Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माझी आवडती मराठी मालिका ...

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 14, 200535 09-14-05  11:40 am
Archive through January 12, 200625 01-12-06  8:03 am
Archive through March 28, 200625 03-28-06  7:20 am
Archive through April 07, 200625 04-07-06  12:03 pm
Archive through April 24, 200620 04-24-06  6:55 am
Archive through May 19, 200620 05-19-06  11:52 am
Archive through November 10, 200620 11-10-06  12:25 pm
Archive through December 12, 200620 12-12-06  5:06 am
Archive through January 16, 200720 01-16-07  2:27 pm
Archive through January 29, 200720 01-29-07  8:59 am
Archive through February 09, 200720 02-09-07  8:04 am
Archive through February 15, 200720 02-15-07  7:04 am
Archive through February 22, 200720 02-22-07  9:45 am
Archive through February 27, 200720 02-27-07  7:38 am
Archive through April 26, 200720 04-26-07  6:56 am
Archive through May 18, 200720 05-18-07  8:04 am
Archive through September 10, 200720 09-11-07  12:10 am
Archive through October 05, 200720 10-05-07  11:30 pm
Archive through October 12, 200720 10-12-07  9:46 am
Archive through November 21, 200720 11-21-07  6:30 am
Archive through February 06, 200820 02-06-08  1:53 pm
Archive through February 14, 200820 02-14-08  8:39 pm

Nandini2911
Friday, February 15, 2008 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ.. हॉस्टेलमधे एका मुलीने पंख्याला ओढणी फ़ासून आत्महत्या केली होती. बाजूच्या खोलीत मी असून मला समजलं नाही..
नंतर तिची रूम मेट आल्यावर दार फ़ोडलं..
माणूस पंख्याला लटकून मेलेला पाहिलाय... त्यानंतर पोलीसाना उत्तरं पण दिली आहेत...


Dhanu66
Friday, February 15, 2008 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahi. mi raiway track cross karatana melele lok 5/6 vela baghitale aahet. 2 vela tar dead bodies aamchyach dabyat chadhvlyaat.

Psg
Friday, February 15, 2008 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए काय चाललंय इथे?
आपण 'पाहिलेल्या मराठी मालिका' यावरच बोलूया का?

'मी मराठी' चॅनल बघता का कोणी? बरे असतात त्यावर कार्यक्रम. बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० ते १०.३० 'असे पाहुणे येती' म्हणून मुलाखत असते. दिलिप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, अश्विनी भिडे-देशपांडे अशी मंडळी येऊन गेली आहेत. 'ताकधिनाधिन' पण असतो टीपीला.. 'घे भरारी' म्हणून मालिका सुरु झाली आहे. बरी आहे तीही. झी, ई चे कार्यक्रम पाहून कंटाळा आला असेल तर हा चॅनलही पहा मधूनच.. :-)


Shyamli
Friday, February 15, 2008 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मी मी मराठी मी मराठी कोण ते राज राज ओरडतय :D
बर इथे कविता महाजन, स्वानंद किरकिरे पण येवून गेले.
आणि त्या घे भरारी मधे कोल्हापूरहुन आलेली एक पत्रकार आहे मला तीला बघून नंदिनीचीच आठवण येते अगदि खरच :-)

या मालिकेच टायटल song मिलींद गुणाजीने लिहिलंय मस्त आहे.

अजुन एक गम्मत याच्यावरच्या ब-याच मालिकांची नावं मराठी गाण्यांच्या ओळी आहेत
दोष ना कुणाचा, दैव जाणिले कुणी, हा खेळ सावल्यांचा, रंग माझा वेगळा (बंदच पडली :-()

मृणाल कुलकर्णीचा दावत पण छान असतो या मधे hollywood चे नो बिंगो फेम (सुनील नारकर) येउन गेले, एक्दम् मस्त व्यक्तीमत्व
कांचन अधिकारीचा दिलखुलास कार्यक्रमही मस्त अस्तो, छानच बोलते ती .

बातम्या आणि टोटल करमणुक हे दोन कार्यक्रम मात्र डोक्यात जातात अशुद्ध उच्चारांमुळे.


Amruta
Friday, February 15, 2008 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असंभव मधे तो सुनिल बर्वे अस काय बोलतो. सॉलिड हसायला येत.:-)
'विक्रांत (श्वास सोडत.. पॉज घेत).... काय नाव आहे त्या...(पॉज) मुलीच(परत श्वास सोडत)'


Sonalisl
Friday, February 15, 2008 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली सगळ्याच वाहिनीवरच्या सगळ्याच मालिकांमध्ये दिर्घ श्व्वसन चालु आहे. सगळ्या Talent showsगुणदर्शक कार्यक्रमात तर विचारायलाच नको. उदा.
"आता......तो..क्षण........ आला.... आहे."
"बघु.....महागुरू......किती...............गुण..........देतात..ते."
कित्ती वेळ काढतात ते. असं वाट्ट, गदागदा हलवुन ओरडाव "लवकर बोल" म्हणुन.


Giriraj
Saturday, February 16, 2008 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेक्चरला जाण्या_आधी जर तयारी झाली नसेल तर मी एकच आकृति खूप वेळ काढत रहायचो तसेच वाटते हे.. आणि एक मालिका अशी नाही की सरळ कही होईल.. सतत कुणी ना कुणी कुणाला ना कुणाला रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात अस्ते... या पार्श्वभूमीवर 'मी एक बन्डू' ही मालिका पहाविशी वाटते पण ती नेमकी सरेगमच्या टायमाला असते..:-(

Sanghamitra
Saturday, February 16, 2008 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> "आता......तो..क्षण........ आला.... आहे."

हो आणि पुढे "पण त्या आधी घेऊ या एक छोटासा(साडे आठ मिनिटांचा) ब्रेक."
आणि काहीतरी सर्प्राईज वगैरे मिळाल्यावर ज्या रिऍक्शन्स देतात त्या पण सिरियल मधल्या सतरा वेळा चष्मा छापच असतात.
मी फक्त ट्रेलर्स बघून जिवाची करमणूक करून घेते. वहिनीसाहेब नावाच्या मालिकेचा ट्रेलर मला फार आवडतो.

>>सतत कुणी ना कुणी कुणाला ना कुणाला रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात अस्ते
अगदी. आयुष्याचं ध्येय फक्त सूड घेणे एवढंच असू शकतं? अशा मालिका बघून सगळ्या पिढीची प्रवृत्तीच बदलेल असं वाटतं कधीकधी.

Mansmi18
Thursday, February 28, 2008 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी सध्याची तुफ़ान विनोदी मालिका "वहिनिसाहेब" बघतात का?

सध्या त्या मालिकेत जे चाललेय ते बघुन खूप मजा येतेय. राजा "विचारांची देवाणघेवाण" करायला new zealand ला चालला. हा "देवाणघेवाणीचा" approach आमच्या कधी डोक्यातच नाही आला.:-)

मी बायकोला म्हटले मी जाउ का "विचारांची देवाणघेवाण" करायला, ती म्हणते divorce paper वर सही करुन ठेव आणी अर्ध्या property value चा चेक लिही आणी मग वाटेल तिथे "देवाणघेवाण" करायला जा..सगळ्या बायका कुठे नेहा सारख्या समजूतदार असतात:-)

आणी अवघाची संसार त्यानी रात्री दहा नंतर ठेवायला हवी. त्या हर्ष आणी त्या बाईची story जशी चालली आहे ते मुलाबाळांबरोबर बघता येत नाही हो -;)


Suja
Monday, April 21, 2008 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सुखानो या मे मधे सम्पनार आहे म्हने.
असम्भव खुपच चान चललि आहे.
चिन्मय मन्द्लेकर म्हन्जेच अभिमान चे सवाद मसतच


Kittu
Tuesday, April 22, 2008 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झी वर फक्त "असंभव" सोडले तर एकही सिरीयल धड नाही... "वहिनीसहेब सगळ्यात आधी बंद झाली पहिजे.... US मध्ये "मी मराठी" दिसण्याचे काही chance आहे का?

Dakshina
Friday, May 02, 2008 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळत नकळत मध्ये तर आता परत गौरव जिवंत झालाय. हे सगळं असलं सिरियल्स मध्येच घडतं.
आणि अख्ख्या एका एपिसोडात... दाखवतात ते काय तर चार दोन वाक्य, तेच तेच चेहरे.. आणि... छूक छूक क्यामेरा.....
गेलेल्या एक एपिसोड्मध्ये तिला तो नवा गौरव दिसतो, तर हि त्याच्या मागे अडीच किलोमिटर पर (टेन) आवर या वेगाने धावत आणि घशातून हाकेसारखा आवाज काढत पळत (??) जाते.. आणि मागून कोणितरी ओरडतंय हे न ऐकू यायला तो नवा गौरव इतका किवंडा असावा?
वेळ काढू मालिका.... नुसत्या.....


Swaroop
Tuesday, May 13, 2008 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच.... झी मराठी वरच्या एकुण एक मालिका सध्या बकवास आहेत....
मी मराठी फ़ुल्ल टाइम्पास!
एक फ़ुल..., चोरावर मोर, उचापती.... म्हन्जे डोक्याला ताप नाही category
दावत, दिलखुलास खासच...
आणी स्वप्नील सोनालीचा तो game show ही बरा असतो....
मेन म्हणजे हे सगळे program कुठुनही कधीही बघता येतात!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators