Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Maayboli/Hitguj Subscription

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » Maayboli/Hitguj Subscription « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 25, 200335 02-25-03  3:54 pm
Archive through February 26, 200335 02-26-03  2:12 pm
Archive through July 30, 200422 07-30-04  2:38 pm

Parinita
Tuesday, September 19, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin i want to subscribe to rangiberangi for 3 years. i want to write diary there.i dont want to use credit card no paypal also.how can i do in rupees.

Admin
Tuesday, September 19, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Parinita,
Maayboli is a registered organization in US and we submit tax returns every year. As such we have to maintain accounts and source of income. We can not accept anonymous subscription and this has become more important since 9/11. If you have to be paid subscriber, you have to disclose name and address to us. Credit card or paypal helps us to maintain integrity of accounts by confirming identity. Paypal also makes sure we at maayboli never know your credit card number, but just confirms identity (Thus addressing your securiy concerns). Hope you understand these measures are in the long term interest of Maayboli.

Parinita
Tuesday, September 19, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin can i send check with my name and address but please do nto disclose the details to anybody else.
i had made complaint heer about mods deleting post not liked by brahmins pleas guide me abt your policy.
if anti muslim, anti communist, anti pakistan, anti congress, anti bjp, antii gandhii, anti christain anti shivadharma ( shivadharama is it a joke kind of threads) anti obc, anti bc writing are allowed then why only anti brahmin material gets deleted immediately. us based comapnies are requried to be NON recist. this is clear recism.

Admin
Tuesday, September 19, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Parinita,
We try our best to protect privacy of our members. In return members also understand the obligation they have not to misuse this mutual trust. Rangiberangi section gives more freedom of expression and control to members who own it, but at the same time puts more responsibilty on the owner to write reponsibly.
Based on what you have posted earlier, we do not think you take this responsibility seriously and so we can't protect your identity/privacy. We encourage you to write with your own real name if you want to have a rangiberangi BB.

Abedekar
Wednesday, September 19, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

is maayboli a non-profit organization?

Admin
Thursday, September 20, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

No. Maayboli is for Profit organization.
We had given a very serious consideration to make it non profit or merge with existing non profit. However after looking at various non-profit organizations and their fate after say 10-20 years (specially after original founders have moved on), we concluded unless there is a strong financial success, maayboli as an organization can not survive/very difficult to survive in the long term.
So we decided to create a for profit company and build an eco-system where all stakeholders, partners, readers can benefit from its success. e.g some members are already selling their own creations on maayboli (kharedi) where they benefit as well as maayboli benefits.

Abedekar
Thursday, September 20, 2007 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks for the clarification ... i have always wondered about this.

Bee
Friday, September 21, 2007 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin, but that sell is very less. Apart from Kharedi, what else is making profit? Is rangiberangi providing any profit? is just keeping site running, USA govt or Indian govt provides anything to you? we don't know internally how it happens?

Ksha
Friday, September 21, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे इंग्रजीमध्येच लिहावे असा काही नियम आहे का? :-)

Viveki
Friday, September 21, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee you are right. even UNO, FIFA and BCCI may be funding maayboli :-) Appreciate your ever (often mispalced) inquisitiveness, but a private company's internal working and profitability model is generally not disclosed.

Abedekar
Friday, September 21, 2007 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee - as vivek points out, its a private for prof t enterprise ... there is absolutely no obligation to disclose the internals of the company. that being said, its appropriate that rangiberangi memberships are described as 'subscriptions' and not 'donations'.

my guess is that advertising is a major source of revenue. maayboli could probably be classified as an entrepreneurial venture with solid social impact - could probably make a nice case study one day in an mba program.

Upas
Friday, September 21, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Abe, Perfecto.. very well said.

Zakki
Friday, September 21, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणि मायबोलीला देणग्या किंवा रोख बक्षिसे देतात का? देत असतील तर कोषाढ्यक्षाच्या जोडीने एक वकील असणेहि आवश्यक आहे.

काही काही खाजगी कं सुद्धा नको त्या लोकांकडून (मध्यपूर्वेतल्या) देणग्या स्वीकारतात. त्या कं म्हणतात की आम्ही 'आमच्या' लोकांना मदत करतो. पण इथल्या सरकारचे मत काही औरच. त्यांनी त्या संस्थेविरुद्ध आरडा ओरडा केला. स्वत:च्या बचावासाठी त्यांना भरपूर फी घेणारे वकील लागले, तरी त्यांच्यावर ठपका बसलाच!

अनेक अमेरिकनांच्या मते ' Hindu militant ' असे लोक आहेत. नि आपले इथले लिखाण वाचून त्यात त्यांचे काही चुकले असे म्हणता येणार नाही!


Limbutimbu
Saturday, September 22, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या पोस्टिन्गच्या नियमाला अपवाद करीट पोस्ट करतो हे!

प्रॉफिट म्हणले की नफेखोरी हा शब्द डोळ्यासमोर येतो!
सर्वच कम्पन्या किन्वा व्यावसायिक "नफा" मिळविण्याकरता धन्दा करतात!
हे व्यावसायिक आणि मायबोली यात फरक असावा! (तसा तो आहेच)
मायबोली अर्थार्जन करेल, नफा नाही मिळविणार!
अर्थार्जन करेल ते "मायबोलीच्या" हिता साठी!
नफा किन्वा फायदा या शब्दा ऐवजी मला "स्वबळावर उभे रहाण्यासाठी अर्थार्जन" करणे ही कल्पना अभिप्रेत आहे

कदाचित माझे वरील मुद्दे चूक असतील, पण भावना कळतील अशी आशा हे!
ज्या क्षणी मायबोली सो कॉल्ड प्रोफिटचा विचार करू लागेल त्या क्षणी तिचे सद्ध्याचे स्वरुप बदलुन ती एक धन्देवाइक साईट ठरेल, मात्र केवळ आणि केवळ "टिकुन रहाण्याकरता" आवश्यक तेवढे अर्थार्जन करणे हा उद्देश राहिला तर तो सर्व मायबोलीकरहि डोक्यावर घेतिल. टिकुन रहाणे यात, नविन तन्त्रज्ञान, त्याकरता आवश्यक निधी आदी सर्व बाबी धराव्या लागतील, पण इन एनी केस, या वर्षी मायबोली Inc ने अमुक तमुक डॉलर Profit केला या पेक्षा मायबोली Inc ने अमुक तमुक खर्चाचे उपक्रम राबविण्याकरता अमुक तमुक रक्कमेच अर्थार्जन केले असे ऐकणे केव्हाही भुषणास्पद ठरेल!
खर तर या विषयावर मत नोन्दविण्याइतका मी मोठा नाही, पण मला जे वाटते ते मी मान्डले, त्यातुन कुणाचा अधिक्षेप करण्याचा किन्वा सद्य स्थितीत चालू असलेल्या मायबोलीचा आणि तिच्या चालकान्च्या उद्दिष्टाप्रती शन्का घेण्याचा काडीचाही हेतू नाही!
इति लेखनसीमा!
:-)

Killedar
Saturday, September 22, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजिबात पटले नाही.
एकदा पंडीत नेहरूना जमशेदजी टाटा काही नवीन प्रकल्प समजावून देत होते. त्यातला एक शब्द ऐकल्यावर नेहरू म्हणाले. " Profit ! don't use that dirty word in front of me" बरे झाले टाटानी आपल्या मनाचेच केले.

मला वाटते मायबोलीने रग्गड पैसे मिळवावे. अगदी नफेखोरपणा करून. त्याचे चालक, सभासद जे कोणी असतील त्यानीही मिळवावे. त्यासाठी मायबोलीचे स्वरूप बदलले तरी चालेल.
का ? कारण त्यामुळे मायबोली जे काही करते आहे ते आणखी यशस्वी होईल. यात चार पैसे सुटतात हे कळाले तर आणखी मराठी वेबसाईट्स निघतील. आणखी मराठी लोकाना नोकर्‍या मिळतील. मराठी लेखक कविना मोबदला मिळेल. नवीन नवीन प्रयोग होतील.
हेच जर तुम्ही म्हणता तसे उपक्रम म्हणून केले तर त्या उपक्रमात सहभागी होतील त्यानाच फक्त फायदा होईल. आणि यात काही पैसा नाही म्हणून इतर कुणिही त्यात पडणार नाही.

त्यामुळे तुम्ही म्हणाल मग मायबोली मला माहिती आहे तशी मायबोली रहाणार नाही. आपुलकी वाटणार नाही.
अगदी बरोबर. मलाही तसेच वाटेल.
पण मी म्हणेन मला काय वाटते यापेक्षा जर एकूण मराठी समाजाचे त्याने भले होणारे असेल तर काय हरकत आहे? आणि आपुलकीचं म्हणायचं तर ते आपल्यावरही तितकंच आहे. माझ्या छोट्या शाळेत जी आपुलकी होती ती शहरातल्या मोठ्या कॉलेजात नव्हती. पण तिथे देखील मला काही अगदी जिवाभावाची माणसं भेटली. शाळेतली आपुलकी मी धरून बसलो असतो तर माझ्याच प्रगतीला मुकलो असतो.

हे लक्षात घ्या कि धंदा हा एवितेवी होणारच आहे. त्याला तुम्ही थांबवू शकणार नाही. मराठी माणसाने नाही केला तर कुणि परप्रांतीय माणूस मराठी माणसांना कामाला लावून पण मराठी वेबसाईट काढून करेल. मग मायबोलीने केला तर काय वाईट?

तत्वाचा प्रश्न म्हणून चालणारी वृत्तपत्रे असतात आणि मस्त धंदा करणारी नफेखोरी करणारी वृत्तपत्रे असतात. माझ्यामते तत्वाला जागून बंद पडलेल्या वृत्तपत्रांपेक्षा, नफा करून दहा लोकाना रोजीरोटी देणारी वृत्तपत्रे समाजाचं जास्त कल्याण करतात.
कधी गुजराथी समाजात वावरले आहात? सगळे एकमेकाना आपण नवीन काय धंदा सुरू केला आहे हे अभिमानाने सांगतात. मराठी माणसाने त्याच्या मित्रांमधे नुसते नाव जरी काढले तरी " झाली इथे यांची जाहिरातबाजी" म्हणून नाक मुरडले जाते. असं का? कारण नफा करणं चूक, निष्काम कर्मसेवा फक्त योग्य हे पिढ्यान पिढ्या आपल्यावर बिंबवले गेले आहे.

साधी रहाणी उच्चविचारसरणी करणारे आपण कुठे राहिलो आणि उच्च रहाणी, साधी विचारसरणी करणारे कुठे पोहोचले याचा विचार करा.

उलट अस म्हणूया मायबोलीच्या रुपाने सगळ्यानाच एक चांगली संधी आली आहे. आपण सगळ्यानीच त्याचा उपयोग करून भरपूर फायदा करून घेउ या

"ऋणं कृत्वा, घृतं पिबेत" म्हणणारा चार्वाक आणि "अर्थ एव प्रधान:" म्हणणारा चाणक्य यांचं आपण तेंव्हाच ऐकायला हवं होतं.
धंद्यात पैसे मिळवणे, नफेखोरी वाईट यासारख्या विचारामुळे आपल्या भारतियांचे आणि त्यातुनही मराठी माणसाचे केवढे नुकसान झाले आहे हे पाश्चीमात्य देशात राहिलेला कुणिही माणूस नक्किच समजू शकेल.


Bee
Wednesday, September 26, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किल्लेदार, बरोबर आहे तुमचे म्हणने.

खरच मायबोलिचे साहित्य विकायचे झाले तर कसे काय विकत येईल? माझ्या कथांबद्दल नाही म्हणत आहे मी..


Hawa_hawai
Wednesday, September 26, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किल्लेदार चांगले विचार आहेत.

btw जमशेदजी टाटांशी नेहरूंची चर्चा झाली असेल असे वाटत नाही. ते JRD असतील.


Maanus
Wednesday, September 26, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच मायबोलिचे साहित्य विकायचे झाले तर कसे काय विकत येईल...

सोपे आहे.

गोष्टीचा पहीला पॅरेग्राफ फुकट वाचायला ठेवायचा, पुढे वाचायचे असेल तर paid member व्हा :-)
same thing कविताबरोबर करता येईल, एक दोन कडवी फ्री, पुर्ण कविता हवी असेल तर paid membership :-)

पुढे जाऊन दोन तीन प्रकारच्या paid membership करता येऊ शकतात.

१. basic: इथे तुम्हाला चालु महीन्यातले सगळे साहीत्य वाचता येऊ शकेल. पण फक्त वाचता, कारण text, image format मधे असेल.
२. plus: मधे ह्या वर्षातले सगळे साहीत्य वाचता येऊ शकतील, again can only read, as text is in image format
३. super: one can read everything & download printable pdf files.

Story, Poems, Recipe writer gets paid by the number of views for their content
and you always have free membership for My City, GTP, V&C, My Experiences

wow! this is nice idea, I wish I had time to implement it.

Open Invitation: If anyone has time and talent to implement these ideas, I can sponsor the project. from the generated revenue 80% is yours 20% is mine.

Not talking about maayboli saahitya though for this project, as I dont have rights for that. :-)

I'll take back my words, if maayboli has interest in creating this kind of project. :-)


कृपया माझ्या बोलण्याच्या गैर अर्थ घेऊ नये. माझा पैसे कमवण्याच्या काही एक उदैश नाहीय... ना इथे स्पर्धा करयायचा. कल्पना आली, बोलुन दाखवली :-)
उद्योग करणे म्हणण्या इतके सोपे नसते, कधी काळी मी त्यातुन गेलोय आणि तेव्हा आमच्यावर असे पण दिवस आले होते की आठवडा आठवडाभर घरात एक रुपाया पण नसायचा.


Dineshvs
Thursday, September 27, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किल्लेदार, HH माणुस, मी बर्‍याच दिवसांपासुन हा विचार मांडत आहे.
हे जितक्या लवकर सुरु करु, तेवढे चांगले.
टिका होणारच, पण आपल्या हेतुबाबत आपली खात्री असेल तर टिकेचा विचार करायची गरज नाही.


Shonoo
Friday, September 28, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युनायटेड वे कडून मदत मिळू शकते का मायबोलीला? माझ्या क.म्पनीत दर वर्षी युनायटेड वे ची कॅम्पेन चालते. सगळ्यांना Gentle encouragement मिळत असते महिनाभर. मी कधी मराठी मंडळ, कधी JDRF किंवा तत्सम संस्थांना पैसे देते. पण मायबोली ला जर मिळण्या सारखे असेल तर अगदी आनंदाने देईन.

Seema_
Friday, September 28, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किल्लेदार खरच चांगले विचार मांडलेत .

गोष्टीचा पहीला पॅरेग्राफ फुकट वाचायला ठेवायचा, पुढे वाचायचे असेल तर paid member व्हा
same thing कविताबरोबर करता येईल, एक दोन कडवी फ्री, पुर्ण कविता हवी असेल तर paid membership
>>>

माणुस बाकीच पटल पण हे जरा पटल नाही .
साहित्य वाचताना अशाप्रकारे रसभंग झालेल लोकाना आवडेल कि नाही शंका आहे. आणि दुसर म्हणजे काही ठरावीक लोकांचच साहित्य पैसे देवुन वाचल जाईल. कारण बरेचवेळा मायबोलीवर नाव बघुन साहित्य वाचल जात . ( प्रत्येकवेळी अस होतच अस मला म्हणायच नाही . )
गुलमोहरची monthly magazine type paid memebrship , किंवा paid दिवाळी अंक , किंवा मायबोलीच्या साहित्यावर आधारीत पुस्तक , असे बरेच पर्याय आहेत .


Maanus
Saturday, September 29, 2007 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑनलाईन उद्योग असेच चालतात हो :-) त्याला मार्केटींग मधे रसभंग नाही, teaser ads का अस काहीतरी म्हणतात.

सध्या फक्त amateur लोकच इथे लिहीतात. आपल्या कार्यास लगेच (आर्थिक) मोबदला मिळतो हे कळायला लागल्यावर पट्टीचे लेखक सुद्धा इथे येऊन लिहायला लागतील.

मराठी पुस्तक print रुपात काढणे प्रत्येकालाच शक्य नसते, असे लोक इथे हमखास लिहीतील. प्रकाशकाच्या मागे पुढे करणे काहीना आवडत नाही. बर सगळे करुन पुस्तक छापले, तरी ते देशोदेशात पोचवने सोपे नाही.

मायबोली ऑनलाईन प्रकाशन :-)

well and you still have option to keep amateur text free. once the amateur becomes mature, he/she can decide to earn or not. Such thing will certainly increase the marathi reading material. writer writers - reader pays to maayboli - reader gets satisfied - maayboli pays portion to writer - writer looks happy - he writes more - maayboli has guaranteed flow of cash. :-)

printing is not easy task, it involves printing, distribution etc. many newspapers work this way nowdays, they keep certain portion free, but to read complete newspaper you have to become paid member. NY times is saying it'll soon stop print edition. Few book publication houses also started to apply same principles.

चला आता मी पुणेकर असल्याचे सिद्ध झाले. अमेरीकेची आर्थिक घडी कशी बसवता येईल ह्यावर चर्चा केली :-)


Dineshvs
Saturday, September 29, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी पुस्तकांच्या प्रिंटिगबाबात आजही आनंदी आनंद आहे. खास करुन जर चित्र वा फोटो असतील तर बघायलाच नको.
केवळ चित्रकलेला वा फोटोग्राफीला प्राधान्य देणारी पुस्तके मात्र अपवाद आहेत.
आपल्याला या माध्यमात फोटो, चित्रे इतकेच नवे तर ऑडिओ क्लिप्स आणि व्हीडिओ क्लिप्स पण देता येतील.


Vaatsaru
Saturday, September 29, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ह्या सगळ्याबरोबरच कॉपीराईट कसा सांभाळायचा हे सुद्धा बघावे लागेल

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators