Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 23, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 23, 2007 « Previous Next »

Chyayla
Thursday, August 23, 2007 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या, जेंव्हा मानवाला कळुन चुकत की ही माया आहे तेंव्हा त्यातुन बाहेर पडायचा मार्ग शोधण्यात काय चुक आहे?
किंवा कोणी स्वातन्त्र प्रेमी पक्षी जरी एखाद्या पिंजर्यात, भलेही तो सोन्याचा का असेना जेंव्हा त्यात आपण अडकुन पडलो आहोत ही जाणीव होते तेंव्हा त्याला बाहेरचे मोकळे आकाश खुणावणारच. आणी मग तो बाहेर मोकळ्या नभात भरारी मारायची धडपड करणारच तुम्ही त्याला कितीही पिंजर्याचा महिमा सांगितला त्याला ते पटणार नाही.

हो ते रहस्य जाणुन घ्यायचे मार्ग व्यक्ति सापेक्ष वेगळे असु शकतात. सुरुवात करायला गृहीतकही असु शकेल. एखाद्या अज्ञात ( Abstract ) गोष्टीला समजुन घेण्यास सुरुवात करण्यास त्याचा उपयोग होतो. शिवाय गृहीतक हे शेवटी गृहीतक रहात नाही जर तुला विज्ञान, गणीताची पद्धत कळत असेल तर सुरुवातीला जो "क्ष" घेतला असतो तो काही शेवटी "क्ष" रहात नाही त्याला निश्चित असे मुल्य मिळत. पण यामुळे "क्ष" धरणेच चुकीचे असे म्हणु शकत नाही.

अद्नेयवादींच एक उदाहरण देतो जर कधी तो आगगाडीत बसुन प्रवास करतोय आणी त्याला अस दीसतय की आपण स्वता: स्थिर आहोत पण बाहेरची झाडे, घरे पळताना दीसतात तो त्यालाच सत्य मानुन गप्प बसेल व त्याचा, प्रवासाचा आनंद घेइल. पण अध्यात्मिक मनुष्य तीथे स्वस्थ बसणार नाही तो खरे काय ते जाणण्याचा प्रयत्न करतो. तो प्रकृती, मायाशी संघर्श करेल. तो जसे भासते तसे स्वीकारणार नाही.

मग हा संघर्ष बाह्य असो वा आंतरीक तो विजयी होउ शकतो. जसे मानव हा पुर्वी पशुवत जंगलात रहात होता, थंडी, वारा, पाउस याचा त्रास होउ लागला तेम्व्हा त्यानी ठरवले नाही मी जसे आहे त्यातच जगणार नाही त्यानी संघर्श केला आणी घर बांधले व अशा प्रकारे त्याने बाह्य जगतात विजय मिळवलाच. हे जे विज्ञान विकसीत झाले ते याच संघर्शातुन, ती एक बाह्य प्रकृतीच्या विरुद्ध संघर्श गाथा आहे.

हीच तर मोठी संकल्प शक्ति मानवात आहे त्याने ठरवले तर तो काहीही करु शकतो.

ह्याच प्रकारे संघर्श करुन आपण आंतरीक जगातही विजय मिळवु शकतो मनाच्या, बुद्धीच्या पलीकडे जाउ शकतो आपण ह्या मायालाही हरवु शकतो आणी त्यातही मानव यशस्वी होतोच. संत महंतानी तो संघर्श केला आणी ते अज्ञानाच्या जोखडातुन मुक्त झाले म्हणजे मोक्ष पावले आणी संसारात मायेनी, दुखानी, अज्ञानानी विव्हळणार्या मानवाला आईच्या ममतेने सांगत आहेत, वाट दाखवत आहे या मानवानो मी ते सत्य अनुभवले तुम्हीही पहा आणी मुक्त व्हा. पण हा संघर्श ज्याचा त्याला स्वता:ला करायचा आहे. संत केवळ मार्ग दाखवतील. ज्याप्रमाणे आंबा स्वता:च खाल्ला तरच त्याची चव कळते कुणाच्या वर्णानातुन नव्हे तसेच देव हा स्वता:च अनुभवावा लागतो कोणी कितीही सांगितले तरी त्याचा उपयोग होत नाही कारण तो अवर्णनीय आहे.







Aschig
Thursday, August 23, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

> घरे पळताना दीसतात तो त्यालाच सत्य मानुन गप्प बसेल

आणी ते खरेही असेल! तो त्या frame of reference वरुन फलाटावर उभ्या असलेल्यांना जी सत्ये जाणवतात ती सर्व त्याला उमगु शकतात. नाहीतरी नाही का, आपणहि पृथ्वी बरोबर सुर्याभोवती गाडीपेक्षा कितितरी अधिक गतीने फिरतो आहोत, आणी अख्खी सुर्यमाला आकाशगंगेभोवती त्याही अधिक वेगाने आणी पुर्ण आकाशगंगाच इतर दिर्घीकांच्या सापेक्ष दुरवर भिरकवल्या जाते आहे?

गाडीतील माणुसच नाही तर त्याच्या ताटलीतल्या अन्नावर बसलेल्या माशीच्या पोटातील bacteria देखील स्वत:ला स्थिर समजुन विश्वाचे modelling करु शकेल. पण जर त्याने ठरवीले की ही माशी ज्या अन्नामुळे जीवंत आहे ते अन्न बनवीणारा आचारीच महान आणी आपण त्याची प्रार्थना करु, तर कठीण आहे.


Tanyabedekar
Thursday, August 23, 2007 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष हा क्ष न राहता त्याला गणिताच्या शेवटी एक मुल्य मिळते हे मान्य. पण म्हणुन मधल्याच एका पायरीवरुन क्ष बरोबर ५ असे म्हटले जात नाही. क्ष बरोबर ५ येण्यासाठी प्रत्येक पायरी लॉजिकली ओलांडली जाते. तुम्ही क्ष बरोबर माया हे एकदम मधल्याच कुठल्यातरी पायरीवरुन गृहीत धरुन टाकता.

दुसरे म्हणजे, क्ष बरोबर ५ हे समजण्यासाठी बुद्धी, तर्क इत्यादी गोष्टींचा वापर केला जातो. कधी कधी गणित सुटत नाही. तेव्हा माणुस परत मागच्या पायर्‍या तपासतो आणि प्रयत्न करत राहतो. गणित सुटले नाही म्हणुन माझ्या बुद्धीच्या बाहेरचे काहीतरी आहे जे ह्या गणिताचे उत्तर आहे असे समजता येत नाहे. आणि एका विशिष्ट पायरीपर्यंत तुम्हाला बुद्धीच घेवुन जाते, बाकी कोणतीही इतर गोष्ट नाही. मग अचानक हे बुद्धीच्या बाहेर जावुन उत्तर मिळवायचे आणि ते ह्याच बुद्धीला समजवायाचे हे चुकिचे नाही का? की अमुक एका पायरी पर्यंत एक साधन आणि तिथुन पुढे दुसरे असे चालेल?

मानवाला हे सर्व जग माया आहे हे नक्की कश्याने सिद्ध झालेले आहे? पहिलेच विधान मोघम केले की पुढे स्वातंत्र्य, सोन्याचा पिंजरा वगैरे गोष्टी येतात. इथे मुद्दा तुमच्या पहिल्या विधानाची सिद्धता काय आहे यावरच चालु आहे.


Prashantl
Thursday, August 23, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चान्गले चालले आहे... चालू द्या....

या सन्दर्भात एक सुन्दर रचना द्याविशी वाटली


"Evolution and Laws of Providence in a Nutshell"

OM, AMITHAYA!
Measure not with words, The Immeasurable;
nor sink the string of thought, Into the fathomless!
Who asks doth err, Who ansers, errs;
say nought!

Shall any gazer see with mortal eyes;
or any searcher know by mortal mind!
Veil after veil will lift - but there must be;
veil upon veil behind!

Before beginning, and without and end;
as space eternal and as surety sure!
Is fixed a Power Divine which moves to good;
only its Laws endure!

It slayeth and it saveth, no wise moved;
except unto the working out of doom!
Its threads are Love and Life; and death and pain;
the shuttles of its Loom!

It maketh and unmaketh, meaning all;
what it hath wrought is better than hath been!
Slow grows the splendid pattern that it plans;
its wistful hands between!

This is its work upon the things ye see;
the unseen things are more - men's Hearts and Minds!
The thoughts of people and their ways and wills;
those, too, the Great Law binds!

Unseen it helpeth ye with faithful hands;
unheard it speaketh stronger than the storm!
The hidden good it pays with peace and bliss;
the hidden ill with pains!

It knows not wrath, not pardon; utter-true;
it measures mete, its faultless balance weighs!
Times are as naught, tommarrow it will judge;
or after many days!

Such is the Law which moves to righteousness;
which none at last can turn aside or stay!
The heart of it is Love, the end of it;
is peace and consummation sweet. Obey!

The Dew is on the Lotus! - rise Great Sun!
And lift my leaf and mix me with the Wave;
OM! "Mani Padme Hum". The Sunrise comes!
The Dew drop slips into the Shining Sea!



- "Evolution and Laws of Providence in a Nutshell"
{ These 10 verses translated from Pali, from Sir Edwin Arnold's 'Light of Asia' published in 1879 as a reminder of Gautam Buddha's ingenious role as the original philosopher-scientist (563-483 B.C.) of the world status}

Prafull
Thursday, August 23, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगातील सगळ्या गोष्टी अस्थिर आहेत. कुठलीहि गोष्ट टिकून राहत नाही. पण मनुष्य ह्या अस्थिरतेची जाणीव न ठेवता जगत असतो. ह्यालाच संत माया म्हणतात.
बाकी तुमचे चालु द्या :-)
Tanya, Regarding knowledge, there are 3 avenues of acquiring knowledge.
1. Instincts - All living organisms are blessed with it.
2. Intellect - Higher animals are blessed with it.
3. Realization awareness - Few of the higher animals stumble across it.
I know you may disagree with the 3rd and thats fine with me.
Lets keep the discussion on track. I would love to hear your views about infinity and do you think it makes sense to tackle it with intelligence?


Tanyabedekar
Thursday, August 23, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रफुल्ल, मनुष्य अस्थितरतेची जाणीव ठेवुन या अस्थितरेतला माया न समजता जगु शकतो. मी ह्याबद्दल आधीदेखील लिहिले आहे. ही अस्थितरता वा अनिश्चितता हे जग माया आहे हे सिद्ध करत नाही. आता तसे मानले तर ती केवळ श्रद्धा, फॅक्ट नव्हे.

तु दिलेली रचनाच पाहा ना. पहिले कडवे असे म्हणते (स्वैरानुवाद) की जे मोजता येत नाही ते शब्दात मोजु नकोस, तुझ्या विचारांनी ह्या अथांग जगाचा शोध घेत बसु नकोस. ते व्यर्थ आहे. तुला उत्तरे मिळणार नाहीत तसेच तुला पडणारे प्रश्ण देखील व्यर्थ आहेत.

आता हे कडवे एक विधान आहे ज्यावरुन बाकी सर्व कडवी डिराइव्ह झालेली आहेत. ह्या विधानाला पुष्टी काय? तर काही नाही. माझा ह्यालाच विरोध आहे. असे एक विधान मांडायचे आणि त्यावर श्रद्धा ठेवायची आणि मग पुढचे आडाखे बांधायचे. कारण काय तर जगातील सर्व घटना आज आपल्या बुद्धीने व उपलब्ध साधनांच्या सहाय्याने उकलत नाहीत.


how are your instincts not part of your intellect? instincts can be explained logically. They are the actions taken based on the experience and reasoning, former is converted into later using intellect. What is realization awareness? Is it something which is beyond reasoning, beyond probing? If that is the case, then why?

In my opinion, the concept of infinity is put forth by the man using his intelligence. Man has derived theories and mathematics on this concept using intelligence only. I dont think one fine day someone just thought that there is infinity. Second, does infinity really exists? Is matter infinite? Is energy infinte? Or they are indeed finite? Mankind is asking these questions using his intellect and trying to answer using the same. So I think it makes perfect sense to question and answer these questions using intelligence. Now will we be able to solve all the questions? Whether question themselves are constant? are some of the questions which we might not be able to answer today or ever. But none of this proves that "it is beyond intelligence and it is foolish to tackle it by using intelligence".
Now if someone gets bogged down by the total uncertainity of these unanswered questions and achieves peace by believing in 'yet to be proved hypothesis', well, then, that's running away from the reality.

Chyayla
Thursday, August 23, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माया नाही हेही म्हणणे एक विधान आहे ज्यावरुन तुमची बाकीची पोस्ट आली आता याला सिद्धता काय? नुसते जगता येते म्हणजे माया नाही ही समजुत कशी करुन घेतलीत? तसे तर पशुन्नापण जगता येत. असो तान्या तुम्ही पण एक विधान मांडताय व त्यावरच श्रद्धा ठेवुन पुढचे आडाखे बांधत आहात.

असो माझे गृहीतक हे सुरुवातीला धरण्याबद्दल लिहिले होते मधुनच नाही.

तुला पडणारे प्रश्नच व्यर्थ आहे या विधानाचा काय अर्थ?... माणसाला जिज्ञासा, कुतुहल असणारच, मग त्याला अमुकच प्रश्न पडु नये आणी तमुकच प्रश्न पडावा हे कसे शक्य आहे? आणी ते व्यर्थ कसे? मग कशाला विज्ञानाच्या माध्यमाने माणुस जगाचे रहस्य समजण्यास धडपडा करत आहे. तो कोणत्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे? असे आहे तर मग मानवी जीवन त्याचा झालेला विकास सगळ व्यर्थ आहे.

आश्चिग तशी प्रार्थना करुन त्या Bacteria ला ब्रह्मज्ञान, ब्रह्मानंद मिळत असेल तर जरुर करावे. त्याच्यालेखी तोही मार्ग असु शकतो.


Aschig
Thursday, August 23, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

infinity is indeed an abstract concept and unreal in the real sense. Just like the more mundane concept of addition. Or even two. What is two? two buses? two cows? two people? Those are just examples of the instantiations of two (OOPs) but they are not two. Does that prove God exists?

instinct brings forth an interesting thought: instincts are experiences from past generations. May be that is what reincarnation is? Traits that can be systematized and fed into reproducible effects. Of course all offsprings will get them to various extent. My son may not get certain genes from me, but my daughter may. Her daughter in turn may get some of those traits and people will claim she is me (or vice versa).

Deemdu
Thursday, August 23, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी बीज एकले
बीज अंकुरले रोप वाढले

एका बीजापोटी तरु कोटी, कोटी
जन्म घेती सुमने फळे
पोटी जन्म घेती सुमने फळे

आधी बीज एकले

व्यापुनी जगता तुही अनंता
बहुविध रुपे घेसी, घेसी
परि अंती ब्रम्ह एकले

आधी बीज एकले


बाकी तुमचे चालु द्या :-)


Tanyabedekar
Thursday, August 23, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सर्व जग माया नाही असे मी ठाम विधान करत नाहीच आहे. ती एक शक्यता आहे असे मी देखील म्हणत आहे. पण म्हणुन ती एक फॅक्ट आहे ह्या श्रद्धेला माझा विरोध आहे.

"""
तुला पडणारे प्रश्नच व्यर्थ आहे या विधानाचा काय अर्थ?... माणसाला जिज्ञासा, कुतुहल असणारच, मग त्याला अमुकच प्रश्न पडु नये आणी तमुकच प्रश्न पडावा हे कसे शक्य आहे? आणी ते व्यर्थ कसे? मग कशाला विज्ञानाच्या माध्यमाने माणुस जगाचे रहस्य समजण्यास धडपडा करत आहे. तो कोणत्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे? असे आहे तर मग मानवी जीवन त्याचा झालेला विकास सगळ व्यर्थ आहे.
""""

ते प्रफुल्लला विचार. मी त्याने दिलेल्या कवितेचा (श्लोकाचा) स्वैर अनुवाद केलेला आहे आणि त्याचा उहापोह देखील केलेला आहे. मी त्या अनुवादातील कोणतेही वाक्य एंडॉर्स केलेले नाही.


Ashwini_k
Thursday, August 23, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तन्या, ती कविता प्रफ़ुल्लने नाही, प्रशांतने टाकली होती.
-----

माया ही परमेश्वराहून (निर्गुण, निराकार दत्तगुरु) वेगळी नव्हती तेव्हा परमेश्वराची कार्यशक्ती सुप्ताव्स्थेत होती. "ओम्कार" म्हणजेच परमेश्वराची कार्यशक्ती जागृत होतानाचे पहीले स्पंदन. त्या बिंदूपासून परमेश्वरी माया कार्यरत होऊन अष्टबीज ऐश्वर्यांपासून नव-अंकूर ऐश्वर्ये प्राप्त केलेला परमात्मा (राम, कृष्ण, दत्तात्रेय, स्वामी समर्थ, साई समर्थ हे परमात्मा कोटीतील होत) निर्माण झाला. इथे सगुण, साकार रुप निर्माण झाले. त्याच्या तमोगुणा पासून जड (निर्जीव) , रजोगुणापसून सजीव व सत्वगुणापासून बुध्दीतत्व निर्माण झाले. "परमात्मा"च्या नंतरची कोटी म्हणजे "जिवात्मा" म्हणजेच ज्यांच्या मनावर बुध्दीचा, सत्वगुणाचा ताबा आहे (उदा. संत). त्याच्या नंतरची कोटी म्हणजे "जीव", जो सत्व, रज आणि तम या गुणांच्या कमी जास्त प्रमाणांनी युक्त असतो.

वरील स्पष्टीकरण पुढे कधी कदाचित काही पिढ्यांनंतर सिध्द होईल, न होईल. मला ते आत्ताच मान्य आहे. थोडक्यात आपल्या सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे व आपल्याला "जीव" या अवस्थेतून "जिवात्मा" या अवस्थेकडे जायचा प्रयास करायला हवा.


Vijaykulkarni
Thursday, August 23, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


साई समर्थ हे परमात्मा कोटीतील होत
साई समर्थ म्हणजे कोण? हे नाव ऐकले नाही.


Santu
Thursday, August 23, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनि के
अतिशय सुन्दर विवेचन.
execellent


Chyayla
Thursday, August 23, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती एक शक्यता आहे असे मी देखील म्हणत आहे. पण म्हणुन ती एक फॅक्ट आहे ह्या श्रद्धेला माझा विरोध आहे

हे विधानच किती विसंगती पुर्ण आहे. हाच न्याय तु स्वमताला लावुन पहा. कारण तुला जे प्रत्ययास येत आहे त्यावरच तु श्रद्धा ठेउन आहेस ना? म्हणजे तुम्ही एक शक्यता नाकारुन दुसर्या शक्यतोवर पुर्ण विश्वास,श्रद्धा ठेउनच आहेस ना? एका शक्यतेला एक न्याय तर दुसर्या शक्यतेला दुसरा न्याय कसा शक्य आहे?

भारतिय अध्यात्म म्हणते हे जीवन सत्-असत, चांगला-वाईट, सुख्-दुख्: याचा खेळ आहे जसे कुठे अधीक दीसेल तर कुठे उणीव असेलच कुणी श्रीमंत आहेत याचा अर्थ कोणी गरीब राहणारच ह्या सगळ्या Facts लक्षात घेउन, समजुनच एकंदरीत संतुलीत विचार मांडते त्याला माया म्हणतो आणी हीच त्याची सिद्धता आहे. यात एक गोष्ट लक्षात घे की जे प्रत्ययास येत आहे त्याला तो नाकारत नाही. जसे सर्परज्जुच्या उदाहरणात एखाद्या व्यक्तिला ती दोरी हा सापच वाटतो तो त्यालाही नाकारत नाही. शिवाय प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक Test च असेल हे शक्य नाही काही गोष्टी मुख्यता Abstract ह्या तर्कावरुनच समजुन घ्यावा लागतात.

तु विज्ञानाचाच संदर्भ म्हणशील तर देश्-काल्-निमित्य या त्रिकुटाचा विचार करुन पहा याच्याबाहेर काही Facts असु शकतात याची शक्यता तु नाकारु शकतो का? नसेल तर त्याला सिद्धता काय? जर तु अद्नेयवादाला प्रामाणिक असशील तर हेच म्हणशील.. असे ना का त्या त्रिकुटाच्या बाहेर काही सत्य मला काय फ़रक पडतो. मला काही देण घेण नाही... मला तुझ्या सुरुवातीच्या पोस्ट आठवतात त्यावरुन मी हे मत मांडत आहे.

तान्या आता मी तुमचा सल्ला तुम्हालाच देइल. की भारतिय अध्यात्म शास्त्राचा तुम्हीपण अभ्यास करा केवळ ते भारतिय आहे म्हणुन टाकाउ नव्हे काही मौलिक विचार असु शकतात.

असो माझा मुद्दा पुर्ण करायला परत लिहेन.


Tanyabedekar
Thursday, August 23, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कोणत्या शक्यतेवर संपूर्ण विश्वास (श्रद्धा) ठेवत आहे? मुळात शक्यता हा मी प्रॉबेबल ह्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणुन वापरत आहे. त्यामुळे एकदा एका गोष्टीला शक्यता म्हटले तर ती सिद्ध झालेली नाहीये हे अध्याह्रुत आहे. विश्वास आस्तिक लोक ठेवतात शक्यतेवर. जसा हे जग संपूर्ण माया आहे ह्या शक्यतेवर तुझी श्रद्धा आहे आणि म्हणुन तुझ्यासाठी ती शक्यता राहत नाहीये.

Slarti
Thursday, August 23, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> तो प्रकृती, मायाशी संघर्श करेल. तो जसे भासते तसे स्वीकारणार नाही.
>>> तु विज्ञानाचाच संदर्भ म्हणतो तर देश्-काल्-निमित्य या त्रिकुटाचा विचार करुन पहा याच्याबाहेर काही Facts असु शकतात याची शक्यता तु नाकारु शकतो का?

या संघर्षानंतर जे कळते, जे या त्रिकुटाच्या बाहेरील आहे, ते साक्षात्कारातून आलेले ज्ञान आहे का ? हे ज्ञान मिळण्यासाठी काही विशेष ज्ञानेंद्रिय लागते काय ?

>>> शिवाय प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक Test च असेल हे शक्य नाही काही गोष्टी मुख्यता Abstract ह्या तर्कावरुनच समजुन घ्यावा लागतात.

हे ठिक. पण अध्यात्म हे केवळ तर्काचा वापर करुन समजून घेणे शक्य नाही असे इथे म्हटले गेले आहे आणि तर्क वापरला तर ते पटत नाही.

Aschig
Thursday, August 23, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनि ही कपिलमुनिंच्या सांख्य गोटातील दिसते आहे:

सांख्य ( कपील ): या पद्धतीत उत्क्रांतीवर भर दिलेला आहे. न्याय व वैशेषिक यांची अनेकविध विभाजने दोन मुख्य गटांमध्ये एकत्र करण्यात येतात : प्रकृती व पुरुष. पुरुष म्हणजे ज्याला जाणीव होते तो आणि प्रकृती म्हणजे जड पदार्थ. सत्व, रज, तम हे त्रिगुण ही सांख्यांची देण आहे. या गुणांच्या वेगवेगळ्या प्रमाणामुळे वस्तूंना त्याचे स्वत्व मिळते ( व पुरुषाला विविधता जाणवते ) . पुरुषामुळेच प्रकृतीची उत्क्रांती होऊ शकते. सत्वापासून मन व ज्ञानेंद्रियांचा उदय होतो. व्यक्ती म्हणजे शरीर किंवा मन नव्हे तर अनंत आत्मा. सांख्य देखील सर्व आत्मे वेगवेगळे असतात असे मानते. सर्व आत्मे नेहमीच मुक्त असतात. योगसूत्रांद्वारे ही जाणीव कशी होऊ शकते ते दाखवले जाते.

चिन्या विष्णुभक्त म्हणजे माधवाचार्यांच्या द्वैतवादी गोटातील्:

द्वैत (~ 1200 CE): विष्णू म्हणजे ब्रह्मन अथवा ईश्वर. त्याच्या आज्ञेने सर्व व्यवहार चालतात. पूर्वसंचिताची ( कर्माची ) पापे धुवून निघेपर्यंत आत्मा जीवनचक्रात अडकून राहतो. ईश्वराचे नित्य पूजन म्हणजे मुक्ती.

इतर अनेक स्वत:ला अद्वैतवादी म्हणवतात ते शंकराचार्यांच्या गोटातील्:

अद्वैत (~ 800 CE): आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्याची गरज नाही व ते शक्यही नाही कारण सर्व सिद्धासिद्धतेचे मूळ आपला आत्माच आहे. आत्मा अनंत व वैश्विक असतो. जग हे मिथ्या नाही पण अंतिम सत्यही नाही. ब्रह्मन हे या जगापलीकडील आहे. आत्मा आणि ब्रह्मन एकच आहेत. मोक्ष म्हणजे विद्येनी अविद्येची जागा घेणे.

अनेक योगी देखील अधुन्-मधुन इकडे फिरकतात्:

योग ( पतंजली ): पुरुषाला प्रकृतीच्या बंधनातून वेगळे करण्याचा मार्ग म्हणजेच योग. प्रकृतीमुळे चित्त विचलीत होते. आत्म्याची चित्तापासून मुक्तता म्हणजेच खरी मुक्तता. विचारांवर विजय मिळवून हे साध्य करण्याचा मार्ग म्हणजे योग. योगसामर्थ्याद्वारे अलौकिक शक्ती प्राप्त होऊ शकतात. त्या मिळवणे म्हणजे मुक्तीच्या मार्गात अडथळा आणणे.

वैशेषीक मानणारे कणादवादीही अनेक्:

वैशेषिक ( कणाद ): पदार्थाच्या विशेष गुणधर्मावरून या दर्शनाचे नाव 'वैशेषिक' असे पडले. सत्य पडताळणे म्हणजे पदार्थांच्या गुणविशेषांवरून निष्कर्शापर्यंत पोचणे. आत्मा असतो हा निष्कर्श यावरून काढला जातो की आपले मन हा आपल्या शरीराचा गुणधर्म असू शकत नाही. वेगवेगळ्या लोकांची मने वेगवेगळे विचार करतात म्हणजे त्यांचे आत्मे वेगवेगळे असले पाहिजेत. प्रत्येक आत्म्याची वैशिष्ठ्ये वेगळी. मुक्त आत्म्यांची देखील. अणुवादाची देण कणादाचीच. मात्र त्याचे अणू हे पृथ्वी, तेज व वायू हे होत.

भक्तिमधे तल्लिन होवुन मोक्षप्राप्तिचा प्रयत्न करणारे हे रामानुजचार्यान्चे followers :

विशिष्ठद्वैत (~ 1000 CE): सजीव तसेच निर्जीव हे ब्रह्मन वर अवलंबून असतात. या पद्धतीचा कल भक्तीमार्गाकडे आहे. आत्मा व ब्रह्मन एक होऊ शकत नाहीत. मुक्ती म्हणजे सतत ब्रह्मनाची जाणीव असणे.

गौतामाची न्यायशाखादेखी वैदीकच होती. त्याला मानणारे मात्र कमीच दिसतात. त्यातील उशीराने झालेल्या बदलांना मात्र बहुसंख्य मानतात. बहुतेक convenience चा भाग असवा:


न्याय ( गौतम ): न्याय करणे म्हणजे मनाला कारणांद्वारे पटेल अशा निष्कर्षाप्रत पोचणे. प्रमात्राला प्रमितीद्वारे प्रमेयापर्यंत पोचवणारे एक प्रमाणशास्त्र. हे सर्व जरी विज्ञाननिष्ठ असले तरी प्रत्यक्षाला सर्वात जास्त महत्त्व असे. प्रत्यक्ष म्हणजे मुळात ज्ञानेंद्रियापासून मिळणारी जाण. पण पुढे त्याचा अर्थ कोणत्याही प्रकारे होणारी जाण असा झाला. जाण व अनुमान या व्यतिरिक्त उपमान (analogy) आणि शब्द (verbal authority) हे देखील प्रमाण मानले जाऊ लागले.


शब्द (न्याय), अणुवाद - पृथ्वी, तेज, वायु (वैशेषिक), गुण - सत्व, रज, तम (सांख्य), कर्म-फल (पुर्व-मिमांसा) आणी वरील काही गोष्टींची खिचडि करणारे मात्र सर्वात अधिक. remixes आणी fusion चा जमाना आहे यात शंका नाही. न्यायी लोकांची संख्या कमी होणे म्हणजेच सत्वाची तमा सोडुन कलीयुग ओढवुन घेणे



Tanyabedekar
Thursday, August 23, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

""""
भारतिय अध्यात्म म्हणते हे जीवन सत्-असत, चांगला-वाईट, सुख्-दुख्: याचा खेळ आहे जसे कुठे अधीक दीसेल तर कुठे उणीव असेलच कुणी श्रीमंत आहेत याचा अर्थ कोणी गरीब राहणारच ह्या सगळ्या Facts लक्षात घेउन, समजुनच एकंदरीत संतुलीत विचार मांडते त्याला माया म्हणतो आणी हीच त्याची सिद्धता आहे.
"""""

since when the creation of hypothesis itself translates into the proof of the same?
हीच श्रद्धा का?

"""
जसे सर्परज्जुच्या उदाहरणात एखाद्या व्यक्तिला ती दोरी हा सापच वाटतो तो त्यालाही नाकारत नाही. शिवाय प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक टेस्त
Abstract ह्या तर्कावरुनच समजुन घ्यावा लागतात.
"""

abstract तर्क म्हणजे काय? की एखादी गोष्ट abstract असे मानले की मग तिथुन पुढे तर्क लागु न होता गृहीतके सत्य बनतात?

मी भारतीय अध्यात्म शास्त्राचा संपुर्ण अभ्यास केला आहे असे मुळिच नाही. पण मी संपुर्ण अनभिज्ञदेखील नाही.

मझ्या मते तुला वाटते आहे की भारतीय अध्यात्मामध्ये जे सांगितले आहे त्याच्यावर मी पुर्ण विश्वास ठेवत नसल्याने मी त्याचा अनादर करत आहे किंवा ते मौलिक नाही असा माझा दृष्टीकोण आहे. पुरातन काळात भारतीय ऋषिमुनींनी जो विचार केला, वाद्-विवाद केले त्याबद्दल मला निश्चितच अभिमान आहे. पण केवळ अभिमान आहे म्हणुन ते बरोबरच आहे असे नव्हे. असो, ह्या विषयावर बरेच वेळा लिहुन झाले आहे.


Tanyabedekar
Thursday, August 23, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशावर अभिमान असणे, संस्कृतीवर अभिमान असणे, राजकीय, आंतरराष्ट्रीय (geopolitical) मते ह्या गोष्टी आणि देव आहे की नाही, भारतीय अध्यात्माने सांगितलेलेच सत्य आहे की नाही ह्या गोष्टी अतिशय भिन्न तसेच unrelated आहेत. संकृती, देश इत्यादीशी निष्ठावंत राहुनदेखील देव ह्या संकल्पनेबद्दल questioning करता येते. ह्या गोष्टी mutually exclusive नाहीत.

Tanyabedekar
Thursday, August 23, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"""""
वरील स्पष्टीकरण पुढे कधी कदाचित काही पिढ्यांनंतर सिध्द होईल, न होईल. मला ते आत्ताच मान्य आहे.
""""

जे आज सिद्ध नाही तरीही तुला मान्य आहे, असे का? मला कुतुहल आहे ते हे की सिद्ध न झालेल्या गोष्टींवर माणसाचा विश्वास का बसतो? (ह्यात कुठेही हेटाळणी नाही). आपण बाकी रोजच्या जगात सर्व गोष्टी तर्क लढवून, सिद्धता पाहुनच करतो उदा. लग्नाच्या वेळी मुलगा अथवा मुलगी बघणे, इंजिनीअरींगला प्रवेश, रस्ता क्रॉस करणे, भाजी विकत घेणे इ.इ.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators