Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 06, 2008

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through April 06, 2008 « Previous Next »

Slarti
Saturday, January 26, 2008 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोंधळ दूर केल्याबद्दल धन्यवाद.

Tanyabedekar
Saturday, January 26, 2008 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी व्हिकी ऐवजी चुकुन व्हिस्की वाचले. असो. वीकेंडचा परीणाम. (परीणाम मधला री र्‍हस्व की दीर्घ? )

Dhondopant
Monday, January 28, 2008 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की अहं ब्रह्मास्मी कैच्या कैच.. बेरंगी वाटतय त्ये पोस्ट... एक्दम सेक्युलर वाटतय. मी बी खुष तु बी खुष. द्येव हाय पण आनि नाय पण. वांधाच नाय.. काय? आपल्याकड नाय का समदेच देशभक्त... काय बी करा..

तुच त्ये हाईस.


Zakki
Monday, January 28, 2008 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरेच माझ्या मनात फार गोंधळ आहे, नि जे काही समजले असे वाटते तेहि धड लिहीता येत नाही. पण एकदा ते उघड्यावर आणले की त्यातले दोष इतरांना तरी दिसतील, नि मग काही नवीन वाचायला, विचार करायला मिळेल, नि कदाचित् एक तरी गोष्ट समजेल, या भावनेतून लिहीले आहे.

तुमच्या लिखाणाबद्दल धन्यवाद. आता तुम्ही काही लिहा, समजले तर बघतो.


Satishmadhekar
Friday, February 29, 2008 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिज्ञासूंसाठी एक जबरदस्त लेख . . .

http://www.loksatta.com/lokprabha/20080208/bhumika.htm


Vijaykulkarni
Friday, February 29, 2008 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा लेख "विचित्र विश्व" सारख्या मासिकात शोभेल



Satishmadhekar
Saturday, March 01, 2008 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही "विचित्र विश्व"चे तहतयात वाचक असल्यामुळे तुमचा असा गैरसमज होणे साहजिकच आहे. परंतु हा लेख जिज्ञासूंसाठी आहे. "विचित्र विश्व" आवडीने वाचणार्‍यांसाठी नाही.

Chyayla
Sunday, March 02, 2008 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, चांगला व माहितीपुर्ण लेख आहे. मला संपादकाची या विषयाकडे सरसकट फ़ुली मारण्यापेक्षा डोळस पणे बघण्यची दृष्टी पटली. विज्ञान, आधुनिकतेच्या नावाखाली आपण अधिक उथळ व अंधश्रद्ध होत चाललो आहोत की, अधिक खुले होत चाललो हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.

Satishmadhekar
Monday, March 10, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिज्ञासूंनी श्री श्री परमहंस योगानंद यांचे आत्मचरित्र "Autobiography of a Yogi" जरूर वाचावे. याचे मराठी भाषांतर "योगीकथामृत" या नावाने उपलब्ध आहे. श्री श्री परमहंस योगानंदांचा San Diego जवळ Encinitas मध्ये समुद्रकिनार्‍यावर अतिशय सुन्दर आश्रम आहे. जिज्ञासूंच्या बर्‍याचश्या शंका हे आत्मचरित्र वाचल्यावर दूर होतील.

Radha_t
Monday, March 10, 2008 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त मसालेदार चटपटीत खुसखुशीत आणि रंजक लेख आहे, आपल्याला तर एकदम आवडला बुवा

Satishmadhekar
Tuesday, March 11, 2008 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा लेख जिज्ञासू, अज्ञानी, "विचित्र विश्व"प्रेमी अशा सर्वांनाच आवडलेला दिसतो आहे.

Radha_t
Tuesday, March 11, 2008 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW या लेखात देवाचा कुठेच उल्लेख नाही, ना चित्रगुप्ताचा, त्याबद्दल कुणाला काही म्हणायच आहे का?

Satishmadhekar
Tuesday, March 11, 2008 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या लेखात देवाचा किंवा चित्रगुप्ताचा का उल्लेख नाही ते देवालाच ठाऊक. :-)

Prr
Tuesday, March 11, 2008 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Satishmadhekar ...thanks for sharing such a nice article.
संपुर्ण लेख वाचुन होईस्तोवर थोडी भितीच वाटायला लागली. मिती वाचुन तर थोडी जास्तच:-)
चांगले आणी वाईट कर्म याची सविस्तर माहिती कुठे वाचली असल्यास सांगा.(भगवद् गीता वाचत आहे)

"Autobiography of a Yogi" वाचायला सुरवात केली होती (The Law of Miracles chapter ..very interesting)

Satishmadhekar
Wednesday, March 12, 2008 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भगवद् गीतेत कर्माचे खूपच सविस्तर विवेचन केलेले आहे. "Autobiography of a Yogi" (किंवा मराठीत "योगीकथामृत"), श्री सदगुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र व त्यांची प्रवचने या पुस्तकांत चांगले व वाईट कर्म कोणते हे सोदाहरण आणि सोप्या भाषेत स्पष्ट केलेले आहे.

Radha_t
Wednesday, March 12, 2008 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अब्जावधी मनुष्य प्राणी, किती कुणास ठाऊक अन्य प्राणी, वनस्पती, ही पृथ्वी, सुर्यमाला, आकाशगंगा आणि ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा फापट पसारा बघून आपण यात किती नगण्य आहोत अस वाटत. हे सगळ काही तरी, कस तरी चालतय.सगळच गूढ आहे. बर हे सगळ आहे तर आहे पण हे सगळ चालवणारी कुठली अचाट शक्ती आहे अस म्हणतात. बर असली तर असली. पण तिला देव म्हणतात आणि ती मला भेटली म्हणतात. काय great लोक आहेत.
देव हा concept आजीबात वाईट नाही, खूप चांगला आहे. अगदी वरच्या लेखात दिलेल्या मित्यांचा concept सुद्धा खूप चांगला आहे. तो जर मानला आणि त्याप्रमाणे वागल तर आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येईल. पण शेवटी ती एक संकल्पना आहे. संकल्पना समजली उमगली म्हणण ठीक आहे पण भेटली म्हणायला कस वाटत?


Amruta
Wednesday, March 12, 2008 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेख छान आहे. योगीकथामृतहि वाचलय.
ही जी काहि शक्ती आहे ती सहजासहजी प्रत्येकाला कळण केवळ अशक्य वाटत. ती भेटली म्हणण्यापेक्षा काही व्यक्तींना ती थोडी कळली हे म्हणण जास्त योग्य ठरेल.

राधा, छान नाव आहे. सहजच सांगत्ये.
मी सध्या शिवाजी सावंत ह्याच युगंधर वाचत्ये. अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यात राधा ह्या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. रा म्हणजे मिळो,लाभो आणि धा म्हणजे मोक्ष. राधा म्हणजे मोक्षा साठी तळमळणारा जीव.


Vijaykulkarni
Thursday, March 13, 2008 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सहज आठवले,
परमहन्स योगानन्दान्च्या निधनानन्तर त्यान्चे दोन शिष्य दया माता आणी क्रियानन्द यान्च्यात "परमहन्द योगानन्द" या शब्दाच्या कॉपिराइट्वरून बरेच खटले झाले आणे लाखो डॉलर्स गेले.


Zakki
Thursday, March 13, 2008 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सगळ्या धर्मग्रंथाचा एक 'विकिपेडिया' झाला आहे. खरे काय नि खोटे काय? त्यापेक्षा खालील गाणे म्हणा:
'जिंदगी ख्वाब है, ख्वाबमे झूठ क्या, और भला सचहि क्या?'

किंवा 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या'.

आता जर झोपेतच जर काही देव म्हणून असले तरी ते झोपेतच रहाते.

जागेपणी मात्र
'यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:!'

अगदी निष्काम कर्म म्हणजे तरी काय,तर आपण आपल्याला योग्य वाटेल ते करावे, परिणाम आपल्या हाती नसतो! सोप्पे!

अश्या विचारांमुळे मानसिक व शारीरिक सौख्य लाभते! म्हंटलेच आहे:
'रडतच आलो येताना पण, हासत जावे जाताना'





Vijaykulkarni
Sunday, April 06, 2008 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पुणे महापालिका देणार निर्मला देवीना मानपत्र



http://esakal.com/esakal/04062008/PuneBB38E7E861.htm


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators