Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 15, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 15, 2007 « Previous Next »

Tanyabedekar
Wednesday, August 15, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजवर ह्या बीबी वर बरीच चर्चा झाली. आता नीट पाहिले तर ती गोल गोल फिरते आहे. मला वाटलेले सार असे:

देव ह्या कल्पनेचा पाया श्रद्धेवर उभा राहिलेला आहे. ही श्रद्धा लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण होते. उदा. संस्कार्- आई, वडील, शिक्षक, समाजातील इतर घटक हे लहानपणापासुन असे बिंबवितात की देव नावाची एक शक्ति आहे जे सर्वश्रेष्ठ आहे. तिची उपासना केल्याने कल्याण होते. जसा जसा मनुष्य मोठा होउ लागतो, तसे तसे त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी, कॉंप्लेक्सिटीज वाढत जातात. उदा: शाळा, अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, जवळच्या लोकांचे मृत्यु, स्वत:चे कुटुंब, ते पोसण्यासाठी करावे लागणारे कष्ट आणि धडपड, सतत वाढणार्‍या जबाबदार्‍या ई.ई. ह्याच बरोबर येणारे आनंदाचे प्रसंग. ह्या प्रत्येक पायरीवर, त्याच्या प्रयत्नांचे फळ हे अपेक्षित प्रमाणात मिळतेच असे नाही. अनपेक्षीत, त्याच्या दृष्टीने इनप्रपोर्शनेट फळ आयुष्यात एक मुलभूत अनिश्चितता पैदा करते कारण त्याच्या कृत्यांचे आउटकम तो १०० टक्के सफलतेने प्रेडिक्ट करु शकत नाही.

आपण ज्या समाजामध्ये, जगामध्ये राहतो, तिथे आज अनेक गोष्टी अनिश्चित आहेत. अनेक गोष्टींचे संपूर्ण आकलन झालेले नाही. सर्व गोष्टींचा कार्यकारणभाव उमजलेला नाही. तसेच स्वतला वगळता माणसाचा
(an individual or a group) बाकी कश्यावरही संपूर्ण कंट्रोल नाही. कारण प्रत्येक घटना (स्वतःबाबत तसेच स्वतच्या बाहेर घडणारी) ही तुमची कृती व इतर प्रत्येकाची कृती ह्याचे फंक्शन आहे
f(your action+action of every individual entity). प्रत्येक पुढचा क्षण हा ह्या मागच्या फंक्शनचे आउटपुट असते. पुढचा क्षण म्हणुन प्रेडिक्ट करणे हे आपल्या बुद्धीच्या कुवतीच्या बाहेर आहे (थेरॉटिकली कदाचित शक्य आहे. पण आज आपल्याला उपलब्ध साधनांच्या आधारे शक्य नाहीये). मग कोणाचा आधार घ्यायचा? साहजिकच अश्या गोष्टीचा आधार घ्यायचा जी कॉंस्टंट आहे, जिच्यावर वरील फंक्शन लागु होत नाही आणि जी काळाच्या ओघामध्ये नष्ट होत नाही. अशी गोष्ट (मी इथे सर्व ठिकाणी गोष्ट हा शब्द एंटिटी ह्या अर्थाने वापरत आहे) केवळ सिस्टमच्या बाहेर असु शकते. आणि ती संकल्पना म्हणजे देव. देव हा नष्ट होत नाही, काळाच्या ओघात तो बदलत नाही, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो सगळे कंट्रोल करत असल्याने त्याच्यावर वरील फंक्शन लागु होत नाही. ह्या सर्व गोष्टी देव ह्या संकल्पनेला निश्चित बनवतात आणि तो ही सिस्टम गव्हर्न करत असल्याने तो सर्वश्रेष्ठ बनतो.
संत महंत बाबा गुरु प्रेषित हे समजायला सोपे जातात आणि म्हणुन ते देवाचे अंश, मेसेंजर, देवावर गाढ श्रद्धा असणारे आणि त्यामुळे त्यांच्या भक्तांनाही त्या मर्गाने पुढे घेउन जाणारे, वाट दाखवणारे अश्या विविध रुपात पुजिले जातात.

मनुष्याची जशी जशी उत्क्रांती होत गेली तसे तसे त्याच्या हाताशी असलेली साधने (उदा. आग, मेटल, गणित, वैद्यक शास्त्र, विविध शास्त्रांच्या संयोगाने विअकसित होणारी नविन साधने व क्षेत्रे) अधिकाधीक इफेक्टिव्ह आणि केपेबल बनत गेली (आणि बनत आहेत). ह्या साधनांच्या आधारे तो त्याच्या भोवतालची अनिश्चितता, न उकललेले कार्यकारणभाव ह्यांची उत्तरे शोधत आहे. साहजिकच ह्या प्रवासात त्याला अजुन जास्ती कठीण प्रश्ण सामोरे येतात. ही प्रश्ण व उत्तरांची स्पर्धा आधी न उकललेल्या गोष्टींना आकलनीय बनवते व नवीन अनाकलनीय गोष्टींना जन्म देते. म्हणजे हे विज्ञान (आणि पर्यायाने त्याचा उपभोक्ता मनुष्य) निश्चित, सर्वज्ञानी व सर्वशक्तिमान एंटिटी बनु शकत नाहे. आता विज्ञान आणि त्यायोगे मनुष्य ह्या स्टेजला पोचेल का नाही हे सांगता येत नाही. कदाचित पोचेल जर ह्या विश्वातील प्रश्णांचे क्वांटम कॉंस्टंट आहे. जर हे विश्व प्रत्येक क्षणाला विस्तारत अथवा आकुंचित होत असेल तर समोर येणारे प्रश्ण हे कधीच संपणार नाहेत. जर काही कारणामुळे मनुष्य जात नष्ट झाली तर तिचा हा प्रवास पुर्ण झाला असे म्हणता येणार नाही. थोडक्यात अनेक शक्यता व आउटकम्स आहेत.

मृत्युची मनुष्याला उपजत भिती असते तसेच कुतुहल असते. कारण मनुष्य जो काही आहे तो त्याचे अस्तित्व आहे म्हणुन आहे. मेलो की अस्तित्व संपते आणि मग ह्या आयुष्यात जे जे काही केले, अस्तित्व ही अत्यंत सेंट्रल गोष्ट, त्याला काही अर्थच उरत नाही. ही कल्पनाच प्रत्येकाला पचायला, समजायला आणि मुख्य म्हणजे स्विकारायला अत्यंत अवघड असते. मग एटर्नल ब्लिसची (मोक्ष, स्वर्ग व त्यांचे काउंटरपार्ट पुनर्जन्म व नरक) स्वप्ने त्याला आणखी एका निश्चिततेकडे घेवुन जातात. एटर्नल ब्लिस बरोबरच मानसिक आधार आणि अनिश्चितता ह्या नेहेमीच परस्परविरोधी फॅक्ट्स त्याला एका विशिष्ट पद्धतीने जगण्यास प्रव्रुत्त करतात. त्यांना आपण धर्म अधवा पंथ म्हणतो (धर्म व संस्कृती ह्यांची गल्लत करु नका. धर्म मी इथे रिलिजन ह्या इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द म्हणुन वापरत आहे).

नास्तिक व अज्ञेयवादी अनिश्चिततेला जीवनाचा अविभाज्य भाग मानुन जगतात. ह्या अनिश्चिततेला सोल्युशन असेलच ह्याचेही निश्चित उत्तर ते देउ शकत नाहीत. पण म्हणुन ते आधारासाठी काल्पनीक गोष्टीच्या मागे धावत नाहीत.

देव ही एंटिटी, तिचा समाजावरील परिणाम ह्या गोष्टींचा मी इथे उल्लेख केला नाही कारण ते ह्या चर्चेशी सुसंगत नाहीत असे मला वाटते. असो, मी आता माझे चार शब्द संपवतो. :-)

जाता जाता आणखी एक सुविचार
:-)
"If there is a sin against life, it consist perhaps not so much in despairing of life as hoping for another life and in eluding the implacable grandeur of this life." Albert Camus

Santu
Wednesday, August 15, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या
तु जे म्हनतोयस कि माणुस मेला कि संम्पला ही गोष्ट पुर्ण पणे खरी
नाहिय.
२००० सालि डॉ.सॉम पार्निया हे southmpton genrel hospital येथे जवळ जवळ ६३ पेशंट चा त्यानि near death अश्या अनुभवाचा अभ्यास
केला तर हे सगळे जण "ब्रेन डेड" होते याना म्रुत म्हणुन घोषित केल्या नंतर परत हे "जिवंत" झाले. त्याअतिल काहि जणाना आपण शरिराअच्या
बाहेर आलो हे दिसले. आपले "म्रुत शरिर" त्यानी "बाहेरुन"पाहिले.
त्याना हे हि दिसले की डॉक्टर त्यांच्या वर उपचार करतायत नातेवाइक आक्रोश करतायत.

म्हणजे म्रुत होते ते शरिर "आपण" नाहि. असे बरेच अनुभव शास्त्रज्ञानी लिहुन ठेवले आहेत.
अगदि गेल्या महिन्यात एक उत्तर प्रदेशातिल एक अडाणी मजूर
अचानक अमेरिकन accent मधे english बोलु लागला. फ़टाफ़ट गणिते सोडवु लागला जि तो कधि शिकलाच नव्हता.
हे केवळ मागिल जन्माच्या स्म्रुतिने. कारण तो स्वथ;च तिथला पत्ता संगु लागला. हे सगले टिव्हि वर दाखवले होते.

भोपाळ मधिल एक बाई आहेत त्या प्रोफ़ेसर आहेत.त्याना मागचे दोन जन्माच्या स्म्रुति आहेत. त्याना आसामि बोलता येते ज्या कधी त्या शिकल्याच नाहित.तसेच त्यानि परत असाम मधे आपल्या पुर्व जन्मातिल पत्ता शोधुन काढला. तर गतजन्मी त्यांचा अपघाति म्रुत्यु झाला होता.
त्याची नोन्द सुध्दा तिथे


Santu
Wednesday, August 15, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलिस ठाण्यात आहे. तसेच बंगालदेशात त्याची फ़ाळणी च्या
वेळि काहि मुस्लिमानि हत्या केली हे सुध्दा त्याना अठवते. तिथे सुध्दा
अशे record आहे. हे सर्व पुन्र्जन्मातिल स्म्रुति मुळेच.

काहि संशोधकाच्या मते mind and conciusnes are independent of brain म्हनजे conisiusness हा मेदुवर अवलंबुन नसतो. तो कायम असतो
मग शरिर असो वा नसो. अशी हजारि उदाहरणे
तुम्हाला
http://www.lajarous.com या साइट वर मिळतिल कि ज्या
लोकांनि म्रुत्यु प्रत्यक्ष अनुभवला. तसेच life after death या पुस्त्कात लेखक richard bessel यानि पण अशि बरिच उदाहरणे दिलि आहेत.

Antara
Wednesday, August 15, 2007 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सगळ्या कथा शुद्ध भंपकपणा वाटतात. गणपती दूध प्यायला, सफ़रचंदात ख्रिस्त दिसला अशा सुरस कथा अगदी झटपट पसरतात जगात आणि नन्तर कोणीही त्याची शहानिशा न करता छातिठोकपणे त्याचे दाखले देउ लागतात! मूर्खपणाचे, अतार्किक अंधविश्वासाचे नमुने पहायचे असतील तर हा बिबि अगदी प्रातिनिधिक आहे! पूर्वजन्म!! आणि त्याच्या आठवणी!! महान

Santu
Wednesday, August 15, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरा
तुझ्या पेक्षा कमि भंपक आहेत.
मग तुज्या मताप्रमाणे विवेकानंद, रामक्रुष्ण परमहंस, वेडे आणि भंपक
ठरतिल.लाखो लोक जे श्रध्दे ने पंढरी ची वारी करणारे भंपक आणी
तुझ्या सारखी इन्ग्रजाळलेली मडड्म तेव्हढि शहाणी काय?

ते जर भंपक असते तर एखाद्या रोलॉ सारख्या नोबल पुरस्क्रुत तत्वज्ञ लेखाकाला
रामक्रुष्णावर चरित्र लिहावेसे वाटले नसते.
अर्थात काहि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या
लोंकाना देवाधार्माच्या विरुध्द बोलणे 'पुरोगामी" वाटते त्याला कोण काय करणार.

मुर्ख भंपक अशी विशेषणे देण्यापेक्षा आभ्यास पुर्वक मत मांडले तर बरे होईल.


Antara
Wednesday, August 15, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या सारखी इन्ग्रजाळलेली मडड्म >>>अरेच्या!सन्तु, मी शुद्ध मराठीत लिहिलेय मला काय म्हणायचे ते, इन्ग्रजाळण्याचे काय म्हणलात ते कळले नाही! देव धर्म न मानणे म्हणजे इन्ग्रजी(?!) अहो इन्ग्रजही (हो हो मड्डम पण) देवधर्म मानतात की:-O ते पण तेवढेच भंपक, अन्ध्श्रद्ध इ इ असू शकतात की देशी लोकांसारखेच :-)

Chyayla
Wednesday, August 15, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या, तुझी पोस्ट फ़ारच सुन्दर व विचार करण्यासारखी आहे यात शन्काच नाही. तुझा मानवी जीवनातील अनिश्चितता व त्यावर तु दीलेला तर्क छान आहे ह्या मुद्याव्यतिरिक्त कुणास ठाउक कुठे तरी काही कमतरता जाणवते. माझा संतुच्या पुराव्याना पण पाठींबा आहे खास करुन पुनर्जन्मासारख्या एक ना अनेक घटना घडल्याच्या प्रत्यक्ष नोंदी आहेत. ज्याला प्रामाणिकपणे वैज्ञानिक शोध घ्यायचा निदान तो तरी ह्या नोंदी नाकारु शकत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या अर्थी विधान करत आहेत ते सुद्धा अवैज्ञानिक का मानु नये? अद्नेयवादी, नास्तिक म्हणजे विज्ञानवादी नाही हे विधानही खरे असु शकते, कारण डोळस विज्ञानवादी शोध घेण्यासाठी कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणार नाही असे मला वाटते.

अजुन एक उदाहरण काही व्यक्तिन्ना घटना घडण्याच्या आधी त्याचा स्वप्न द्रुष्टांत होणे, उदाहरणार्थ सगळ्याना माहीत असलेले "नॉस्ट्रॅडेमस" ज्याचा सगळ्या नव्हे पण काही ठळक व प्रत्यक्ष घडलेल्या घटनांकडे कोणीच दुर्लक्ष करु शकत नाही. आपल्याकडेही अशा दृष्टांताच्या नोंदींची काहीच कमी नाही.

त्यामुळे तु ज्या स्पष्ट पण साचेबंद चौकटीत विचार करत आहे त्यापेक्षा वस्तुस्थिती वेगळीच आहे असे जाणवते.


Tanyabedekar
Wednesday, August 15, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे असे एकमेकांवर वैयक्तिक टिका-टिप्पणी करु नका. त्यामुळे उगाचच कडवटपणा येतो आणि संवाद कुठेतरीच भटकतो. असो.

संतु, हे ब्रेन डेड मधुन बाहेर आलेले लोक होते त्यांचे सर्वांचे अनुभव समान होते का? ते शरिरामधुन बाहेर पडल्यावर त्याच स्पेस मधे होते जिथे ते पुर्वी होते की आणखी कुठेतरी होते? असेही असु शकते की नातेवाइक आक्रोश करत आहेत हे त्यांचे हॅलुसिनेशन असु शकते (आपण मेल्यावर आपल्या मागे कोणितरी रडत आहे ही सुखद भावना असावी). तु उल्लेख केलेल्या डॉ. सॉम पार्नियांनी हे कुठेतरी लिहुन ठेवले असेल, एखादा रिसर्च पेपर तरी असेल. मला इंटरनेट वर तरी त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही. तु दिलेली लिंक उघडत नाहीये. घरी जाउन बघतो एकदा, कदाचित ऑफिस मध्ये उघडत नसावी (फायरवॉल मुळे). पण डॉ सॉम पार्निया नावाने एकही सेअर्च येत नाही गूगल मध्ये हे थोडे विचित्र आहे.

कुठल्या टीव्ही वर तु सांगितलेले अनुभव दाखविले. त्याची संपूर्ण शहानिशा, अभ्यास कोणी करत आहे का? असे बरेच अनुभव शास्त्रज्ञांनी लिहुन ठेवले आहेत असे तु म्हणतोस. असे शास्त्रज्ञ कोण कोण आहेत?

तु ज्या रिचर्ड बेसेल यांच्या लाइफ आफ्टर डेथ ह्या पुस्तकाचा उल्लेख केला आहेस ते पुस्तक दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान युरोपातील सामाजीक आणि सांस्कृतिक इतिहासाबद्दल आहे. त्या पुस्तकाची मला नेट वर मिळालेली माहिती अशी:

Cambridge University Press
0521804132 - Life after Death: Approaches to a Cultural and Social History of Europe
During the 1940s and 1950s
Edited by Richard Bessel and Dirk Schumann

Life after Death
APPROACHES TO A CULTURAL AND SOCIAL HISTORY
OF EUROPE DURING THE 1940s AND 1950s
This collection of essays offers a novel approach to the cultural and social history of Europe after the SecondWorldWar. In a shift of perspective, it does not conceive of the impressive economic and political stability of the postwar era as a quasi-natural return to previous patterns of societal development but approaches it as an attempt to establish “normality” on the lingering memories of experiencing violence on a hitherto unprecedented scale. It views the relationship of the violence of the 1940s to the apparent “normality” and stability of the 1950s as a key to understanding the history of postwar Europe. Although the history of postwar Germany naturally looms large in this collection, the essays deal with countries across Western and Central Europe, offer comparative perspectives on their subjects, and draw on a wide range of primary and secondary source material.

Richard Bessel is Professor of Twentieth-Century History at the University of York.
He is the author of Political Violence and the Rise of Nazism (1984) and Germany after
the First World War (1993), as well as editor of a number of collections, including
Fascist Italy and Nazi Germany: Comparisons and Contrasts (Cambridge, 1996). Since
1994 he has been co-editor of the journal German History.
Dirk Schumann is the Deputy Director of the German Historical Institute,
Washington, D.C. He has taught at the Ludwig-Maximilians-Universit¨at in
Munich, the Universit¨at Bielefeld, and Emory University. He is the author of
Bayerns Unternehmer in Gesellschaft und Staat, 1834–1914 (1992) and Politische Gewalt
in der Weimarer Republik 1918–1933 (2001).

ह्या पुस्तकाचे वरील वर्णन वाचुन असे वाटत नाहीये की या मध्ये पुनर्जन्माच्या गोष्टी असतील. तु खरेच हे पुस्तक वाचुन इथे लिहिले आहेस का? की तुला दिपक चोप्राचे Life After Death: The Burden of Proof by Deepak Chopra या पुस्तकाबद्दल लिहायचे होते.


Slarti
Wednesday, August 15, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या, good post . life after death असा गूगल मारला तर संतूने दिलेले Lazarous and Dr Sam Parnia हे संदर्भ आणि बाकीचेही बरेच संदर्भ दिसतील. BBC शिवाय NBC10 वरील बातमीचीही एक कडी आहे.
Lazarus या नावाला बायबलमधील एका कथेचा संदर्भ आहे. या माणसाला ख्रिस्ताने पुनर्जीवित केले.
हे अनुभव आणि त्या व्यक्तीचे धार्मिक, अध्यात्मिक विचार यांचा संबंध काय हेही बघावे लागेल. उदा. ख्रिस्ती लोकांना देवदूत दिसतात, तसे बौद्धांना दिसतात का ? इ.


Tiu
Wednesday, August 15, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<भोपाळ मधिल एक बाई आहेत त्या प्रोफ़ेसर आहेत.त्याना मागचे दोन जन्माच्या स्म्रुति आहेत. त्याना आसामि बोलता येते ज्या कधी त्या शिकल्याच नाहित.तसेच त्यानि परत असाम मधे आपल्या पुर्व जन्मातिल पत्ता शोधुन काढला. तर गतजन्मी त्यांचा अपघाति म्रुत्यु झाला होता. >>>

हे आणी कुठुन ऐकलत तुम्ही? ह्या असल्या ऐकीव माहीतीवर विश्वास ठेवणे, कुठेतरी वाचलेलं, कुणाकडुन तरी ऐकलेलं खरं समजणे ह्यालाच अंधश्रद्धा म्हणतात बहुतेक...

मी लहान असतांना प्रवासात बस मधे कधी कधी काही लोक पत्र वाटायचे...कुठल्या तरी देवाच्या नावाचे...म्हणजे हे पत्र तुम्ही जर १०० लोकांना वाटले नाहीत तर तुमच्यावर फ़ार मोठं संकट येईल...आमुक गावातल्या श्री. तमुक यांनी पत्र फ़ाडुन फ़ेकुन दिलं तर त्यांना व्यापारात खुप मोठं नुकसान झालं...आणी सौ. तमुक यांनी पत्र वाचुन दुर्लक्ष केलं तर त्यांच्या मुलाला एका आठवड्यात अपघात झाला...आणी तम्क्यानी फ़क्तं ५० लोकांनाच पत्रं वाटले तरी त्याला म्हणे १ लाखाची लॉटरी लागली वगैरे वगैरे....आणी काही लोकांना ते सगळं खरं वाटायचं!!!


Chinya1985
Wednesday, August 15, 2007 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती १८८५ साल हे जुनच आहे कारण भावनांचा अभ्यासाला सध्या वेग येउ लागला आहे. असो मी मागच्या पोस्टमधे लिहिल होत की विज्ञानाच्या लिमिटेशन्स दाखवायचा प्रयत्न नाहि. mathematical modelling जैवशास्त्रात संशोधनाचे साधन म्हणुन वापरले जाते खगोलशास्त्रात तसे नव्हे. या शास्त्रात ते प्रमाण म्हणुन पुरावा म्हणुन मानले जाते. तुम्ही माझि आणि अशिगची आधिचि चर्चा वाचलि नसावि. त्याच्या तर्काप्रमाणे भावनाही नाहित कारण ना त्यांचे बरोबर आकलन विज्ञानाला झाले आहे आणि ना अचुक असे mathematical model त्यासाठि उपलब्ध आहे. जे खगोलशास्त्राबद्दल तसेच इतर indirectly सिध्द केलेल्या गोष्टींबद्दल आहे.

तन्या, तुम्ही लोक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठि पुरावे मागता पण बिनापुराव्याचा पुर्ण मानवजातिच्या इतिहासाचा आढावा घेण तुम्हाला कस पटत??माझ म्हणन एकच की देवाला पुरावे मागता ना मग सगळिकडेच पुरावे मागा,आणि पुराव्याशिवाय एकहि स्टेटमेंट करु नका.

अंतरा तर अगदिच भलतिच स्टेटमेंट्स करते आहे. psychology मधे जगभरातिल psychologist regression therapy चा वापर करतात. त्यामागे असे शास्त्र आहे की ते रुग्णाच्या मागिल आयुष्यातिल trends वरुन मानसिक आजार बरे करतात. म्हणजे आपल्यात काहि psychological trends असतात कोणी भित्रा असतो,कोणि शांत असतो,कोणि रागिट,एखाद्याला एखाद्या गोष्टीची जन्मत्:च भिति असते वगैरे ह्या गोष्टी या जन्मातिल अनुभवांमुळे येउ शकतात उदा. अपघात झाल्यावर गाडि चालवण्याची भिती वाटणे. पण काहिकाहि गोष्टी जन्मत्:च असतात. तर त्याचा संबंध मागच्या जन्माशी related आहे का हे तपासणे आणि त्याप्रमाणे उपचार करणे हे या regression therapy तुन करतात. त्यामुळे पुनर्जन्म भंपकपणा नाहि हे अनेक psychologist पण treatment ची success बघितल्यावर मान्य करतात. मला फ़क्त इतकच म्हणायच आहे की बुध्दीप्रामाण्यवाद सगळिकडेच दाखवा. आधी शहानिशा करा पुनर्जन्माबद्दल आणि मग बोला. संतुने लिहिल्याप्रमाणे आज तक headlines today वर १ महिन्यापुर्वि अशी चर्चा झालि होती ज्यात एक परदेशी psychologist (नाव आठवत नाहि), ने येउन regression therapy बद्दल सांगितले होते. २मुले,१मुलगी,१महिला ज्यांना मागचे जन्म आठवतात त्यांना प्रश्न विचारुन ३ जण खरे बोलत आहेत आणि १ मुलिबद्दल(मागचा जन्म कल्पना चावला सांगते) doubt आहे असे डॉक्टरचे म्हणने होते. टिव्हिवर हे मागचा जन्म आठवणारे लोक खास बोलावुन आणले होते,त्यांची उलटतपासणि करण्यासाठि त्यांना खास प्रश्न विचारले होते त्यामुळे त्या ४ केसेस तरि अफ़वा नाहित हे नक्की.

मला असे वाटते की तन्याच्या म्हणयाप्रमाणे आमचा जसा देव आहे असा faith आहे तसाच तुमच्या मनातही देव नाहि असा faith आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता देवाशी संबंधित आहे ना मग चुकिचिच असणार मग करा विरोध अशी तुमची mentality दिसते. त्यामुळे जर आम्ही बुध्दीप्रामाण्यवादि नसलो तर तुम्हिहि नाहि हे विसरु नये.


Tanyabedekar
Wednesday, August 15, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, पुन पुन तेच तेच काय सांगायला लावतोस. तरी सुद्धा मी परत एकदा बोलतो. खुप आधी आश्चिगने लिहिले होते की नास्तिक हे सुद्धा देव न मानणारे आस्तिकच. माझ्या सर्व पोस्ट्स वाचल्यास तर मी देव नाहीच आहे असे नाही म्हणत. माझी भुमिका ही फ्रेम ऑफ रेफरंस, अस्तित्व अश्या वेगवेगळ्या बाबींमधुन मी मांडायचा प्रयत्न केला आहे.

my earlier post talks about the concept of GOD as certainty and why people accept this certainty. Agnost do not believe in this certainty. There are further elaborate theories about this. Tell me frankly, how many believers have read any literature which talks about agnosticism, objectivism, atheism and such other theories. Whereas you will find many non-believers here who have read geeta, have read commentries on upanishadas. I myself have read these scriptures (i did proof reading and discussion of braahmasutrashaankarbhaashya with my grandfather around 10 years back when he was editing it), along with this I have also read quran and some parts of bible. I kept my mind open to read these scriptures/books even though I may not believe in them. The firm belivers by nature of the belief shut down other possibilities.

I personally do not have any problems with believers. There are pros and cons as with all other theories. The whole point of this particular discussion was to discuss the concept and not its effect on mankind and society.

Regarding your comment that I have taken a sweep over the entire history of mankind. can you please explain where I have done so? You can dissect my each statement and the logical fallacy in them. I welcome that because I know that I do not know everything and what I say can/may be right or can/may be wrong. I dont have any qualms about my thinking being wrong. What I have tried to explain is the psychology behind the belief or shraddha. I have nowhere claimed anything without an explanation.

Vijaykulkarni
Wednesday, August 15, 2007 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असे वाटते की तन्याच्या म्हणयाप्रमाणे आमचा जसा देव आहे असा फ़ैथ फ़ैथ मेन्तलित्य

देव नाही असा फ़ेथ असू शकत नाही.
आणी एखाद्या गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास न ठेवणे याला अन्धस्रद्धा म्हणता येणार नाही.
मुळात वैज्ञानिक अन्धश्रद्धा हा शब्दच चुकीचा आहे. (लाल पिताम्बर किन्वा नवजात व्रुद्ध असा)

आधी शहानिशा करा पुनर्जन्माबद्दल आणि मग बोला.

अमेरिकेतल्या जेम्स रान्डी ( हा शब्द कसा लिहायचा? )
यानी थोडे थोडके नाही तर दहा लाख डोलर चे बक्शीस लावले आहे असल्या गोष्टी सिद्ध करणर्याला.

त्यामुळे पुनर्जन्म भंपकपणा नाहि हे अनेक पण ची बघितल्यावर मान्य करतात

कोण बरे हे सायकोलोजिस्ट



Peshawa
Wednesday, August 15, 2007 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी एखाद्या गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास न ठेवणे याला अन्धस्रद्धा म्हणता येणार नाही.>>>

Interesting statement given that not everything can be proven in a given closed system. then to belive that a proof can be obtained for so an so in a system is a type of andhashradha or may be not ;-)

to prove the existance of god as it is defined (omni this and that) is not possible under current scenario. To prove god one has to be either god him/herself or something that encompasses the god...

and here I think one can experience the godhood by using 'aham bramhasmi' concept. In a given closed system that a human brain can simulate one tries to be that system in whole and experience its implications and functioning in full the realization one achives by doing this 'simulation' is probably closest one can get to the understanding of the God entity if at all it exists...


Prafull
Wednesday, August 15, 2007 - 10:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dr. Ian Stevenson has put a lot of time and efforts to study various cases of reincarnation. He is considered an authority on this subject. You will find lots of information about his research papers on the internet.

Prafull
Wednesday, August 15, 2007 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Doctors or scientists have not been able to prove that self(ego, I) exist in the body. (and most probably it will never be proven)There is no mathematical model to define self. Considering all this, scientifically , "I" do not exist, what exists is a group of cells called as human body.
Now tell this to an illeterate villager and he/she will laugh. Because his/her experience of the SELF is more genuine than theoritical arguements.
On similar grounds, in the chaos of energy and matter we call as universe there is a self that resides within and without. There are people that experience this unity/sigularity of the universe. After seeking such experince dnyaneshvar mauli says " विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ".
One has to decide if one should ignore those words considering them his hallucination or to confirm it by seeking similar experience.


Slarti
Wednesday, August 15, 2007 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> To prove god one has to be either god him/herself or something that encompasses the god...

I was an atheist until I realised I am God.

Vijaykulkarni
Wednesday, August 15, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I was an atheist until I realised I am God

no, silly, I am God.

Aschig
Thursday, August 16, 2007 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही माझि आणि अशिगची आधिचि चर्चा वाचलि नसावि. त्याच्या तर्काप्रमाणे भावनाही नाहित कारण ना त्यांचे बरोबर आकलन विज्ञानाला झाले आहे आणि ना अचुक असे mathematical model त्यासाठि उपलब्ध आहे. जे खगोलशास्त्राबद्दल तसेच इतर indirectly सिध्द केलेल्या गोष्टींबद्दल आहे.

Chinya, I do not think I said so. Can you please point out?
Indirect proofs are fine with me so long as they have mathematical basis. I may have said emotions are personal. But as slarti says, even those are being mathematically modelled. That may take the fun out of it, but it will be still real.

Vijaykulkarni
Thursday, August 16, 2007 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Three years ago, the British evolutionary biologist Richard Dawkins became a guinea pig in an experiment. Neuroscientist Michael Persinger claimed he had induced religious experiences in subjects by stimulating specific regions of their brains with electromagnetic pulses. Dawkins, renowned for his biological theories as well as for his criticism of religion, volunteered to test Persinger's electromagnetic device—the "God machine," as some journalists dubbed it. "I've always been curious to know what it would be like to have a mystical experience," Dawkins said shortly before the experiment. Afterward, he admitted on BBC that he was "very disappointed" that he did not experience "communion with the universe" or some other spiritual sensation.

http://www.discover.com/issues/dec-06/features/god-experiments/?page=1


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators