Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इस्ट इंडिया कंपनी ...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » इस्ट इंडिया कंपनी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 29, 200820 03-29-08  2:45 pm
Archive through March 30, 200820 03-31-08  2:54 am

Uday123
Monday, March 31, 2008 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणगा: तुमच्याकडे जर या सर्व प्रश्नांची उत्तरे असतील तर लिहा राव आमच्या सारख्या (वर्तमान पत्रे लिहीतात त्याच्या आधारावर मते बनवणारे) लोकांसाठी. माझी तरी वाचायची तयारी आहे. जर खुप माहीती असेल आणि येथे अप्रस्तुत वाटत असेल तर नवीन फ़ळा सुरु करा.


Slarti
Monday, March 31, 2008 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल, कंपनी ही एका देशात सुरू झाली म्हणून बहुतेक वेळा आपण त्या देशाचे नाव घेतो. सद्यस्थितीत त्याउप्पर त्यास काही महत्व आहे का हे इथे वाचायला आवडेल. माझ्या देशातील कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केली तर मला अभिमान वाटणे हे नैसर्गिक आहे. पण येत्या काही दशकांमध्ये कुठलीही कंपनी एका विशिष्ठ देशाची आहे हा समज हळूहळू कालबाह्य होईल असे वाटते (मी खाजगी कंपन्यांबद्दल बोलत आहे, PSUs बद्दल नाही). निदान तुलामला ज्या तीव्रतेने हा अभिमान वाटतो ती तीव्रता पुढच्या पिढ्यांमध्ये नसेल, कमी असेल. या बाबतीत राजकीय सीमारेषा धूसर होत जातील...त्याची कारणे अशी असावीत -
१. देशांच्या अर्थव्यवस्था या स्वयंभू नाहीत, एवढेच नव्हे तर ती गुंतागुंत उत्तरोत्तर वाढतच जाईल. अशा वेळी भारतासारख्या देशातील कंपन्या अधिकाधिक प्रमाणात आंतरराष्ट्रीयत्वाकडे जाणार आहेत. हे दोन प्रकारे होईल, एक म्हणजे तू जी उदाहरणे दिली आहेस तसे ज्यात 'येथील' कंपनी 'तिथल्या' कंपनीचा ताबा घेईल. दुसरा प्रकार म्हणजे, तेथील कंपनीने इथली कंपनी ताब्यात घेणे. हे आता कदाचित अशक्य वाटेल, पण असं बघ... त्या कंपन्यांचे भारतातील 'अस्तित्व' वाढत आहे. अस्तित्व म्हणजे केवळ शाखा उघडणे या अर्थाने नव्हे, तर इथल्या कंपन्यांमधील, इथल्या अर्थव्यवस्थेमधील त्यांचा हिस्सा (मराठीत stake ) वाढत आहे. ( Heineken आता UB Group मध्ये ३७.५% हिस्सेदार आहे). भारतातील realty कंपन्यांमध्ये बाहेरील कंपन्यांचा हिस्सा वाढत आहे. आपल्याकडे अजूनतरी insurance, banking ही क्षेत्रे बाहेरच्यांसाठी पूर्ण उघडली नाहीयेत, पण ते जर बदलले तर हा दुसरा प्रकार अजूनच ढळढळीतपणे दिसेल. थोडक्यात, जे फोर्ड, टेटले आदी कंपन्यान्च्याबाबत झाले ते इथल्या कंपन्यांचेही नक्कीच होऊ शकते, होइलसुद्धा. हे सर्व व्यवहार करतानासुद्धा फक्त भारतीय वित्तसंस्थांवर विसंबले जात नाही. आता सुद्धा टाटांना या व्यवहारासाठी कर्ज देणार्‍या संस्थांमध्ये विदेशी बँका आहेतच. विदेशी संस्थांची वाढती गुंतवणूक बघता भारतीय कंपन्यांमध्ये नाव व मूळ याव्यतिरिक्त भारतीय काय असेल ? तेव्हा 'भारतीय कंपनी' ते 'भारतीय मूळ असलेली कंपनी' ते 'MNC' असा प्रवास असेल. MNC शेवटी कुठल्या देशाची असते ?!!
२. गुलामगिरी ही व्याख्येनेच एकतर्फी आहे. १५० वर्षांनंतर इंग्रजांचे जमाखाते हे भारताच्या जमाखात्यापेक्षा कैकपटीने जास्त होते (जरी समाजसुधारणा इ. (विवाद्य) आर्थिकेतर गोष्टी लक्षात घेतल्या तरी)... आता जे घडत आहे ते एकतर्फी नाहीच. हे लादले गेले नसून एक व्यापारी व्यवहार आहे ज्यात दोन्ही बाजूंचे हितसंबंध गुंतले आहेत. उदा. टाटा जिंकले आणि JLR हरली असे होणे शक्य नाही आणि तसे होऊ दिले जाणारसुद्धा नाही. आता तशी पिळवणूक करणे / होणे खूप अवघड आहे. (मी फक्त कंपन्यांबद्दल बोलत आहे, MNCs व स्थानिक जनतेची पिळवणूक हा मुद्दा इथे लागू होत नाही कारण तिथे व्यवहारांमध्ये सरकारचा प्रत्यक्ष सहभाग असतो.) त्यामुळे तेव्हा जरी त्यांचे पारडे जड होते, तरी आता आपले पारडे जड आहे हे मानणे र्‍हस्वदृष्टीचे वाटते. पारडे जड होणे, हलके होणे ही अवस्था किती काळ टिकणार आहे यापुढे ? मुळात, असल्या गुंतागुंतीच्या dynamic व्यवस्थेला तराजूचे (बाळबोध) मापदंड लावणे कितपत योग्य आहे ? (योग्य म्हणजे ते समजून घेण्यसाठी आणि त्याहीपुढे जाऊन, त्या व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी).
३. कंपन्या देशप्रेमावर चालत नाहीत. त्या त्यांचे आणि त्यांचेच हितसंबंध बघणार. स्थानिकांकडून 'देशप्रेमा'पोटी विरोध होइल, पण तो फार काळ टिकणे अवघड आहे. 'आपली' कंपनी आणि 'त्यांची' कंपनी हा दृष्टीकोन कालबाह्य होत चालला आहे.
४. आपल्या मनातील अभिमानाची भावना प्रत्यक्ष आर्थिक फरक काही घडवू शकते का हेही बघायला पाहिजे. उदा. मला जर Twinings आवडत असेल तर 'टाटाने घेतला' यासाठी मीतरी टेटले घेणार नाही... शेवटी केवळ माझी आवड आणि वस्तूचा दर्जा हेच महत्वाचे राहणार, नाही का ?


Chyayla
Monday, March 31, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर (च्यायला), संघाच्या विचारसरणीच्या विरुद्ध बोलणारा प्रत्येक मनुष्य भंपक नसतो, तो कमी देशभक्त नसतो, आणि कमी हिंदु नसतो.. उलट अश्या लोकांच्या मताचा, त्यांच्या बरोबरच्या चर्चेचा कामामध्ये अत्यंत उपयोग होतो, सुधारणेला वाव मिळतो.


तान्या, मी तुमच्या माझ्या बाबत झालेल्या भ्रमाचे निराकरण करेल, फक्त मला एक सांगा बाबासाहेब पुरंदरे आणी संघ यांचा काय सम्बंध? मला तरी संघ या बाबतित काय म्हणतो ठाउक नाही. संघाच्या विरोधकांच्या बाबतित भुमिकेचा, विशाल दृष्टीकोनाचा मलाही आदर आहे व अभिमान आहे.

मी तरी टोणगा याना शत्रु समजत नाही, आणी जे काही लिहिले ते मुद्यालाच धरुन, विचाराला उत्तर हे विचारानेच देतो. पण समोरचा जर वैयक्तिक पातळीवर उतरत असेल तर मग जशास तसे उत्तर देतो कारण आपल्याला गांधीगिरी जमत नाही तो माझा वैयक्तिक दोष आहे मान्य.

असो चालु वादात(चर्चेत) तुम्हीच वैयक्तिक टीपणी केली होती. संतु, जयमहाराष्ट्र यान्नी जरी टोणग्याला वैयक्तिक पातळीवर काही लिहिले असले तरी एक लक्षात घ्या टोणगाही तसेच लिहितो. त्यामुळे निदान तुम्ही तरी असल्या वैयक्तिक वादात पडायची गरज नव्हती असे वाटते. ज्याप्रमाणे तुम्ही मला चांगलेच सांगितले त्याचप्रमाणे मी पण तुम्हाला अश्या वैयक्तिक टीप्पणी पासुन दूर राहण्यासाठी सांगत आहे, त्यात तुम्ही दुखावले गेले असाल तर क्षमस्व.

शेवटी जयमहाराष्ट्रानी टोणग्याबद्दल जे लिहिले तेच खरे ठरले व त्यान्नी स्वता:च कबुल केले, त्यामुळे तुमचाही टोणगा बद्दल भ्रमनिरास झाला असावा, म्हणुनच या बाबतित मी तुम्हाला एक मित्र म्हणुन जे लिहिले त्याचा विचार करावा ही नम्र सुचना.

स्लार्तीनी जी चर्चा मुळ विषयावर आणली त्यावर पुढे जाण्यास हरकत नसावी.


Arc
Monday, March 31, 2008 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याच देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी छत्रपतींबद्दल जे अनुद्गार काढले त्याचे काय?>>>>नेहरु ब्राह्मण होते.तुम्हि नक्की ब्राह्मणाच्या विरोधत आहात कि बाजुने?
आता tonaga तुम्हाला थोडे जातियवादी वाटेल पण तरी fact म्हणुन पाहिले तर मे काय म्हणतिये ते लक्शात येइल
शिवाजी महाराज great होते ह्यात वाद नाही पण ब्राह्मण इतिहासकारानी त्यान्चा इतिहास लिहिला नसता तर ते लोकापर्यन्त पोहचले असते का?कुठलेही software performancewise कितीही चान्गले असले तरी चान्गल्या documenatation आणि marketing शिवाय टिकु शकत नाही. शिवाजी महाराजान्चे चरित्र व्यवस्थित document करन्याचे श्रेय ब्राह्मणानाच जाते. हे post चुकीचे वाटल्यास उदवुन टाकावे


Giriraj
Monday, March 31, 2008 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहरु ब्राह्मण होते.तुम्हि नक्की ब्राह्मणाच्या विरोधत आहात कि बाजुने>>>> इथे ब्राह्मण असण्या नसण्याचा काय संबंध... जे ब्राह्मण आहेत त्यांची एकजात एकसारखी मते असतात असे कुणाला वाताते का?
व्यक्तिला 'व्यक्ति' न मानता 'जातिसदस्य'मानणे बरोबर आहे का??


Peshawa
Monday, March 31, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ द्या हो बेडेकर. आता संभाजी ब्रिगेडचा अन माझा काय संबंध? पण याना आठवला. हे उत्तमच झाले. खरं तर संभाजी ब्रिगेडची कार्यपद्धती वेडपटपणाचीच असते पण त्यानी भांडारकर इन्स्टीट्यूट बाबत जे केले ते उत्तमच होते असे तिथले प्रकार पाहून म्हणावेसे वाटते.>>>>

ह्या विचारंसाठि बेडेकरांनी तुम्हाला सम्र्थन दिले असेल असे वाटत नाही.

नव्हे त्यापेक्षा अधिक करायला पाहिजे होते.तो विषय कोणाला वाढवायचा असेल तर हरकत नाही.त्यांचेच हसे होईल त्यात. शिवभक्तीह्या गप्पा मारणारांनी महाराजाना राज्याभिषेकासाठी गागाभटाला का आणावे लागले तेही लक्षात घ्यावे.>>>

तुमचा अभ्यास दांडगा आहे आणी वर पुन्हा तुम्ही शाहिरही नाही आहात. चक्क टोणगे आहत. तेंव्हा तुमची अभ्यास्पुर्ण मते ऐकायला मिळवीत अशीच अपेक्षा

महाराजांची दौलत बुडवून युनिअन जॅक शनिवारवाड्यावर कोणाच्या 'शुभहस्ते' वर गेला ते ही एकदा सांगा.>>>
बरे झालेत तुम्ही हे गो ब्रह्मण प्रतिपालक महाराजांच्या समोर नाही म्हटलेत नाही तर मानवी अधिकार नसलेल्या जमान्यात तुमचे दोन हात दोन पाय अणी (कदाचीत) असलेले एकमेव डोकेही उतरवले गेले असते

जेम्स लेन प्रकरणात कोल्हापुरचे इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार ह्या प्रकरणा आधी पुण्यात येऊन कोण कोणाला भेटले अन त्यानी त्याना काय विनन्ती केली माहीत आहे का? मग पुण्यातल्या ढुढ्ढाचार्यानी कशी नरो वा कुंजरो वा भूमिका घेतली. लेनबाबाचे लिखाण चित्रलेखेत प्रसिद्ध झाले तरी सम्भाजीब्रिगेड वगळता इथल्या अन तिथल्या शिवभक्तांचे रक्त का बरे freezing point च्या खाली गेले होते. कारण त्याना हवे तेच प्रसिद्ध झाले होते ना. >>>

अरे तान्या बेडेकरच म्हणले की मत व्यक्त करायचा अधिकार टोणगा ह्यांना आहे त्यातुन टोणगा ह्यांचे मत अभ्यास्पुर्ण असते मग तसा 'अभ्यास पुर्ण' मत असण्याचा अधिकार लेनलाही आहे. अर्थात पन तुम्ही केलेला अभ्यास तो अभ्यास बकि करतात ती शहीरी नाही तर निन्दा नालस्ती. तुमचे असे अभ्यास आहेत म्हणुनच तर संभाजी ब्रेगेड अस्तित्वात आहे... अता बेडेकरंचा तीलाही support आहे की नाही हे माहीत नाही

Uday123
Monday, March 31, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे या विषयी ज्ञान अगदीच तोकडे आहे. पण एक वाटत रहातं की काहीच जरुर नव्हती भांडारकर मढे आदळापट करायची, ते करीत असताना आपण उगाचच त्या 'लेन' ला फ़ुक्कटची प्रसिद्धी देतो हे देखील समजत नाही? नाहीतरी त्याचे विधान कुणालाही मान्य नव्हते, नसणार मग का आगपाखड?

शेवटी या सर्व गोष्टिंचा फ़ायदा कुणाला झाला? लेनच्या नखालाही धक्का लागला नाही. सामान्य माणासाच्या लेखी शिवाजी महाराज आहे तेथेच आहे, असे दहा लेन जरी आले आणि काहीही बकले, ओकले तरी आपल्याला तसुभरही फ़रक नको पडायला. जर बदला घेण्याची एवढीच खुमखुमी होती तर, तोडफ़ोड आणि जाळ-पोळ करायाला जी शक्ती/ अक्कल वापरली तिचाच वापर महाराजां वर अजुन चार चांगल्या पुस्तकांची भर घालण्यात करता आला असता. अजुनही महाराजांच्या कार्याला (पुस्तक रुपाने) यथोचित न्याय मिळाला नाही आहे असे मला तिव्रतेने जाणवते.

आपले स्वत:चे पुस्तक (किंवा चित्रपट) खुप प्रसिद्ध होण्या आधी त्यात असे काही तरी मुद्दाम घुसडायचे की जेणेकरुन एरवी शांत असलेल्या समाजात गदारोळ माजेल. मग सर्व प्रकारचे मिडिया कामाला लागतात, चार-दोन मरायला टेकलेल्या संघटना त्यातील काही भागाला आक्षेप घेते. प्रसिद्धिची एक उंची गाठल्यावर मग लेखक म्हणतो मला असे काही म्हणायचे नव्हतेच, काहींनी गैरसमज पसरवला, अजुन पुढे जाऊन तो माफ़िही मागतो (एव्हाना लायकी नसतांना प्रसिद्धी मिळुन गेलेली असते).


Maanus
Monday, March 31, 2008 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारएंड सॉरी विषय भरकटवल्याबद्दल.

Farend
Tuesday, April 01, 2008 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण प्रत्यक्षात गप्पा मारताना सुद्धा एका विषयावर चालू होऊन १-२ तासात भलत्याच विषयावर जातो तसे येथे ही होणे साहजिक आहे, पण आता येथील चर्चा मूळ विषयावर ठेवण्यासाठी ती चर्चा दुसर्‍या फळ्यावर (आजच कोणीतरी येथे वापरलेला हा शब्द आवडला) हलवली तर बरे होईल.

स्लर्ती, इंटरेस्टिंग माहिती. टाटा सारख्या कंपनीला इंग्लिश कंपनी (रूढ अर्थाने) विकत गेण्यासाठी पैसे देणे हे विदेशी कंपन्यांना 'चांगली इन्वेस्टमेन्ट' वाटते हे ही विशेष वाटले मला. माझा रोख मुख्य भारतीय कंपन्या या लेव्हल ला जाउन पोहोचतायत यावर होता. पूर्ण आर्थिक दृष्टीने लिहिले नव्हते. पण मलाही अशी माहिती आवडेल आणखी.

पुलंच्या 'असा मी असामी' मधे त्या फ़ेदरवेट साहेबाच्या वर एक 'शेठ' यून बसतो त्याचे आश्चर्य ती कंपनी भारतात असून लेखकाला वाटते. येथे एक भारतीय त्या कंपनीच्या इंग्लंड च्या ऑफिसात जाऊन त्याचा बॉस होईल :-)


Slarti
Tuesday, April 01, 2008 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय, भारतीय कंपन्या 'त्या' पातळीला जात आहेत हे बघून खरेच बरे वाटते अर्थव्यवस्थेची दारे उघडी केल्यावर हे होणे अपरिहार्य होते. किंबहुना, अर्थव्यवस्थेची दारे उघडणे हेच अपरिहार्य आहे.
अमेरिकन credit संकटातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकन वित्तसंस्थांना वित्तपुरवठा कोणी केला याची काही उदाहरणे बघ -
asian injection . सर्वात खाली टेबल दिले आहे.
हे जास्त interesting वाटते कारण या आशियाई वित्तसंस्था या 'सार्वभौम निधी' (sovereign wealth funds) आहेत म्हणजेच सरकारी, पक्षी, त्या त्या देशाच्या आहेत. थोडक्यात, तो हिस्सा खरेच त्या देशाचा आहे. (ईस्ट इंडिया कंपनी ही संज्ञा मी थोड्या जास्त व्यापक अर्थाने घेत आहे.) या धर्तीवर भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी बाहेर काय गुंतवणूक केली आहे ते बघायला पाहिजे. मध्यंतरी आपल्या ONGC ला China National Petrolium Corporation International ने २ - ३ वेळा मागे टाकले... कज़ाखस्तानातले खनिजतेलस्त्रोत मिळवण्याच्या प्रयत्नांत आणि अजूनही असेच कुठेतरी, बहुधा उत्तर आफ्रिकेत कुठेतरी. त्यांचा हात जास्त भारी पडतो. हे केवळ उदाहरण म्हणून दिले, भारत - चीन हा वाद सुरू करण्याचा मुळीच इरादा नाही. असो.
भारताचाही असा काही सार्वभौम निधी आहे का ?

Santu
Wednesday, April 02, 2008 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भंडार कर इन्सि. वर केलेल्या हल्ल्याचे समर्थन होवु शकत. नाहि.
मि. टोणगा



Vijaykulkarni
Wednesday, April 02, 2008 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जेम्स लेन प्रकरणात खरे शिवभक्त कोण हे मात्र स्पष्ट झाले



Shendenaxatra
Thursday, April 03, 2008 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते कसे काय बुवा?

Deshi
Thursday, April 03, 2008 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे शिवभक्त कोण हे मात्र स्पष्ट झाले >>> मग कोण आहेत ते?


Manish2703
Thursday, April 03, 2008 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी... Slarti, Farend या BB ला परत मार्गावर आणत आहेत... आता pls विषयांतर करू नका

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators