Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मायबोलीकर आणि समाजकार्य ...

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » मायबोलीकर आणि समाजकार्य « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 11, 200535 11-11-05  9:56 am
Archive through November 21, 200535 11-21-05  11:30 am

Moodi
Wednesday, November 23, 2005 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनबाबत माझा अनुभव चांगलाच आहे. मी तिथे साधारण महिनाभर काम केले. तेथील व्यक्तीही खेळकर अन चांगल्या आहेत त्यामुळे वेळ कसा जायचा ते कळलेच नाही. मध्ये माझे भारतात जायचे ठरल्याने मी ते सोडले. आता थंडीनंतर परत एकदा तिथे काम करायचे आहे.
तसेच इतरही संघटना चांगल्या आहेत.


Admin
Wednesday, November 23, 2005 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे उपसदर वेगवेगळ्या सेवाभावी संस्था आणि मायबोलीकर त्याना शक्य असेल त्या पद्धतीने कसे काम करीत आहे याच्या माहितीसाठी आहे त्या संस्था, त्यांनी हाताळलेले प्रश्न मूळात योग्य आहे का, त्यानी कुठले प्रश्न हाताळावे, कसे हाताळावे याची चर्चा इथे केली तर मुख्य माहितीकडे दुर्लक्ष होईल तरी कृपया ती चर्चा इथे टाळावी.

Kandapohe
Wednesday, February 01, 2006 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे!! हे शाळेत शिकलेले वाक्य अजूनही मनात साठलेले आहे.

देशात असताना सहज म्हणुन सारसबागेत गेलो होतो. आपण इथे का आलो, आपण कचर्‍यात तर बसलो नाही ना अशे विचार मनाला भेडसावत होत्या. तेव्हा एक विचार आला की एखादा ग्रुप जमवुन महीन्यातील एखाद्या संध्याकाळी जायचे आणि जमेल तितका कचरा गोळा करुन Dustbin मधे टाकायचा. आपले अनुकरण काही जण करतील आणि थोडाफार फ़रक पडेल.

मायबोलीचे महीन्यातुन एकदा कुठे ना कुठे GTG होतेच. ते अशा सत्कार्याला लावता येइल का? मी उंटावरुन शेळ्या हाकतो आहे असे मला वाटते आहे. पण देशात आल्यावर हे करावे असा माझा विचार आहे.

मी परत आल्यावर जे पहीले GTG होईल त्यात हा विचार मी परत मांडेनच.
:-)

Bee
Wednesday, February 01, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच कांदेपोहे, तुमचा हा उद्देश अमलात येऊ देवो अशी सदिच्छा!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators