Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 29, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 29, 2007 « Previous Next »

Maanus
Wednesday, August 29, 2007 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाढी चा प्रश्न शोधला पन सापडला नाही. पन अजुन काहीतरी वाचायला मिळाले त्या पुस्तकात त्याचा सांराश असा.

प्रश्न्: जर देवाने जग बनवले, तर देवाला कुणी बनवले.

ऊत्तर्:
हा प्रश्न विचारण्याआधी तुम्ही असे विचारा की देवाला मृत्यु आहे का. जर हो असे तर पुढे वाचण्यात अर्थ नाही. पन जर नाही म्हणत असाल तर, ज्याला मृत्यु नाही त्याचा जन्म कसा होणार. त्यामुळे देवाला कोणी जन्म दिलेला नाही. हिच संकल्पना बाकी धर्मात देखील आहे. मुसलमान लोक देवाला अकबर म्हणतात, म्हणजे अ-कबर, ज्याची कबर खोदता येत नाही असा. अकबर ला मृत्यु नाही. ख्रिचन लोक देवाला anthony म्हणतात ज्याचा पन अर्थ same आहे.


This may be off the topic, so dont discuss this, its only FYI.

Human Journy

here is interesting map from NG
journy atlas link

Also check this wiki link, The_Seven_Daughters_of_Eve according to this, we all are children of Ursela


Shendenaxatra
Wednesday, August 29, 2007 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवलिन्ग व अणुभट्टीतील साधर्म्य हे काही खरे नाही. केवळ भाभा अणु ऊर्जा केंद्राचा आकार तसा आहे. बाकी जगभरातील अणुभट्ट्या वेगळ्याच आकाराच्या आहेत.
निव्वळ तो आकार आणि पाण्याच्या अभिषेकावरून अणूउर्जेपर्यंत उडी मारणे अतीच आहे.
आपल्याला अणू, त्यातील अंतर्गत केंद्रोत्सारी बल, विविध किरणोत्सारी धातू याविषयी माहिती असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. तेव्हा हा निष्कर्ष साफ चुकीचा आहे असे माझे मत.


Vijaykulkarni
Wednesday, August 29, 2007 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्यन इन्वेश्जन थेअरी ही आता चुकीची मानली जात आहे. इन्व्हेजन झालेच नाही असे काही ईतिहासकार म्हणत आहेत.

कोण बरे हे इतिहासकार?

आजच्या इराण मध्ये फार पुर्वी मिट्टानी आणी हिट्टाइट
नावाची दोन राज्ये होती.
त्यान्च्यामधल्या तहाच्या शिलालेखावर इन्द्र वरूण यान्चे उल्लेख सापडतात.

आर्यानी अचानक आक्रमण केले ही जुनी थेअरी आता सुधारून ते टप्प्याटप्प्याने आले असे मानले जात आहे एवढेच.


Aschig
Wednesday, August 29, 2007 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

How is anthony the same?

Tanyabedekar
Wednesday, August 29, 2007 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस, विकिपिडीया हा नेहेमीच माहितीचा बरोबर सोर्स नाही. मी "द सेवन डॉटर्स ऑफ इव्ह" हे पुस्तक वाचले आहे. आता सर्व तपशील लक्षात नाहीत. पण त्या पुस्तकामध्ये ज्या डाटावरुन निष्कर्ष काढले आहेत तो मुख्यत युरोपियन लोकांचे डी एन ए वापरुन मिळवलेला डाटा आहे. त्याची थेअरीप्रमाणे बहुसंख्य युरोपियन हे ह्या ७ मूळ स्त्रीयांचे पुढील वंशज आहेत. त्यांना काही सॅंपल्स न मिळणारी मिळाली. पण तरीही म्युटेशन्स कंसिडर करुन स्टॅटिस्टिकली त्याची थेअरी प्रूव्ह होते. अत्यंत चिकाटीने आणि डोळसपणे कसा शोध घेतला जातो ह्याचे ते पुस्तक उत्तम उदाहरण आहे. तसेच सामांन्यांना कळेल अशा सोप्या भाषेत लिहिले आहे.

त्या पुस्तकाच्या शेवटच्या भागात इतर, म्हणजे, आशियायी, आफ्रिकन इत्यादींच्या मूळ वंशजांबद्दल त्याने उपलब्ध अत्यंत लिमिटेड डेटा वापरुन एक्स्ट्रापोलेशन केले आहे. परंतु असेही नमुद केले आहे की हा पक्का रिझल्ट नाही. आपल्या पुर्वज स्त्रिया नक्की करण्यासाठी अतिशय व्यापक डी एन ए डेटा मिळवला पाहिजे त्यानंतरच काही निष्कर्ष काढता येतील.

आपली पुर्वज उर्सुला आहे ह्याची ग्यारंटी नाही.


Tanyabedekar
Wednesday, August 29, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवलिंग आणि अणुभट्टी, रामायणामध्ये विमानाचा उल्लेख असल्याने त्याकाळी भारतीयांनी विमानाचा शोध लावला होता, संजयने दुरदृष्टी वापरुन धृतराष्ट्राला लढाइचे वर्णन ऐकवले म्हणुन आपल्याकडे तेव्हा टीव्ही होता, वगैरे विधाने अत्यंत हास्यास्पद आहेत.

आपल्या पुर्वज साहित्यिकांनी, विचारवंताची कल्पनाशक्ति तसेच थेरॉटिकल सायन्स मधील प्रगती नक्कीच वाखाणण्याजोगी होती. पण म्हणुन कल्पना ह्या फॅक्टच आहेत असे म्हणु नका.

गणितासारख्या विषयात, जिथे प्रॅक्टिकल्सची गरज पडत नाही तिथे आपली प्रगती नक्कीच अभिमानस्पद आहे. ह्याच शाखेच्या प्रगतीचा फायदा खगोलशास्त्रामधील प्रगती करता झाला.


Maanus
Wednesday, August 29, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wikipedia is GOD. Thats about it. Period.

Anthony म्हनजे endless असे त्या पुस्तकात लिहीले आहे. मला त्याचे खरे meaning माहीत नाही. best i was able to find on net was Anthony = Priceless

ज्या पुस्तकात मी हे वाचले त्याचे नाव आहे "अज्ञान की मृत्यु, जिज्ञासा का जन्म" by तेजगुरु सरश्री तेजपारखी. मी त्यांचे एकपन lecture attend केलेले नाही. मला कोणीतरी ते पुस्तक वाचायला दिले म्हणुन माझ्याकडे ते आहे.

बाकी theoritical studies मधे expert चा मुद्दा मान्य. त्याला कारण आपली वर्ण संस्था असु शकते. अन्न, वस्त्र, निवारा ह्या तिन्ही गोष्टीची सोय करायला त्यांनी क्षुद्र वर्ण बनवला असेल. व त्यामुळे त्यांना uninterrupted study साठी वाव मिळाला. possible?

So after all these talks, have people reached to any conclution on what god is?
for me wikipedia is one of the gods, as it gives me answer to most of my questions.

आणि माझा मागील प्रश्न, देव ह्या कल्पनेचा उगम युरोपात झाला असे म्हणु शकतो का? भारतीयांनी फक्त त्याच्यावर खुप study करुन त्याला वेग वेगळी रुपे दिली.
जर हो तर ten commandments खर्‍या का? पन 2nd commandment नुसार अजुन पन बाकी देव आहेत.

माह्या ह्या बोलण्याच असा अर्थ नका घेवु की मी नास्तिक आहे. I believe.


Ashwini_k
Wednesday, August 29, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय दादा,

'''त्या दोन रुग्णापैकी एकाने परमेश्वराचा मनोभावे धावा केला आणी ऑपरेशन किन्वा उपचार केले नाहीत, आणी दुसर्‍याने फक्त ऑपरेशन व उपचार केले तर काय होयील? प्रार्थनेने रोगी बरा होत असेल तर मेडिकल ख़ॉलेज ची जरूर काय?'''

---उपचार केलेच पाहिजेत कारण ते एक साधन आहे. काहीही प्रयास न करता हातावर हात ठेऊन बसणे हे आस्तिक किंवा नास्तिक कोणाकडूनही अपेक्षित नाही.

अंतरा,

'''करंट चालू होता पण आग थोड्या वेळानी लागली यात देवाचा काय संबन्ध आधी ते वायरिन्ग तापले असेल बराच वेळ आणि मग लागली असेल आग, हे नाहीतर असेच कारण असणार.. '''

----बाई गं, पहिली आग लागली, मग आमच्या डोळ्यादेखत आपोआप थांबली व काही तासांनी जेव्हा त्या स्पॉट वर लक्ष होते तेव्हा परत सुरू झाली. "असे झाले असेल, तसे झाले असेल" या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. तुला कारण सांगता येत नसूनही तू बोलायचे म्हणून बोलते आहेस म्हणजे तू अंधश्रध्द आहेस.

'''डोक्याला जास्त त्रास नको. मला हेवा वाटतोय अस करु शकणार्या लोकान्चा '''

----- जिथे गोष्टी आपल्या अवाक्याबाहेरचा असतात तेव्हा आम्ही "त्याच्या" (ज्याच्या अवाक्यात सर्वकाही आहे त्याच्यावर) सोपवून शांत राहून आपली कामे करतो. तुम्हाला हेवा वाटणारच कारण तुम्ही सर्वकाही स्वतःच्याच हातात असे मानून सत्य नाकारता. मला वाटते माझ्या जागी तेव्हा तू असतीस तर नुसते शॉर्ट्सर्कीट होईल असे मनात आल्यावर रात्री १० वाजता प्रिकॉशन म्हणून अख्ख्या घराचे वायरींग व अप्लायन्सेस तपासत बसली असतीस. अर्थात आग लागून पटकन थांबली नाही तर आपण सर्वच आधी मिटर बंद करून (जे आम्ही सकाळी परत आग लागल्यावर केले. रात्री आग थांबल्यावर मिट्ट काळोख झाला होता, आमच्या घराचे स्ट्रक्चर लाकडी होते. आग थांबली नसती तर खूप गोंधळ उडाला असता) फ़ायर ब्रिगेडला बोलावून खाली धाव घेऊ.

टिऊ,

'''आरे योउ सुरे
नाही बर्याच वेळा आपण स्वप्न बघतो आणी त्या स्वप्नांची तीव्रता इतकी असते कि जागे झाल्यावर पण आपल्याला वाटत राह्तं की खरच असं काहितरी घडलं होतं!
नोथिन्ग अब्नोर्मल इन इत... '''

--- मला व आईला रात्री १० वाजता, आम्हा ६ जणांना रात्री २.३० वाजता, आम्ही ६ जण.व मजल्यावरची माणसे यांना सकाळी ६-६.३० ला, इलेक्ट्रिशिअनला सकाळी ७ वाजता अशी सामुहीक स्वप्ने पडली का? असेल, असेल. अणि ही घटना खरच अतर्क्य होती त्यामुळे तुला स्वप्न वाटणे साहजीकच आहे.

'''आणी खरंच घडलं असेल तर जे घडलं तो योगायोग आणि देवच आपल्या मदतीला धाउन आला म्हणुन काही विपरीत घडलं नाही ही तुमची समजुत म्हणजे अंधश्रद्धा! '''

मी म्हटलेच होते की नास्तिक लोकं "योगायोग" म्हणणार! तुमच्याकडे वरील घटनेला ठोस उत्तर नाही आणि श्रध्दा हा तुम्हाला कमीपणा आणणारा शब्द वाटतो त्याला तुम्ही तरी काय करणार!

तरी टिऊ, तुझी भाषा व्यवस्थित सौम्य आहे बरं का!




Tanyabedekar
Wednesday, August 29, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणसा, ज्यु, ख्रिश्चन, मुस्लिम धर्म यांचा उदयाच्या कितितरी आधी हिंदु संस्कृती व तिच्या तत्त्वज्ञानाचा उगम झालेला आहे. आर्य युरोपामधुन आले असे मान्य केले तरी ते ज्या काळी स्थलांतरीत झाले असावेत तेव्हा ज्यु धर्माचा देखील उगम झाला नव्हता. ज्यु, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माची लाइनेज एकच आहे.

विकिपिडीया हा एक ओपन माहिती सोर्स आहे. त्यामध्ये चुका असु शकतात असे त्या साइट वरच लिहिले असते. विशेषत इतिहासासारख्या विषयांमध्ये एकच पुस्तक अथवा मतप्रवाह वाचुन मत बनवता येत नाही. अने रेफरंस व फॅक्ट्सचा तौलनिक अभ्यास करावा लागतो. कारण संपूर्णपणे अन-बायास्ड ऐतिहासिक लेखन करणे कुणालाही अवघड आहे.

अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे विकिवर वाचुन तु काढलेला 'सेवन डॉटर्स ऑफ एव्ह' चा निष्कर्ष तसेच त्या पुस्तकाबद्दलची अत्यंत तोकडी माहिती. मी त्याबद्दलचे स्पष्टीकरण आधीच दिले आहे.


Vijaykulkarni
Wednesday, August 29, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी ताई,
तुम्ही दिलेले शॉर्ट सर्किट चे उदाहरण अत्यन्त हास्यास्पद आहे असे मी नम्रपणे सान्गू इच्छितो.

ही पहा तुमच्याच लिखाणातील विसन्गती

जिथे गोष्टी आपल्या अवाक्याबाहेरचा असतात तेव्हा आम्ही "त्याच्या" (ज्याच्या अवाक्यात सर्वकाही आहे त्याच्यावर) सोपवून शांत राहून आपली कामे करतो.

काहीही प्रयास न करता हातावर हात ठेऊन बसणे हे आस्तिक किंवा नास्तिक कोणाकडूनही अपेक्षित नाही.

ही दोनीही वाक्ये तुम्हीच लिहिली आहेत, एकाच पोस्ट मध्ये

तुमच्या घरातील किरकोळ शॉर्ट सर्किट ची आग वाचविणार्‍या देवाने शेकडो माणसान्चे बळी घेणार्‍या सुनामी बद्दल काहीही करू नये? की आपण कोणितरी स्पेशल आहात असे आपल्याला वाटते?

यात मला तुम्हाला दुखवायचे नाही हे पुन्हा स्पष्ट करतो.



Antara
Wednesday, August 29, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ अश्विनि ताई
मी नक्की एक्स्प्लेनेशन देऊ शकत नाही नाही याचा अर्थ एवढाच की मी तिथे नव्हते, मला काय माहित तुम्ही सांगता त्यात तार्किक किती अन अतिशयोक्ति किती.
आणि येस्स माझ्याकडे मला शोर्‍टसर्किट ची शंका जरी आली असती तर मी मला शक्य तेवढी सर्व खबरदारी व उपाय केलेच असते. तुम्ही केलेत त्याला चक्क रिस्क घेणे असे म्हणतात. आणि काही फ़ार घडले नाही त्यात आश्चर्य वाटायचे काही कारण नाही, रिस्क मधे ती एक शक्यता असतेच.


Santu
Wednesday, August 29, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय
सुनामी बद्दल देवाने काहि का करु नये)))) मला वाटते विजय
ति माणसे तुमच्या सारखि नास्तिक असावित म्हणुन. म्हणुन
देवाने तिकडे दुर्लक्ष केले असावे.


Tiu
Wednesday, August 29, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते विजय
ति माणसे तुमच्या सारखि नास्तिक असावित म्हणुन. म्हणुन
देवाने तिकडे दुर्लक्ष केले असावे.
>>>

जे माझ्यावर श्रद्धा ठेवतात, माझी पुजा करतात, त्यांचं मी भलं करीन,
जे मला मानत नाहीत त्यांच्यासाठी मी काही करणार नाही, ते मेले तरी मला काही फ़रक पडत नाही...

अरेरे!!! इतकी संकुचित विचारसरणी असावी देवाची?
असा कसा हो तुमचा देव?


Maanus
Wednesday, August 29, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i think मला काळालेय देव म्हणजे काय ते. लहान तोंडी मोठा घास घेतोय :-) हे फक्त आज सकाळी मनात आलेले विचार आहेत. no study, no base

मी काल म्हणालो कि विकीपीडीया देव आहे, कारण तो मला बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. माझ्या ह्या विधानात देव काय आहे ह्याचे उत्तर आहे असे मला वाटतेय.
i think देव म्हणजे एक particular entity जी तुम्हाला कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता मदत करत असते. ह्याला मुर्त स्वरुप आहे का नाही हा वादाचा विषय आहे. पन काहीतरी आहे जे व्यवहारी दृष्टिकोण न ठेवता तुम्ही मागाल तेव्हा तुम्हाला ते देत असते.

वेळेनुसार आपन ह्या particular entity ला वेगवेगळी रुपे देतो. जसे मी पुर्वी जेव्हा दुधाचा उद्योग करायचो तेव्हा माझे खुप सारे देव होते. दिवसा पावुस पडुदेत पहाटे नको, गिर्‍हाईक कसे येनार, म्हणुन पर्जंन्य देव. गाडी ला काही problem नको यायला म्हणुन वाहन देव. आज म्हशीणे खुप दुध द्यावे म्हणुन म्हैस / गो देव. जास्त उन नको पडायला, विज नको जायला अश्या हजारो देवांची प्रार्थना करायचो. पन आता computer मधे आल्यापासुन व nature वरची dependacy कमी झाल्यापासुन माझे देव limited झालेत. एक / दोन max .

in short, अशी एक व्यक्ती जिच्याकडुन मला कोणत्याही condition शिवाय काहीतरी मिळावे ही अपेक्षा करतो, ती व्यक्ती / entity म्हणजे देव. आता नवस का असतात, कोंबडी का कापावी लागते ते अजुन कळाले नाहीय. पन चिंचवडच्या paper mill ची गोष्ट सर्वांना माहीत असेलच, नाहीतर त्यावर बनवलेला सचीन चा "श्री अष्टविनायक" चित्रपट माहीत असेल, ज्यात त्यांनी दाखवलेय बोललेला नवस न फेडल्यास काय होते. माहीत नाही किती विश्वास ठेवायचा ते.


Aschig
Wednesday, August 29, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस, पहिला भाग बरोबर आहे.

आणी त्यामुळे असा कोणी असेल असा तुमचा विश्वास नसेल तर देव नसतो.

तो काहीही मोबदला न मागता देत असल्यामुळे नवसांनी फरक पडणार नाही. नाही झाले तुमचे मनोगत साध्य तर त्याचा अर्थ तुम्ही चुकिचा देव निवडला (म्हणजे ज्याला तुम्ही देव समजलात तो देव नाहीच).

wikipedia वर donation द्या wikipedia ला जिवंत ठेवायला असे लिहिले असते.


Chyayla
Wednesday, August 29, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अणुभट्टी, रामायणामध्ये विमानाचा उल्लेख असल्याने त्याकाळी भारतीयांनी विमानाचा शोध लावला होता, संजयने दुरदृष्टी वापरुन धृतराष्ट्राला लढाइचे वर्णन ऐकवले म्हणुन आपल्याकडे तेव्हा टीव्ही होता, वगैरे विधाने अत्यंत हास्यास्पद आहेत.

तान्या, या तुझ्या विधानाला अंधश्रद्धा का म्हणु नये? ते असे होते म्हणणार्यांकडे काही तरी ठोस व लेखी पुरावा आहे. बीना आधाराशिवाय ईतक्या उच्च, प्रगत कल्पना करणे तरी शक्य नाही आणी तेही ईतक्या प्राचिन काळी. असो हा विषय नाही. पण एखाद्या गोष्टीला तुम्हाला अपेक्षीत असे पुरावे उपलब्ध होउ शकत नाही म्हणुन त्याची कोणतीही शहानिशा न करता तु कोणत्या आधारावर हास्यास्पद ठरवतो.. उलट या बाबतित तुझे विधान केवळ कल्पनेवर आहे, तुझी समजुत आहे की असे काही नव्हतेच निदान माहित नाही तर शक्यता असु शकते हेही तु आंधळेपणाने ते नाहीच असे ठामेठोकपणे सांगणे हे मला अजुनच हास्यास्पद वाटतय.

असो मला हे म्हणायचे नाही की तो टीव्हीच होता पण हो नक्कीच कोणते तरी तंत्रज्ञान होते हे निश्चित. तु जर मागच्या शतकात असता आणी कोणी म्हटले की आपल्याकडे असे टीव्ही सारखे तंत्रज्ञान असेल तेंव्हाही तु असे हास्यास्पद आहे म्हटले असते... अर्थात ज्याला ठरवुन सगळ नाहीच असे म्हणायचे तर त्याला विज्ञान, तर्क कशाचा आधार घ्यायची गरज नसावी... मला नास्तिकांचा केवळ हाच प्रकार कधीच पटला नाही जे मला विज्ञानाच्याही तत्वा विरुद्ध वाटते म्हणुच मी मागे नास्तिक आणी खरा विज्ञानवादी याचा काही सम्बंध नाही म्हटले होते ते याचसाठी. ज्याला केवळ हिणवायचे आहे त्यांच्याबद्दल न बोललेच बरे. तरी तान्याचे काही मुद्दे मला प्रामाणिक वाटतात.


श्रध्दा हा तुम्हाला कमीपणा आणणारा शब्द वाटतो त्याला तुम्ही तरी काय करणार!

अगदी बरोबर..

Slarti
Wednesday, August 29, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नास्तिक आणि विज्ञानवादी यांचा "necessarily" काही संबंध असतोच असे नाही किंवा दुसर्‍या शब्दात, प्रत्येक नास्तिकाचे नास्तिकत्व हे वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच जन्माला आले असेल असे नाही.

Tanyabedekar
Wednesday, August 29, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, माझ्यी पोस्ट नीट वाच. मी कुठेही "नव्हतेच" असा शब्दप्रयोग केलेला नाही. मी ते "होतेच" ह्या विधानाला हास्यास्पद म्हणत आहे. शक्यता मी कधीच नाकारत नाही. (मी पोस्ट सबमिट करण्यापुर्वी ड्राफ्ट किमान २-३ वेळा वाचतो. कदाचित घरात बाकी सर्वजण वकील असल्याने ड्राफ्ट्स २-३ वेळा वाचायची सवय लागली आहे ;) )

तुझेच विधान घे: """असो मला हे म्हणायचे नाही की तो टीव्हीच होता पण हो नक्कीच कोणते तरी तंत्रज्ञान होते हे निश्चित."" ही निश्चिती कुठुन आली? केवळ कल्पनाविलास नाही ही शक्यता का गृहीत धरता येणार नाही. अगदी अलिकडील उदाहरण म्हणजे ज्यूल्स व्हर्न. त्याच्या अनेक कल्पना ह्या सत्याच्या खुप जवळपास निघाल्या. म्हणुन त्याने ते सर्व पाहिले असा अर्थ होत नाही.


तसेच मी ज्या गोष्टींना अभिमानास्पद मानत आहे, त्या होत्याच ह्याचे पुरावे उपलब्ध आहेत. उदा: गणित व खगोलशास्त्र.

"""श्रध्दा हा तुम्हाला कमीपणा आणणारा शब्द वाटतो त्याला तुम्ही तरी काय करणार!"""

कमीपणा वगैरे सगळे रिलेटीव्ह असते.. एकच आयुष्य (निदान तुर्तास तरी).. त्यात लोकांशी कशाला तुलना करायची..


Aschig
Wednesday, August 29, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I recently read two things that are relevant to the discussion here.

(1) I do not want to start a debate about Christian gods and Hindu or other Gods, so please treat this as a general thing if you can, otherwise treat me as ignorant and ignore it:

Mother Teresa's letters (see latest Time for instance) have revealed that she thught her prayers were empty, going to a black hole of sorts. Her work was completely humanaterian though she preached christianity. That says a lot about her (greatness) as well as about God (if he exists, should he not have showed up for her?).

(2) I do not want this part to lead to determinism versus non-determinism and to Calvinistic discussions, but it is clear that one particular small gene on Chromosome four can determine if you will contact dementia, and at what age just based on how many CAG triplets are repeated in it. Far more accurately than what a superstitious astrologer can hope that a horoscope will. The interesting part is, parents can decide if their children are going to have it (there is a known percent chance that they will not), then at what age should the onset be for them. (See chapter 4 for Matt Ridley's Genome).

Tanyabedekar
Wednesday, August 29, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashchig, I think a collection of Mother Teresa's letters has been published recently and the above incidence is mentioned in one of her correspondence with a vatican minister.

I did not get the relevance of second point (regarding dementia) with this debate.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators