Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नोकरी: एक गुलामी? ...

Hitguj » Views and Comments » General » नोकरी: एक गुलामी? « Previous Next »

Hkumar
Wednesday, October 24, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या BB चे बरोबर शीर्षक ' नोकरी: एक गुलामी?' असे आहे. त्यातील प्रश्नचिन्हाला महत्व आहे.
समाजातील बहुसंख्य लोक चरितार्थासाठी नोकरी करतात. नोकरीची एक बाजू ' सुरक्षीत पगाराची चाकरी' ही आहे. तर दुसर्‍या बाजूस त्यातील मानसिक ताणतणाव, मानापमान, वरिष्ठांचे लांगूलचालन इ. गोष्टी येतात. नोकरदार मायबोलीकरांनी आपली मते जरूर मांडावीत.


Zakki
Wednesday, October 24, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लांगूलचालन हा शब्द जरा कठोर नि करणार्‍याला कमी दर्जाचा ठरवतो. बहुधा वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे आपले मन मोडावे लागते, आपल्या मनाविरुद्ध वागावे लागते असे म्हणायचे असेल.

तर ते वरिष्ठ असो, किंवा आपले काही प्रमुख गिर्‍हाईक असोत, थोड्याफार प्रमाणात करावेच लागते. जर ते कमी प्रमाणात करून चालेल अशी युक्ति सापडली, तर त्याकडे दुर्लक्ष करावे लागते. मग धंदा नि नोकरी यात फरक नाही.

बाकी मानसिक ताण, मानापमान हा आयुष्याचा एक भाग आहे. त्याला तोंड देणे चुकणार नाही. त्याबाबतीत नोकरी, धंदा यात फरक नाही.

मानसिक ताण याबद्दल असे सांगतात की आपल्याला वाटते की लहान मुले किती सुखी, त्यांना हे असले त्रास नाहीत. पण बाल मानस शास्त्रज्ञ सांगतात की ते खरे नाही. तो या बातमीफलकाचा विषय नाही.


Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तर ते वरिष्ठ असो, किंवा आपले काही प्रमुख गिर्‍हाईक असोत, थोड्याफार प्रमाणात करावेच लागते.

खरय. नोकरी करा किंवा स्वत:चा व्यवसाय, मुरड घालावीच लागते. फ़क्त किती मुरड घालायची (आधी नीट तपासून खात्री पटल्यावर की आपलेच बरोबर आहे.) ते ठरवायचे असते. मी स्वत्: तळहातावर शिर घेऊन फ़िरणारा आहे. त्यामूळे आपल्याला फ़ार तोशीस होणार नाही इथपर्यंत ऐकून घेतो आणि करतो. मग शांतपणे बोलून दाखवतो माझे विचार. नाही पटले व गरज पडली तर नोकरी सोडायला तयार असतो. म्हणजे मग डोक्याला त्रास नाही.
अहो नोकर्‍या पण भरपूर असतात. आहे काय नी नाही काय.
गेल्याच नोकरीतला अनुभव. मी ठाण्याला रहातो आणि सिप्झला जायचो. माझी झेप तिथपर्यंतच हे मी ठरवले आहे पुर्वीच. कंपनीने मालाडला नवीन ऑफीस घेतले. म्हणे आता तू तिथे जाच. नाहीतर प्रमोशन नाही. म्हटले जाणार नाही. इथेच ठेवत असाल तर ठीक आहे. उलट त्यासाठी एक पद खाली येईन पगार कमी घेईन. मला काही त्रास नाही. तरी ऐकेनात. मग म्हटले
नाही तर सोडतो नोकरी. संबंध चांगले रहातील. तुम्हाला नंतर गरज वाटली माझी तर बोलवा परत नोकरीवर. मी मोकळा असेन तर नक्की येईन.
मग वरमले. त्याच ऑफ़ीसला राहीलो.
तुम्हाला काय पाहीजे आणि काय नाही हे नक्की माहीत पाहीजे. माझेच मित्र आहेत जे मालाडला जातात आणि रोज रडतात की अडीच तास लागतात. अरे पण तुम्हाला प्रमोशन पाहीजे, होंडा सिटीच पाहीजे, बाहेर फ़िरायला गेल की आलीशान हॉटेलच पाहीजे. मग त्यासाठी हे तणाव पण सहन करायला पाहीजेत.


Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

btw HK, u r a doctor, which is altogether diff profession. so our above views may not be applicable at all to u.

Maanus
Friday, October 26, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहे त्यात सुख मानायचे :-)

नोकरीमधेच गुलामी असा काही प्रकार नाही. the grass is always green on other side जावे त्यांच्या वंशी.

पुर्वी रस्त्यावर उभा राहुन मी दुध विकायचो, (म्हणजे उद्योग करायचो) तेव्हा पहाटे अगदी गोड गोड हसुन दुध नेणारे लोक जर दिवसा रस्त्यात दिसले की ओळख पण नाही दाखवायचे. दिवसभर म्हशींमधे असल्याने माझ्या अंगाला म्हशींचा वास यायचा, कदाचीत दुधवाला भैया म्हणुन ते मला ओळख नसतील दाखवत.

म्हणुन काय दुसर्‍या दिवशी मी त्यांना दुध विकणार नाही असे म्हणु शकत नाही. same thing applies in every situation where you get in touch with other people, irrespective of service or business.

but lets say you are independant stock broker, where the only thing you are interacting with is your computer and not with any other human, then you are not "गुलाम" of anyone :-)

however human is a social animal, and there are situations when he has to interact with other humans त्यावेळेस गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण आठवयाची, हो पन maximum वेळेस असे बघायचे की ह्या म्हणीतला वैद्य मरो हा भाग आपल्याला माहीत नाही आणि सगळ्यांशी चांगले संबध ठेवायचे :-)

According to every individual human, every other huamn is wrong at some point of time.

According to every mother, her child is most beautiful/handsome smart child in world; so you should not dare to show how your child is smart or beautiful than hers.

According to every woman, her husband is always correct. so dont dare to show how superior you are or your husband is than her husband. (I did this unknowingly last week, and it took me one complet day to correct it)

Accordingly every human thinks his act is correct, so you have to develop this skill of ignoring things, and then life becomes wonderful.

मी का सध्या सगळीकडे जावुन नाक खुपसतोय, i need to stop this.


Zakki
Friday, October 26, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

According to every woman, her husband is always correct.
आँ!? हे कुणि सांगितले तुला?

Hkumar
Friday, October 26, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची, मी पण नोकरीतच आहे. म्हणून तर हा विषय चर्चेला घेतला!

Savyasachi
Friday, October 26, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण पेशंट आणि डॉक यांच नात वेगळ आहे रे आमच निर्जीव सॉफ़्टवेअरशी असलेल्या पेक्षा. मी नाही केल काम तर दुसरा कोणितरी करू शकतो. तुमच कदाचीत तस नसेल. म्हणून म्हटल.

Apurv
Friday, October 26, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

According to every woman, her husband is always correct.
आँ!? हे कुणि सांगितले तुला?

>>> नवरा बायकोच्या भांडणात नेहमी बायकोच बरोबर असते... पण इतरवेळी नवरा चुकीचा असेल तरी त्याचे बायको समर्थन करते हे माझ्यापण प्रत्ययास आलय.
अर्थात अपवाद असतीलच :-)


Kedarjoshi
Friday, October 26, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

but lets say you are independant stock broker, where the only thing you are interacting with is your computer and not with any other human, then you are not "गुलाम" of anyone >>>>>

नाही रे बंधु हे खरे नाही. स्टॉक ब्रोकर क्लायंटांचा गुलाम असतोच. माझा मित्र आता ब्रोकर आहे त्याचावर इतर चढतात. ( मधीली बात म्हणजे जर पिटातला ब्रोकर असेल तर बिचारा खुप जास्त स्ट्रेस खाली असतो) कारण मोठ्या कंपन्यांचा तो नोकर असतो. शेवटी नोकरी असो की छोकरी गुलामीतर आहेच. छोकरीची बायको झाली की गुलामीत सुध्दा बढती होते. ( माणसा तु तुझे हे भलते म्हण्जे ऑल मेन आर राइट वैगरे विचार बाजुला ठेवुन लग्न कर नाहीतर पछतावशील. ( पुढ्च्यास ठेस मागचा शहाना म्हणुन तुला सांगतोय रे भो)

Maanus
Saturday, October 27, 2007 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वेगळ काहीतरी म्हणायचे होते, पण वेगळ काहीतरी बोललो गेलोय... anyway भा. पो. म्हणजे झाले.



Hkumar
Sunday, October 28, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नोकरी करणारा माणूस 'नेमून दिलेले काम' हे करीत असतोच. पण बर्‍याच ठिकाणी कामाचे स्वरूप कालांतराने ' पडेल ते काम' असे होवू लागते. तर काही ठिकाणी मुख्य कामापेक्षा ' हमाली कामे 'अधिक करावी लागतात. ह्या गोष्टी चिडचिड निर्माण करतात.

Zakki
Sunday, October 28, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे काय, नेहेमीच सारखे चित्तथरारक काम मिळेल असे नसतेच. अगदी support किंवा Customer service चे काम असले तरी दररोज काहीतरी नवीन असतेच असे नाही. लवकरच तेहि रूटिन वाटते. किती दिवस तुम्ही म्हणणार, 'अहो त्यानी PC ON च केला नव्हता, नि सांगत होता, प्रोग्रॅम चालत नाही!' असे नेहेमीच चालते, customer service मधे.

Savyasachi
Monday, October 29, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सपोर्ट आणि कके तर १० दिवसात शिळ होत. डेव्हलपमेंट असेल तर निदान ३ ४ महीने काहितरी नवीन असते.

Radha_t
Tuesday, October 30, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छोकरीची बायको झाली की गुलामीत सुध्दा बढती होते.
मी तर उलट म्हणते प्रत्येक स्त्री ही राणी लक्ष्मी बाई असते. म्हणजे अस बघा ती आई वडिलांकडे असते तेव्हा आई वडील तिला राणी सारखी ठेवतात, लग्न करून सासू सासरे तिला लक्ष्मीच्या रुपात घरी आणतात आणि लग्न झाल्यानंतर ती कामवाली बाई म्हणुन काम करत राहते घरात आणि आॅफिसमधेही. नवर्‍याला तरी फक्त एकाच नोकरिची गुलामगिरी असते, बायको मात्र बिचारी दोन दोन गुलामगिर्‍या पार पाडत असते.

बाकी नोकरीला गुलामी समजायच का नाही ते ज्याच्या त्याच्या हाती आहे. म्हणतात ना सायबाच्या पुढन आणि गाढवाच्या मागन कधी जाऊ नये. गाढवाच्या मागन गेलात तर लाथ बसायची शक्यता आणि सायबाच्या पुढे जाताय अस समजल तर सायब ठेचून काढेल. सायबाला कस handle करायच हे जर तुम्हाला समजल तर खल्लास, सायबच तुमचा गुलाम. कारण तुम्ही काम केल्याशिवाय सायबाला credit मिळणार नाही


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators