Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 17, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 17, 2007 « Previous Next »

Maanus
Thursday, August 16, 2007 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक लिंक आजच्या NY Times मधुन.

There's a 20% Chance we're living in the Matrix

First para from artical...
Until I talked to Nick Bostrom, a philosopher at Oxford University, it never occurred to me that our universe might be somebody else 19s hobby. I hadn 19t imagined that the omniscient, omnipotent creator of the heavens and earth could be an advanced version of a guy who spends his weekends building model railroads or overseeing video-game worlds like the Sims.


Radha_t
Thursday, August 16, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय टाईम पास आहे. कल्पनाविलास कल्पनाविलास आणि कल्पना आणि विलास :-)

Chinya1985
Thursday, August 16, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशीग, दोन्ही मॉडेल्समधे खुप फ़रक आहे. एकिकडे हे मॉडेल्स प्रमाण मानले जातात उदा. तु दिलेली युनिव्हर्सच्या भव्यतेची, अणुंच्या संख्येची मॉडेल. जैवशास्त्रात अशी मॉडेल्स नाहित. जैवशास्त्रातिल मॉडेल्स म्हणजे भावनांचा अभ्यास एका object वर न करता अनेकांवर केला तर समजेल का अशा हेतुतुन राबविला जातो. इथे mathematical model प्रमाण नाहि. त्यांच तशा प्रकारच मॉडेलहि उपलब्ध नाहि. ते संशोधनातिल सोईसाठि वापरल जात. त्यामुळे भावना indirectly proove होतात शिवाय त्यांना mathematical basis नाहि त्यामुळे आध्यात्मिक अनुभवांप्रमाणे त्याही नाहित असे तुझे म्हणने proove होते.

तन्या,देवावर फ़क्त तु लिहिलेल्या गोष्टींसाठिच विश्वास ठेवत नाहि. असो.

विजयराव, psychologist कोण हे माहित नाहि पण जुलै महिन्यात आज तक आणि headlines today वर ते आले होते(तुम्ही त्यांच्या साईट्स तपासा आणि बघा नाव सापडले तर). तो कोण जेम्स रान्डि आहे तो skeptic असला पाहिजे,त्यामुळे तो कधीच मान्य करणार नाहि की पुनर्जन्म होउ शकतो. headlines today वर एका भारतिय skeptic शी त्या psychologist नी चर्चा केली. त्यात त्याने विचारले पुरावा काय तुमच्या थिरपिला??तर सायकोलॉगिस्ट म्हणाला की सायकोलॉज़ित फ़क्त एकच बेसिक थिरपि आहे जिला पुरावा आहे बाकी सर्व बिना पुराव्याच्या अनुभवांवर आधारित आहेत. थिरपिचा रुग्णाला उपयोग होतो ना हाच त्याचा पुरावा मानला जातो. त्यानंतर psychologist नी विचारल skeptic ला की पुनर्जन्म नसेल तर regression therapy उपयोगि कशी पडते तर त्या skeptic कडे काहिच उत्तर नव्हते.



Santu
Thursday, August 16, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या
सॉम पर्निआ वर लेख हा बीबीसी वर आला होता. bbc and life after death गुगल वर सर्च कर.
तन्या
reincaarnation गुरु डॉ.इयान स्टिवनसन head of department phsychiatry at verginia univercity usa यानी जवळ जवळ अश्या ३००० केसेस च अध्ययन केल आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार अशा लोकांना त्याच पुर्व आयुष्य जवळ जवळ सर्व आठवत होत. नंतर जर त्याच्या पुर्व आयुष्यातील गावि जावुन हि माहिति taaly केलि तर ति जुळत होति.

nimhans या पुनर्जन्म या विषयावर अभ्यास करणार्‍या संस्थे तिल एका शास्त्रज्ञा कडे दिल्लि तिल एक जगदिश मित्तल सेठ(७३)(हे निव्रुत्त एअर कमांडर आहेत.) यानि संपर्क साधला त्यांना आपला पुर्वजन्मातिल सगळे आठवत होते. त्यानि सान्गितले की त्यांचा पुर्व जन्म हा झेलुम पाकिस्तान येथे झाला होता. त्यांचे वडिल हे इरिगेशन खात्यात ईन्जिनिअर होते. त्याना हे हि आठवत होते की वडिलाचे वरिष्ठ हे (ब्रिटिश) श्री.मार्टिन हे होते. त्याना मागच्या जन्मात सात मुले. होती

याची खात्रि करण्यासाठि हे सर्व लोक पाकिस्तानात गेले.
तिथे श्री.सेठ यानी त्यांच्या मुलाला(गतजन्मातील)ओळखले. तो पण आस्चर्य चकित झाला. त्यानी त्याला आपला म्रुत्यु कसा झाला हे पण सांगितले( त्यांचा मागिल जन्मी म्रुत्यु आराम खुर्चित बसल्या बसल्या झा ला होता. परत त्यानी बर्‍याच लोकाना ओळखले.


Aschig
Thursday, August 16, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादी गोष्ट खरी केंव्हा होते तर ती universal बनली की. अध्यात्मीक अनुभव (उदा. देव दर्शन) खरे नसतात कारण ते universal नसुन personal असतात. त्या उलट काही "अध्यात्मिक" अनुभव उदा. अंगात येणे हे chemical/hormonal changes द्वारे कसे घडतात हे mathematically दाखवता येते. hypnosis देखिल याच प्रकारातील.

भावनांचे अचुक model अजुन आपल्याकडे नाही. पण म्हणुन त्या देवावर सोपवणे म्हणजे त्या क्षेत्रातील लोकांचा अपमानच होय.

Recommeded reading :
V S Ramachandran चे phantoms of the brain वरील पुस्तक.


Santu
Thursday, August 16, 2007 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता हे श्री सेठ काहि अडाणि नव्हेत. उलट उच्च विद्या विभुशीत आहेत.
व सुस्थी थीत आहेत. अशि बरिच उदाहरणे आहेत.

हे सर्व संशोधन केले आहे श्रिमति डॉ. सतवंत पसरिचा या additional profesar at dept of pschycology,national institute of metal health and nuro scinece bengalore यांचे आहे.

श्रीमति पसरिचा यांचा फोन नं. ९९-०८०-६९९५०००
त्यांची वेब साइट्-
http://www.nimhans.kar.nic.in

इयन स्टिवेन्सन यांची साईट्- http://childpastlives.org

एअर कमांडर जे.एम.सेठ यांचा नं ९१-०११-५७८८३५७

या साईट वर जावुन किंवा सेठ याना फोन लावुन आपण खात्रि करु शकता.

उगिच "अंतरा" सारखे उचललि जिभ लावली टाळ्याला असे नको. पण काय करणार काहि लोकांच्या स्वभावाला औषध नसते त्याला काय करणार.


Chinya1985
Thursday, August 16, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहिरे संतु. जाम भारि!!!!

अशीग मी कधिच भावनांना देवावर सोपवले नव्हते. उलट मी तर म्हणतो आहे की विज्ञानाला यात यश मिळेलहि पण सध्या तर भावना indirectly proove होतात आणि त्याला proove करणारे मॉडेलही नाहि तसेच काय असु शकते अशी सर्वमान्य थिअरिहि नाहि तर मग तुझ्या लॉज़िकप्रमाणे त्या नाहित हे सिध्द होते. तसेच पुनर्जन्माबद्दल तुझे म्हणने काय आहे??


Vijaykulkarni
Thursday, August 16, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पसरिचा या पुनर्जन्मा बद्दल नव्हे तर नीअर डेथ एक्स्पेरियन्स बद्दल सन्शोधन करतात.
हिन्दु माणसाना यम वगैरे दिसतात हा सन्स्काराचा परिणाम आहे. सत्य नव्हे.
सन्तु तुम्ही लिन्क दिलेली कारोल बोमन ही जॉन एडवर्ड्स सारखीच भोन्दू आहे.
पुनर्जन्माची भोन्दू सन्कल्पना म्हणजे शुद्राना दाखवलेले गाजर होते.
या जन्मात तुम्ही फारसे प्रश्न न विचारता आपले काम करा, पुढच्या जन्मी वरच्या वर्णात जन्म मिळेल :-)

The young subjects of these cases have been found most readily in certain parts of the world, such as South Asia
No surprises here .
http://www.rediff.com/news/1999/apr/06pas.htm


Santu
Thursday, August 16, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय
अरे हि लिन्क पहा यात डॉ.पसरिचा नी काय संशोधन ते दिले आहे.
http://www.lifepositive.com/mind/personal-growth/past-life-therapy/reincarnation.asp
उगिच पेडगाव ला जावु नको.

Tanyabedekar
Thursday, August 16, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु, तु जर ह्या विशयावरील संशोधन वाचुन इथे आपले मत मांडले असतेस तर जास्ती चांगले झाले असते. तुझ्या पोस्ट्स वरुन जाणवते आहे की तु एक वेब साइट वरील माहिती फक्त इथे पोस्ट करतो आहेस.

तु आधीही लाइफ आफ्टर डेथ हे पुस्तक रिचर्ड बेस्सेल यांचे आहे असे लिहिले होतेस. माझ्या अंदाजाने तु गूगल सर्च मारुन पहिली लिंक पोस्ट केलीस कारण तु ज्या विषयाबद्दल बोलतो आहेस त्याबाबत दीपक चोप्राचे पुस्तक आहे. आणि जर तु ते वाचले असतेस तर तु कधीच रिचर्ड बेस्सेलच्या पुस्तकाचा रेफरंस दिला नसतास (जे युरोपच्या १९४०-५० च्या इतिहासाबद्दल आहे).

आपल्या सर्वांना माहिती आहे की एका वेब पेज वरुन माहिती घेवुन तिला प्रमाण मानणे हे धोकादायक आहे. मला कुठेही स्टॅस्टिकल प्रमाणे-निश्कर्ष दिसले नाहीत. कुणी जर या विषयावर वाचले आहे आणि केले जाणारे प्रयोग, स्टॅस्टिकल अनालिसिस याची माहिती असेल, तर कृपया पोस्ट करावी.

मी तुमच्या मतांचा अनदर करत नाहीये. ज्या पद्धतीने तिच्यावर विश्वास ठेवला जातोय.. असो.. खुप वेळा झाले


Aschig
Thursday, August 16, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, भावना या internal असतात. तुमच्या reactions external असतात उदा. राग गिळता येतो. देवाचे पण तसेच जर असेल ( internal असणे) तर मला काही problem नाही.

पुनर्जन्मावर माझी मते मी अनेकदा अनेक details सहीत दिली आहेत. बहुदा "ज्ञान म्हणजे काय?" किंवा तत्सम BB वर होते. मला archives मध्ये नाही सापडले. MODs तुम्हाला आठवतोय का तो प्रकार? links मिळतील का?

थोडक्यात सांगायचे झाल्यास पुनर्जन्म असु शकत नाही. मी त्या विषयवर इथे बोलणार नाही. या BB शी तो वीषय directly connected नाही.


Chinya1985
Thursday, August 16, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अशीग, सर्व भावनांना external reactions नसतात. असो तुझ 'ते' वक्तव्य चुकिच होत हे तु मान्य करणार दिसत नाहि.
तन्या आणि अशीग मी पण पुनर्जन्मावर काहि गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याबद्दल काय वाटते??
पुनर्जन्म असु शकत नाही???का बुवा??
पुनर्जन्म का असु शकतो याच एक लॉजिक अस की आपल्यामधे जी चेतना असते ती पण एक प्रकारची energy असते. मग लॉ काय आहे- energy cann't be created nor can destroyed it can only be converted from one form to another . मग ही चेतना रुपी energy आपल्या शरिराच्या मृत्युनंतर दुसर्‍या शरिरात जाते(हे माझे वैयक्तिक मत आहे)


Antara
Thursday, August 16, 2007 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला म्हणतात सायंटिफ़िक बुवाबाजी! म्हणजे उगीच काहीतरी शास्त्रीय भासतील असे शब्द वापरून केलेली भोंदूगिरी. ही धार्मिक बुवाबाजीपेक्षा जास्त धोकादायक आहे.
बर आत्मा ही एनर्जी समजायची समजा. ती एका शरीरातून दुसरीकडे जाते, बर जाऊ द्यात. मग त्या आधीच्या फ़ॉर्म मधल्या आठवणी.. मेमेरीज त्या आत्मा रुपी एनर्जीने कशात 'कॅरी करायच्या' म्हणे या नव्या अवतारात? त्या तर त्या जुन्याच मेन्दू मधे असणार ना? ते नव्या मेन्दूमधे कसं येईल??की मेन्दू मधे मेमरी स्टोरेज वगैरे असं काही असतं हे मान्य नाही?
असो. तरीही आत्मा म्हणजे एनर्जी हे सायंटिफ़िक विधान केले ते फ़ार बरे झाले. आता बोला मग heat, electricity, magnitic energy इ प्रमाणेच आत्मा या एनर्जीला पण भावना, आठवनी इ मनुष्य विशेष नसणार च मग गेल्या जन्मा मधल्या आठवणी येणे, भावना हे कसं बुवा एक्स्प्लेन करता हे तुम्ही? उदा sound energy ला आपण electric energy मधे microphone ne convert केले तर ती electric energy असे लक्षात ठेवेल का की मी पूर्वी किनई sound होते असं??
आता जिभ उचलून टाळ्याला लावताना तुम्हीच विचार करा बर का :-)


Slarti
Thursday, August 16, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Does this chetana get affected by external factors ? Does the amount and nature of chetana differ from person to person ? Our population is increasing continuously. Does it mean each being is getting less and less chetana ?
मुख्य म्हणजे अध्यात्माला विज्ञानाचे नियम चालत नाहीत ना ? आणि चालत असतील तर कुठले वैज्ञानिक नियम लावायचे याचा निकष काय ? शिवाय जर ते नियम लागू होत असतील तर अध्यात्म हे विज्ञानाच्या कक्षेत येते असाही निष्कर्ष निघतो.
anyways, the real law states that the total mass and energy of an isolated system (e.g. universe) remains constant, one can be converted into other...
btw , सर्व भावनांचे बाह्य प्रदर्शन होत नाही हे खरे, पण तसे करणे ही त्या व्यक्तीची इच्छा असते म्हणून.

Chinya1985
Thursday, August 16, 2007 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरा,तुझ्यापेक्षा तरि लॉज़िकल विधाने करतो मी. आत्मा म्हणजे energy अस लिहिल नव्हत तर चेतना म्हणजे energy लिहिल होत. असो मी मुद्दाम लिहिल होत की हे वैयक्तिक विधान आहे. ते चुकिच असणार हे धरुनच नुसता तर्क केला होता. माझ चुकिच विधान बरोबरच कस हे दाखवण्यासाठी मी शाब्दिक खेळ करणार नाहि तुमच्यासारखा. regression therapy वरुन पुनर्जन्म आहे हे सिध्द होतेच नाहितर ती उपयोगि ठरलिच नसती.

सर्व भावना external येण्याइतक्या तिव्र नसतात.


Slarti
Thursday, August 16, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly. मला वाटते की आशिषसुद्धा हेच म्हणत आहे की भावना या internal असतात. शेवटी व्यक्तीच ठरवते की त्यांचे बाह्य प्रदर्शन करायचे का नाही हे. म्हणजे भावना तीव्र नसली तरीसुद्धा मी ठरवू शकतो की तिचे प्रदर्शन करायचे की नाही ते.
दुसरे म्हणजे regression therapy उपयोगी पडते म्हणून तिची सद्य कारणमीमांसा बरोबरच आहे हे थोडे घाईचे वाटते. पुनर्जन्म हा एक कार्यकारणभाव नक्कीच होईल, पण अजून काही असतील तर ? मला माहिती नाही, मी फक्त शक्यता विचारात घेत आहे. उदा. कैक गोष्टी समजून घेण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, predict करण्यासाठी classical mechanics उपयोगी पडते, यशस्वी ठरते. म्हणून त्यामागील absolute nature of time, deterministic world view आदी संकल्पना बरोबर ठरत नाहीत.


Vijaykulkarni
Thursday, August 16, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला म्हणतात सायंटिफ़िक बुवाबाजी! म्हणजे उगीच काहीतरी शास्त्रीय भासतील असे शब्द वापरून केलेली भोंदूगिरी.

दीपक चोप्रा सारखी. :-)


Radha_t
Friday, August 17, 2007 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरा पुनःर्जन्माबाबत तुला पडलेले प्रश्न मलाही नेहेमीच भेडसावतात पण त्याची समाधानकारक उत्तर कोणीच देत नाही.
सायंटिफ़िक बुवाबाजी!

BTW विषय भरकटतोय. देव म्हणजे काय? चेतना energy , चैतन्य, सर्वशक्तीमान का सगुण साकार ब्रह्मा विष्णू आणि महेश?

Santu
Friday, August 17, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरा
जिभ उचलुन टाळ्याला.)))))) आता तुझ बघ पडले तरि नाक वर
असेच आहे.
अग हे झालय ना. त्या सेठ ना विचार ना
बाबा अस का झाल तुला मागच का आठवलय म्हणुन.

अग आत्मा एनर्जी हे काय शेवटि माणसाने योजलेले शब्द आहेत.
देवा ने निर्माण केलेल्या काहि गोष्टिचा शोध लागाला म्हणुन "काही" माणसे
शेफ़ारुन गेलीत. तुला काय वाटते की आत्मा वैगेरेच्या propreaties काय computar सारख्या आहेत. की तु त्याची तुलना एखाद्या computar मेमरी या तु शिकलेल्या भाषेत करावी.

एक लक्षात ठेव की मेन्दुने कॉम्पुटर बनवला आहे पण अजुन कॉम्पुटर मेन्दु बनवु शकलेला नाहि.


Limbutimbu
Friday, August 17, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> पण अजुन कॉम्पुटर मेन्दु बनवु शकलेला नाहि
आणि नैसर्गिक पुनरुत्पत्तीशिवाय, एक मेन्दुही दुसरा मेन्दू बनवु शकलेला नाही! :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators