मग पोलीस ग्राऊंडवर मोठा 'होम' आणी होम पेटला की पुन्हा बोंबा!! 'होळी रे होळी, पुरणाची पोळी; साहेबाच्या वर बंदुकीची गोळी!!'

दुसर्‍या दिवशी सकाळी, एका ठरावीक पोफळीच्या (सुपारीचे झाड) बागेतून पोफळीचे एक झाड उपटून काढायचे, त्याची पूजा करायची, त्याच्या जागी पोफळीचे एक नवीन रोपटे लावायचे
आणि मग १५-२० पोरांनी 'होळी(ते झाड) गावातून नाचवत नाचवत नदीपाशी न्यायचे! दिवसआखेरीस हात चांगलेच दुखून येत असत!

त्यादिवशी मग पुरणपोळी आणि नारळाचे दूध अस बेत..

होळीपासून शिमगा सुरू होत असे..महिनाभर. मग महिनाभर लहान लहान गावातून येणर्‍या पालख्या आणि खेळे! 'तिठवली' गावाची पालखी आमची फेवरीट! आमच्या आळीत ती आली की मी आणि माझा भाऊ, त्या पालखीबरोबर प्रत्येक घराच्या आंगणात जाउन पालखी नाचवत असू! पालखी बरोबर मी एक दोन वेळा ढोल्-ताशा पण वाजवलेला आहे!

खेळे हा अजून एक निराळा प्रकार! ४-५ वर्षांचा असतान मी गोमूचे एक गाणे नेहमी म्हणत असे- " गोमू तुझा नवरा गे बाय, हाय गो फ्याशानवाला; त्याने लावीला गॉगल काला!"

good old days..
संगीत आणि मी

कोण्या काळी कुमारजींनी अत्यंत आर्ततेते गायलेले कबीर भजन कानात आणि ओठात रेंगाळत असते. परवाच ऐकलेल्या बॉब डिलनच्या गाण्याचा आज नुकताच उमजलेला अर्थ अस्वस्थ करुन जात असतो. आणि कोठेतरी डेव्ह ग्रिसमन आणि टोनी राइस यांची गिटार्-मेन्डोलीनची जुगलबंदी आठवत असतेच.

मनाच्या अशा अवस्थेत आरती प्रभूंची एक कविता नजरेसमोर येते..
"संपूर्ण मी तरू की, आहे नगण्य पर्ण
सांगेल राख माझी, गेल्यावरी जळून"
कवितेचा उमगत जाणारा अर्थ.. अन खोलीच्या कोपर्‍यात खुणावणार गिटार..एक गाण जन्माला येत असत

to be continued

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner adityaranade Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators