Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 06, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through September 06, 2007 « Previous Next »

Antara
Tuesday, September 04, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन माणुस अमर का झाला नाहि अजुन त्याची अमर्याद बुध्दि वापरुन>>>> अमर होणे हेही सुपर्नेचरल झाले की :-O निसर्ग नियमाविरुद्ध. ते अजून घडले नाही यात काय विशेष??बरोबर च चल्लय की :-)सन्तु तुम्हिच वापरा बघू तारतम्य!
किती तरि प्रजाति आहेत जगात कि अजुन त्याचा पत्ता लागत नाहि
>>>बर मग? नाहि लागला अजून तर लागेल त्यात काय :-)
आपण काहि पाहिल नाहि म्हनजे ते नाहि अशि समजुत करुन घेणे. म्हणजे काय शहाणपणा आला असे नाहि.
हे उलट सर्वात लॉजिकल झाले ना, जे सिद्ध झाले नाही ते नाही असे म्हणणे!! उलट ज्याचा काही पत्ता पुरावा अनुभुती काही काही नसताना ते आहेच असे म्हणन्णे म्हणजेच अडाणी अन्धश्रद्धा झाली :-)

असेच एक मुर्ख तत्वज्ञानने दोन शतके धुमाकुळ घातला होता होता काय झाल त्याच. मिळाल ना धुळिला.
>>>>हे काय आहे म्हणे? कुणाबद्दल बोलता? pls explain

Santu
Tuesday, September 04, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


योगि अरविंद, विवेकांनद हि काय अशिक्षित मानसे नव्हति.
पण त्यांनि पण तो coniusness अभ्यासला. अनुभवला.
आता काहि लोकाना भक्ति मार्गातुन, सापडला तर काहिना
योग करुन. म्हणुन काय मुर्ति पुजा गौण नाहि.
त्याचे महत्व आम पब्लिक ला.
त्यासठि पंढरिला जायला हवे. देवळाचे शिखर पाहिले की
धावणारे वारकरि पहायला हवे. हि काहि सर्व जण अशिक्षित नव्हेत.
मुळात पुस्तकी शिक्षण म्हनजे काहि सर्व नव्हे.
जगाच्या पुस्तकातुन जे ज्ञान मिळेल तेच चिरंतन अहे.
म्हणुन तर ते टिकुन आहे.

अरे बापाच्या फोटोला तरि तुम्हि नमस्कार करताना
मग तो काय फोटोत असतो का? ( अर्थात तुम्हि त्या फोटोला फ़क्त एक कागद म्हणुन लाथ मारत असाल तर गोष्ट वेगळि) नसतो ना पण आपण आदर
दाखवतो ना? तसाच भाव मुर्ति शी एखद्या भक्ताचा असतो. मग त्याची टर उडवणे कितपत योग्य



Antara
Tuesday, September 04, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात पुस्तकी शिक्षण म्हनजे काहि सर्व नव्हे.
जगाच्या पुस्तकातुन जे ज्ञान मिळेल तेच चिरंतन अहे.
>>>हे बाकि बरोबर हो सन्तु :-)

पण आपण आदर
दाखवतो ना? तसाच भाव मुर्ति शी एखद्या भक्ताचा अस्तो >>>>मग असु द्यात कि:-) त्याची कोण कुठे टर उदवतोय! :-O


Lukkhi
Tuesday, September 04, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठेतरी वाचलय की आपण मुर्खाशी भांडलो तर लोकांना दोघांमधला फरक समजत नाहे... म्हणून, काही लोकांच्या पोस्टवर उत्तरे दिली नाही तरच बरे

Santu
Wednesday, September 05, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरा
आता एक सांगा स्वताच्या तिर्थ रुपांच्या
फोटोला नमस्कार करणे श्रध्दा की अंधश्रध्दा


पत्ता पुरावा नसताना ते म्हणने म्हणजे अंध श्रध्दा)))) मग हवा तरि कुठ दिसते. मग ति असते का नसते.


Bee
Wednesday, September 05, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या जर वार्धक्यात तुम्हाला स्मृतीभ्रंश झाला तर तुम्ही नक्की त्यांच्या फोटोला नमस्कार करणार नाही कारण तुम्ही सर्व विसरून गेलेले असतात. नविन जन्म घेताना आपण पुर्वीचे सर्व विसरून आलेलो असतो. न जाणे कुठल्या जन्मात अमूक देवाशी आपली गाठ पडली असेल नसेल म्हणून नमस्कार.

Antara
Wednesday, September 05, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु अहो काय हे, किती बेसिक प्रश्न विचारता. हवा आहे का नाही हे सिद्ध करता येते प्रयोगाने, जितक्या वेळा प्रयोग कराल तितक्या वेळा सिद्ध होते. त्यात कोणते घटक किती प्रमाणात आहेत हेही समजते. हे तर शाळेत शिकलो के आपण! देवाचे तसे आहे का? उगीच काय च्या काय तुलना!!
बर आणि वडील हयात नाहीत अन त्यांच्या फ़ोटो ला नमस्कार केला ही अन्ध्श्रद्धा नव्हे. पण आग लागत असताना तीर्थरूप (फ़ोटोमधले!) वाचवतील असे मानून निवान्त झोपी जाणे ही अन्ध्श्रधा! माझा कि नाही ऍक्सिडेन्ट होणार होता पण बापूंचे स्मरण केले अणि गाड्या आपोआप थांबल्या ही अन्धश्रद्धा. त्या अमूक्बाईचा पाय अधू होता पण तमूक माताजीनी हात फ़िरवून बरा झाला ही अन्ध्श्रद्धा. कळले का आता?
जी बाई किन्वा बुवा आपण देवचे अवतार आहोत असा दावा करून लोकांकडून पाया पडून घेणे, स्वत्:चे फ़ोटो विअकणे, चमत्काराचा दावा करणे हे करतात त्याला भोन्दू बाबा म्हणतात. आणि जे अश्या लोकांच्या नादी लागतात त्याना अन्ध्श्रद्ध असे म्हन्तात.


Santu
Wednesday, September 05, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हवा आहे हे कस सिध्द करता सान्गा ना? पण दिसत नाहिच ना?
अस काहि दिसत का बाबा हि एवढि एव्हढि हवा म्हणुन.
हि हवा काळि का गोरि म्हणुन.शिळि का ताजि म्हणुन शेवटि प्रयोग करुन आपन
आपले "मानतो " काहितरि आहे म्हणुन.

किति बेसिक प्रश्न))) तेच तर अवघड असतात.

एवढे प्रयोग करुन डोळ्याला हवा कुठ दिसते. शेवटि तुम्हि मानता ना
की फ़ुग्यात हवा आहे वै. पण डोळ्याला दिसते का. ? मग?
कारण तुम्हि तर डोळ्याला दिसले तर्च मानता ना की वस्तु आहे का?
अहो देव म्हणजे डोळ्याला दिसत नाहि पण हवे सारखा जाणवतो
ना त्या साठि कष्ट घ्यावे लागतात. तो काय लगेच दिसत नाहि.
एक सहा महिने ध्यान करा म्हणजे जरा कल्पना येईल.
उगिच अहं पणा करुन तर मुळिच दिसत नाहि.

देव वाचवेल म्हणुन कोणि आगित झोपत नाही. उगिच वडाची साल पिंपळाला जोडु नका. तुम्हि म्हणाताय कि देव नाहि तोच आमचा वादाचा मुद्दा आहे.
अहो देव म्हणजे निर्विकल्प शांतता, मग कोणि त्याचि तसबिर बनवेल तर कोणि ग्रन्थ सगळ्यांचे चुक नाहिच तर बरोबरच आहे. कुणि प्राण्यात तो पाहिल कारण सगळ्यात तो आहेच.


Ksha
Wednesday, September 05, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चमत्कार ही परमार्थाच्या मार्गातील सर्वात मोठी धोंड आहे.

तुम्ही सगळे जाणते आहात. उगाच चमत्कार आणि देव यांत गल्लत करू नका.

सिद्धी असतात की नसतात हा वेगळ्या बीबीचा विषय होऊ शकतो. त्याची इथे उगा चर्चा करू नका.


Aschig
Wednesday, September 05, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A blog entry from cosmic varience on mother teresa:

http://cosmicvariance.com/2007/08/24/charity-without-religious-belief-mother-teresa/

Zakki
Wednesday, September 05, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या ओळखीच्या एक दोन वृद्ध व्यक्ति ज्या आयुष्यभर अगदी अंधश्रद्ध म्हणता येईल इतक्या उत्साहाने नि नेमाने देव देव करायच्या, त्यांनी आयुष्याच्या अखेरीस एकदम देवाची पूजा करणे इ. सर्व धार्मिक कृत्ये सोडून दिली. मनातल्या मनात सुद्धा देवाचे नाव घ्यायचे थांबवले, असे त्यांनी सांगितले.

पण तुमचा देवावरला विश्वास उडाला का? असे विचारले तर म्हणत, नाही देव आहे, पण मला त्यासाठी आता काही करायची गरज नाही. जणू वय झाले, पैसे कमावले, आता नोकरी करण्याची, किंवा पैसे वाढवण्यासाठी काही कष्ट घेण्याची गरज वाटत नाही तसे.

मला कुणि सांगितले की जसजशी तुमची अध्यात्मात 'प्रगति' होईल, तसतसे तुम्हाला कर्मकांडाबद्दलचे प्रेम कमी होते, देवदर्शन (खरे, मूर्तीचे दर्शन) सुद्धा सहज घडले तर ठीक आहे, पण मुद्दाम काही उठून देवळात, देवघरात जाण्याचे कष्ट घेत नाहीत!

तरी पण ते लोक शांत नि समाधानी दिसतात!


Chyayla
Wednesday, September 05, 2007 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, बरोबर आहे त्यांचे.. श्रद्धा, भक्ति भले ती कशीही असो, अगदी तरुण वयातले आंधळे प्रेमही हे शेवटी ज्ञान प्राप्त करुन देतात. कर्मकांड महत्वाचे नाही पण ते जर कुणाला त्याच्या उद्दीष्टापर्यंत पोहोचण्यास मदत करत असतील तर जरुर करावे.

मदर टेरेसाच्या बाबतित म्हणायचे तर त्यांचा उद्देश सेवेच्या नावाखाली धर्मांतर करुन एका धर्माचा व्यावसायिक रीत्या प्रसार करण्यासाठी वापरलेली Business tactics याशिवाय दुसरे काही नाही. त्यामुळे देव वैगेरे काय हे कळले नसावे यात काहीच आश्चर्य नाही.

स्वामी विवेकानंद ही म्हणतात "नर सेवा नारायण सेवा" ते का या मागचे रहस्य शोधा म्हणजे देव हा केवळ आकाशात नसुन सगळ्याच चराचरात व्याप्त आहे.

क्ष च्या मताशी पुर्ण सहमत.


Vijaykulkarni
Wednesday, September 05, 2007 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मदर तेरेसानी आपल्या जीवनातले रितेपण प्रान्जळपणे लिहिण्याचे तरि धाडस दाखविले.

आणी बिझिनेस ट्याक्टिक साठी एक स्त्री आयुष्य अर्पण करेल हे पटण्यासारखे नाही.

( आपले ते धार्मिक पुनरुत्थान दुसर्‍यान्चा तो बिझिनेस? )


Aschig
Thursday, September 06, 2007 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I was referring specifically to the following excerpt from the blog and I totally agree with that part:

beliefs should be judged on whether they are correct or incorrect, not on whether they cause people to do good or bad things. (If the belief is not correct, but it makes people do something good, can we say they’ve been tricked into acting that way?) Certainly, nobody is going to convince me to believe something if they admit that it’s false, but it would be good for me to believe.

Maanus
Thursday, September 06, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


.. .. .. ..


Maanus
Thursday, September 06, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

a quote from
Cowboy Bebop "Brain Scratch" - Tell me, why do you think people believe in God? Because they want to. It's not easy living in such an ugly and corrupt world. There is no certainty and nothing to hope for. People are lost, so they reach out. Don't you get it? God didn't create humans. No, it's humans who created God.

Radha_t
Thursday, September 06, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस एकदम पटेश!! माणासानेच देव ही संकल्पना तयार केली.
चांगल्या कामासाठी ती वापरात असली तर भले वापरा. पण त्याचा गैरफायदा भोंदू लोकांनाच जास्त होत असेल किंवा कर्मकांडावर विश्वास ठेवून पाप धुतली जातात अशी श्रद्धा असेल आणि स्वैराचार वाढत असेल तर ही संकल्पना नसलेलीच बरी, नाही का?
सौ चुहे खाके बिल्ली गयी हाज की काय म्हणतात ना तसे. जर देव आहे तुमची श्रद्धा आहे तर आणि तसही देव फक्त वैयक्तीक अनूभूतीतूनच समजतो तर त्याच सार्वजनीकरण कशाला?देवाच्या नावाने वेगवेगळे धर्म कशाला?युद्ध कशाला?

देव असण्याला किंवा देव मानण्याला आजीबात विरोध नाही. पण देवाला social activities मधे न आणलेल बर, अस मला वाटत.

आता असच बघा लोकमान्य टिळकांनी किती उदात्त हेतूने गणपती उत्सव सार्वजनीक स्वरूपात साजरा करायची युक्ती केली. आणि या सार्वजनीक उत्सवाच आताच रूप बघा. वर्गणी दिली नाही म्हणुन खून या बातम्या काही नवीन नाहीत. ध्वनी-प्रदूषण, जल प्रदूषण, वाहतूकिची कोंडी, चेंगराचेंगरी हे आहेच. त्यापेक्षा आता त्या उस्तवाच सार्वजनीक स्वरूप बंद केलेलच बर अस वाटत. ( सार्वजनीक स्वरूप, पूर्ण गणपती उत्सवच बंद झालेल बर, अस मी म्हटलेल नाही. )

सार्वजनीक गणपती उत्सव सुरु रहावा की बंद व्हावा यासाठि दुसरा BB उघडायची गरज नाही. मी आपल मत मांडण्यासाठी फक्त एक उदाहरण दिल.


Chyayla
Thursday, September 06, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस तु अत्यंत हास्यास्पद पाटी टाकलीस Who are you who questions his wisdom अरे बाबा मी पण म्हणु शकतो मला हे विचारायला लावणाराही तोच देव आहे.

बाकी देवाला संकल्पना मानुन त्यावर अजुन संकल्पना मांडण्याचा प्रकार म्हणजे मनोरंजन होतय खासच.


Maanus
Thursday, September 06, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हा BB बंद पाडायचाय, म्हणुन माझे हे उद्योग सुरु आहेत :-) एकदाचे सगळ्या नास्तिक लोकांच्या समाधानासरखे बोलले की ते बोलायचे बंद होतील असे मला वाटतेय.

Ksha
Thursday, September 06, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव असण्याला किंवा देव मानण्याला आजीबात विरोध नाही. पण देवाला social activities मधे न आणलेल बर, अस मला वाटत. >>>
मग नवा बीबी उघडा
"धर्माच्या नावाखालील भोंदूपणा" या नावाचा. :-)

राधा,
माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे जर देव ही संकल्पना कालबाह्य केली तर हे सर्व थांबेल अशी कल्पना / अपेक्षा आहे का तुमची?
ज्यांना हे सगळं करायचंय ते काही केल्या हे करणारच. त्याचे खापर देवाच्या नावाने फोडू नका.

शाळेतल्या वर्गाचे उदाहरण घ्या. शिक्षक एकच असताना एकाच वर्गातली काही मुले हुषार आणि काही दंगेखोर आणि उनाड असतात. याचे कारण काय?
तर प्रत्येक मनुष्य आपल्या कुवतीनुसार आणि पूर्वतयारीनुसार जे कळते त्याचा अर्थ लावतो. आणि भलते अर्थ लावले की त्यांतून भलते निष्पन्न होणारच. तेव्हा अशाच प्रकारे पूर्वी जे अवतार होऊन गेले ( अवतार, देव नव्हे ) त्यांच्या मतांना धर्म असे नाव देऊन त्याचे अर्थ लावले गेले. आणि तुम्ही ज्या बद्दल इतक्या त्रस्त आहात ते सर्व त्यांतून निष्पन्न झालेले आहे.

समजा उद्या देव ही कल्पना कालबाह्य केली तरीही सामोपचाराने, सहयोगाने जगण्यासाठी काही कायदे, नियम असतीलच ना? त्यांच कायद्यांना पुढे कोणि धर्म म्हंटले तर त्यांत वावगे काहीच नाही. कारण मूलतः धर्म म्हणजे कसे जगावे याचे नियम! पण आपण आजही बघतोच की कायदे कसे वाकवता येतात आणि त्यांचा यथा ( अ ) योग्य वापर करून स्वतःच्या तुंबड्या भरणारे कमी नाहीत. त्यांचे काय कराल? की कायदाही नको तुम्हांला.

तेव्हां सर्वप्रथम तुम्हांला काय हवे आहे याची व्यवस्थित जुळणी करा. आणि मग तुम्ही त्यांवर जो उपाय सुचवत आहात तो लागू केला तर त्याचा फायदा होणार आहे का हा साधा विचार करा म्हणजे तुमचे उत्तर तुम्हांलाच मिळेल.

असो. आता अजून तिकडे भरकटणे विषयाला धरून होणार नाही कारण धर्म हा या बीबीचा विषय नव्हे.
आता परत त्यांत गल्लत करू नका.

बाकी कुणाचे काही ऐकण्यापेक्षा प्रथमतः देव म्हणजे काय हे समजावून घ्यायचा प्रयत्न करा. तरच तुमच्या मनातील हे भय आणि हा जो कल्लोळ आहे तो दूर होईल.

aschiq आणि shrini च्या प्रश्नांनी माझ्याही मनात काही प्रश्न उभे राहीले होते. त्यावर उत्तरे शोधू गेलो तेव्हा काही अतिशय उत्तम पुस्तकं वाचण्यात आली. विशेष म्हणजे ही पुस्तके हजारो वर्षांपूर्वीच्या ऋषीमुनींनी लिहीली नसून काही अगदी अलिकडच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी लिहिलेली आहेत. त्यांच्यातली मते यथावकाश मांडेनच पुढे.
असो.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators