Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 04, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through September 04, 2007 « Previous Next »

Ksha
Friday, August 31, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय वाट्टेल त्या विषयावर चर्चा खेचताय!

देवाच्या दाढीमिशा???!!

अशक्य लोकं आहात एक एक!


Vijaykulkarni
Saturday, September 01, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक शन्का नेहेमी सतावते.
प्राचीन काळी रेझर वगैरे नव्हते तरीही लोक दाढी कशी करत असतील?


Sunilt
Saturday, September 01, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णीसाहेब, काहीतरी खुसपटं काढू नका. नाहीतर ही मंडळी तुमचीच करतील - बिनपाण्यानी!!!!!

गुमान चाललेली चर्चा वाचा आणि मनमुराद हसा!!!


Ashwini_k
Monday, September 03, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस,

'''अश्विनी, असे देवावर सोपवुन झोपुन जाणे योग्य नव्हे. ते म्हणतात ना, प्रयत्न न करणार् ०दयाला देवही मदत करत नाही. तुमच्या मनात शॉर्ट सर्किटचा विचार येण्यासाठी नक्कीच काहीतरी धागा असेल. नीट आठवुन बघा. कुठले तरी बटन किंवा इलेक्ट्रिक अप्प्लायन्स गरम लागले असेल किंवा तत्सम. तुम्ही जे केलेत ते खरोखरच अंधश्रद्धेत मोडते.'''

---नाही ग प्रिन्सेस, आम्ही चक्क गादीवर बसून बोलत होतो. दिवे संध्याकाळी लावले होते त्यामुळे बटणापाशी कोणी गेले नव्हते. किंवा गप्पांमध्ये शॉर्टसर्कीटचा विषयही नव्हता. शंका येण्यास काहीही कारणच नव्हते. प्रयत्न न करणार्‍यास देवही मदत करत नाही हे मलाही मान्य आहे. तुम्ही जोर काढू लागलात तर "तो" दुधाची वाटी घेऊन मागे उभाच असतो, पण तुम्ही म्हणाल परमेश्वरा तुच जोर काढ व मला मात्र दुधाची वाटी दे! तर ते होणे नाही.

आता समज तू बसने चालली आहेस, मधेच तुझ्या मनात आले की बस घाटात खाली कोसळेल. इथे तर circumstances आहेत तरीही तू काय करू शकतेस? तू आस्तिक आहेस तर देवावरच सोपवणार ना? का बस सोडून प्रिकॉशन म्हणून ट्रेनने जाणार, चालत घाट पार करणार?


दिव्व्या,

'''आश्विनी देव हा सर्वव्यापी जरी असला तरी तो निसर्गाप्रमाणे तटस्थ आहे. तो कसलेही चमत्कार करत नाही. तो सर्वांसाठी सारखाच आहे आस्तिकांसाठी सुद्धा आणि नास्तिकांसाठी सुद्धा.'''

---तो चमत्कार करत नाही. तो हवेतून ताईत किंवा अंगारा काढत नाही. पण त्याची पंचमहाभूतांवर सत्ता असते. वीज हे अग्नीतत्व नाही का? एका बिंदूपर्यंत तो आस्तिकांसाठी व नास्तिकांसाठी सारखाच असतो (नास्तिक हे सत्शिल असतील तर फ़रक पडेलच) पण त्यानंतर तो नक्कीच पार्शिअलिटी करणारच. मला सांग नामस्मरण (जे आपल्याला कुठल्याही कर्मकांडाशिवाय कुठेही करता येते) कशाला करावे? तू आस्तिक का नास्तिक ते माहीत नाही. तुझा संतांबद्दल आदर आहे का नाही ते माहीत नाही पण असेल तर माझे जाऊदे (मी तर चारचौघांसारखी आहे) त्यांच्या कथांमध्ये तुला ही पार्शिअलिटी जाणवली नाही का?

'''तुम्ही जे केलेत ते खरोखरच अंधश्रद्धेत मोडते. '''

---या बिबिवर तुला कळलेच असेल की अंधश्रधा ही रिलेटिव्ह टर्म आहे कारण तूझ्या माझ्यासारख्या आस्तिक असणार्‍यांनासुध्दा अंधश्रध्द म्हणणारी माणसे जगात आहेत कारण त्यान्च्यामते मुळात देव नाहीच.


आणि तटस्थपणा म्हणशील तर आपण तटस्थपणा करावा, दुसर्‍याला मदत करताना तो पापी आहे का पुण्यवान हे पहाणे आपले काम नाही, आपण आपले माणुसकीचे कर्तव्य करावे. प्रत्येकासाठी आपले स्वतःचे पापच सर्वात मोठे मानले जावे व ते कमी करायचा प्रयास करावा एवढेच मला कळते.






Ashwini_k
Monday, September 03, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'''प्राचीन काळी रेझर वगैरे नव्हते तरीही लोक दाढी कशी करत असतील? '''

---दाढी मिश्यांबद्द्ल मला माहीत नाही. पण गंमतीचा भाग म्हणून विचारते, रेझर नव्हते कशावरून? रेझर म्हणजे पातेच ना? एवढी मोठी तलवार असू शकते मग रेझर किंवा वस्तरा का नसावा?


Vijaykulkarni
Monday, September 03, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी ताई,
पण त्यानंतर तो नक्कीच पार्शिअलिटी करणारच.
म्हणजे काय?
माझे नामस्मरण आणी पूजा करणार्‍यान्चे मी भले करनार पण न करणार्‍याची होडी बुडविणार ( साधु वाण्यासारखी?) ,
मग देव आणी एखादा राजकिय पुढारी यात फरक काय?




Shravan
Monday, September 03, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो अश्विनी,

पाते, वस्तरा ))))
असले प्रश्न अनुल्लेखाने मारायचे असतात हो




Shravan
Monday, September 03, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी साहेब तेवढे शेवटचे मात्र खरे बोललात..!!!


Antara
Monday, September 03, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्यानंतर तो नक्कीच पार्शिअलिटी करणारच>>>>
यावरून मला देव म्हनजे एखादा राजकिय नेता, चमच्यांचे तेवढे 'भले' करणारा, किन्वा एखादा मूठ गरम केली की मगच काम करून देणारा सरकारी बाबू असावा अशी चित्रे समोर येउ लागलेय! सही आहे देवाची ही कल्पना!! :-O

Waatasaru
Monday, September 03, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचून मला हेरा फेरी मधले एक वाक्य आठवले....

" हे भगवान उठाले रे
मेरेको नही इन सबको"


Maanus
Monday, September 03, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाण्याची बोट बुडाली कारण त्याने त्याचे promise खुप वेळा मोडले. कथा परत निट ऐका.

ह्या BB वर वायफळ चर्चा करायला लागा म्हणजे हा BB बंद होईल.

वायफळ चर्चा करण्यासाठी विषय.
- माणूस चांगले चमचमीत पदार्थ खावु शकतो उ.दा. बटर चिकण, मिसळ वैगेरे. पन गाई म्हशीनां फक्त पाला पाचोळाच खावा लागतो. वाघ सिंव्हाना कच्चे मास खावे लागते. देवाने अशी पार्शीलीटी का केली.

- देव एवढे झगमगीत कपडे, सोन वैगेरे का घालतात.

- देव प्लॅटीनम का नाही वापरत.

नाहीतर best उपाय म्हणजे अंताक्षरी वैगेरे वर चर्चा सुरु करा इथे.


Zakki
Monday, September 03, 2007 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय, अंतरा, तुम्ही देव कसा आहे, (नाही) हे ठरवायला तुमच्या सोयीच्या गोष्टींचा वापर करता, पण तुमच्या हे कसे लक्षात येत नाही की हजारो वर्षात मूळकल्पनांचा मोठ्या प्रमाणात विपर्यास झाला असू शकतो.

'दुसर्‍या व्यक्तीचा खून करू नये, चोरी करू नये,' इ. साध्या गोष्टी न समजणार्‍यांसाठी तसा कायदा करून मग तश्या कायद्याची भीति घालावी लागते.

देव आहे ही एक कल्पना, आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात ही आणखी एक कल्पना.

जसे उन्हाळ्यात उष्णतेमुळे धातू प्रसारण पावतात, नि हिवाळ्यात थंडीमुळे ते आकुंचन पावतात हे शास्त्रीय सत्य आहे. तसेच उन्हाळ्यात दिवस मोठा असतो नि हिवाळ्यात लहान होतो हेहि सत्य आहे, पण त्याचे कारण म्हणून पहिला नियम कुणि सांगितला तर तो विनोद होतो! तसेच एका Abstract level वर देव कर्म, भक्ति, इ. कल्पना, न समजता एकमेकात मिसळल्या की तुमचे आक्षेप हेहि हास्यास्पद होतात.


Nandini2911
Tuesday, September 04, 2007 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका, खूप कमी शब्दात अगदी बरोबर मांडले.
अंतरा, तुमचा देवावर विश्वास नसेल तर हरकत नाही. तो तुमचा प्रश्न आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही दुसर्‍याच्या श्रद्धेची हवी तशी खिली उडवावी.
मुळात देव धर्म संस्कृती आणि दैनंदिन जीवन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजून न घेतल्यामुळे तुम्ही असे आक्षेप नोंदवत आहात. देव न मानणार्यानीदेखील काही चांगले मुद्दे मांडले आहेत. एका निकोप चर्चेच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.
मात्र दरवेळेल तुम्ही आणि विजयजी फ़क्त हास्यास्पद मुद्दे मांडत आहात. यामुळे तुमचेच हसू होत आहे. :-)



Santu
Tuesday, September 04, 2007 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय
तुम्हि काय करता समजा रेझर नसला तर.
"उपटत" तर नाहि ना?


Santu
Tuesday, September 04, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नामस्मरण न करणार्‍याची होडि बुडवणार))))) हि भिति
घालणारा एखादा पोटार्थी भट असणार.

खर्‍या अर्थानी. संत पदाला पोचलेला एखादा रामक्रुष्ण किंवा विवेकानंद अशी भिती घालणार नाहि.


Santu
Tuesday, September 04, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव म्हनजे सरकारी बाबु असावा अशी कल्पना येवु लागलिय)))) अंतरा स्वतहा वरुन देवाची परिक्षा का करतेस. देवाला तुझ्या सारख्या "चमची" ची गरज नाहि. तो स्वयंभु आहे त्याला तुझ्या
दमडयां ची गरज नाहि.

अश्विनी
अग तु कितिही गांभीर्‍याने चर्चा केलि तरी काहि ना नुसते
वस्तरे व दाढ्या हेच आठवणार असल्यावर
काय उपयोग.

मला इथे एक म्हण आठवते
रिकामा न्हावी आणि


Savyasachi
Tuesday, September 04, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>देवाला तुझ्या सारख्या "चमची" ची गरज नाहि.

म्हणजे कोणत्यातरी प्रकारच्या चमच्यांची गरज आहे :-)

Antara
Tuesday, September 04, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके, झाले का कांगावे करून! आता let me tell you once n for all .. मला माणसाच्या बुद्धीवर, कर्तृत्वावर विश्वास आहे. कोणत्याही सुपरनेचरल एन्टिटि वर विश्वास नाही, आणि होय, हेही मान्य आहे की निसर्गाच्या शक्तीपुढे माणूस अजूनही क्षुद्रच. आता यालाच कुनी देव म्हनून मान दिला तर मला काही वावगे दिसत नाही. I will respect their faith and respect :-) पण..! पण थोतांड, कर्मकांड, अन्ध्श्रद्धा... हे मान्य नाहीच. कुणी जर म्हटले की अमूक स्वामींच्या आशीर्वादानी आपोआप आग विझली अन तमूक माताजींनी रोग बरा केला.. तर येस्स, टिंगल च होणार :-)
तसेच वर देवाची selective कृपा अन अवकृपा हे भकतजनांचे उद्गार वाचून खिल्ली उडवणार नाही तर काय करणार
:-)

Santu
Tuesday, September 04, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कस लागल मग जरा काहि तारतम्य ठेवुन वाद घाला ना.
उगिच दाढ्या हजामति काय करता?

मानसाच्या बुध्दिवर विश्वास आहे)))) अजुन माणुस अमर का झाला नाहि अजुन त्याची अमर्याद बुध्दि वापरुन. अजुन एक माणसाच्या सुध्दा शरिराला पुर्ण बरे करु शकत नाहि माणुस( aids, cancer ) उगिच
कशाला बाता मारता. अश्याअ किती तरि प्रजाति आहेत जगात कि अजुन त्याचा पत्ता लागत नाहि.
म्हणे माणुस शहाणा.
आपण काहि पाहिल नाहि म्हनजे ते नाहि अशि समजुत करुन घेणे. म्हणजे काय शहाणपणा आला असे नाहि.

म्हणे कर्म कांड इथे काय कोणि आसुड घेवुन कडकलक्ष्मि
झाले नाहि.

प्रश्न आहे देव( concius ness ) आहे कि नाहि याचा.
असेच एक मुर्ख तत्वज्ञानने दोन शतके धुमाकुळ घातला होता होता काय झाल त्याच. मिळाल ना धुळिला.


Santu
Tuesday, September 04, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कस लागल
मग जरा काहि तारतम्य ठेवुन वाद घाला ना.
उगिच दाढ्या हजामति काय करता?

मानसाच्या बुध्दिवर विश्वास आहे)))) अजुन माणुस अमर का झाला नाहि अजुन त्याची अमर्याद बुध्दि वापरुन. अजुन एक माणसाच्या सुध्दा शरिराला पुर्ण बरे करु शकत नाहि माणुस( aids, cancer ) उगिच
कशाला बाता मारता. अश्याअ किती तरि प्रजाति आहेत जगात कि अजुन त्याचा पत्ता लागत नाहि.
म्हणे माणुस शहाणा.
आपण काहि पाहिल नाहि म्हनजे ते नाहि अशि समजुत करुन घेणे. म्हणजे काय शहाणपणा आला असे नाहि.

म्हणे कर्म कांड इथे काय कोणि आसुड घेवुन कडकलक्ष्मि
झाले नाहि.

प्रश्न आहे देव( concius ness ) आहे कि नाहि याचा.
असेच एक मुर्ख तत्वज्ञानने दोन शतके धुमाकुळ घातला होता होता काय झाल त्याच. मिळाल ना धुळिला.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators