Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 12, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through September 12, 2007 « Previous Next »

Radha_t
Friday, September 07, 2007 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष तुमच म्हणण पटतय. देव ही संकल्पना कालबाह्य करून उपयोग नाही. ज्यांना युद्धच करायच आहे त्यांना इतरही बरीच कारण सापडतील ते करण्यासाठी. आणि माझ्या सांगण्याने ती तशी कालबाह्य होणारही नाही.
देव म्हणजे काय हे समजावून घ्यायचा प्रयत्न करा

तेच करतेय मी माझ्या मते देव ही एखादी entity नसून concept आहे, संकल्पना आहे. याबद्दल तुमच काय मत आहे? विष्णू म्हणजे देव शंकर म्हणजे देव हे मला पटत नाही. जर तुम्हाला समजल असेल तर तुम्हीच सांगा देव म्हणजे काय ते.

देव आणि धर्म हे वेगवेगळे आहेत पटल. पण देव आणि अध्यात्म हे एकच आहेत का मग?

माझ्यासारखे नास्तिक लोक देव आणि धर्माची गल्लत करतात अस म्हटल जात मग आस्तिक लोक अध्यात्म आणि देव यांची गल्लत करतात अस म्हणण धाडसाच होइल काय? अध्यात्म आणि देव एकच आहेत का?

नास्तिक लोक अध्यात्माच्या दिशेने जाऊ शकत नाहित काय? मी स्वतला नास्तिक म्हणवते पण सत्यनारायण गोयंकांच्या विपश्यनेच्या शिबिरांना जाते. ध्यान धारणा करणे मन एकाग्र करणे, मन निर्विकार करणे, या गोश्टी अध्यात्मात असतात का? मज पामराची तर अध्यात्म म्हणजे काय इथून सुरवात आहे.



Chyayla
Saturday, September 08, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मज पामराची तर अध्यात्म म्हणजे काय इथून सुरवात आहे.

देव समजुन घ्यायचा तर मग त्याची सुरुवात केवळ दुस्वास, द्वेष, त्रागा करुन कशी होइल? शिष्य जर विनम्र असेल, त्याची श्रद्धा असेल तरच त्याला गुरु शिकवु शकतील आणी त्यानीच विद्या ग्रहण करण्याची पात्रता निर्माण होउन मग ज्ञान प्राप्ती होते, हा तर सगळ्यात पहिला धडा आहे.

जर भांड गढुळ असेल तर त्यात स्वछ पाणी टाकुन काही फ़ायदा नाही ते गढुळच होणार. त्यासाठी मनरुपी भांड स्वछ, निर्मळ केले तरच सगळ स्पष्ट दीसेल.

ईथे बरीच चर्चा झाली आहे त्यात तुमच्या प्रश्नांची उत्तरेही आली आहेत पण कदाचित तुमच लक्ष नसाव. उलट तुमच्या मनावर देव, धर्म, समाजरीती याबाबत गल्लत चालु होती याबद्दल मी अगदी सुरुवातीलाच लिहिले होते. आणी ह्या BB च्या विषयाला तेन्व्हापासुनच न्याय नाकारण्यात आला होता, वास्तवीक चर्चा देव आहे की नाही, देवाला कालबाह्य करावे अशा निरर्थक, असम्बद्ध मुद्यांपेक्षा देव हा कसा आहे, त्याचे स्वरुप काय असावे, त्याला समजुन घेण्याचे मार्ग कोणते, विष्णु, शंकर या सगुण रुपाच्या आरोपाने आपण कसे निर्गुण व खर्या देवाला समजु शकतो यावर ही चर्चा व्हावयास होती.. पण... असो देर आये दुरुस्त आये. यातच आननंद.

राहीला मुद्दा तुम्हाला न पटण्याचा याच कारण हे असु शकत की तुम्हाला ते समजले नाही, पण म्हणुन ज्याना समजले व पटले त्यांचा तसेच खरे काय ते समजुन न घेता तुमच्या कल्पनेतल्या देवाचाही केवळ द्वेष करुन काय साध्य होणार? याचाही विचार करावा.







Maanus
Sunday, September 09, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भगवान के घर मै देर है अंधेर नही.
आज भगवान ने मेरी तमन्ना कुबुल की

गेल्या २४ तसात ह्या BB वर एक पन msg नाही.



Radha_t
Tuesday, September 11, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
प्रश्नांची उत्तरेही आली आहेत
पण एकही समाधानकारक उत्तर नाही. मला द्वेष करणारी त्रागा करणारी गढूळ म्हणण्याआधी माझ्या साध्या प्रश्नांची समाधान कारक उत्तर द्यायची तयारी आहे का?
असल्यास :
तुमच्या मते
प्रश्न १: देव म्हणजे काय?
प्रश्न २: त्याचे स्वरूप काय? साकार / निराकार
यांच्या उत्तरांवर आधारीत माझे पुढचे प्रश्न असतील हे चाणाक्षांनी ओळखलेच असेल.
beleive me जर माझ समाधान झाल तर मी नक्कीच मान्य करीन. पटतय अस म्हणीन.


Chyayla
Tuesday, September 11, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे ईकडे कुणी तरी संत तुकडोजी महाराज यांची उत्कृष्ट रचना दीली होती..

"मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशान भेटायचा नाही रे"

मी तुम्हाला गढुळ मनाची म्हणण्यापेक्षा हा प्रश्न आपण स्वता:लाच विचारावा, परत सांगतो ज्याला या मार्गावर जायचे त्याच्यासाठी हे पहिले पाउल आहे.

तरी.. तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्या आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळणे आवश्यक आहे. तुम्ही माझ्या पुर्व प्रश्नाचे उत्तर टाळु नये कारण ते अत्यंत महत्वाचे आहे. कारण तुम्हाला जर माझ्याकडुन उत्तर हवे असेल तर माझे समाधान होणे आवश्यक आहे, नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी ओतायला कोण तयार होइल?... तरी संत, महात्मे सगळे सुखी व्हावे, आनंदी व्हावे म्हणुन आईच्या मायेनी सांगत असतातच पण त्यांच्यावर "श्रद्धा" ठेवतो कोण कारण ईथेच तर सगळ अडतय.. तरी आपदभाव न बाळगता जनकल्याण करणार्या संतानपुढे आपसुकच नतमस्तक होतो.

उदाहरण द्यायचे तर भगवान कृष्णाने पार्थाला गीतेचा उपदेश केला त्यानी अर्जुन तर धन्य झालाच सोबत संजयने अप्रत्यक्षपणे तोच उपदेश धृतराष्ट्रालाही केला, संजय तर कृतार्थ झाला पण ध्रुतराष्ट्र तसाच राहीला कारण त्याच्या मनावर पुत्रप्रेमाच्या आंधळ्या मायेची झापड होती. अशा व्यक्तिचे कोण आणी कसे उत्तर देउन समाधान करु शकेल.. प्रत्यक्ष भगवान कृष्णही नाही. तीथे माझी काय गत? तो दयाघन तर केवळ द्यायलाच बसला आहे पण आपली आधी ते घ्यायची तयारी हवी ना.

टीप: तुम्हाला ईथे वैयक्तिक रीत्या दुखवायचा प्रश्न नाही कारण ह्याच मनस्थितीतुन मी सुद्धा गेलो आहे. त्यामुळे हाच प्रश्न मला पण विचारला गेला होता. आणी मला तरी ते पुरेपुर पटले.. Believe Me ... बघा तुम्हालाही ते पटतय का?



Zakki
Tuesday, September 11, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा की तुम्हाला देव दिसला तरच तुम्ही तो मानणार का? तुम्हाला ताबडतोब काही लाभ होणार असेल तरच तुम्ही देवाची भक्ति करणार का? जरी फायदा झाला तरी तो देव मानल्यामुळे झाला, हे तुम्ही मान्य करणार का?

मला नाही वाटत की तुम्हाला कुणि देव दाखवू शकेल, किंवा असा काही मंत्र सांगेल की तुम्हाला ताबडतोब अशक्य गोष्टी साध्य होतील. तर या मार्गाने तुमचे कुणि समाधान करू शकणार नाही.

जर ताबडतोब फायदा होत नसेल तर तुम्ही कुठलीहि गोष्ट करणार नाही का? तुम्ही नक्कीच लोकांना मदत करत असणार, त्यात तुमचा काय फायदा असा विचार तुम्ही करत नाही. २००२ साली मुंबईला GTG झाले, दोन चार तास आपण इतर मायबोलीकरांबरोबर घालवले. काय तुमचा फायदा झाला त्यात? पण तुम्ही तिथे होता. का? आनंद झाला का तुम्हाला?

तुम्हाला Abstract विचार करता येतात का? तसे विचार करताना त्यातून तुम्हाला काही आनंद मिळतो का?

तसे कुणाला देव मानून नि देवासाठी नामस्मरण करून, पूजा करून जर काही समाधान मिळत असेल, आनंद होत असेल, तर ते म्हणतीलच, अरे पहा, असे केल्याने मला आनंद झाला, म्हणून मी ते करतो.

देव ही मनुष्याने निर्माण केलेली एक कल्पना आहे. त्या कल्पनेवर आधारित मोठ्या प्रमाणावर बरेचसे साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यात बरेच काही लिहीले आहे जे वरकरणी विसंगत वाटते, पण काही जणांना त्यातले तर्कशास्त्र समजते (म्हणे). त्यानुसार देव हा ज्याने त्याने स्वत:हून अनुभवायचा असतो. खरेच जर कुणाला तो अनुभवायला मिळाला, तरी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? कारण तो त्यांनी अनुभवला तरी तुम्हाला त्याची अनुभूति होणार नाही!

मग तो निर्गुण, निराकार, साकार, कुठल्या स्वरुपाचा आहे हे सगळे तुमच्या कल्पनेने ठरवा.

एव्हढे मात्र सत्य आहे, लोकांनी अनुभवलेले आहे, कि त्या साहित्यात लिहिलेले सर्व जरी नाही तरी एक दोन गोष्टी, जसे शिस्तबद्धतेने दररोज देवाला नमस्कार, प्रार्थना, नामस्मरण केल्याने, मनाला एक प्रकारची शांति लाभते. म्हणून लोक तसे करतात.




Chyayla
Tuesday, September 11, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुम्ही अर्धसत्य बोललात नामस्मरण वैगेरे सारख्या शिस्तबद्धतेनी शांती लाभते म्हणता. पण शांती मिळवणे हा मुळ उद्देश नाहीच मुळी ते तर त्याचे By Product आहे पण साधकाने तिथेच थांबु नये. जसे अध्यात्माच्या मार्गावर सिद्धी प्राप्त होतात पण त्यात गुंतू नये तसेच निव्वळ शांतीमधेही गुंतू नये असे म्हटले आहे. अर्थात तरी त्यानी शांती मिळते म्हणुन लोक करतात हेही बरोबर आहे. जो जशी ईछा: करेल तसेच त्याला प्राप्त होइल.

दुसरा मुद्दा.. एखादी वस्तु, वास्तव प्रत्यक्षात उतरावायला त्याबद्दल आधी कल्पना करायला काही हरकत नाही. पण एकदा प्रत्यक्षात उतरल्यावर त्याला कल्पना म्हणता येइल का? अर्थातच तुम्हाला जोपर्यंत त्याची अनुभुती होत नाही किंवा तुम्ही त्या पायरीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत खुशाल कल्पना म्हणा. जसा कलाकार चित्र वास्तवात साकरण्यापुर्वी मनात आधी कल्पनेनी चित्र रेखाटतो तसेच.

तुम्ही म्हणालात की दुसर्यानी अनुभव घेतला हे कसे पटवता येइल? हा मुद्दा मान्य जसे मागे आंब्याचे उदाहरण दीले होते त्याची चव कळायची तर स्वता: चाखुन पहावा लागतो अगदी तसेच ह्या क्षेत्रात आहे.


Zakki
Tuesday, September 11, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पण ज्यांना फक्त material गोष्टी कळतात नि झटपट लाभ हवा असतो, त्यांना कुठून हा मार्ग किंवा ही कल्पना पटणार?

Ashwini_k
Wednesday, September 12, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,

'''दुसरा मुद्दा.. एखादी वस्तु, वास्तव प्रत्यक्षात उतरावायला त्याबद्दल आधी कल्पना करायला काही हरकत नाही. पण एकदा प्रत्यक्षात उतरल्यावर त्याला कल्पना म्हणता येइल का?'''

---पुर्ण organic chemistry ही केक्यूलेच्या बेन्झीन रिंग बद्दलच्या स्वप्नकल्पनेमुळे पुढे उलगडली गेली.


Radha_t
Wednesday, September 12, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, एक ना धड भाराभर चिंध्या, शेवटी तुमचा प्रश्न काय ते समजलच नाही आणि माझ्या कुठल्याही प्रश्नाच उत्तर मिळालच नाही.

देव ही मनुष्याने निर्माण केलेली एक कल्पना आहे हे मला पटतय. मी सुद्धा तेच म्हणतिये झक्कीजी.

पण नास्तिकांना किंवा मला म्हणा हव तर लाभ नको असतो. म्हणूनच ते देव या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाहीत. ज्यांना लाभ हवा असतो तेच लोक नवस बोलतात. कुणा नास्तिकाने नवस बोललेल ऐकलय का? आणि काही हवच असेल तर ते त्यासाठी देवावर विसंबून रहात नाहित.



Zakki
Wednesday, September 12, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण असे वाटत नाही की काही लाभ व्हावा म्हणून देवाची उपासना करावी. माझा मुद्दा हाच की ती कल्पना गृहित धरून पुढे जे अनंत ग्रंथ लिहिण्यात आले, त्यात बर्‍याच गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळे ते वाचनीय आहेत, पण त्याला जरा पेशन्स लागतो, तो कुणाकडे आजकाल नसतो. शिवाय काही मटेरियल लाभ नसेल तर कुठलीहि गोष्ट करायला बर्‍याच लोकांची तयारी नसते.

बर्‍याच लोकांना ललित साहित्य, कविता, वगैरे आवडतात नि ते बराच वेळ त्यावर खर्च करतात. मला स्वत:ला त्यातले काही समजत नसल्याने मला पण बरेचदा वाटते की हे लोक असे का करतात? कशाला करतात?

पण देवाच्या कल्पनेवर विश्वास ठेवला, त्याचे चिंतन केले तर मला स्वत:ला बरे वाटते, म्हणून मी करतो.


Antara
Wednesday, September 12, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आली का पुन्हा जड शास्त्रिय शब्द वापरून बुवाबाजी!!
होय केक्युले ला म्हणे स्वप्न पडले आणि प्रोब्लेम सुटला.. तर अश्विनि मग तुझे काय मत आहे, त्याला स्व्प्नात कोनच्यातरी देवाचा दृश्टान्त झाला?
त्या केक्युले नी अभ्यास केला, दिवस रात्र फ़क्त त्या बेन्झिन च्या अणु च्या रचनेवर विचार केल तेव्हा त्याला त्या विचारांची संगती कधीतरी )कदाचित झोपेत)लागली यात नवल नाही. यात कसलाही सुपरनेचरल चमत्कार नाही.उगिच वडाची साल पिंपळाला लावू नका


Slarti
Wednesday, September 12, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाच्या अस्तित्वाची जाणीव ही जर श्रद्धेवर मूलभूतरित्या अवलंबून असेल तर मुळात अस्तित्व हेच श्रद्धेवर अवलंबून आहे का हा विचार केला पाहिजे. 'शोधा म्हणजे सापडेल' हे खरे असले तरी त्यावरून 'जर शोधले नाही तर ते अस्तित्वात आहे का ? ' हा प्रश्न येतो. Does a tree falling in jungle make a sound if there is nobody to hear it ?

Deshi
Wednesday, September 12, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Does a tree falling in jungle make a sound if there is nobody to hear it ? >>>

Depends, if you are there you will hear it, if not no sound.

But again "you" were not there to listen that does not mean there was no sound. N I think this is where the relativity comes into picture.

एखाद्याला जर ' तो ' उमगला (असेल तर) तर त्याला आपण अनुभव वा अनुभुती म्हणु शकतो. पण क्दाचीत आपण तिथे नाहीत म्हणुन no sound for us, but yes there was sound


Aschig
Wednesday, September 12, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

On a lighter note ... The official God FAQ:

http://www.400monkeys.com/God/

Chyayla
Wednesday, September 12, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पण ज्यांना फक्त material गोष्टी कळतात नि झटपट लाभ हवा असतो, त्यांना कुठून हा मार्ग किंवा ही कल्पना पटणार?

झक्की सही बोललात की... लगेच पुरावाही मिळाला.

असो आश्चिगच्या पोस्ट वरुन एक किस्सा आठवला.

रशिया मधे कम्युनिजमचा प्रचार करायचा म्हणजे त्याच्या तत्वज्ञानानुसार ईथल्यासारखेच "देव नाही" असे शिक्षणाद्वारे व ईतर मार्गाद्वारे बिम्बवणे सुरु झाले. आज त्यांची गत पहातोच आहेत.. जाउ द्या सध्या तो मुद्दा नाही.

शाळेत शिकवल्या गेले देव हा अस्तित्वात नाही.

परिक्षेत प्रश्न विचारला देव आहे का? हो / नाही

एका छोट्याश्या गोड मुलीनी उत्तर लिहिले.. नाही

परीक्षा सम्पली आणी मैत्रीणींच्या घोळक्यात परीक्षेची चर्चा सुरु होती. त्यात तीनी विचारले. ते देव आहे की नाही याच उत्तर "नाही" हे बरोबर आहे ना? सगळ्यानी तिला हो म्हटले.

त्या मुलीला उत्तर बरोबर निघाले म्हणुन खुप आनंद झाला सोबत आपसुकच सुटकेचा निश्वास सोडत तोंडातुन निघाले Thanks God!


Slarti
Wednesday, September 12, 2007 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> Depends, if you are there you will hear it, if not no sound.

Does it mean that the existence of sound depend upon whether it's heard or not ?
अनुभूती सापेक्ष असते तसे अस्तित्व सापेक्ष आहे काय ?


Deshi
Wednesday, September 12, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

But I also wrote further that, "that does not mean there was no sound".

अस्तित्व सापेक्ष असते का?
सचिन तेंडुलकर हा माणुस आपल्याला माहीती आहे कारण तो प्रसिध्द आहे, त्याला आपण तसे प्रत्यक्षात न बघता पण. प्ण जर तो प्रसिध्द नसता तरी असलाच असता. फक्त आपल्याला माहीती नाही यावरुन त्याचे अस्तित्व नाकारता येईल का?


Aschig
Wednesday, September 12, 2007 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

with the tree falling we enter a rather different terrain, that of QM. The wave function collapse interpretation would state that until one of the following falling domino is perceived as such by a cognisant (what the hell does that mean?) being (what does THAT mean?) the tree has not really fallen. It is much like the slow motion sequence in Matrix where suddenly the whole thing happens because at the receiving end is someone who understands.

But neither is the wave function collapse theory universally accepted (the term universal being like the american term world series), nor is there any reason to apply that reasoning to the perceived appearance of Godlike things somewhere deep in your mind (what is THAT, now?).

You may be interested in a 2003 article By Vilayanur S. Ramachandran and Edward M. Hubbard on synesthesia:
http://www.sciam.com/article.cfm?colID=1&articleID=0003014B-9D06-1E8F-8EA5809EC5880000

Vijaykulkarni
Wednesday, September 12, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिन तेंडुलकर हा माणुस आपल्याला माहीती आहे कारण तो प्रसिध्द आहे, त्याला आपण तसे प्रत्यक्षात न बघता पण. प्ण जर तो प्रसिध्द नसता तरी असलाच असता. फक्त आपल्याला माहीती नाही यावरुन त्याचे अस्तित्व नाकारता येईल का?

हो जरूर नाकारता येइल. किम्बहूना नाकारणेच योग्य होईल. जोपर्यन्त त्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळणार नाही तोपर्यन्त.

एखादा चिनि माणूस सान्गू लागला की चीन मध्ये सहा डोळे, पन्धरा पाय आणी तीन शेपट्या असणारे प्राणी आहेत.

फक्त आपल्याला माहीती नाही यावरुन त्याचे अस्तित्व नाकारता येईल का?






मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators